2027 मध्ये ‘सुपर एलनिनो’चा धोका! बीडमध्ये दुष्काळ टाळण्यासाठी आ. संदीप क्षीरसागर ॲक्शन मोडमध्ये

बीड — जागतिक हवामान तज्ञांनी सन २०२७ मध्ये ‘अलनिनो’ परिस्थिती निर्माण होऊन भीषण दुष्काळ पडण्याचा अंदाज वर्तविला आहे. संभाव्य दुष्काळाच्या पार्श्वभूमीवर आ.संदीप क्षीरसागर ॲलर्ट मोडवर आहेत. या अनुषंगाने बीड शहर आणि परिसरातील गावांमध्ये पाणीपातळी वाढविण्यासाठी बीड शहरातील बिंदुसरा नदीवर, काम सुरू असलेल्या पूल कम बंधार्‍याच्या माध्यमातून पाणी अडविण्यासाठी नियोजन सुरू आहे. याबाबत सोमवारी (दि.२७) रोजी आ.क्षीरसागर यांनी बैठक आयोजित केली आहे.
                   सन-२०२७ मध्ये जागतिक हवामान तज्ञांनी ‘सुपर अलनिनो’ निर्माण होऊन भारतावर गंभीर दुष्काळी परिस्थिती निर्माण होण्याचा अतिसंभाव्य धोका सांगितला आहे. त्या पार्श्वभूमीवर आ.संदीप क्षीरसागरांनी दुष्काळी परिस्थितीचा सामना करण्यासाठी नियोजन करण्यास सुरुवात केली आहे.बीड शहर, हद्दवाढ भाग आणि शहरालगतची गावे यामध्ये पाणी पातळी वाढविण्यासाठी तातडीने उपाययोजना करण्यावर भर दिला असून त्यासाठी आ.संदीप क्षीरसागर, माजी आ.सय्यद सलीम नियोजन करत आहेत.

बेल्ट टाकून याच पावसाळ्यात पाणी अडविण्याचे नियोजन

                  बीड शहरात पूल कम बंधार्‍याचे काम सध्या सुरू आहे. हे काम प्रगतीपथावर असून सदरील काम पूर्ण होण्यासाठी आणखी बराच वेळ लागण्याची शक्यता आहे.परंतु पुढच्या वर्षी अतिसंभाव्य असलेल्या दुष्काळातून निर्माण होणारी पाणीटंचाई टाळण्यासाठी याच पावसाळ्यात बंधारा कामाच्या ठिकाणी बेल्ट टाकून याच पावसाळ्यात किमान १ ते १.५० कि.मी. पर्यंत पाणी अडविण्यासाठी योजना करणार असल्याचे आ.क्षीरसागर यांनी सांगितले आहे.

सोमवारी होणार संयुक्त बैठक

यासंदर्भात सोमवारी (दि.२७) रोजी पूल कम बंधारा कामाची अंमलबजावणीसाठी असलेले प्राधिकरण राष्ट्रीय महामार्ग विभाग, जलसंधारण विभाग आणि संबंधित विभाग यांच्या संयुक्त बैठकीचे आयोजन करण्यात आले आहे.

Related Articles

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Stay Connected

0FansLike
0FollowersFollow
0SubscribersSubscribe

Latest Articles