या बातमीत काय वाचा:
सतीश चव्हाण यांचा खरा चेहरा
सतीश चव्हाण पदवीधर निवडणूक पुन्हा चर्चेत आली आहे. पदवीधरांचा कष्टकरी बाप रडतोय ढसढसा; सतीश चव्हाण च्या गुलगुल्यासाठी पालकमंत्र्यांची सभा होत आहे. बीड सह मराठवाडा भीषण दुष्काळाने होरपळत असताना ही निवडणूक सतीश चव्हाण यांच्यासाठी अवघड होणार आहे….!
बीड — सध्या बीड सह मराठवाडा भीषण दुष्काळाने होरपळत असताना पदवीधरांचा बाप कुठे फाशी घेताना तर बांधावर बसून ढसाढसा रडत असतानाचे विदारक चित्र पाहायला मिळत आहे. मात्र अठरा वर्ष आमदार राहून पदवीधरांच्या प्रश्नावर निवडून येताच न तोंड उघडणारे सतीश चव्हाण यांच्या प्रचारासाठी बीडमध्ये सभा होत आहे.
विशेष म्हणजे भीषण दुष्काळी परिस्थिती असताना शेतकऱ्यांच्या बांधावर जाऊन त्यांचे अश्रू पुसण्यासाठी न फिरकलेल्या पालकमंत्री सुनेत्रा ताई पवार “तुम्ही मरा तसेच उपाशी; विजयाचा गुलगुला द्या आम्हा पाशी” असं म्हणत पदवीधरांना साकडं घालणार आहेत.
स्व. अजित दादा पवार पालकमंत्री असताना कुठेतरी बीडचा विकास बारामती सारखा होईल याची शाश्वती होती. त्यासाठी बारामतीच्या गुत्तेदारांची फौज त्यांनी बीड जिल्ह्यात आणून विकासाची काम सुरू केली. त्यावरही कोणी आक्षेप घेतला नाही. त्यांच्यानंतर पालकमंत्री सुनेत्रा ताई पवार बीड कडे लक्ष देतील ही अपेक्षा होती मात्र ती देखील सपशेल फेल ठरली.सध्या मराठवाडा भीषण दुष्काळाने होरपळत आहे.
भीषण दुष्काळात पदवीधरांचा संताप
शेतातील उभ्या पिकांची राखरांगोळी झाली आहे.
जनावरांच्या चाऱ्याचा, जीवन कसं जगायचं याचा,
भीषण पाणीटंचाईचा प्रश्न भेडसावत आहे. मुलांना पदवीधर करण्यासाठी घ्यावं लागलेलं कर्ज, मुलीच्या लग्नासाठी, शेती पिकवण्यासाठी घेतलेलं कर्ज कसं फेडायचं याची चिंता लागली आहे.
पदवीधरांचे कुठलेच प्रश्न सत्तेत राहूनही अठरा वर्ष आमदारकी भोगूनही आ.सतीश चव्हाण सोडवू शकले नाहीत. मग बेरोजगार असलेला पदवीधर त्याच्यावर देखील दुष्काळाने टाहो फोडण्याची वेळ आली आहे. काहीच जमत नाही म्हणून ना विलाज म्हणून शेती करणारा पदवीधर देखील या भीषण संकटाचा सामना करत आहे.
विशेष महत्त्वाची बाब म्हणजे सुनेत्रा ताई पवार या उपमुख्यमंत्री आहेत तसेच शेतकरी आत्महत्येतून नावारूपाला आलेल्या ऊसतोड कामगारांच्या बीड जिल्ह्याच्या त्या पालकमंत्री आहेत. उभ पीक करपलं शेतकऱ्याच्या आतड्याला पीळ पडला. मात्र याच सुनेत्रा ताई पवार पालकमंत्री या नात्याने बीड जिल्ह्यात शेतकऱ्यांच्या बांधावर फिरकल्या नाहीत.
आजपर्यंत मराठवाड्यातील एकाही शेतकऱ्याला दमडीची देखील मदत मिळाली नाही. शेतकऱ्यांनो “धीर खचू देऊ नका; सरकार तुमच्या पाठीशी आहे” असं म्हणून आश्वासनाची गाजरं सत्ताधारी म्हणून तुमच्याकडून दाखवली जात आहेत.त्याच उपाशी राहायची वेळ आलेल्या शेतकरी पदवीधरांच्या तसेच त्यांच्या बापाचे अश्रू पुसण्याची देखील क्षमता पालकमंत्री म्हणून तुमच्यात नसेल तर तुमच्या म्हणण्यावर उपाशीपोटी असणाऱ्या पदवीधरांनी मतदान का करावं हा मोठा प्रश्न निर्माण झाला आहे.
आज पर्यंत मराठवाड्यातला पदवीधर आज ना उद्या तरी बेरोजगारीचा प्रश्न आ. सतीश चव्हाण सोडवतील किमान पदवीधरांच्या प्रश्नाचा आवाज बनतील अशी नको ती अपेक्षा ठेवून प्रत्येक वेळी
…मताचा दान सतीश चव्हाण यांच्या झोळीत टाकत आला.
पण प्रत्येक वेळी पदवीधरांच्या पदरी निराशात आली…
सतीश चव्हाण यांच्या झोळीत टाकत आला. पण प्रत्येक वेळी पदवीधरांच्या पदरी निराशात आली. निवडून येताच गुलगुले गुलगुले खाण्यात आजपर्यंत ते व्यस्त राहिले. पदवीधर जगला काय मेला काय याकडे त्यांनी डुंकूनही पाहण्याची तसदी घेतली नाही.
5 Shocking कारणे – पराभव का होणार?
त्यामुळे 2008 मध्ये सतीश चव्हाण पहिल्यांदा आमदार झाले त्यावेळेस पासून आज पर्यंत पदवीधरांच्या प्रश्नांमध्ये कुठलाच बदल झाला नाही. उलट तीन टर्म चा कालावधी उलटून देखील आज पदवीधरांची परिस्थिती भीषण बनली आहे. याला काही अंशी का होईना आमदार सतीश चव्हाण जबाबदार नाहीत काय?

सतीश चव्हाण पदवीधर निवडणूक – पेपर फुटी प्रकरणात तोंडाला चिकटपट्टी का?
शेतकऱ्याची पदवीधर पोरं बापाचे पांग फेडावे म्हणून पुण्यासारख्या ठिकाणी फुटाणे खाऊन अर्धपोटी स्पर्धा परीक्षांचा अभ्यास करत आहेत. बापही आपलं पोर स्पर्धा परीक्षेतून यशस्वी होईल आपले पांग फेडील आपल्या वाट्याला आलेले काबाड कष्ट त्याच्या वाट्याला येऊ नये एवढीच आशा ठेवून पोटाला चिमटा घेऊन पोराला पैसा पुरवत आहे.
पण राज्यात झालेल्या स्पर्धा परीक्षांच्या पेपर फुटीत अनेकांची स्वप्न धुळीला मिळाली. अनेक पदवीधर नैराश्येच्या गर्तेत अडकले आहेत. अनेकांना जीव नकोसा झाला आहे. हीच पेपर फुटी होऊ नये यासाठी आंदोलन करत आहे.
अशावेळी पदवीधरांचे आमदार या नात्याने सतीश चव्हाण यांनी काय भूमिका घेतली हा मोठा प्रश्न निवडणुकीच्या तोंडावर निर्माण झाला आहे. “पदवीधरांनो तुम्ही तिकडेच बोंबलत बसा आम्ही भरतो आमचा खिसा” एवढीच भूमिका त्यांची राहिली आहे. बेरोजगार पदवीधरांच्या हक्कावर ते आजपर्यंत फक्त भाषणच ठोकत आले आहेत. पेपर फुटी प्रकरणात रस्त्यावर उतरून त्यांनी आंदोलन करण्याची गरज असताना ते आंदोलनाकडे फिरकले नसल्याचा आरोप सातत्याने होत आहे.
आमदार सतीश चव्हाण आपल्या विस्तारलेल्या शिक्षण संस्थांचे जाळे संभाळण्यातच व्यस्त असताना आमदारकीचा फायदा पदवीधरांपेक्षा स्वतःच्या साम्राज्यासाठी कसा होईल याकडेच त्यांचे लक्ष राहिले आहे. त्यामुळेच 2008 ते 2026 या अठरा वर्षाच्या कालावधीत पदवीधर त्याचे प्रश्न कधीच वाऱ्यावर त्यांनी सोडून दिले आहेत हे वास्तव चित्र पाहायला मिळत आहे.
पदवीधरांच्या शेतकरी बापाचे अश्रू पुसण्याचीही तसदी न घेतलेल्या पालकमंत्री सुनेत्राताई पवार, निवडून येताच पदवीधरांना वाऱ्यावर सोडून देणाऱ्या आ. सतीश चव्हाण यांना पदवीधर या निवडणुकीत तरी कितपत साथ देतील हा मोठा प्रश्न निर्माण झाला आहे.
सतीश चव्हाण पदवीधर निवडणूक : वास्तव काय?
बीडमध्ये दुष्काळाने शेतकरी बाप ढसाढसा रडत असताना सतीश चव्हाण पदवीधर निवडणूक मध्ये फक्त आश्वासनांचे गाजर दाखवत आहेत. पदवीधर तरुण बेरोजगार आहे, बापाच्या शेतात पाणी नाही, पण चव्हाणांना फक्त मतांची चिंता आहे.
सतीश चव्हाण पदवीधर निवडणूक च्या काळातच का सक्रिय होतात? मागील 10 वर्षात पदवीधरांसाठी त्यांनी नेमके काय केले? हा सवाल आज प्रत्येक पदवीधराचा बाप विचारत आहे.
अधिकृत माहितीसाठी : भारत निवडणूक आयोग
हे ही वाचा : बीड जिल्ह्यातील दुष्काळाच्या बातम्या

