Home Blog Page 51

बीडमध्ये मोठी चोरी! सुभाष रोडवरील मोबाईल दुकान फोडून 35 लाखांचा माल लंपास

0

बीड —  शहरातील सुभाष रोड परिसरात असलेल्या श्री साई मोबाईल शॉपी या दुकानात अज्ञात चोरट्यांनी मध्यरात्री धाडसी चोरी केल्याची घटना उघडकीस आली आहे. या घटनेत तब्बल ३० ते ३५ लाख रुपये किमतीचे मोबाईल फोन चोरीला गेले असून, चोरटा सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाला आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, हे दुकान सचिन रासणे यांच्या मालकीचे असून, शनिवारी (दि.१८) मध्यरात्रीच्या सुमारास चोरट्याने दुकानाच्या शटरचा सेंटर लॉक तोडला. त्यानंतर शटर उचकटून आत प्रवेश करत दुकानातील विविध नामांकित कंपन्यांचे महागडे मोबाईल एका पिशवीत भरून फरार झाला.
घटनेनंतर सकाळी चोरी उघडकीस आली. शहर पोलीसांनी तात्काळ घटनास्थळी धाव घेत पाहणी केली. तसेच श्वान पथकाला देखील पाचारण करण्यात आले. सीसीटीव्ही फुटेजच्या आधारे आरोपीचा शोध सुरू आहे.
विशेष म्हणजे, अक्षय तृतीया सारख्या सणाच्या दिवशीच सुभाष रोडसारख्या गजबजलेल्या भागात ही मोठी चोरी झाल्यामुळे व्यापाऱ्यांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.

MPSC ‘निपुण सेतू’ योजना: स्पर्धा परीक्षार्थींसाठी मोठी संधी, सरकारी खासगी नोकऱ्यांचे नवे दरवाजे खुले

0

मुंबई — महाराष्ट्रातील स्पर्धा परीक्षा देणाऱ्या लाखो विद्यार्थ्यांसाठी मोठी दिलासादायक बातमी समोर आली आहे. महाराष्ट्र लोकसेवा आयोग (MPSC) च्या भरती प्रक्रियेत ‘निपुण सेतू’ योजनेद्वारे महत्त्वपूर्ण बदल करण्यात आले आहेत. या निर्णयामुळे उमेदवारांना केवळ सरकारी नोकरीपुरते मर्यादित न राहता खासगी क्षेत्रातही करिअरच्या नव्या संधी उपलब्ध होणार आहेत.

राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत या योजनेला मंजुरी देण्यात आली असून भरती प्रक्रिया अधिक सुलभ, पारदर्शक आणि वेगवान होण्याची अपेक्षा आहे. अनेक वर्षे मेहनत करूनही शासकीय नोकरी मिळवण्यात अपयशी ठरणाऱ्या उमेदवारांसाठी हा निर्णय मोठा दिलासा ठरणार आहे.

 ‘निपुण सेतू’ योजना काय आहे?

केंद्रीय स्तरावरील Union Public Service Commission (UPSC) च्या ‘प्रतिभा सेतू’ प्रणालीच्या धर्तीवर महाराष्ट्रात ‘निपुण सेतू’ योजना राबवली जाणार आहे.या योजनेद्वारे स्पर्धा परीक्षेत चांगले गुण मिळवलेल्या उमेदवारांची माहिती थेट खासगी कंपन्यांपर्यंत पोहोचवली जाईल. म्हणजेच, सरकारी नोकरी न मिळाल्यासही गुणवंत उमेदवारांना नामांकित कंपन्यांमध्ये नोकरी मिळण्याची संधी वाढणार आहे.

 मोठे बदल काय आहेत?

🔴MPSC मार्फत घेतल्या जाणाऱ्या संवर्गांची संख्या 53 वरून 100 हून अधिक करण्यात येणार

🔴एकाच गुणांच्या आधारे इतर समकक्ष पदांसाठी संधी

🔴वारंवार परीक्षा देण्याची गरज कमी

🔴प्रतीक्षा यादीतील उमेदवारांना अधिक संधी

🔴भरती प्रक्रिया अधिक वेगवान आणि पारदर्शक

 खासगी क्षेत्रासाठीही खुला मार्ग

या निर्णयातील सर्वात महत्त्वाचा बदल म्हणजे आता MPSC च्या गुणांच्या आधारे खासगी कंपन्यांनाही गुणवंत उमेदवारांची निवड करता येणार आहे.यामुळे मोठ्या उद्योगसमूहांमध्ये करिअर करण्याचा मार्ग खुला होणार असून राज्यातील रोजगार संधींमध्ये वाढ होण्याची शक्यता आहे.

 विद्यार्थ्यांसाठी फायदे

सरकारी आणि खासगी दोन्ही क्षेत्रात संधी,वेळ आणि मेहनतीची बचत,करिअरच्या पर्यायांमध्ये वाढ,गट ‘क’ संवर्गातील भरतीसाठी मोठी संधी

 विद्यार्थ्यांचा प्रतिसाद

स्पर्धा परीक्षार्थी विद्यार्थ्यांनी या निर्णयाचे स्वागत केले आहे. विशेषतः MPSC मार्फत गट ‘क’ संवर्गातील भरती वाढवण्याची मागणी पूर्ण होत असल्याने अधिकाधिक उमेदवारांना संधी मिळणार, अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे.

निपुण सेतू’ योजना ही फक्त भरती प्रक्रियेत बदल नाही, तर विद्यार्थ्यांच्या करिअरला नवे आयाम देणारी मोठी क्रांती ठरणार आहे. सरकारी आणि खासगी क्षेत्रातील संधी एकाच प्लॅटफॉर्मवर उपलब्ध करून देत ही योजना महाराष्ट्रातील रोजगार व्यवस्थेत मोठा बदल घडणार आहे.

केजमध्ये धक्कादायक प्रकार! सावत्र आई मुलासोबत फरार; नात्यांचा गुंता चर्चेत

0

केज (बीड) – तालुक्यातील एका गावात नात्यांना काळिमा फासणारी धक्कादायक घटना समोर आली आहे. सावत्र आई आणि मुलगा एकमेकांच्या प्रेमात पडून घरातून फरार झाल्याने परिसरात खळबळ उडाली आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, संबंधित एका इसमाला दोन मुले आणि दोन मुली असून मुलींची लग्ने झाली आहेत. पती-पत्नीतील वादामुळे पहिली पत्नी मागील १५ वर्षांपासून वेगळी राहत आहे. दोन्ही मुले वडिलांसोबत राहून शेती करत होती. दरम्यान, चार वर्षांपूर्वी त्या इसमाने एका परित्यक्ता महिलेसोबत दुसरे लग्न केले. ही महिला आणि पतीची मुले एकत्र राहत होती. मात्र १२ एप्रिल रोजी पती मुंबई येथे देवदर्शनासाठी गेल्यानंतर, १५ एप्रिल रोजी सावत्र आई आणि मुलगा एकत्र पळून गेल्याची घटना उघडकीस आली.

पोलिसांत तक्रार

या प्रकरणी पतीने केज पोलिस ठाण्यात तक्रार दाखल केली असून सहाय्यक पोलिस उपनिरीक्षक बाबासाहेब बांगर तपास करत आहेत. दरम्यान पळून जाण्यासाठी वापरलेली मोटारसायकल ही त्या इसमाच्या जावयाच्या नावावर असल्याचे समोर आले आहे. विशेष म्हणजे, तेलंगणातील गच्चीबोली येथे वाहतूक नियमांचे उल्लंघन केल्याबद्दल १,२३५ रुपयांचा दंड झाल्याचा मेसेज जावयाला प्राप्त झाला आहे.

नात्यांचा गुंता

या घटनेमुळे कुटुंबात नात्यांचा विचित्र गुंता निर्माण झाला आहे. “बायकोला सून म्हणावे की बायको?” असा प्रश्न संबंधित व्यक्तीसमोर निर्माण झाला आहे.

गेवराई मतदार संघ पाणीदार करणे हेच माझे ध्येय — अमरसिंह पंडित

0

गेवराई —  गेवराई विधानसभा मतदारसंघ जलसिंचनाच्या माध्यमातून पाणीदार करणे हेच आपले ध्येय असून शेतकऱ्यांचा शेतीचा आणि पिण्याच्या पाण्याचा प्रश्न प्रकल्प जलशारदाच्या माध्यमातून निकाली निघणार आहे. मतदारसंघांमध्ये यापूर्वी सिंदफणा नदीवर बंधारे उभारून आपण जलसिंचन क्षमता वाढवली असून या पुढील काळातही पाण्यासाठी कायम काम करत राहू अशी ग्वाही माजी आमदार अमरसिंह पंडित यांनी दिली. प्रकल्प जलशारदा अंतर्गत बंगालीपिंपळा आणि म्हांडुळा येथे नाला खोलीकरण व रुंदीकरणाचा शुभारंभ करताना ते बोलत होते.

माजी आमदार अमरसिंह पंडित यांच्या शुभहस्ते प्रकल्प जलशारदा अंतर्गत गेवराई तालुक्यातील मौजे बंगाली पिंपळा आणि म्हांडुळा येथे नाला खोलीकरण व रुंदीकरणाच्या कामाचा शुभारंभ करण्यात आला. यावेळी नाम फाऊंडेशनचे मराठवाडा विभागीय समन्वयक राजाभाऊ शेळके, दत्तात्रय गर्जे, योगेश रसाळ, बंगालीपिंपळ्याचे सरपंच बाळासाहेब गायकवाड, उपसरपंच तुकाराम तळतकर, माजी पंचायत समिती सदस्य हिम्मत खरात, संजय तळतकर, दिलसुख चौधरी, माजी उपसरपंच महादेव कारंडे, सुधीर माने, अंबादास चौधरी, पांडुरंग तळतकर, संतराम गावडे, भाऊसाहेब कारंडे, सुनील चौधरी , प्रल्हाद धुमाळ, बाळाभाऊ सोलंकर शहादेव सजगणे, विष्णुपंत चौधरी, बाळासाहेब तळतकर, सखाराम चौधरी व महांडुळा येथील लहूराव ढोबळे, शेख अहमद, ढोबळे मच्छिंद्र, मुंजामिल शेख, शेख आलम, अण्णासाहेब घारगे, काकासाहेब घारगे, कांता माने, विठ्ठल माने, शेख हमीद, शेख हुसेन आदी पदाधिकारी, ग्रामस्थ व राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.

यावेळी बोलताना अमरसिंह पंडित पुढे म्हणाले की, नाम फाऊंडेशन, शारदा प्रतिष्ठान आणि महाराष्ट्र शासनाच्या गाळमुक्त धरण व गाळयुक्त शिवार या योजनेतून ही कामे होणार आहेत. गेवराई तालुक्यात मौजे गोविंदवाडी, भेंडटाकळी, धानोरा यांसह आदी ठिकाणी लवकरच कामांचा शुभारंभ करण्यात येणार असल्याचे त्यांनी यावेळी सांगितले.

गेवराई सारख्या सततच्या दुष्काळ आणि आवर्षण प्रवण भागात सिंचनाच्या सुविधा वाढाव्यात, पाण्याच्या पातळीत वाढ व्हावी या दृष्टीकोनातून मागील अनेक वर्षांपासून माजी आमदार अमरसिंह पंडित यांच्या माध्यमातून नाम फाऊंडेशन, शारदा प्रतिष्ठान, महाराष्ट्र शासन आणि लोकसहभागातून नदी, नाल्यांचे खोलीकरण व रुंदीकरण या कामांसह जुन्या बंधाऱ्यांचे पुर्नजीवन करण्याचा उपक्रम राबविण्यात येत आहे. या उपक्रमाला चांगले यश मिळत असल्याचे चित्र दिसत आहे.

शाळांची ‘दुकानदारी’ बंद! शिक्षण विभागाचे कडक आदेश; ठराविक दुकानातून खरेदीची सक्ती केल्यास कारवाई

0

मुंबई — नवीन शैक्षणिक वर्ष सुरू होण्यापूर्वीच पालकांना मोठा दिलासा देणारा निर्णय घेण्यात आला आहे. शिक्षण विभागाने (Maharashtra Education Department) ने शाळांकडून होणाऱ्या ‘दुकानदारी’वर कठोर कारवाईचा इशारा दिला आहे.
प्राथमिक शिक्षण संचालनालयाने जारी केलेल्या नव्या परिपत्रकानुसार, राज्यातील कोणतीही शाळा विद्यार्थ्यांना गणवेश, पुस्तके किंवा इतर शैक्षणिक साहित्य ठराविक दुकानातूनच खरेदी करण्याची सक्ती करू शकत नाही.

दरवर्षी अनेक शाळा काही निवडक दुकानदारांशी संगनमत करून पालकांवर महागड्या साहित्याची खरेदी करण्यासाठी दबाव टाकतात. या वाढत्या तक्रारींची दखल घेत शिक्षण विभागाने आता स्पष्ट भूमिका घेतली आहे.

 पुस्तकांबाबत महत्त्वाचे आदेश

शाळांना आता खालील नियम पाळणे बंधनकारक आहे
🕳️.  केवळ NCERT, SCERT Maharashtra (बालभारती) किंवा संबंधित बोर्डाने प्रमाणित केलेली पुस्तकेच वापरावी
🕳️.    खाजगी प्रकाशनांची महागडी पुस्तके घेण्याची सक्ती करता येणार नाही
🕳️.   पालकांना कोणत्याही दुकानातून साहित्य खरेदी करण्याचे स्वातंत्र्य असेल

CBSE आणि ICSE शाळांनाही आदेश लागू

हा नियम केवळ राज्य मंडळापुरता मर्यादित नाही. Central Board of Secondary Education अर्थात सीबीएससी आणि ICSE बोर्डाच्या शाळांनाही हे नियम लागू असतील.

तक्रार कशी कराल?

जर कोणतीही शाळा ठराविक दुकानातूनच खरेदी करण्यास भाग पाडत असेल विशिष्ट प्रकाशनांची पुस्तके घेण्यास सक्ती करत असेल
तर पालक थेट शिक्षणाधिकारी किंवा प्रशासनाकडे तक्रार करू शकतात. दाखल केलेल्या तक्रारीत तथ्य आढळल्यास संबंधित शाळेवर दंडात्मक कारवाई तसेच मान्यता रद्द करण्याची प्रक्रिया
होऊ शकते.

अधिकाऱ्यांचे स्पष्ट निर्देश

शिक्षण संचालक शरद गोसावी ( Sharad Gosavi) यांनी स्पष्ट केले की, शाळांनी स्वतःच्या फायद्यासाठी पालकांवर आर्थिक दबाव टाकू नये.या निर्णयामुळे शैक्षणिक साहित्य स्वस्तात मिळेल,खरेदीचे स्वातंत्र्य वाढेल
शाळांकडून होणाऱ्या आर्थिक सक्तीला आळा बसेल

राहुल गांधी प्रकरणात मोठा ट्विस्ट! हायकोर्टाने स्वतःच्याच FIR आदेशाला दिली स्थगिती

0

लखनौ — काँग्रेस नेते आणि लोकसभेतील विरोधी पक्षनेते राहुल गांधी (Rahul Gandhi) यांच्या कथित दुहेरी नागरिकत्व प्रकरणात मोठा न्यायालयीन ट्विस्ट समोर आला आहे. अलाहाबाद उच्च न्यायालय (Allahabad High Court ) च्या लखनौ खंडपीठाने एफआयआर नोंदवण्याच्या स्वतःच्या आदेशालाच स्थगिती दिली आहे.
शनिवारी न्यायालयाच्या अधिकृत वेबसाइटवर जाहीर झालेल्या आदेशानुसार, शुक्रवारी झालेल्या सुनावणीत याचिकाकर्ते, केंद्र सरकार आणि राज्य सरकार यांच्या वकिलांना एक महत्त्वाचा प्रश्न विचारण्यात आला होता—मुख्य आरोपी राहुल गांधी यांना नोटीस बजावणे आवश्यक आहे का?

यावर सर्व पक्षांच्या वकिलांनी एकमताने “नाही” असे मत व्यक्त केले होते. त्यानंतर खुल्या न्यायालयात एफआयआर नोंदवण्याचे आदेश देण्यात आले. मात्र, आदेशाची अधिकृत प्रत तयार होण्यापूर्वीच न्यायमूर्ती. सुभाष विद्यार्थी (Subhash Vidyarthi )यांनी २०१४ च्या पूर्णपीठाच्या निर्णयाचा संदर्भ देत महत्त्वपूर्ण निरीक्षण नोंदवले.
त्या निर्णयानुसार, एफआयआर नोंदवण्याची मागणी फेटाळल्यानंतर दाखल होणाऱ्या पुनरीक्षण याचिकेत प्रस्तावित आरोपीला नोटीस देणे बंधनकारक आहे. त्यामुळे राहुल गांधी यांना नोटीस न देता अंतिम आदेश देणे कायदेशीरदृष्ट्या योग्य ठरणार नाही, असे न्यायालयाने स्पष्ट केले.
या पार्श्वभूमीवर न्यायालयाने स्वतःचाच आदेश स्थगित करत पुढील सुनावणी 20 एप्रिल रोजी निश्चित केली आहे.

प्रकरणाची पार्श्वभूमी

हे प्रकरण कर्नाटकातील रहिवासी एस. विग्नेश शिशिर यांनी दाखल केलेल्या याचिकेवर आधारित आहे. याचिकाकर्त्याने राहुल गांधी यांच्यावर भारतीय दंड संहिता, शासकीय गुप्तता कायदा, परदेशी नागरिक कायदा आणि पासपोर्ट कायदा अंतर्गत गंभीर आरोप केले आहेत.
17 डिसेंबर 2025 लाख हे प्रकरण रायबरेलीहून लखनौ येथे हस्तांतरित केले 28 जानेवारी 2026 विशेष न्यायालयाने ही याचिका फेटाळली
त्यानंतर उच्च न्यायालयात आव्हान देण्यात आले

आता पुढे काय?

या प्रकरणात आता मुख्य मुद्दा “नोटीस बजावणे आवश्यक आहे का?” यावर मुद्दा केंद्रित झाला आहे. 20 एप्रिल रोजी होणाऱ्या पुढील सुनावणीत यावर अंतिम निर्णय होण्याची शक्यता आहे.

राहुल गांधी अडचणीत? दुहेरी नागरिकत्व प्रकरणात उच्च न्यायालयाचा मोठा आदेश

0

लखनऊ — लोकसभेतील विरोधी पक्षनेते राहुल गांधी (Rahul Gandhi) यांच्या अडचणी वाढण्याची शक्यता निर्माण झाली आहे. दुहेरी नागरिकत्वाच्या आरोपांप्रकरणी अलाहाबाद उच्च न्यायालय (Allahabad High Court) च्या लखनऊ खंडपीठाने चौकशीचे आदेश दिले आहेत.शुक्रवारी दिलेल्या या आदेशानुसार, संबंधित प्रकरणात एफआयआर नोंदवून सखोल तपास करण्याचे निर्देश देण्यात आले आहेत. यामुळे या प्रकरणाला नवी वळण मिळाले आहे.

काय आहे न्यायालयाचा आदेश?

उच्च न्यायालयाने कनिष्ठ न्यायालयाचा निर्णय रद्द करत स्पष्ट केले की, राहुल गांधी यांच्यावरील दुहेरी नागरिकत्वाच्या आरोपांची चौकशी होणे आवश्यक आहे. तसेच उत्तर प्रदेश सरकारला स्वतः तपास करण्याचे किंवा प्रकरण केंद्रीय यंत्रणेकडे सोपवण्याचे निर्देश देण्यात आले आहेत.

प्रकरणाची सुरुवात कशी झाली?

हे प्रकरण विग्नेश शिशिर (Vignesh Shishir) यांनी दाखल केलेल्या याचिकेमुळे समोर आले.
याचिकेत आरोप करण्यात आला आहे की,
राहुल गांधी यांच्याकडे भारतीय आणि ब्रिटिश नागरिकत्व असू शकते दोन पासपोर्ट बाळगणे हे कायद्याचे उल्लंघन ठरू शकते.याचिकाकर्त्याने भारतीय दंड संहिता (IPC),शासकीय गुप्तता कायदा,पासपोर्ट कायदा,परदेशी नागरिक कायदा
यानुसार कारवाईची मागणी केली आहे.

प्रकरणाचा प्रवास

🕳️सुरुवातीला रायबरेली न्यायालयात याचिका दाखल तेथे याचिका फेटाळली नंतर प्रकरण उच्च न्यायालयात
🕳️१७ डिसेंबर २०२५ रोजी लखनऊ खंडपीठाकडे हस्तांतरण
पुन्हा फेटाळणी
🕳️आता उच्च न्यायालयाने आदेश देत तपासाला परवानगी
उच्च न्यायालयाच्या आदेशामुळे हे स्पष्ट झाले आहे की, दुहेरी नागरिकत्वाचे प्रकरण संपलेले नाही याप्रकरणी नव्याने तपास होऊन एफआयआर नोंदवण्याची शक्यता वाढली आहे.

महिला आरक्षण विधेयकाला धक्का! लोकसभेत दोन-तृतीयांश बहुमत न मिळाल्याने १३१ वे घटनादुरुस्ती विधेयक नामंजूर

0

नवी दिल्ली – संसदेच्या विशेष अधिवेशनात महिला आरक्षणासंदर्भातील महत्त्वाचे १३१ वे घटनादुरुस्ती विधेयक लोकसभेत मंजूर होऊ शकले नाही. शुक्रवारी झालेल्या मतदानात विधेयकाच्या बाजूने २९८ मते पडली, तर विरोधात २३० मते मिळाली. मात्र घटनादुरुस्ती विधेयक मंजूर करण्यासाठी आवश्यक असलेले दोन-तृतीयांश बहुमत न मिळाल्याने हे विधेयक अपयशी ठरले.

लोकसभा अध्यक्ष ओम बिर्ला यांनी निकाल जाहीर करताना सांगितले की, पहिल्या फेरीत ४८९ सदस्यांनी मतदानात भाग घेतला होता. यामध्ये २७८ सदस्यांनी समर्थन केले, तर २११ सदस्यांनी विरोध दर्शवला.

सत्ताधारी vs विरोधक: जोरदार वादविवाद

विधेयकावर मतदानापूर्वी सत्ताधारी आणि विरोधी पक्षांमध्ये तीव्र वादविवाद झाला. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सर्व पक्षांना महिला आरक्षणासाठी एकत्र येण्याचे आवाहन केले होते.
मात्र काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी या विधेयकावर तीव्र टीका करत सरकारवर गंभीर आरोप केले. त्यांनी सांगितले की, हा प्रस्ताव मूळ महिला आरक्षणाच्या मुद्द्यापासून लक्ष विचलित करणारा आहे.

 राहुल गांधींचा आरोप काय?

राहुल गांधी म्हणाले की, २०२३ मध्ये मंजूर झालेल्या महिला आरक्षण कायद्याच्या अंमलबजावणीसाठी आधीच विलंब होणार असल्याचे संकेत देण्यात आले होते
सध्याचे विधेयक हे निवडणूक नकाशा बदलण्याचा प्रयत्न आहे
यामागे राजकीय डावपेच लपलेले आहेत
त्यांनी जनतेला या घडामोडी समजून घेण्याचे आवाहन केले.

सरकारला दुसरा मोठा धक्का

लोकसभेत महिला आरक्षणासंदर्भातील हे दुसरे मोठे अपयश मानले जात आहे. सरकारने मोठ्या तयारीने हे विधेयक मांडले होते, मात्र अपेक्षित बहुमत मिळवण्यात अपयश आले.
या निकालामुळे महिला आरक्षणाचा मुद्दा पुन्हा एकदा अनिश्चिततेत गेला आहे. आता सरकार या विषयावर पुढे कोणती रणनीती आखते, याकडे देशाचे लक्ष लागले आहे.

एएसपी व्यंकटराम यांच्या पथकाची कारवाई; मस्साजोग मध्ये 9 लाखाचा गुटखा पकडला

0

बीड — Kej Newsविविध गुन्ह्यांचा तपास जलद गतीने व्हावा या उद्देशाने केजचे सहाय्यक पोलीस अधीक्षक व्यंकटराम यांनी विशेष पथकाची 16 एप्रिल रोजी स्थापना केली. दुसऱ्याच दिवशी मस्साजोग शिवारात पोलिसांनी पत्र्याच्या शेडमध्ये विक्रीसाठी ठेवलेला नऊ लाखाचा गुटखाGutkha Raid जप्त केला आहे.

केजचे सहाय्यक पोलीस अधीक्षक व्यंकटराम यांनी गंभीर गुन्हे खून खुनाचा प्रयत्न दरोडा जबरी चोरी मकोका. (Maharashtra Crime) यासारख्या दाखल गुन्ह्यातील आरोपी निष्पन्न करून अटक करण्याच्या उद्देशाने पोलीस उपनिरीक्षक ए जी इनामदार, धारूर पो.स्टे. चे डी वाय मोरे, केज मधील आर आर वंजारे, नेकनूर चे व्ही ए क्षीरसागर यांचे पथक 16 एप्रिल रोजी स्थापन केले. हे पथक स्थानिक गुन्हे शाखेशी समन्वय साधून काम करणार आहे. दरम्यान सहाय्यक पोलिस अधीक्षक व्यंकटराम यांना मसाजोग येथे रंजीत बाजीराव देशमुख यांच्या शेतातील पत्र्याच्या शेडमध्ये रोहित आसाराम देशमुख यांनी प्रतिबंधित गुटखा साठवून ठेवल्याची गुप्त माहिती मिळाली. माहिती मिळताच तात्काळ कारवाई करून दुपारी दोनच्या सुमारास पोलीस उपनिरीक्षक अमिरोद्दीन इनामदार,पो.उप नि. कराडकर आणि त्यांच्या पथकाने छापा मारून शेडची झाडाझडती घेतली. यावेळी निळ्या पांढऱ्या गुलाबी रंगाच्या पोत्यांमध्ये प्रतिबंधित सुगंधी तंबाखू गुटखा आणि पान मसाला मिळून आला. या कारवाईत तब्बल नऊ लाखाचा गुटखा जप्त( Gutkha Seized) करण्यात आला

याप्रकरणी केज पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू असून गुटखा तस्करीच्या रॅकेटमध्ये आणखी कोणाचे हात आहेत याचा तपास केला जात आहे. या घटनेमुळे गुटखा विक्रेत्यांचे धाबे दणाणले असून पोलिसांच्या कामगिरीचे कौतुक होत आहे.

रेल्वे पोलीस कर्मचाऱ्याचा संशयास्पद मृत्यू, कारण अस्पष्ट

0

परळी — येथे रेल्वेमध्ये कार्यरत असलेल्या एका पोलीस कर्मचाऱ्याचा संशयास्पद मृत्यू झाल्याची धक्कादायक घटना आज सकाळी उघडकीस आली. ही घटना माधवबाग परिसरातील भाड्याच्या घरात घडली असून परिसरात खळबळ उडाली आहे.

काय घडलं नेमकं?

मिळालेल्या माहितीनुसार, मयत पोलीस कर्मचारी नितीन पंडित ढगे वय ३०, रा. लोहारा ता. लोहारा जि. धाराशिव त्यांचे अवघ्या आठवडाभरात लग्न होतं.ते काही दिवस सुट्टीवर गावी आले होते. त्यानंतर ते पुन्हा परळी येथे नोकरीवर रुजू झाले. मात्र आज सकाळी त्यांच्या राहत्या घरात त्यांचा मृतदेह आढळून आला.
प्राथमिक माहितीनुसार, कामाच्या ठिकाणी वरिष्ठांकडून त्रास होत असल्याची चर्चा समोर येत आहे. मात्र, त्यांनी हे टोकाचं पाऊल का उचललं, याबाबत अद्याप अधिकृत कारण स्पष्ट झालेले नाही.

पोलिसांचा तपास सुरू

घटनेची माहिती मिळताच शहर पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली पंचनामा करून मृतदेह ताब्यात घेतला उत्तरीय तपासणीसाठी पार्थिव उपजिल्हा रुग्णालय, परळी येथे पाठवण्यात आलंसर्व बाजूंनी तपास सुरू असल्याची माहिती पोलिसांकडून देण्यात आली
अनेक प्रश्न अनुत्तरित
हा मृत्यू नेमका कशामुळे झाला?कामाच्या तणावाचा संबंध आहे का?कोणाचा दबाव किंवा छळ होत होता का? या सर्व प्रश्नांची उत्तरं अद्याप समोर आलेली नाहीत.