Home Blog Page 52

उन्हाळी सुट्ट्यांत एसटी प्रवास महाग; 10% भाडेवाढ 2रु. स्वच्छता अधिभार लागू !

0

मुंबई — उन्हाळी सुट्ट्यांच्या पार्श्वभूमीवर राज्य परिवहन महामंडळाने (एसटी) प्रवासी भाड्यात १० टक्के वाढ लागू केली असून, प्रत्येक तिकिटावर ₹२ स्वच्छता अधिभार आकारण्याचा निर्णय घेतला आहे. ही वाढ बुधवारपासून लागू झाली असून, प्रवाशांमध्ये नाराजीचे वातावरण निर्माण झाले आहे.

 काय आहे निर्णय?

एसटीकडून १०% भाडेवाढ लागू करण्यात आल्यानंतर प्रत्येक तिकिटावर ₹२ स्वच्छता अधिभार लावण्यात आला आहे. १५ एप्रिल ते १५ जून या कालावधीत उन्हाळी सुट्ट्यांतील वाढती गर्दी लक्षात घेऊन निर्णय

प्रवाशांची नाराजी 

यापूर्वीच एसटीने काही महिन्यांपूर्वी भाडेवाढ केली होती. त्यामुळे आता पुन्हा हंगामी वाढ केल्याने सर्वसामान्य नागरिकांवर आर्थिक ताण वाढल्याने कुटुंबासह प्रवास करणे महाग झाले आहे.लांब पल्ल्याच्या प्रवासाचा खर्च देखील वाढला आहे“भाडेवाढ झाली, पण सुविधा कुठे आहेत?” असा प्रश्न प्रवाशांकडून विचारला जात आहे ‌उन्हाळी सुट्ट्यांमध्ये गावी जाणारे प्रवासी
पर्यटनासाठी जाणारे नागरिक देवदर्शनासाठी जाणारी गर्दी  यामुळे एसटी बसमध्ये प्रवाशांची संख्या मोठ्या प्रमाणात वाढते.
इंधन दरवाढ,बस देखभाल खर्च,अतिरिक्त सेवा व्यवस्थापन , या कारणांमुळे भाडेवाढ आवश्यक असल्याचे एसटी महामंडळाकडून सांगितले जात आहे.वाढत्या प्रवासी संख्येमुळे महसूल वाढून
मागील नुकसान (दिवाळी काळातील) काही प्रमाणात भरून निघणार आहे

समस्या अजूनही कायम

्भाडेवाढ झाली असली तरीबसची स्वच्छता अपुरी,वेळेचे पालन नाही,आरामदायी प्रवासाचा अभाव या समस्या जैसे थेच आहेत त्यामुळे प्रवाशांमध्ये नाराजी अधिक वाढली आहे.

बीडमध्ये मोठी कारवाई: 2.45 लाखांचा प्रतिबंधित गुटखा जप्त, एकावर गुन्हा दाखल

0

बीड —  स्थानिक गुन्हे शाखेने मोठी कारवाई करत महाराष्ट्रात प्रतिबंधित गुटख्याचा साठा जप्त केला आहे. नवगण राजुरी येथे छापा टाकून पोलिसांनी तब्बल ₹2,45,328 किमतीचा गुटखा हस्तगत केला असून एका आरोपीवर गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू आहे.

कशी झाली कारवाई?

पोलीस निरीक्षकांच्या आदेशानुसार स्थानिक गुन्हे शाखेचे पथक नवगण राजुरी परिसरात पेट्रोलिंग करत होते. त्यावेळी गुप्त बातमीदाराकडून माहिती मिळाली की, सरकारी दवाखान्यासमोरील एका गाळ्यात प्रतिबंधित गुटखा विक्रीसाठी साठवून ठेवण्यात आला आहे.
या माहितीनंतर पोलिसांनी तत्काळ छापा टाकला.यावेळी. विकास महादेव टुले (वय 30, रा. नवगण राजुरी) याच्याकडून विविध कंपनीचा प्रतिबंधित गुटखा जप्त करण्यात आला. याची किंमत दोन लाख 45 हजार 328 रुपये इतकी आहेसध्या या प्रकरणी पोलीस ठाणे बीड ग्रामीण येथे गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू आहे.
पोलीस अधीक्षक नवनीत काँवत
अप्पर पोलीस अधीक्षक सचिन पांडकर
पोलीस निरीक्षक शिवाजी बंटेवाड
यांच्या मार्गदर्शनाखाली ही कारवाई पार पडली.
या मोहिमेत पोउपनि श्रीराम खटावकर आणि त्यांच्या पथकातील गोविंद राख, राहुल शिंदे, सोमनाथ गायकवाड, बाळू सानप, मनोज परजणे, अश्फाक सय्यद, नितीन वडमारे कर्मचाऱ्यांचा सहभाग होता.

महिला आरक्षणासाठी केंद्र सरकारचे मोठे पाऊल; 2029 पासून 33% आरक्षण, लोकसभा जागा 850 होणार?

0

नवी दिल्ली — केंद्र सरकारने महिला सक्षमीकरणासाठी मोठा निर्णय घेत महिला आरक्षणाशी संबंधित तीन महत्त्वपूर्ण विधेयके संसदेत सादर केली आहेत. 2023 मध्ये मंजूर झालेल्या नारी शक्ती वंदन कायद्याची पूर्ण अंमलबजावणी हे या विधेयकांचे मुख्य उद्दिष्ट आहे.
सरकारच्या प्रस्तावानुसार 2029 पासून लोकसभा आणि सर्व राज्यांच्या विधानसभांमध्ये महिलांसाठी 33% आरक्षण लागू केले जाईल. यामुळे देशातील राजकारणात महिलांचा सहभाग मोठ्या प्रमाणात वाढण्याची शक्यता आहे.

लोकसभा जागा वाढणार; 543 वरून थेट 850 पर्यंत

या विधेयकांतील सर्वात मोठा बदल म्हणजे लोकसभेतील सदस्यसंख्या वाढवण्याचा प्रस्ताव. सध्या 543 असलेल्या जागा वाढवून 850 करण्याचा विचार सरकारने मांडला आहे.
राज्यांसाठी: 815 जागा
केंद्रशासित प्रदेशांसाठी: 35 जागा
हे बदल लागू करण्यासाठी मतदारसंघांचे परिसीमन (Delimitation) करण्यात येणार आहे.

कोणती आहेत ती 3 महत्त्वाची विधेयके?

1️⃣ संविधान (131 वी दुरुस्ती) विधेयक, 2026
महिला आरक्षण लागू करण्यासाठी महत्त्वाचे
संविधानाच्या कलम 81 मध्ये दुरुस्ती
लोकसंख्येनुसार जागा वाढवण्याची तरतूद
2️⃣ परिसीमन विधेयक, 2026
2011 जनगणनेच्या आधारे मतदारसंघ पुनर्रचना
प्रत्येक राज्यात परिसीमन आयोग स्थापन
सर्व पक्षांशी चर्चा करून जागावाटप
3️⃣ केंद्रशासित प्रदेश कायदे (दुरुस्ती) विधेयक, 2026
दिल्ली, जम्मू-काश्मीर, पुदुचेरीमध्ये 33% महिला आरक्षण

विधानसभांमध्ये जागांची पुनर्रचना

 का महत्त्वाचा आहे हा निर्णय?
1976 नंतर प्रथमच मोठ्या प्रमाणात परिसीमन
महिलांना राजकारणात मोठी संधी
लोकसंख्येनुसार प्रतिनिधित्व अधिक अचूक होणार,2029 निवडणुका ऐतिहासिक ठरू शकतात

महाराष्ट्र विधानपरिषद निवडणूक 2026: 9 जागांसाठी 12 मे रोजी मतदान, राजकीय समीकरणे तापली

0

मुंबई — महाराष्ट्रातील राजकारणात पुन्हा एकदा हालचाल वाढली आहे. महाराष्ट्र विधानपरिषदेच्या 9 जागांसाठी निवडणूक कार्यक्रम अधिकृतपणे जाहीर करण्यात आला असून 12 मे 2026 रोजी मतदान होणार आहे. त्यामुळे राज्यातील सर्व प्रमुख पक्षांमध्ये उमेदवारीसाठी चुरस वाढली आहे.
निवडणूक आयोगाच्या घोषणेनुसार, विधानपरिषदेतील 9 आमदारांचा कार्यकाळ 13 मे 2026 रोजी संपणार आहे. यामुळे नव्या सदस्यांच्या निवडीसाठी राजकीय घडामोडींना वेग आला आहे.

 राजकीय गणित: कोणाला किती जागा?

विधानसभेतील सध्याच्या संख्याबळानुसार संभाव्य चित्र असे दिसत आहे:
भाजप – 5 जागा
शिवसेना (शिंदे गट) – 2 जागा
राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार गट) – 1 जागा
महाविकास आघाडी – 1 जागा
मात्र, राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार गट) कडे अतिरिक्त मते असल्यामुळे महायुतीकडून एक जास्तीचा उमेदवार दिला जाऊ शकतो. असे झाल्यास निवडणूक बिनविरोध होण्याची शक्यता कमी होऊ शकते.

उमेदवारीसाठी चढाओढ वाढली

भाजपमध्ये इच्छुकांची संख्या मोठी असल्याने पक्षात अंतर्गत स्पर्धा वाढली आहे.
विशेषतः राज्यसभेत संधी न मिळालेल्या नेत्यांना विधानपरिषदेची संधी मिळू शकते, अशी चर्चा आहे.

कोणत्या आमदारांचा कार्यकाळ संपणार?

या निवडणुकीत खालील आमदारांचा कार्यकाळ संपत आहे:
उद्धव ठाकरे – शिवसेना (उबाठा)
नीलम गोऱ्हे – शिवसेना (शिंदे गट)
शशिकांत शिंदे – राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार गट)
अमोल मिटकरी – राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार गट)
गोपीचंद पडळकर – भाजप
रणजितसिंह मोहिते-पाटील – भाजप
राजेश राठोड – काँग्रेस
प्रवीण दटके – भाजप
रमेश कराड – भाजप

आरक्षणाच्या मागणीसाठी मुस्लिम समाज रस्त्यावर; बीडमध्ये उद्या एल्गार

0

बीड — मुस्लिम समाजाला शिक्षण व शासकीय नोकऱ्यांमध्ये आरक्षण मिळावे, या प्रमुख मागणीसाठी उद्या बीड शहरात भव्य एल्गार मोर्चा आयोजित करण्यात आला आहे. या मोर्चामध्ये जिल्हाभरातून हजारो मुस्लिम बांधव सहभागी होणार असल्याची माहिती आयोजकांनी दिली आहे.

गेल्या १५ ते २० दिवसांपासून या मोर्चाची जोरदार तयारी सुरू असून, विविध भागांमध्ये कॉर्नर बैठका घेऊन नागरिकांना सहभागी होण्याचे आवाहन करण्यात आले आहे. या आंदोलनाला विविध राजकीय पक्ष आणि सामाजिक संघटनांच्या नेते-कार्यकर्त्यांनी पाठिंबा दर्शविला आहे.

 आरक्षणाचा मुद्दा पुन्हा चर्चेत

तत्कालीन काँग्रेस-राष्ट्रवादी सरकारने मुस्लिम समाजाला ५ टक्के आरक्षण दिले होते. मात्र, हे आरक्षण नंतर रद्द करण्यात आले. न्यायालयाने शिक्षणात आरक्षणासंदर्भात सकारात्मक भूमिका दर्शविली होती, परंतु त्यावर या सरकारने कुठलीच पावलं उचलली नाही, असा आरोप आयोजकांनी केला आहे.

मागासलेपणाचा मुद्दा

मुस्लिम समाज शैक्षणिक व सामाजिक दृष्ट्या मागास असल्याचे सांगत, त्यांना मुख्य प्रवाहात आणण्यासाठी आरक्षण आवश्यक असल्याची भूमिका मोर्चा आयोजकांनी मांडली आहे.
मोठ्या संख्येने सहभाग
या मोर्चामध्ये केवळ शहरातीलच नव्हे तर संपूर्ण जिल्ह्यातील मुस्लिम समाज मोठ्या संख्येने सहभागी होणार असल्याने प्रशासनाकडूनही योग्य ती तयारी करण्यात येत आहे.

उष्माघातापासून बचावासाठी जिल्हा प्रशासनाचे आवाहन

0

बीड  —  प्रादेशिक हवामान केंद्र, कुलाबा ,मुंबई यांनी दिनांक १६ एप्रिल ते १८ एप्रिल२०२६ या कालावधीत येलो अलर्ट (yellow Alert) जारी केला आहे . कालावधीमध्ये तुरळ ठिकाणी उष्णतेची लाट येण्याची शक्यता वर्तवली आहे. उन्हाळ्यात तापमानात होणारी वाढ लक्षात घेता जिल्हा आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणाने उष्माघातापासून बचावासाठी मार्गदर्शक सूचना जारी केल्या आहेत. नागरिकांना सतर्क राहण्याचे आवाहन केले आहे.

सुरक्षेच्या उपाययोजना

तहान लागलेली नसली तरीही दर अर्ध्या तासाने पुरेसे पाणी प्यावे. शरीरातील पाण्याचे प्रमाण टिकवून ठेवण्यासाठी ओआरएस (ORS), लस्सी, लिंबू पाणी, ताक आणि कैरीचे पन्हे यांसारख्या घरगुती पेयांचा वापर करावा.
बाहेर पडताना हलके, पातळ आणि सच्छिद्र सुती कपडे वापरावेत. डोके झाकण्यासाठी छत्री, टोपी किंवा ओल्या कापडाचा वापर करावा. दुपारी १२ ते ३ या वेळेत शक्यतो घराबाहेर जाणे टाळावे. कष्टाची कामे पहाटेच्या वेळी उरकून घ्यावीत आणि कामाच्या ठिकाणी मध्ये-मध्ये विश्रांती घ्यावी.घर थंड ठेवण्यासाठी पडदे आणि सनशेडचा वापर करावा. रात्रीच्या वेळी खिडक्या उघड्या ठेवाव्यात. पाळीव प्राणी आणि गुरांना छावणीत ठेवावे व त्यांना पिण्यासाठी पुरेसे पाणी द्यावे.

चक्कर येणे, सतत घाम येणे, डोकेदुखी किंवा अशक्तपणा जाणवल्यास ही उष्माघाताची लक्षणे असू शकतात. अशा वेळी तात्काळ डॉक्टरांचा सल्ला घ्यावा.

सावधगिरीच्या सूचना

चहा, कॉफी, दारू आणि कार्बोनेटेड थंड पेये घेणे टाळावे, कारण यामुळे शरीरातील पाण्याचे प्रमाण कमी होऊ शकते. उच्च प्रथिनयुक्त आणि शिळे अन्न खाऊ नका. लहान मुले किंवा पाळीव प्राण्यांना बंद असलेल्या पार्क केलेल्या वाहनात सोडू नका. तापमान जास्त असताना कष्टाची कामे टाळावीत. उन्हाच्या तीव्र कालावधीत स्वयंपाक करणे टाळावे आणि स्वयंपाकघरात हवेशीर वातावरण ठेवावे.
जिल्हा प्रशासनाने नागरिकांना आवाहन केले आहे की, अधिक माहितीसाठी राज्य आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणाच्या सोशल मीडिया हँडलला (@SDMAMaharashtra) भेट द्यावी किंवा जिल्ह्याच्या अधिकृत संकेतस्थळावरील सूचनांचे पालन करावे. स्वतःचा आणि आपल्या कुटुंबाचा उष्माघातापासून बचाव करण्यासाठी प्रशासनाने दिलेल्या या नियमांचे काटेकोरपणे पालन करण्याचे आवाहन जिल्हा प्रशासनातर्फे करण्यात आले आहे.

भीम जयंतीत डीजेवर पोलिसांची कारवाई; 27 ठिकाणी गुन्हे दाखल

0

बीड — विश्वरत्न महामानव डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंती निमित्त बीड जिल्ह्यात मोठ्या उत्साहात मिरवणुका काढण्यात आल्या. मात्र या उत्सवात डीजे वापरावर घालण्यात आलेल्या नियमांचे उल्लंघन झाल्यामुळे पोलिसांनी कडक कारवाई करत एकूण 27 ठिकाणी गुन्हे दाखल केले आहेत.
जिल्हा पोलीस अधिक्षक नवनीत कॉवत यांनी जयंतीपूर्वीच नागरिकांना डीजे टाळून पारंपरिक वाद्यांना प्राधान्य देण्याचे आवाहन केले होते. तरीही अनेक ठिकाणी या सूचनांकडे दुर्लक्ष झाल्याचे दिसून आले.

कुठे किती गुन्हे दाखल?

परळी (संभाजीनगर पोलीस ठाणे) – 12 (11 डीजे + 1 मारामारी)
माजलगाव – 6
पेठ बीड – 3
बीड शहर – 1
गेवराई – 1
तलवाडा – 1
अंबाजोगाई शहर – 1
परळी शहर – 2
एकूण: 27 गुन्हे नोंद

नियमांचे उल्लंघन, पोलिस अॅक्शन मोड मध्ये 

सायंकाळनंतर काढण्यात आलेल्या मिरवणुकांमध्ये अनेक ठिकाणी डीजेच्या मोठ्या आवाजात नृत्य आणि गर्दी दिसून आली. न्यायालय व पोलिसांनी घालून दिलेल्या ध्वनीप्रदूषण नियमांचे उल्लंघन झाल्याने पोलिसांनी तात्काळ कारवाई सुरू केली.
सध्या देखील काही ठिकाणी चौकशी व पुढील कारवाया सुरू असल्याची माहिती पोलिसांकडून देण्यात आली आहे.

सासऱ्याचा सुनेवर अत्याचार; पतीही आरोपी वडिलांच्या कृत्याला पतीचा पाठिंबा!

0

खुलताबाद — शहरात एक अत्यंत धक्कादायक आणि संतापजनक घटना समोर आली आहे. एका 23 वर्षीय विवाहित तरुणीवर तिच्याच सासऱ्याने वर्षभर अत्याचार केल्याचा गंभीर आरोप आहे. या प्रकरणात पीडितेच्या पतीलाही सहआरोपी करण्यात आले असून तो सध्या फरार आहे.

पीडित तरुणीने दिलेल्या तक्रारीनुसार, सासऱ्याने गेल्या वर्षभरात वारंवार तिच्यावर जबरदस्ती केली. या प्रकाराची माहिती तिने सुरुवातीला सासूला दिली, मात्र तिने प्रकरण दडपून ठेवले.
यानंतर पीडितेने आपल्या पतीला सर्व सांगितले असता, त्याने उलट सासऱ्याचे समर्थन करत अमानुष प्रतिक्रिया दिली. पुढे पतीने तिला सोडून दुसऱ्या महिलेसोबत राहण्यास सुरुवात केली.

धक्कादायक बाब

पती घर सोडून गेल्यानंतरही सासरा रात्रीच्या वेळी तिचा छळ करत राहिला. या काळात पीडितेने एका मुलीला जन्म दिला.सामाजिक भीतीमुळे पीडिता गप्प राहिली होती. मात्र 15 दिवसांपूर्वी ती माहेरी गेल्यानंतर तिने आई आणि भावाकडे संपूर्ण घटना सांगितली.14 एप्रिल रोजी सासरा तिला घेण्यासाठी माहेरी आला असता, कुटुंबीयांनी त्याला रोखले आणि पीडितेला पोलिसांकडे जाण्यास मदत केली.
खुलताबाद पोलिसांनी आरोपी सासऱ्याला अटक केली आहे.न्यायालयाने 18 एप्रिलपर्यंत पोलीस कोठडी सुनावली पती फरार असून पोलीस त्याचा शोध घेत आहेत

मनरेगा कामगारांना मोठा धक्का! वेतनवाढ रखडली, 7 कोटी कामगार प्रतीक्षेत

0

नवी दिल्ली — केंद्र सरकारने मनरेगा (महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी अधिनियम 2005) अंतर्गत काम करणाऱ्या कोट्यवधी कामगारांना मोठा धक्का दिला आहे. दरवर्षी जाहीर होणारी वेतनवाढ यावर्षी अद्याप जाहीर झालेली नाही, ज्यामुळे सुमारे 7 कोटींहून अधिक कामगार प्रभावित झाले आहेत.
सरकारकडून नवीन VB-G RAM G योजना 2025 (विकसित भारत-गॅरंटी फॉर रोजगार अँड आजीविका मिशन – ग्रामीण) लागू करण्याची घोषणा करण्यात आली आहे. मात्र या योजनेची अंमलबजावणी अद्याप झालेली नाही.

वेतनवाढ का थांबली?

केंद्रीय ग्रामीण विकास मंत्रालय यांनी सर्व राज्यांना कळवले आहे की,2026-27 आर्थिक वर्षासाठी नवीन वेतन दर VB-G RAM G योजना लागू झाल्यानंतरच जाहीर केले जातील
तोपर्यंत  2025-26 चे जुने वेतन दरच लागू राहतील

यंदा वेगळं काय?

मागील 13 वर्षांपासून वेतनवाढ फेब्रुवारी-मार्चमध्ये जाहीर होत होती मात्र यावर्षी
एप्रिलचे 15 दिवस उलटल्यानंतरही घोषणा नाही
⚖️ कायद्यातील तरतूद
मनरेगा अंतर्गत वेतन दर हे कलम 6(1) अंतर्गत जाहीर केले जातात आणि ते दरवर्षी 1 एप्रिलपासून लागू होतात मात्र यंदा ही प्रक्रिया उशिरा सुरू असल्यामुळे कामगारांमध्ये अस्वस्थता वाढली आहे.
कामगारांवर परिणाम
वेतनवाढ लांबणीवर,महागाईत वाढ,ग्रामीण भागातील उत्पन्नावर परिणाम,रोजगार हमी योजनेवर अवलंबून असलेल्यांची अडचण वाढणार
नवीन VB-G RAM G कायदा 2025 लागू झाल्यानंतरच नवीन वेतन दर जाहीर
कामगारांना वाढीव मोबदला मिळण्याची शक्यतातोपर्यंत मात्र कोट्यवधी कामगारांना प्रतीक्षा करावी लागणार आहे.

इंधनदर वाढीचा झटका बसणार; पेट्रोल ₹18 तर डिझेल ₹35 पर्यंत महागण्याची शक्यता

0

नवी दिल्ली — देशात कच्च्या तेलाच्या वाढत्या किमतींमुळे लवकरच पेट्रोल-डिझेल दरात मोठी वाढ होण्याची शक्यता तज्ज्ञांनी व्यक्त केली आहे. विशेषतः निवडणुका संपल्यानंतर ही दरवाढ होण्याचा अंदाज व्यक्त केला जात आहे, त्यामुळे सर्वसामान्य नागरिकांच्या खिशावर मोठा परिणाम होऊ शकतो.

कच्च्या तेलाच्या किमतीत मोठी चढउतार

सध्या आंतरराष्ट्रीय बाजारात कच्च्या तेलाचे दर अस्थिर आहेत.फेब्रुवारी अखेरीस: $73 प्रति बॅरल,मार्चमध्ये वाढ होऊन $120 प्रति बॅरल झाले.एप्रिलमध्ये किंचित घट होऊन $100 प्रति बॅरल झाली ही पातळी अजूनही उच्च असल्यामुळे भारतातील तेल कंपन्यांवर आर्थिक ताण वाढत आहे.

तेल कंपन्यांना मोठा तोटा

पेट्रोलवर अंदाजे ₹18 प्रति लिटर तोटा
डिझेलवर अंदाजे ₹35 प्रति लिटर तोटा
काही आठवड्यांपूर्वी दररोज तोटा: ₹2,400 कोटी होता .सध्या हा तोटा कमी होऊन ₹1,600 कोटी रुपये झाला आहे. कच्च्या तेलात प्रत्येक $10 वाढ झाली, की कंपन्यांचा तोटा प्रति लिटर ₹6 ने वाढतो.

 भारताचे आयातीवर अवलंबित्व

भारत आपल्या गरजेपैकी सुमारे 88% कच्चे तेल आयात करतो मध्यपूर्व देशातून 45%तर रशियामधून 35% आयात केले जाते.
म्हणूनच आंतरराष्ट्रीय बाजारातील बदलांचा थेट परिणाम भारतातील इंधनदरांवर होतो.

अर्थव्यवस्थेवर परिणाम

चालू खात्यातील तूट वाढण्याची पहिल्या तीमाहित शक्यता $20 अब्ज डॉलर होऊन रुपयावर दबाव वाढू शकतो इंधनावरील उत्पादन शुल्काचा महसूल घट पूर्वी:22%होती ती सध्या 8% इतकी आहे

दरवाढ कधी होणार?

तज्ज्ञांच्या मते, पाच राज्यांच्या निवडणुका संपल्यानंतर पेट्रोल-डिझेल दरवाढ होण्याची शक्यता जास्त आहे.कच्च्या तेलाच्या वाढत्या किमती, आयातीवरील अवलंबित्व आणि तेल कंपन्यांचा तोटा यामुळे येत्या काळात इंधनदर वाढ जवळपास निश्चित मानली जात आहे. याचा थेट परिणाम महागाई आणि सर्वसामान्यांच्या दैनंदिन खर्चावर होणार आहे.