खुलताबाद — शहरात एक अत्यंत धक्कादायक आणि संतापजनक घटना समोर आली आहे. एका 23 वर्षीय विवाहित तरुणीवर तिच्याच सासऱ्याने वर्षभर अत्याचार केल्याचा गंभीर आरोप आहे. या प्रकरणात पीडितेच्या पतीलाही सहआरोपी करण्यात आले असून तो सध्या फरार आहे.
पीडित तरुणीने दिलेल्या तक्रारीनुसार, सासऱ्याने गेल्या वर्षभरात वारंवार तिच्यावर जबरदस्ती केली. या प्रकाराची माहिती तिने सुरुवातीला सासूला दिली, मात्र तिने प्रकरण दडपून ठेवले.
यानंतर पीडितेने आपल्या पतीला सर्व सांगितले असता, त्याने उलट सासऱ्याचे समर्थन करत अमानुष प्रतिक्रिया दिली. पुढे पतीने तिला सोडून दुसऱ्या महिलेसोबत राहण्यास सुरुवात केली.
धक्कादायक बाब
पती घर सोडून गेल्यानंतरही सासरा रात्रीच्या वेळी तिचा छळ करत राहिला. या काळात पीडितेने एका मुलीला जन्म दिला.सामाजिक भीतीमुळे पीडिता गप्प राहिली होती. मात्र 15 दिवसांपूर्वी ती माहेरी गेल्यानंतर तिने आई आणि भावाकडे संपूर्ण घटना सांगितली.14 एप्रिल रोजी सासरा तिला घेण्यासाठी माहेरी आला असता, कुटुंबीयांनी त्याला रोखले आणि पीडितेला पोलिसांकडे जाण्यास मदत केली.
खुलताबाद पोलिसांनी आरोपी सासऱ्याला अटक केली आहे.न्यायालयाने 18 एप्रिलपर्यंत पोलीस कोठडी सुनावली पती फरार असून पोलीस त्याचा शोध घेत आहेत




