नवी दिल्ली — देशात कच्च्या तेलाच्या वाढत्या किमतींमुळे लवकरच पेट्रोल-डिझेल दरात मोठी वाढ होण्याची शक्यता तज्ज्ञांनी व्यक्त केली आहे. विशेषतः निवडणुका संपल्यानंतर ही दरवाढ होण्याचा अंदाज व्यक्त केला जात आहे, त्यामुळे सर्वसामान्य नागरिकांच्या खिशावर मोठा परिणाम होऊ शकतो.
कच्च्या तेलाच्या किमतीत मोठी चढउतार
सध्या आंतरराष्ट्रीय बाजारात कच्च्या तेलाचे दर अस्थिर आहेत.फेब्रुवारी अखेरीस: $73 प्रति बॅरल,मार्चमध्ये वाढ होऊन $120 प्रति बॅरल झाले.एप्रिलमध्ये किंचित घट होऊन $100 प्रति बॅरल झाली ही पातळी अजूनही उच्च असल्यामुळे भारतातील तेल कंपन्यांवर आर्थिक ताण वाढत आहे.

तेल कंपन्यांना मोठा तोटा
पेट्रोलवर अंदाजे ₹18 प्रति लिटर तोटा
डिझेलवर अंदाजे ₹35 प्रति लिटर तोटा
काही आठवड्यांपूर्वी दररोज तोटा: ₹2,400 कोटी होता .सध्या हा तोटा कमी होऊन ₹1,600 कोटी रुपये झाला आहे. कच्च्या तेलात प्रत्येक $10 वाढ झाली, की कंपन्यांचा तोटा प्रति लिटर ₹6 ने वाढतो.
भारताचे आयातीवर अवलंबित्व
भारत आपल्या गरजेपैकी सुमारे 88% कच्चे तेल आयात करतो मध्यपूर्व देशातून 45%तर रशियामधून 35% आयात केले जाते.
म्हणूनच आंतरराष्ट्रीय बाजारातील बदलांचा थेट परिणाम भारतातील इंधनदरांवर होतो.
अर्थव्यवस्थेवर परिणाम
चालू खात्यातील तूट वाढण्याची पहिल्या तीमाहित शक्यता $20 अब्ज डॉलर होऊन रुपयावर दबाव वाढू शकतो इंधनावरील उत्पादन शुल्काचा महसूल घट पूर्वी:22%होती ती सध्या 8% इतकी आहे
दरवाढ कधी होणार?
तज्ज्ञांच्या मते, पाच राज्यांच्या निवडणुका संपल्यानंतर पेट्रोल-डिझेल दरवाढ होण्याची शक्यता जास्त आहे.कच्च्या तेलाच्या वाढत्या किमती, आयातीवरील अवलंबित्व आणि तेल कंपन्यांचा तोटा यामुळे येत्या काळात इंधनदर वाढ जवळपास निश्चित मानली जात आहे. याचा थेट परिणाम महागाई आणि सर्वसामान्यांच्या दैनंदिन खर्चावर होणार आहे.

