बीड — स्थानिक गुन्हे शाखेने मोठी कारवाई करत महाराष्ट्रात प्रतिबंधित गुटख्याचा साठा जप्त केला आहे. नवगण राजुरी येथे छापा टाकून पोलिसांनी तब्बल ₹2,45,328 किमतीचा गुटखा हस्तगत केला असून एका आरोपीवर गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू आहे.
कशी झाली कारवाई?

पोलीस निरीक्षकांच्या आदेशानुसार स्थानिक गुन्हे शाखेचे पथक नवगण राजुरी परिसरात पेट्रोलिंग करत होते. त्यावेळी गुप्त बातमीदाराकडून माहिती मिळाली की, सरकारी दवाखान्यासमोरील एका गाळ्यात प्रतिबंधित गुटखा विक्रीसाठी साठवून ठेवण्यात आला आहे.
या माहितीनंतर पोलिसांनी तत्काळ छापा टाकला.यावेळी. विकास महादेव टुले (वय 30, रा. नवगण राजुरी) याच्याकडून विविध कंपनीचा प्रतिबंधित गुटखा जप्त करण्यात आला. याची किंमत दोन लाख 45 हजार 328 रुपये इतकी आहेसध्या या प्रकरणी पोलीस ठाणे बीड ग्रामीण येथे गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू आहे.
पोलीस अधीक्षक नवनीत काँवत
अप्पर पोलीस अधीक्षक सचिन पांडकर
पोलीस निरीक्षक शिवाजी बंटेवाड
यांच्या मार्गदर्शनाखाली ही कारवाई पार पडली.
या मोहिमेत पोउपनि श्रीराम खटावकर आणि त्यांच्या पथकातील गोविंद राख, राहुल शिंदे, सोमनाथ गायकवाड, बाळू सानप, मनोज परजणे, अश्फाक सय्यद, नितीन वडमारे कर्मचाऱ्यांचा सहभाग होता.

