बीडमध्ये मोठी चोरी! सुभाष रोडवरील मोबाईल दुकान फोडून 35 लाखांचा माल लंपास

बीड —  शहरातील सुभाष रोड परिसरात असलेल्या श्री साई मोबाईल शॉपी या दुकानात अज्ञात चोरट्यांनी मध्यरात्री धाडसी चोरी केल्याची घटना उघडकीस आली आहे. या घटनेत तब्बल ३० ते ३५ लाख रुपये किमतीचे मोबाईल फोन चोरीला गेले असून, चोरटा सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाला आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, हे दुकान सचिन रासणे यांच्या मालकीचे असून, शनिवारी (दि.१८) मध्यरात्रीच्या सुमारास चोरट्याने दुकानाच्या शटरचा सेंटर लॉक तोडला. त्यानंतर शटर उचकटून आत प्रवेश करत दुकानातील विविध नामांकित कंपन्यांचे महागडे मोबाईल एका पिशवीत भरून फरार झाला.
घटनेनंतर सकाळी चोरी उघडकीस आली. शहर पोलीसांनी तात्काळ घटनास्थळी धाव घेत पाहणी केली. तसेच श्वान पथकाला देखील पाचारण करण्यात आले. सीसीटीव्ही फुटेजच्या आधारे आरोपीचा शोध सुरू आहे.
विशेष म्हणजे, अक्षय तृतीया सारख्या सणाच्या दिवशीच सुभाष रोडसारख्या गजबजलेल्या भागात ही मोठी चोरी झाल्यामुळे व्यापाऱ्यांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.

Related Articles

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Stay Connected

0FansLike
0FollowersFollow
0SubscribersSubscribe

Latest Articles