Home Blog Page 50

बीड जेलमध्ये कराड गँगची दहशत? ऑडिओ क्लिप व्हायरल 

0

बीड —  मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुख यांच्या अपहरण आणि हत्या प्रकरणातील आरोपींची दहशत आता जेलमध्येही सुरू असल्याचा धक्कादायक प्रकार कथित व्हायरल ऑडिओ क्लिप मुळे समोर आला आहे. या प्रकरणातील मुख्य आरोपी वाल्मिक कराड आणि त्याच्या गँगमधील सदस्यांविरोधात यामधून गंभीर आरोप करण्यात आले आहेत.

 काय आहे संपूर्ण प्रकरण?

बीड जिल्हा कारागृहात कैद असलेल्या सुदर्शन घुले, प्रतीक घुले आणि त्यांच्या साथीदारांनी एका कैद्याला बेदम मारहाण केल्याचा दावा एका कथित ऑडिओ क्लिपमधून करण्यात आला आहे.

ही ऑडिओ क्लिप सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत असली तरी तिची अधिकृत पडताळणी अद्याप झालेली नाही.

व्हायरल ऑडिओ क्लिपमधील धक्कादायक दावा

कथित ऑडिओमध्ये संबंधित कैदी आपल्या नातेवाईकाशी बोलताना सांगतो की,सहा नंबरच्या बराकमध्ये त्याला निर्दयपणे मारहाण करण्यात आली या मारहाणीत त्याचा हात मोडला असून गंभीर दुखापत झाली आहे ‌
जेलमधील काही पोलिस आरोपींशी संगनमत करून तक्रारींकडे दुर्लक्ष करत आहेत
तसेच, “आमचं कोणी काही वाकडं करू शकत नाही” अशा प्रकारच्या धमक्या देण्यात आल्याचा आरोपही करण्यात आला आहे.

प्रशासनावरही गंभीर आरोप

संबंधित कैद्याने जेल प्रशासनावरही गंभीर आरोप केले आहेत पोलिसांनी आरोपींकडून पैसे घेतल्याचा संशय व्यक्त करण्यात आला असून
तक्रार केल्यानंतर उलट धमक्या दिल्या जात असल्याचा आरोप केला गेला आहे.जेल अधीक्षकांकडूनही दुर्लक्ष होत असल्याचा दावा

 जेल प्रशासनाचे स्पष्टीकरण

या सर्व आरोपांवर प्रतिक्रिया देताना कारागृह अधीक्षक रामराजे चांदणे यांनी सांगितले:
कैद्यांमध्ये केवळ शाब्दिक वाद झाला होता
मारहाणीचा कोणताही प्रकार घडलेला नाही
दोन्ही गटांनी लेखी स्वरूपात तक्रार नसल्याचे दिले आहे
सध्या या प्रकरणात दोन वेगवेगळे दावे समोर येत आहेत.एकीकडे गंभीर मारहाणीचे आरोप, तर दुसरीकडे प्रशासनाचा इन्कार.व्हायरल ऑडिओ क्लिपची अधिकृत चौकशी झाल्यानंतरच सत्य समोर येणार आहे.

बीड सह महाराष्ट्रातील ९ जिल्ह्यांमध्ये ‘पंतप्रधान धनधान्य कृषी योजना’ लागू – शेती विकासाला मोठा बूस्ट

0

बीड  — राज्यातील पालघर, यवतमाळ, गडचिरोली, धुळे, रायगड, चंद्रपूर, छत्रपती संभाजीनगर, नांदेड आणि बीड या ९ जिल्ह्यांमध्ये पंतप्रधान धनधान्य कृषी योजना राबविण्यास राज्य सरकारने प्रशासकीय मान्यता दिली आहे. या निर्णयामुळे मागास कृषी जिल्ह्यांच्या विकासाला मोठी चालना मिळणार आहे.
ही योजना केंद्र सरकार ने २०२५-२६ च्या अर्थसंकल्पात जाहीर केली असून देशातील १०० आकांक्षित जिल्ह्यांचा विकास करण्याचा उद्देश आहे. महाराष्ट्रातील वरील ९ जिल्ह्यांचा त्यात समावेश करण्यात आला आहे.

योजनेचा मुख्य उद्देश

🌕.   शेती उत्पादनात वाढ करणे
🌕.    पिकांमध्ये विविधता वाढवणे
🌕.  शाश्वत शेती पद्धतीला प्रोत्साहन
🌕.      सिंचन सुविधा वाढवणे
🌕.    साठवणूक क्षमता सुधारणा
🌕.     शेतकऱ्यांना अल्प व दीर्घ मुदतीचे कर्ज उपलब्ध करणे
समित्यांची रचना
राज्य स्तरावर समिती – अध्यक्ष: मुख्य सचिव
जिल्हा स्तरावर समिती – अध्यक्ष: जिल्हाधिकारी

जिल्हा समितीची प्रमुख कामे

🕳️.  सर्वसमावेशक जिल्हा कृती आराखडा तयार करणे
🕳️.   निधीचे योग्य नियोजन व वेळेवर वितरण
🕳️.    कृषी उत्पादन, कर्ज व मूल्यवर्धन यावर                नियमित आढावा
🕳️.    मागास तालुके व गावांवर विशेष लक्ष
🕳️.    खासगी क्षेत्राचा सहभाग वाढवणे
🕳️.   नीती आयोगाच्या डॅशबोर्डवर माहिती                  अद्ययावत करणे

योजनेचा कालावधी

ही योजना ५ वर्षांसाठी राबवली जाणार असून केंद्र व राज्य योजनांच्या अभिसरणातून अंमलबजावणी केली जाईल.
शेतकऱ्यांसाठी काय फायदा?
उत्पन्न वाढण्याची संधी,आधुनिक शेती तंत्रज्ञानाचा वापर,बाजारपेठ व ब्रँडिंगसाठी मदत
मूल्यवर्धनातून अधिक नफा

पवनराजे निंबाळकर हत्या प्रकरणाचा निकाल 14 मे रोजी; पद्मसिंह पाटील यांच्यासह 9 आरोपींचे भविष्य ठरणार ?

0

धाराशिव — राज्यभर गाजलेल्या पवनराजे निंबाळकर हत्या प्रकरणाचा बहुप्रतीक्षित निकाल येत्या 14 मे रोजी लागणार आहे. तब्बल वीस वर्षांनंतर या प्रकरणाचा शेवट जवळ आला असून, राजकीय वर्तुळात पुन्हा एकदा खळबळ उडाली आहे.

धाराशिवचे विद्यमान खासदार ओमराजे निंबाळकर यांचे वडील दिवंगत पवनराजे निंबाळकर आणि त्यांच्या चालकाची 2006 मध्ये निर्घृण हत्या करण्यात आली होती. या प्रकरणात राज्याचे माजी गृहमंत्री डॉ. पद्मसिंह पाटील यांच्यासह एकूण 9 जणांवर गंभीर आरोप आहेत.

 काय आहे प्रकरण?

3 जून 2006 रोजी कळंबोली येथे पवनराजे निंबाळकर यांच्या गाडीवर गोळीबार करून त्यांची आणि चालक समद काझी यांची हत्या करण्यात आली. या हल्ल्यामागे सुपारी किलिंगचा कट असल्याचा आरोप तपास यंत्रणांनी केला आहे.
सीबीआयच्या तपासानुसार, या हत्येसाठी सुमारे 25 लाख रुपयांची सुपारी देण्यात आली होती. अनेक महिन्यांच्या कटानंतर हा हल्ला घडवून आणण्यात आल्याचा दावा करण्यात आला आहे.

 सुनावणीची स्थिती

या प्रकरणाची सुनावणी मुंबईतील विशेष न्यायालयात सुरू आहे न्यायाधीश एस. आर. नावंदर  यांच्या कोर्टात ही सुनावणी सुरू आहे 4 जुलै 2011 पासून सुनावणी केली जाणार आहे.
🕳️ साक्षीदार 128 (यात समाजसेवक अण्णा हजारे यांचा समावेश)
🕳️  माफीचा साक्षीदार: पारसमल जैन बादला
दरम्यान, अलीकडील सुनावणीला डॉ. पद्मसिंह पाटील यांच्यासह 7 आरोपी हजर होते.
बचाव पक्षाची भूमिका
डॉ. पद्मसिंह पाटील यांच्या वतीने तब्बल 1250 पानांचे लेखी म्हणणे सादर करण्यात आले आहे. या निवेदनात निंबाळकर कुटुंबावरच गंभीर आरोप करण्यात आले आहेत.
तपासाची व्याप्ती
या प्रकरणाचा तपास तीन प्रमुख यंत्रणांनी केला आहे पोलीस,सीआयडी,सीबीआय
हत्या प्रकरणात 2009 मध्ये सीबीआयने डॉ. पद्मसिंह पाटील यांना अटक केली होती, तेव्हा ते खासदार होते.
आता पुढे काय?
14 मे रोजी होणारा निकाल हा केवळ एका हत्येचा निकाल नसून, महाराष्ट्रातील मोठ्या राजकीय प्रकरणाचा शेवट मानला जात आहे. या निकालाकडे संपूर्ण राज्याचे लक्ष लागले आहे.

सिरसदेवीत गांजा विक्रीवर छापा; पावणेतीन लाखाचा मुद्देमाल जप्त

0

बीडगेवराई तालुक्यातील सिरसदेवी येथे गांजाची बेकायदेशीर साठवण व विक्री करणाऱ्या आरोपीवर स्थानिक गुन्हे शाखा (LCB) आणि तलवडा पोलिसांनी संयुक्त कारवाई करत मोठा पर्दाफाश केला आहे. या कारवाईत तब्बल २ लाख ६६ हजार ६४० रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला असून एका आरोपीला अटक करण्यात आली आहे.

स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक शिवाजी बंटेवाड यांना सिरसदेवी येथे गांजाची चोरटी विक्री सुरू असल्याची खात्रीशीर माहिती मिळाली होती. या माहितीची पडताळणी करून वरिष्ठांच्या आदेशानुसार तात्काळ छापा टाकण्यात आला या छाप्यात शेख रईस शेख युसूफ (वय २५, रा. सिरसदेवी) याच्या घराची झडती घेतली असता, दोन लाख 66 हजार 640 रुपये किमतीचा आठ किलो 888 ग्रॅम गाजा यावेळी जप्त करण्यात आला.

याप्रकरणी आरोपीला ताब्यात घेऊन त्याच्याविरुद्ध तलवडा पोलीस ठाण्यात गुन्हा नोंद करण्यात आला असून पुढील तपास सुरू आहे.ही कारवाई पोलीस अधीक्षक नवनीत काँवत, अप्पर पोलीस अधीक्षक सचिन पांडकर, उपविभागीय पोलीस अधिकारी अनिल कटके यांच्या मार्गदर्शनाखाली पार पडली.

या मोहिमेत नायब तहसीलदार गजानन मोरे, सपोनि संतोष जंजाळ, पोउनि सुशांत सुतळे, तसेच पोलीस कर्मचारी आनंद मस्के, विकास राठोड, राहुल शिंदे, अंकुश वरपे, बबन सलगर, अतुल हराळे, सुधीर जोशी यांचा सहभाग होता.

आष्टी महावितरणच्या महिला अभियंत्या 18 हजारांच्या लाचेसह रंगेहात पकडल्या

0

बीड — जिल्ह्यात लाचखोरीच्या घटनांमध्ये दिवसेंदिवस वाढ होत असल्याचे चित्र समोर येत आहे. काल गेवराई तालुक्यातील तलवाडा येथील ग्रामसेवकाला लाच घेताना पकडण्यात आल्यानंतर आज पुन्हा एक मोठी कारवाई करण्यात आली आहे.आज (दि.२१) दुपारी आष्टी येथील महावितरण कार्यालयातील सहाय्यक अभियंता कोमल अर्जुन शिंदे यांना १८ हजार रुपयांची लाच घेताना लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने रंगेहात पकडले.

 नेमकं प्रकरण काय?

प्राथमिक माहितीनुसार, तक्रारदाराच्या सोलार प्रकल्पाच्या पडताळणीसाठी संबंधित अधिकाऱ्यांनी लाचेची मागणी केली होती.
याबाबत तक्रारदाराने तत्काळ लाचलुचपत प्रतिबंधक विभाग (ACB) बीड यांच्याकडे तक्रार दाखल केली.त्यानंतर अधिकाऱ्यांनी सापळा रचून आज दुपारी उशिरा कारवाई करताना १८ हजार रुपयांची लाच स्वीकारताना आरोपी अभियंत्यांना पकडले ही कारवाई पोलीस उपअधीक्षक सोपान चिटमपल्ले यांच्या मार्गदर्शनाखाली बीड ACB पथकाने केली. दुपारपर्यंत कारवाई सुरू होती.या घटनेमुळे महावितरण विभागात मोठी खळबळ उडाली असून, सलग दोन दिवसांत झालेल्या कारवायांमुळे प्रशासनात भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.

महाराष्ट्रात पुढील 120 तास धोक्याचे! मुसळधार पाऊस, गारपीट आणि वादळी वाऱ्याचा IMD कडून हाय अलर्ट

0

मुंबई — भारतीय हवामान विभाग (IMD) ने महाराष्ट्रासाठी पुढील 120 तास अत्यंत महत्त्वाचे असल्याचा इशारा दिला आहे. राज्यात एकीकडे कडक उन्हाचा तडाखा कायम असताना, दुसरीकडे अचानक अवकाळी पावसाचा मोठा धोका निर्माण झाला आहे.
IMD च्या ताज्या अंदाजानुसार, 21 ते 24 एप्रिल दरम्यान महाराष्ट्रातील बहुतांश भागांमध्ये मेघगर्जना, विजांचा कडकडाट, जोरदार पाऊस आणि गारपीट होण्याची दाट शक्यता आहे. त्यामुळे संपूर्ण राज्यात हाय अलर्ट जारी करण्यात आला आहे.

 कोणत्या भागांना सर्वाधिक धोका?

हवामान खात्याने खालील विभागांना विशेष सतर्क राहण्याचा इशारा दिला आहे:विदर्भ
मराठवाडा,मध्य महाराष्ट्र कोकण पट्टा
प्रभावित जिल्हे
पालघर, रत्नागिरी, सिंधुदुर्ग, धुळे, जळगाव, नाशिक, अहिल्यानगर, पुणे, कोल्हापूर, सातारा, सांगली, सोलापूर, छत्रपती संभाजीनगर, जालना, परभणी, बीड, हिंगोली, नांदेड, लातूर, गोंदिया, चंद्रपूर, यवतमाळ

उष्णतेचा तडाखा कायम

दरम्यान, अमरावती आणि वर्धा जिल्ह्यांमध्ये उष्णतेची लाट कायम राहणार असून IMD ने पिवळा इशारा (Yellow Alert) जारी केला आहे. त्यामुळे राज्यात “दोन टोकाचे हवामान” अनुभवायला मिळत आहे.

प्रशासन सतर्क – नागरिकांना महत्त्वाचे निर्देश

महाराष्ट्र सरकारने सर्व यंत्रणांना सज्ज राहण्याचे आदेश दिले आहेत रुग्णवाहिका, अग्निशमन दल आणि आपत्ती व्यवस्थापन पथके तयार करून
शाळा आणि सरकारी इमारती सुरक्षित निवाऱ्यासाठी खुल्या करण्यात आल्या आहेत
मोठे कार्यक्रम आणि धार्मिक यात्रा पुढे ढकलल्या
बांधकाम कामांवर तात्पुरती बंदी घातली आहे

शेतकऱ्यांसाठी विशेष सूचना

विजांचा कडकडाट सुरू असताना शेतात काम टाळा,जनावरांना सुरक्षित ठिकाणी ठेवा
पीक आणि उपकरणे संरक्षित ठेवा
नागरिकांसाठी सुरक्षितता टिप्स
वादळी वाऱ्यात झाडाखाली उभे राहू नका
मोबाईल वापरताना खुल्या जागेत सावध रहा
विजेच्या खांबांपासून दूर राहा
अफवांवर विश्वास ठेवू नका25 एप्रिलपर्यंतचा काळ महाराष्ट्रासाठी आव्हानात्मक ठरणार असून, हवामानातील अचानक बदलामुळे जीवित व मालमत्तेचे नुकसान टाळण्यासाठी प्रशासन आणि नागरिकांनी सतर्क राहणे अत्यावश्यक आहे.

5 हजारांची लाच घेताना ग्रामसेवक एसीबीने रंगेहात पकडला

0

बीड —  जिल्ह्यात लाचखोरीच्या घटनांमध्ये वाढ झाली त्याच प्रमाणात लाच लुचपत प्रतिबंधक विभागाच्या कारवाया देखील वाढलेल्या आहेत. लाचखोरीचं शेण खान्याचा आणखी एक धक्कादायक प्रकरण समोर आले आहे. तलवाडा येथील ग्रामसेवक सोपान मुसळे याला 5 हजार रुपयांची लाच स्वीकारताना लाच लुचपत प्रतिबंधक विभागाने (Anti Corruption Bureau)  च्या पथकाने रंगेहात पकडले

 काय आहे संपूर्ण प्रकरण?

मिळालेल्या माहितीनुसार, तक्रारदाराकडून पीटीआर (PTR) देण्यासाठी आरोपी ग्रामसेवकाने सुरुवातीला 10 हजार रुपयांची लाच मागितली होती. तडजोडीच्या चर्चेनंतर हा व्यवहार 5 हजार रुपयांवर ठरला. यानंतर तक्रारदाराने जालना ( Jalna )येथील एसीबी कार्यालयात तक्रार दाखल केली.
तक्रारीची पडताळणी केल्यानंतर सोमवारी गेवराई ( Gevrai )येथे सापळा रचण्यात आला. यावेळी आरोपी मुसळे याने तक्रारदाराकडून 5 हजार रुपयांची लाच स्वीकारताच एसीबीच्या पथकाने त्याला रंगेहात पकडले.

 कारवाई कोणाच्या मार्गदर्शनाखाली?

ही संपूर्ण कारवाई एसीबीचे उपअधीक्षक बाळासाहेब जाधवर यांच्या मार्गदर्शनाखाली पार पडली. सध्या आरोपीविरुद्ध गेवराई पोलीस ठाण्यात ( Gevrai Police Station )येथे गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू असून पुढील तपास सुरू आहे.

भेंडवळ घटमांडणी 2026: पावसाचा इशारा, पिकांवर संकट आणि देशाच्या अर्थव्यवस्थेबाबत मोठा अंदाज

0

बुलढाणा — महाराष्ट्रातील शेतकऱ्यांचे लक्ष लागून राहणारी अक्षय्य तृतीया निमित्ताने विदर्भातील भेंडवळ येथे पार पडलेली ऐतिहासिक घटमांडणी यंदाही चर्चेत आली आहे. सुमारे ३५० वर्षांची परंपरा असलेल्या या विधीतून आगामी वर्षातील पाऊसमान, पीकस्थिती आणि देशाच्या सामाजिक-राजकीय घडामोडींबाबत महत्त्वाचे संकेत देण्यात आले आहेत.

 पावसाचा अंदाज: सुरुवात दमदार, पण पुढे धोका

भेंडवळच्या घटमांडणीनुसार यंदा मान्सूनची सुरुवात जोरदार होण्याची शक्यता आहे.
जून: पावसाची दमदार सुरुवात
जुलै: सर्वसाधारण पाऊस
ऑगस्ट-सप्टेंबर: पावसात घट
मात्र, पावसातील अनियमिततेमुळे काही भागात महापुराचा धोका निर्माण होऊन शेतीचे नुकसान होऊ शकते, असा इशाराही देण्यात आला आहे.

पीक स्थिती: कोणती पिके फायदेशीर?

✅ भरघोस उत्पादन
कापूस
तांदूळ
तीळ
बाजरी

 या पिकांना यंदा चांगला भाव मिळण्याची शक्यता आहे.

सर्वसाधारण पिके
ज्वारी
तूर
मूग, उडीद
मटकी, जवस, वाटाणा
या पिकांचे उत्पादन मध्यम राहण्याचा अंदाज आहे.

शेतकऱ्यांसाठी इशारा

पिकांवर रोगराईचे प्रमाण वाढण्याची शक्यता
हवामानातील बदलांमुळे उत्पादनावर परिणाम
शेती व्यवस्थापन अधिक काळजीपूर्वक करावे लागणार
देशाची स्थिती: आर्थिक आणि राजकीय संकेत
घटमांडणीतून देशाच्या स्थितीबाबतही काही महत्त्वाचे अंदाज व्यक्त झाले आहेत:
पंतप्रधान पदावर कायम राहण्याची शक्यता
राजकीय आणि मानसिक तणाव वाढू शकतो
देशाची आर्थिक स्थिती फारशी मजबूत राहणार नाही
आंतरराष्ट्रीय आणि संरक्षण स्थिती
इराण – अमेरिका तणावाचा परिणाम भारतावर होण्याची शक्यता
सीमावर्ती भागात तणाव वाढण्याची चिन्हे
संरक्षण व्यवस्थेवर ताण वाढण्याचा अंदाज

 परंपरेचे महत्त्व

पूर्णा नदीकाठी पार पडणारी ही घटमांडणी शेतकऱ्यांसाठी आजही आशेचा आधार मानली जाते. चंद्रभान महाराज यांनी सुरू केलेली ही परंपरा आजही श्रद्धेने पाळली जाते. बदलत्या हवामानाच्या काळातही या पारंपरिक अंदाजांकडे संपूर्ण देशाचे लक्ष लागलेले असते.

महाराष्ट्रात सरकारी कर्मचाऱ्यांचा बेमुदत संप; सरकारचा “काम नाही, वेतन नाही” इशारा

0

मुंबई — महाराष्ट्रातील राज्य सरकारी कर्मचारी मध्यवर्ती संघटना आणि गट-ड कर्मचारी महासंघाने विविध मागण्यांसाठी मंगळवार (२१ एप्रिल) पासून बेमुदत संपाची घोषणा केली आहे. या संपामुळे राज्यभरातील शासकीय कामकाज ठप्प होण्याची शक्यता व्यक्त होत आहे. यावर राज्य सरकारने कडक भूमिका घेत सर्व विभागांना महत्त्वाच्या सूचना जारी केल्या आहेत.
सामान्य प्रशासन विभागाने काढलेल्या परिपत्रकात स्पष्ट करण्यात आले आहे की, संपामध्ये सहभागी होणाऱ्या कर्मचाऱ्यांवर शिस्तभंगाची कारवाई करण्यात येईल. तसेच “काम नाही, वेतन नाही” हे धोरण लागू करण्यात येणार असून संपकाळातील वेतन दिले जाणार नाही.

सरकारने सर्व विभागप्रमुखांना असे दिले आदेश 

🛑  कोणत्याही कर्मचाऱ्याला संपकाळात रजा मंजूर करू नये
🛑.   रजेवर असलेल्या कर्मचाऱ्यांना तात्काळ कामावर बोलवावे
🛑.  कार्यालये नियमित वेळेत सुरू व बंद ठेवावीत आवश्यक असल्यास पोलीस बंदोबस्ताची मदत घ्यावी
🛑.  विभागप्रमुखांनी मुख्यालय सोडू नये
याशिवाय, महाराष्ट्र अत्यावश्यक सेवा अधिनियम (ESMA) अंतर्गत येणाऱ्या सेवांमध्ये सहभागी कर्मचाऱ्यांनी संप केल्यास त्यांच्यावर कायदेशीर कारवाई होऊ शकते, असा इशाराही देण्यात आला आहे.
राज्य सरकारने सर्व विभागांना अत्यावश्यक सेवा सुरळीत ठेवण्यासाठी विशेष उपाययोजना करण्याचे निर्देश दिले आहेत

बीड नगर परिषदेत मोठी कारवाई: 3 अधिकाऱ्यांच्या निलंबनाचा प्रस्ताव

0

कोणीही असो चुकीला माफी नाहीच – नगराध्यक्षा प्रेमलताताई पारवे

बीड —  डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंती महोत्सवातील मिरवणुकीत कचखडी आणि रस्त्यावर अचानक आलेल्या पाण्यामुळे मोठी गैरसोय झाली होती. या प्रकरणात नगरपालिकेने बांधकाम विभागातील इंजि. किरण देशमुख, स्वच्छता विभाग प्रमुख गणेश पगारे आणि पाणीपुरवठा विभागाचे प्रमोद माने या तिघांना नोटीस बजावली होती. सदरील नोटीसचे खुलाशे संबंधितांनी सादर केले आहेत मात्र ते समाधानकारक नसल्याने आणि त्यांच्याकडून गंभीर चूक झाल्याने इंजि. देशमुख यांच्यासह पगारे, माने या तिघांविरुद्ध नगराध्यक्षा यांच्या आदेशावरून मुख्याधिकाऱ्यांनी निलंबनाच्या कारवाईचा प्रस्ताव नगरपरिषद प्रशासनाचे सह आयुक्त यांच्यामार्फत आयुक्त तथा संचालक नगरपरिषद प्रशासन संचालनालय मुंबई यांच्याकडे पाठवला आहे. दरम्यान या संदर्भात वरिष्ठ स्तरावर प्रशासकीय पाठपुरावा करण्यात येणार आहे. दोषीवर कारवाई करण्यात येणार असून चुकीला माफी नसल्याचे नगराध्यक्ष प्रेमलताताई पारवे यांनी स्पष्ट केले.
भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार विश्वरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंती उत्सव मिरवणुकीच्या अनुषंगाने विविधि प्रकारच्या उपाययोजना करणेबाबत आदेश निर्गमीत करण्यात आले होते. परंतु रस्त्यावर टाकण्यात आलेल्या कचखडीमुळे तसेच मिरवणूकी दरम्यान रात्री 9.30 नंतर मिरवणूक मार्गावर एका ठिकाणी अचानक घाण पाणी आल्यामुळे नागरीकांना त्रास सहन करावा लागला. सदरील गैरसोयीबद्दल नगर पालिकेने बांधकाम विभाग प्रमुख इंजि.किरण देशमुख,पाणी पुरवठा विभाग प्रमुख  प्रमोद माने तसेच स्वच्छता विभाग प्रमुख गणेश पगारे यांना नोटीस बजावून खुलासा मागवण्यात आला होता,  संबंधिताचे खुलासे प्राप्त झाले असून सदरील खुलाशाच्या अनुषंगाने संबंधीत विभाग प्रमुख यांच्यावर उचित कार्यवाहीस्तव निलंबनाचा प्रस्ताव आयुक्त तथा संचालक नगरपरिषद प्रशासन मुंबई यांच्याकडे पाठवण्यात आला आहे. जयंती उत्सव मिरवणुकी दरम्यान भीमसैनिकांची आणि नागरिकांची झालेली गैरसोय ही गंभीर बाब असून या प्रकरणात कोणालाही पाठीशी घालण्यात आलेले नाही. यामध्ये जे कोणी दोषी आहेत त्यांच्याविरुद्ध कारवाई प्रस्तावित करण्यात आली असून आवश्यक ती सर्व प्रकारची कायदेशीर प्रक्रिया पूर्ण करण्यात येत असल्याचे नगराध्यक्ष प्रेमलताताई पारवे यांनी सांगितले.

विघ्नसंतोषी लोकांनी पाणी सोडल्याचा स्वच्छता विभाग प्रमुखाचा खुलासा 

जयंती उत्सव मिरवणुकी दरम्यान त्या दिवशी रात्री 10 वाजेपर्यंत कसल्याही प्रकारची तक्रार नव्हती. कदाचित बीड नगर परिषद कार्यालयाच्या मागील वस्तीमध्ये पाणी पुरवठा सुरू होता. रोडवरील रहदारीमुळे ती कच खडी नालीमध्ये गेली असावी किंवा नगर परिषदेच्या बाजूस शासकीय रुग्णालयाचे निवास आहेत. तिथे पाण्याची टाकी असून तिथून काही विघ्नसंतोषी लोकांनी पाणी सोडले असेल त्यामुळेच पाणी आले असेल, त्यामुळे ते तपासणे गरजेचे असल्याचा असा खुलासा स्वच्छता विभाग प्रमुख यांनी केला.

मुख्याधिकाऱ्यांनी दिले पोलीस ठाण्याला पत्र

महामानव डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंतीनिमित्त काढण्यात आलेल्या मिरवणुकीदरम्यान रात्री 9.30 च्या सुमारास नगर परिषद बीड कार्यालयाशेजारील शासकीय  निवासस्थाना समोर रस्त्यावर अचानक पाणी जमा होऊन मिरवणूकीस अडथळा निर्माण झाला. सदर ठिकाणी जाणीवपूर्वक अज्ञात व्यक्तींनी नगर परिषदेची बदनामी करून मिरवणुकीस अडथळा निर्माण करत सामाजिक तेढ निर्माण करण्याचा प्रयत्न केला असल्याचे निदर्शनास येत असून सदर प्रकरणात चौकशी करून गुन्हा दाखल करण्याबाबत योग्य ती कार्यवाही करावी व या कार्यालयामार्फत संबंधितांवर गुन्हा दाखल करण्यासाठी नगर परिषदेचे उपमुख्याधिकारी उमेश दुधाळ यांना प्राधिकृत करण्यात येत असल्याचे पत्र मुख्याधिकारी यांनी बीड शहर पोलिसांना दिले आहे.