चंदन पठाण यांना ‘यंग जर्नलिस्ट ऑफ द इयर 2026’ पुरस्कार जाहीर

बीड — गेल्या दोन दशकांपासून पत्रकारिता क्षेत्रात आपल्या लेखणीचा दरारा निर्माण करणारे आणि बीड शहरातील प्रसिद्ध दैनिक ’सिटीझन’चे कार्यकारी संपादक चंदन पठाण यांना यंदाचा अत्यंत मानाचा यंग जर्नलिस्ट ऑफ द इयर 2026 पुरस्कार जाहीर झाला आहे. ’साप्ताहिक युवा लोकमित्र’ वृत्तपत्राच्या 5 व्या वर्धापन दिनानिमित्त आणि 6 व्या वर्षात पदार्पण सोहळ्याचे औचित्य साधून ’युवा लोकमित्र परिवार’च्या वतीने या पुरस्काराची अधिकृत घोषणा करण्यात आली आहे.

साप्ताहिक युवा लोकमित्र’तर्फे विविध क्षेत्रांत उल्लेखनीय व आदर्शवत कामगिरी करणार्‍या कर्तृत्ववान व्यक्तींना सन्मानित करण्यात येते. पुरस्कार निवड समितीने पत्रकारिता क्षेत्रातील निष्पक्ष, निर्भीड आणि सातत्यपूर्ण योगदानासाठी चंदन पठाण यांच्या नावावर एकमुखाने शिक्कामोर्तब केले आहे.चंदन पठाण हे गेल्या 20 वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात सक्रिय कार्यरत आहेत. सामान्य

जनतेचे प्रश्न प्रशासनासमोर मांडणे, सामाजिक समस्यांना वाचा फोडणे आणि बीड जिल्ह्याच्या विकासात्मक मुद्द्यांवर सातत्याने प्रकाश टाकणे ही त्यांच्या पत्रकारितेची प्रमुख वैशिष्ट्ये राहिली आहेत. दैनिक ’सिटीझन’चे कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळताना त्यांनी अनेक नवोदित पत्रकारांना मार्गदर्शन केले असून, तरुण पिढीमध्ये पत्रकारितेची नवी ऊर्जा निर्माण केली आहे. त्यांच्या याच प्रदीर्घ अनुभवाला आणि तरुण सुलभ उत्साहाला दाद म्हणून त्यांना ’यंग जर्नलिस्ट ऑफ द इयर’ या पुरस्काराने गौरविण्यात येत आहे.

हा दिमाखदार पुरस्कार वितरण सोहळा येत्या शनिवार, 20 जून 2026 रोजी संध्याकाळी 06:00 वाजता ’ताज पॅलेस’, कादरपुरा, बार्शीनाका, बीड येथे अत्यंत उत्साहात पार पडणार आहे. राजकीय, सामाजिक, शैक्षणिक आणि प्रशासकीय क्षेत्रातील अनेक दिग्गज मान्यवरांच्या प्रमुख उपस्थितीमध्ये हा सोहळा पार पडणार आहे.

चंदन पठाण यांनी आपल्या 20 वर्षांच्या पत्रकारितेत नेहमीच तत्त्वांना आणि जनहिताला प्राधान्य दिले. दैनिक सिटीझनच्या माध्यमातून त्यांनी पत्रकारितेचा एक वेगळा दर्जा निर्माण केला आहे. त्यांच्यासारख्या अभ्यासू आणि ऊर्जावान संपादकाचा सन्मान करताना युवा लोकमित्र परिवाराला अत्यंत अभिमान वाटत आहे असे साप्ताहिक युवा लोकमित्रचे संपादक शेख ताहेर जाफर यांनी म्हटले आहे.

पुरस्कार जाहीर झाल्याबद्दल चंदन पठाण यांच्यावर पत्रकारिता क्षेत्रातून, विविध राजकीय नेत्यांकडून, सामाजिक संघटनांकडून आणि मित्रपरिवाराकडून अभिनंदनाचा वर्षाव होत

आहे.

Related Articles

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Stay Connected

0FansLike
0FollowersFollow
0SubscribersSubscribe

Latest Articles