Home क्राईम केजमध्ये मोठी पोलिस कारवाई : कत्तलीच्या उद्देशाने ठेवलेली ८ गोवंश जनावरे जप्त

केजमध्ये मोठी पोलिस कारवाई : कत्तलीच्या उद्देशाने ठेवलेली ८ गोवंश जनावरे जप्त

0
7

केज (बीड) : बीड जिल्ह्यातील केज शहरात गोवंश जातीच्या जनावरांची कत्तल करण्याच्या उद्देशाने त्यांना बांधून ठेवण्यात आल्याची धक्कादायक बाब समोर आली आहे. या प्रकरणी विशेष पथकाने तातडीने कारवाई करत तब्बल ८ जनावरे जप्त केली असून दोन जणांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.


ही कारवाई पोलीस अधीक्षक नवनीत कावत , अपर पोलीस अधीक्षक चेतना तिडके आणि सहायक पोलीस अधीक्षक श्री. वेंकटराम  यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आली.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, दिनांक २७ मे २०२६ रोजी सकाळी सुमारे ११ वाजण्याच्या सुमारास सहायक पोलीस अधीक्षक श्री. वेंकटराम यांना गोपनीय माहिती प्राप्त झाली होती. त्यानंतर उपविभागीय पोलीस अधिकारी कार्यालय, केज येथील विशेष पथकाने तातडीने छापा टाकला.


या कारवाईदरम्यान भागवत बारीकराव पारवे (रा. केज) आणि नौशाद उस्मान कुरेशी (रा. कुरेशी मोहल्ला, केज) हे गोवंश जातीच्या बैल व गाय अशा एकूण ८ जनावरांना कत्तलीच्या उद्देशाने बांधून ठेवल्याचे आढळून आले. जप्त करण्यात आलेल्या जनावरांची अंदाजे किंमत १ लाख ६३ हजार रुपये असल्याचे सांगण्यात आले.
या प्रकरणी पोलीस हवालदार राजू रुपचंद वंजारे यांच्या फिर्यादीवरून केज पोलीस ठाण्यात प्राण्यांना क्रूरतेने वागविण्यास प्रतिबंध अधिनियम १९६०, महाराष्ट्र पशु संरक्षण सुधारणा अधिनियम १९७६ तसेच महाराष्ट्र पोलीस कायद्यानुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
सदरची कारवाई ग्रेड पोलीस उपनिरीक्षक अमीरोद्दीन इनामदार, पोलीस हवालदार बालासाहेब डापकर, धोंडीराम मोरे, राजू वंजारे, विशाल क्षीरसागर आणि विकास चोपणे यांच्या पथकाने यशस्वीरीत्या पार पाडली.

NO COMMENTS

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here