केज उपविभागीय विशेष पथकाची कारवाई; 6.53 लाखांचा प्रतिबंधित गुटखा जप्त

केज — बीड जिल्ह्यातील केज उपविभागीय विशेष पथकाने मोठी कारवाई करत महाराष्ट्रात विक्रीस प्रतिबंधित असलेला गुटखा आणि पानमसाला जप्त केला आहे. या कारवाईत तब्बल 6 लाख 53 हजार 945 रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला असून एका आरोपीविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.


पोलीस अधीक्षक नवनीत कावत, अपर पोलीस अधीक्षक चेतना तिडके तसेच सहायक पोलीस अधीक्षक वेंकटराम यांच्या मार्गदर्शनाखाली विशेष पथकाने ही कारवाई केली.
दिनांक 23 मे 2026 रोजी दुपारी 3 वाजण्याच्या सुमारास गुप्त माहितीच्या आधारे पोलीसांनी युसुफवडगाव हद्दीत सापळा रचला. यावेळी संजय रामलिंग तपसे (वय 47, रा. चंदनसावरगाव, ता. केज) याच्या ताब्यातून प्रतिबंधित गुटखा आणि पानमसाला जप्त करण्यात आला.
जप्त करण्यात आलेल्या मुद्देमालामध्ये विमल पान मसाला, दिलबाग पान मसाला, गोवा गुटखा-1000 पूडे यांसह वाहतुकीसाठी वापरण्यात आलेली महिंद्रा TUV-300 (MH-46-BK-8119) या वाहनाचा समावेश आहे.
प्राथमिक चौकशीत आरोपीने हा माल रंजीत नागनाथ आगाडे (रा. इंदिरानगर, कळंब, जि. धाराशिव) याच्याकडून आणल्याची माहिती दिली. याप्रकरणी युसुफवडगाव पोलीस ठाण्यात गुन्हा क्रमांक 142/2026 दाखल करण्यात आला असून भारतीय न्याय संहिता 2023 अंतर्गत कलम 123, 274 आणि 275 प्रमाणे कारवाई करण्यात आली आहे.
ही कारवाई ग्रेड पोलीस उपनिरीक्षक अमीरोद्दीन इनामदार, पोलीस हवालदार धोंडीराम मोरे, राजू वंजारे आणि विशाल क्षीरसागर यांच्या पथकाने केली.

Related Articles

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Stay Connected

0FansLike
0FollowersFollow
0SubscribersSubscribe

Latest Articles