केजमध्ये सोयाबीनच्या गंजींना आग; १४ लाखांचे नुकसान

केजमध्ये सोयाबीनच्या गंजींना आग लागल्याची घटना घडली आहे. केज तालुक्यातील बारगजे वस्तीवर ही आग लागली असून पाच दिवसात सहा गंजी जळाल्या आहेत.

बीड — आभाळाची साथ नाही, पावसाची हमी नाही आणि शेतीत केलेल्या खर्चाची परतफेड होईल की नाही, याची शाश्वती नाही. अशा संकटांशी दोन हात करत शेतकऱ्यांनी कष्टाने सोयाबीनचे पीक काढले. मात्र, हातात आलेल्या पिकाची मळणी होण्यापूर्वीच आगीने घास हिरावला. केज तालुक्यातील टाकळी शिवारात सोयाबीनच्या गंजी जळण्याच्या सलग घटनांनी शेतकऱ्यांच्या चिंतेत भर घातली आहे. सोमवारी (१२ ऑक्टोबर) चार गंजी जळून खाक झाल्याने बारगजे बंधूंचे सुमारे १४ लाख रुपयांचे नुकसान झाले.

केजमध्ये सोयाबीनच्या गंजींना आग

टाकळी येथील शिवाजी कोंडीबा बारगजे, राजेंद्र कोंडीबा बारगजे, शंकर कोंडीबा बारगजे आणि दशरथ कोंडीबा बारगजे या चार सख्ख्या भावांनी सोयाबीनची कापणी करून मळणीसाठी शेतात गंजी रचून ठेवल्या होत्या. सोमवारी सायंकाळी पाचच्या सुमारास या गंजींना आग लागली. शेतकरी आणि ग्रामस्थांनी आग विझवण्यासाठी प्रयत्न केले; मात्र वाळलेल्या पाचटामुळे आगीने रौद्ररूप धारण केले. पाहता पाहता चारही गंजी जळून खाक झाल्या.१४ लाख रुपयांचे नुकसान हे बारगजे बंधूंच्या चार गंजींचे आहे.

वर्षभराच्या कष्टांची राख झाल्याने बारगजे कुटुंबावर आर्थिक संकट कोसळले आहे.

पाच दिवसांत सहा गंजी जळाल्या

टाकळी शिवारात गंजी जळण्याची ही पहिली घटना नाही. ७ ऑक्टोबर रोजी बाबासाहेब वैजनाथ घुले यांच्या गंजीला आग लागली. ११ ऑक्टोबर रोजी गिरजाबाई बाबासाहेब घुले यांच्या गंजीचे नुकसान झाले. त्यानंतर १२ ऑक्टोबरला बारगजे बंधूंच्या चार गंजी जळाल्या. अशा प्रकारे पाच दिवसांत सहा गंजी आगीच्या भक्ष्यस्थानी पडल्या आहेत.

आगींच्या सत्रामुळे शेतकरी धास्तावले

गंजींना जाणीवपूर्वक आग लावण्यात आल्याचा संशय व्यक्त करत बारगजे बंधूंनी केज पोलीस ठाण्यात तक्रार दिली आहे. सहायक फौजदार पी. टी. चव्हाण या प्रकरणाचा तपास करत आहेत.

दुष्काळाशी झुंज देणाऱ्या शेतकऱ्याला आता शेतातच पिकाच्या सुरक्षिततेची चिंता सतावत आहे. या घटनांचा छडा लावून दोषींना कायद्याच्या चौकटीत आणावे, अशी मागणी ग्रामस्थांकडून होत आहे.केजमध्ये सोयाबीनच्या गंजींना आग लागल्याने शेतकऱ्यांमध्ये भीतीचे वातावरण आहे.

केजमध्ये सोयाबीनच्या गंजींना आग कोणी लावली याचा तपास पोलीस करत आहेत.

Related Articles

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

[td_block_social_counter facebook="tagdiv" twitter="tagdivofficial" youtube="tagdiv" style="style8 td-social-boxed td-social-font-icons" tdc_css="eyJhbGwiOnsibWFyZ2luLWJvdHRvbSI6IjM4IiwiZGlzcGxheSI6IiJ9LCJwb3J0cmFpdCI6eyJtYXJnaW4tYm90dG9tIjoiMzAiLCJkaXNwbGF5IjoiIn0sInBvcnRyYWl0X21heF93aWR0aCI6MTAxOCwicG9ydHJhaXRfbWluX3dpZHRoIjo3Njh9" custom_title="Stay Connected" block_template_id="td_block_template_8" f_header_font_family="712" f_header_font_transform="uppercase" f_header_font_weight="500" f_header_font_size="17" border_color="#dd3333"]
- Advertisement -

Latest Articles