गेवराईत अवैध दारू वाहतूक उघड; स्विफ्ट डिझायर कारसह 6.08 लाखांचा मुद्देमाल जप्त

बीड  — जिल्ह्यात आगामी सण-उत्सवांच्या पार्श्वभूमीवर अवैध धंद्यांवर कठोर कारवाई करण्याचे आदेश पोलीस अधीक्षक नवनीत काँवत यांनी दिले आहेत. त्या अनुषंगाने गेवराई पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक किशोर पवार यांच्या नेतृत्वाखाली विशेष पथकाने अवैध दारू वाहतुकीवर मोठी कारवाई केली आहे.


पोलिसांना गेवराई शहरातून देशी-विदेशी दारूची चोरटी वाहतूक होत असल्याची गोपनीय माहिती मिळाली होती. या माहितीच्या आधारे पोलिसांनी सावता नगर चौक परिसरात सापळा रचून तपासणी मोहीम राबवली. त्यावेळी स्विफ्ट डिझायर कार क्रमांक MH12QG7964 संशयास्पदरीत्या आढळून आली.


पोलिसांनी कारची तपासणी केली असता त्यामध्ये अवैधरित्या देशी-विदेशी दारूचा साठा आढळून आला. याप्रकरणी राम अश्रुबा कदम (वय 45, रा. पंचायत समिती रोड, भिमनगर, गेवराई) याला ताब्यात घेण्यात आले.
या कारवाईत पोलिसांनी सुमारे 8 हजार रुपयांची देशी-विदेशी दारू तसेच स्विफ्ट डिझायर कार असा एकूण 6 लाख 8 हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे. आरोपीविरुद्ध गेवराई पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास सुरू आहे.
ही कारवाई पोलीस अधीक्षक नवनीत काँवत, अपर पोलीस अधीक्षक चेतना तीडके आणि उपविभागीय पोलीस अधिकारी अनिल कटके यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आली. कारवाईत पोलीस निरीक्षक किशोर पवार, सपोनि संतोष जंजाळ, पोहेकॉ आशोक हंबर्डे, पोकॉ धिरज खांडेकर, महादेव कदम, रामराजे काकडे तसेच होमगार्ड ढाकणे यांनी सहभाग घेतला.

Related Articles

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Stay Connected

0FansLike
0FollowersFollow
0SubscribersSubscribe

Latest Articles