केज — हॉस्टेलवर राहणाऱ्या अल्पवयीन मुलीला तु आजारी असल्यामुळे दवाखान्यात दाखवायचे आहे मामाने दवाखान्यात बोलवले आहे.अशी बतावणी करून हॉस्टेल समोरून अपहरण केले. अंबाजोगाई महामार्गावरील एका लॉजच्या मागील बाजूस घेऊन जात तिच्यावर लैंगिक अत्याचार केला. ही घटना गुरुवारी उघडकीस आली. याप्रकरणी दोघा विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
बीड तालुक्यातील अल्पवयीन मुलगी शिक्षणासाठी तिच्या मामाने केज येथील हॉस्टेलवर ठेवले आहे. दरम्यान दहिफळ चिंचोली येथील सनी उर्फ स्वप्निल पाडळे, अमोल अंकुश जाधव हे दोघे बुधवारी रात्री नऊच्या सुमारास होस्टेलवर गेले. तुझे मामा उपजिल्हा रुग्णालयात आलेले आहे. तुला आजारपणामुळे दवाखान्यात दाखवायचे आहे यासाठी मामांनी बोलावले आहे. असे म्हणून दोघांनी तिला मोटार सायकल वर बसवले. अंबाजोगाई महामार्गावर असलेल्या एका लॉज च्या मागील खुल्या जागेत तिला घेऊन गेले. यावेळी सनी उर्फ स्वप्नील पाडळे याने मुलीवर बळजबरीने अत्याचार केला. त्यानंतर पीडित मुलीला तिच्या मुळगावी नेऊन सोडले.अत्याचारामुळे घाबरलेल्या पिडीत मुलीने आईवडिलांना घडलेली घटना सांगितली.नातेवाइकांनी लागलीच केज पोलिस पोलीस ठाण्यात धाव घेतली.या प्रकरणी पीडित अल्पवयीन मुलीच्या फिर्यादीवरून केज पोलिस स्थानकात बाल लैंगीक प्रतिबंधक, पोक्सो कायद्यानुसार सनी उर्फ स्वप्नील पाडळे आणि अमोल अंकुश जाधव या दोघांच्या विरोधात गुन्हा नोंद झाला आहे. पुढील तपास पोलीस निरीक्षक प्रशांत महाजन यांच्या मार्गदर्शनाखाली पिंक पथकाचे प्रमुख पोलीस उपनिरीक्षक प्रकाश शेळके हे करीत आहेत.