NTA ने NEET UG 2026 पुनर्परीक्षेची तारीख जाहीर केली आहे. 21 जून रोजी परीक्षा होणार असून विद्यार्थ्यांना पुन्हा अर्ज करण्याची गरज नाही. पेपरफुटी प्रकरणानंतर मोठा निर्णय.
स्टॅलिन यांची मोदींकडे NEET बंद करण्याची मागणी
नवी दिल्ली — नॅशनल टेस्टिंग एजन्सी (National Testing Agency )अर्थात NTA ने NEET UG 2026 पुनर्परीक्षेची अधिकृत तारीख जाहीर केली असून, ही परीक्षा रविवार 21 जून 2026 रोजी घेण्यात येणार आहे. केंद्र सरकारच्या मान्यतेनंतर हा निर्णय घेण्यात आला आहे. NEET UG 2026 पेपरफुटी प्रकरणामुळे देशभरात निर्माण झालेल्या संताप आणि गोंधळाच्या पार्श्वभूमीवर ही मोठी घोषणा करण्यात आली.

NTA ने सोशल मीडिया प्लॅटफॉर्म X वर माहिती देताना स्पष्ट केले की, re-NEET साठी विद्यार्थ्यांना पुन्हा अर्ज करण्याची आवश्यकता नाही. मे 2026 मध्ये भरलेला अर्ज, निवडलेले परीक्षा केंद्र आणि उमेदवारीची माहिती याच आधारे पुनर्परीक्षा घेतली जाणार आहे. विद्यार्थ्यांकडून कोणतेही अतिरिक्त शुल्क घेतले जाणार नाही. याशिवाय आधी भरलेले परीक्षा शुल्क परत दिले जाणार असल्याची माहितीही NTA कडून देण्यात आली.
NEET Admit Card पुन्हा जारी होणार
NTA च्या माहितीनुसार, पुनर्परीक्षेसाठी नवीन प्रवेशपत्र (Admit Card) जारी करण्यात येईल. विद्यार्थ्यांना ते अधिकृत संकेतस्थळावरून डाउनलोड करता येणार आहे.
अधिकृत वेबसाइट : neet.nta.nic.in
केंद्रीय शिक्षण मंत्र्यांच्या निवासस्थानी उच्चस्तरीय बैठक
काल रात्री उशिरा केंद्रीय शिक्षण मंत्री Dharmendra Pradhan यांच्या निवासस्थानी जवळपास दोन तास उच्चस्तरीय बैठक पार पडली. या बैठकीत भविष्यात पेपरफुटी रोखण्यासाठी कठोर उपाययोजनांवर चर्चा झाली.
बैठकीला उच्च शिक्षण सचिव विनीत जोशी, शालेय शिक्षण सचिव संजय कुमार, NTA चे महासंचालक अभिषेक सिंग, Central Board of Secondary Education चे अध्यक्ष राहुल सिंग तसेच KVS आणि NVS चे वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते.
NEET 2026 पेपरफुटीचा मोठा खुलासा
मिळालेल्या माहितीनुसार, NEET UG 2026 पेपरफुटीचे मूळ महाराष्ट्रातील नाशिक येथे असल्याचे समोर आले आहे. ही गेस पेपर साखळी हरियाणा, राजस्थान, बिहार, केरळ, जम्मू-काश्मीर आणि उत्तराखंडपर्यंत पोहोचल्याचा दावा करण्यात आला आहे.
अहवालानुसार, WhatsApp आणि Telegram ग्रुपवर 400 हून अधिक प्रश्न असलेली संभाव्य प्रश्नपत्रिका व्हायरल झाली होती. त्यातील जीवशास्त्र आणि रसायनशास्त्र विषयातील 120 हून अधिक प्रश्न मूळ पेपरशी जुळल्याचा आरोप करण्यात आला आहे.
स्टॅलिन यांची मोदींकडे मोठी मागणी
एम के स्टालिन (M. K. Stalin ) यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी ( Narendra Modi) यांना पत्र लिहून NEET मधून 2026-27 शैक्षणिक वर्षासाठी तात्पुरती सूट देण्याची मागणी केली आहे.
त्यांनी NMC कायदा 2019 मधील कलम 14 मध्ये बदल करण्यासाठी अध्यादेश आणण्याची मागणी करत, राज्य सरकारांना बारावीच्या गुणांच्या आधारे वैद्यकीय प्रवेश देण्याचा अधिकार द्यावा, असे म्हटले आहे.
स्टॅलिन यांनी पत्रात म्हटले की, “अत्यंत केंद्रीकृत परीक्षा पद्धतीमधील संरचनात्मक दोष पुन्हा एकदा उघड झाले आहेत. वारंवार होणाऱ्या पेपरफुटीमुळे विद्यार्थ्यांचा विश्वास डळमळीत झाला आहे.”
विद्यार्थ्यांसाठी महत्त्वाच्या सूचना
🕳️. पुनर्परीक्षेसाठी नवीन अर्ज करण्याची गरज नाही
🕳️. जुनी नोंदणीच वैध राहणार
🕳️. अतिरिक्त परीक्षा शुल्क आकारले जाणार नाही
🕳️. नवीन Admit Card जारी होणार
🕳️. परीक्षा 21 जून 2026 रोजी होणार

