Home क्राईम बीड: तरुणावर तीन राऊंड फायरिंग; जुन्या भांडणातून थरार, एक आरोपी ताब्यात

बीड: तरुणावर तीन राऊंड फायरिंग; जुन्या भांडणातून थरार, एक आरोपी ताब्यात

0
5

बीड — शहरातील इमामपूर रोड परिसरात जुन्या भांडणाची कुरापत काढत एका तरुणावर पिस्तुलातून तीन राऊंड फायरिंग केल्याची धक्कादायक घटना बुधवारी (दि. १२) उघडकीस आली. या घटनेमुळे परिसरात काही काळ खळबळ उडाली. याप्रकरणी बीड ग्रामीण पोलीस ठाण्यात सहा ते सात जणांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला असून, पोलिसांनी एका संशयित आरोपीला ताब्यात घेतले आहे.


शेख मोहम्मद साद शेख हारुण (वय २२, रा. जुना बाजार, हत्तीखाना, बीड) यांनी दिलेल्या तक्रारीवरून सफवान खान महेबुब खान, सय्यद साद, फरदीन, अखलाख (सर्व रा. पेठ, बीड) यांच्यासह सहा ते सात अनोळखी व्यक्तींविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपींनी गैरकायद्याची मंडळी जमवून हातात काठ्या घेत सलीम पेट्रोलपंप परिसरात फिर्यादी आणि त्याच्या मित्रांना धमकावल्याचा आरोप आहे. याचवेळी आरोपी क्रमांक एकाने पिस्तुलातून फिर्यादीच्या दिशेने तीन गोळ्या झाडल्याचे तक्रारीत नमूद करण्यात आले आहे.
फायरिंगनंतर आरोपीने लाकडी दांड्याने फिर्यादीच्या उजव्या कानावर मारहाण करून त्याला जखमी केल्याचाही आरोप आहे. घटनेनंतर ग्रामीण पोलिसांनी तपासाची चक्रे फिरवत एका आरोपीला ताब्यात घेतले आहे.
या प्रकरणी बीड ग्रामीण पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून, सपोनि दराडे पुढील तपास करीत आहेत.

NO COMMENTS

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here