Home क्राईम बीडमध्ये सात स्पा सेंटरवर पोलिसांचा छापा; महिला आणि ग्राहक ताब्यात

बीडमध्ये सात स्पा सेंटरवर पोलिसांचा छापा; महिला आणि ग्राहक ताब्यात

0
6
अश्लील कृत्ये सुरू असल्याच्या संशयावरून पोलिसांची कारवाई; ताब्यातील व्यक्तींना वैद्यकीय तपासणीसाठी जिल्हा रुग्णालयात पाठवले
बीड — शहरातील विविध भागांमध्ये सुरू असलेल्या सात स्पा सेंटरवर पोलिसांनी बुधवारी एकाच वेळी धडक कारवाई केली. स्पा सेंटरच्या नावाखाली आक्षेपार्ह प्रकार सुरू असल्याची माहिती मिळाल्यानंतर पोलिसांनी ही कारवाई केल्याचे सांगण्यात आले. या कारवाईत काही महिला आणि पुरुष ग्राहकांना पोलिसांनी ताब्यात घेतले आहे.
बीड शहर तसेच शिवाजीनगर पोलीस ठाण्याच्या हद्दीत ही कारवाई करण्यात आली. पोलीस अधीक्षक नवनीत काँवत यांच्या आदेशानंतर अपर पोलीस अधीक्षक समीर शेख यांच्या पथकाने संबंधित स्पा सेंटरवर छापे टाकले.

कारवाईदरम्यान ताब्यात घेण्यात आलेल्या महिला आणि पुरुष ग्राहकांना वैद्यकीय तपासणीसाठी बीड जिल्हा रुग्णालयात पाठवण्यात आले. वैद्यकीय तपासणीचे अहवाल आणि पोलिसांच्या पुढील तपासातून या स्पा सेंटरमध्ये नेमके कोणते प्रकार सुरू होते, याबाबत अधिक स्पष्टता होणार आहे.

दरम्यान, बीड शहरातील सात स्पा सेंटरवर एकाच वेळी झालेल्या पोलिसांच्या कारवाईमुळे खळबळ उडाली आहे. पोलिसांकडून या प्रकरणाचा पुढील तपास सुरू असून, ताब्यात घेतलेल्या व्यक्तींविरोधात कोणती कायदेशीर कारवाई केली जाते, याकडे लक्ष लागले आहे.

ब्रेकिंग अपडेट

बीडमध्ये तीन स्पा सेंटरवर पोलिसांचा छापा; कारवाईने खळबळ

बीड : स्पाच्या नावाखाली सुरू असलेल्या गैरप्रकारांविरोधात बीड पोलिसांनी बुधवारी रात्री एकाच वेळी तीन ठिकाणी धडक कारवाई केली. शहरातील ब्लीस, मिड आणि क्रिस्टल स्पा सेंटरवर छापे टाकण्यात आले. कारवाईत काही महिलांची सुटका करण्यात आली असून संबंधित आरोपींना ताब्यात घेण्यात आले आहे.

शिवाजीनगर पोलिसांनी नगर नाक्यावरील मिड स्पावर कारवाई करत दोन महिलांची सुटका केली. याप्रकरणी स्पा चालक/व्यवस्थापक सोमदेव राजेंद्र भारती याला ताब्यात घेण्यात आले असून, गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू आहे.

ही कारवाई पोलीस अधीक्षक नवनीत कॉवत व अपर पोलीस अधीक्षक समीर शेख यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आली.

मिड स्पा : आरोपी – सोमदेव राजेंद्र भारती; शिवाजीनगर पोलिसांची कारवाई.
ब्लीस स्पा : शहर पोलिसांची कारवाई.
क्रिस्टल स्पा : शहर पोलिसांची कारवाई.

NO COMMENTS

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here