बीड — चंद्रकांत गोसावी यांच्या कार्यकाळात पवनचक्की कंपन्यांचे पाय चाटण्यात मग्न असतांना न्याय मागणाऱ्या शेतकऱ्याच्या मुलाला अय शहाणपणा करू नको सातबारा दाखव नाहीतर कॅरेक्टर खराब करून टाकेल बेट्या अशी धमकी देताना चा दत्तात्रय बळवंत याचा व्हिडिओ व्हायरल झाला होता. त्यावेळी पोलीस अधीक्षक नवनीत कावत यांनी बळवंत ची पाठराखण केली होती. तोच बळवंत जालना येथील लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने दहा हजाराची लाच घेताना जेरबंद केला. शेतकऱ्याला धमकी दिली त्याच वेळी एस.पी .नी कारवाई केली असती तर आज खाकी डागाळली नसती असा सुर आता उमटू लागला आहे..
नेकनूर चे ठाणेदार राहिलेल्या चंद्रकांत गोसावी यांच्या कार्यकाळात पोलीस यंत्रणा ही फक्त जनतेसाठी नसून पवनचक्की कंपन्यांसाठी काम करत असल्याचं चित्र पाहायला मिळत होतं. अवैध धंद्यांसोबतच पवनचक्क्या सौर कंपन्या यांच मोकळ कुरण लुटायला भेटलं होतं. या विरोधात प्रसिद्धी माध्यमांनी आवाज उठवून देखील पोलीस अधीक्षक नवनीत कांवत यांनी त्यांची पाठराखण करण्याची भूमिका घेतली. परिणामी कानडी घाट येथील विद्युत टावर उभारणी करत असताना मावेजा मागणाऱ्या एका शेतकऱ्याच्या मुलाला अय शहाणपणा करू नको सातबारा दाखव नाहीतर कॅरेक्टर खराब करून टाकेल बेट्याऽऽ! असा धमकी देताना चा कॉन्स्टेबल दत्तात्रय बळवंत याचा व्हिडिओ व्हायरल झाला होता. त्यावेळी कर्तव्यदक्ष म्हणवणारे पोलीस अधीक्षक नवनीत कांवत बळवंत वर कारवाई करतील अशी अपेक्षा जनतेतून व्यक्त केली जात होती. मात्र या उलट घडल्या गेलं. बळवंतची ठाणेदारासह पोलीस अधीक्षकांकडून पाठराखण केली गेली.

शेतकरी ही पोलीस यंत्रणा ही पवनचक्की कंपन्यांसाठीच काम करणारी आहे असा एस पी नी दिलेला अप्रत्यक्ष संदेश समजून मुकाट अन्याय सहन करत गेली.
ज्या बळवंतची पाठराखण पोलीस अधीक्षकांपासून ठाणेदार पर्यंत केल्या गेली त्याच बळवंत च कॅरेक्टर किती खराब आहे हे दिसून आलं.येळंब येथील एका व्यक्तीचा काही दिवसापूर्वी अपघात झाला होता. अपघातग्रस्त रुग्णाचा उपचारादरम्यान मृत्यू झाला. मयताच्या मुलाने अपघात विम्याचा लाभ घेण्यासाठी आवश्यक कागदपत्रांची मागणी अंमलदार दत्तात्रय बळवंत याच्याकडे केली होती. त्यावेळी कागदपत्रे देण्यासाठी १० हजार रुपयांच्या लाचेची मागणी त्याने केली होती. याप्रकरणी तक्रारदाराने जालना लाचलुचपत प्रतिबंधक विभागाशी संपर्क साधला. प्रकरणाची शहानिशा केल्यानंतर लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने सापळा रचून अंमलदार बळवंत दत्तात्रय यास लाच घेताना जालना एसीबीचे उपाधीक्षक बाळासाहेब जाधवर यांच्या मार्गदर्शनाखाली रंगेहात पकडले.दरम्यान ही कारवाई शनिवारी दुपारी नेकनूर पोलीस ठाणे परिसरात करण्यात आली. याप्रकरणी दत्तात्रय बळवंत याच्या विरोधात गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू आहे. एसीबीच्या या कारवाईनंतर पोलीस अधीक्षकांनी शेतकऱ्याच्या मुलाला धमकी दिल्याचा व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर कारवाई केली असती तर आज बीड पोलिसांची खाकी डागाळली नसती असा सूर नेकनूर पोलीस ठाणे हद्दीतील जनतेतून उमटू लागला आहे.

