अंबाजोगाईत नवविवाहित तलाठ्याची आत्महत्या; मोरेवाडी परिसरात खळबळ

अंबाजोगाई — बीड जिल्ह्यातील अंबाजोगाई शहरातील मोरेवाडी परिसरात एका नवविवाहित तरुणाने गळफास घेऊन आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. गणेश दत्तू कोळी असे मृत तरुणाचे नाव असून ते चंद्रपूर महसूल विभागात तलाठी पदावर कार्यरत होते. या घटनेमुळे अंबाजोगाईसह दोन्ही कुटुंबांमध्ये शोककळा पसरली आहे.


मिळालेल्या माहितीनुसार, गणेश कोळी हे पत्नीसमवेत अंबाजोगाईतील मोरेवाडी परिसरात भाड्याच्या खोलीत राहत होते. त्यांच्या पत्नी अंबाजोगाई येथील अप्पर पोलीस अधीक्षक कार्यालयातील फॉरेन्सिक विभागात कंत्राटी पद्धतीवर कार्यरत आहेत.
घटनेच्या दिवशी पत्नी ड्युटीवर गेल्यानंतर गणेश कोळी यांनी खोलीतील लोखंडी हुकाला दोरी बांधून गळफास घेत आत्महत्या केल्याचे समोर आले आहे. काही वेळानंतर हा प्रकार उघडकीस आल्यानंतर परिसरात एकच खळबळ उडाली.
घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत पंचनामा केला. मृतदेह शवविच्छेदनासाठी शासकीय रुग्णालयात पाठवण्यात आला आहे. आत्महत्येमागचे नेमके कारण अद्याप स्पष्ट झाले नसून पोलीस विविध अंगांनी तपास करत आहेत.
विशेष म्हणजे, गणेश कोळी यांचा अवघ्या १२ दिवसांपूर्वीच विवाह झाला होता. नवविवाहानंतर इतक्या कमी कालावधीत घडलेल्या या घटनेमुळे दोन्ही कुटुंबांवर दुःखाचा डोंगर कोसळला आहे. परिसरात हळहळ व्यक्त केली जात असून आत्महत्येमागील कारणांबाबत विविध तर्क-वितर्क लावले जात आहेत.

Related Articles

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Stay Connected

0FansLike
0FollowersFollow
0SubscribersSubscribe

Latest Articles