माजलगाव मधील घटनेने खळबळ
माजलगाव — तालुक्यात ऊस तोडणीसाठी छत्तीसगढ मधून 14 जणांची आदिवासी समाजातील लोकांची टोळी आलेली आहे. यातील दोन ऊसतोड मजुरांच्या अल्पवयीन बालिकांवर बलात्कार केल्याची खळबळ जनक घटना घडली आहे.
साखर हंगाम सुरू झाल्यानंतर ऊसतोड कामगारांच्या टोळ्या माजलगाव परिसरात आलेल्या आहेत. छत्तीसगड मधून आदिवासी समाजातील लोकांची 14 जणांची टोळी ऊस तोडणीसाठी माजलगाव मध्ये आली. यातील दोन मजुरांनी आपल्या भाकरीची सोय व्हावी यासाठी आपल्या दोन अल्पवयीन मुलींना देखील सोबत आणले होते. तालुक्यातील रोशनपुरी येथे या ऊसतोड मजुरांचे ऊस तोडणीचे काम सुरू होते. हे मजूर दोन महिन्यापासून ऊसतोड मुकादम उद्धव श्रीकिशन तिडके यांनी आणले होते. दि.24 डिसेंबर रोजी ऊसतोड मजूर तोडणीसाठी गेले असता त्यांच्या झोपडीमध्ये अल्पवयीन मुली एकट्याच होत्या. याचाघ फायदा घेऊन गावातील किराणा दुकानदार गणेश राजाभाऊ घाटूळ आणि त्याचा मित्र ट्रॅक्टर चालक अशोक भास्कर पवार या दोघांनी या 13 व 14 वर्षे वयाच्या दोन अल्पवयीन मुलींना झोपडीतून बाहेर बोलावले. त्यांना बाजूच्या ऊसाच्या व कापसाच्या शेतात नेत त्यांच्यावर बलात्कार केला.या घटनेनंतर दोन्ही मुली प्रचंड दहशतीत होत्या. शेवटी यातील एका पीडित मुलीने दि.28 डिसेंबर रोजी आपल्या वडिलांना घटनेची माहिती दिली. दोन्ही मुलींवर बलात्कार झाल्याच्या घटनेने एकच खळबळ उडाली. मुलीच्या वडिलांनी या प्रकरणी ग्रामीण पोलीस ठाण्यात 29 डिसेंबर रोजी तक्रार दाखल केली. या प्रकरणी घटनेतील दोन्ही नराधमांना सपोनि गोविंद पांडव यांनी अटक केली असून पुढील तपास उपविभागीय पोलीस अधिकारी करत आहेत.

एकीकडे हरितक्रांतीच्या नावाखाली वारे माप रासायनिक खत तणनाशक यांचा मारा शेतात होऊ लागला त्यामध्ये काळ्या आईचं आरोग्य बिघडलं गेलं. मात्र पी जी कुलकर्णी यांचे वडील गोविंदराव कुलकर्णी यांनी कुठल्याच पिकाला रासायनिक खत कधी वापरलंच नाही. तन नाशकांचा मारा देखील केला नाही. त्यामुळे मूळतः च पी जी कुलकर्णी च्या जमिनीच आरोग्य चांगलं होतं. त्यात पुन्हा भर पडली ती देशी गाईचं शेण गोमूत्र/जैव ऊर्जा शेती यांचा वापर करून जमिनीतली जैव विविधता वाढवण्याचं काम त्यांनी केलं.
या प्रदर्शनांमधून गुळ निर्मितीचा दर्जा,हा ब्रँड कसा इतरापेक्षा वेगळा आहे. हे सांगण्यात पटवून देण्यात त्यांनी यश मिळवले. प्रदर्शनाच्या माध्यमातून ज्यांनी या गुळाची चव चाखली त्यांनी या ब्रँडची वारंवार मागणी केली. देशातल्या अनेक राज्यांसह परदेशामध्ये देखील ग्राहकापर्यंत गुळ पोहोचवला .त्यामुळे सतत चार वर्ष गुळ निर्मिती करून उत्पादित माल जास्त काळ सांभाळण्याची वेळ त्यांच्यावर आली नाही. गत वर्षी मागणी मोठ्या प्रमाणावर झाल्याने माल लवकरच संपला त्यामुळे अनेक ग्राहकांच्या पदरी निराशा पडली. ऊस उत्पादन घेताना रासायनिक खताचा/कीटकनाशकांचा/तणनाशकांचा वापर करण्यात येत नाही.
गुळ करण्याची प्रक्रीया स्टेनलेस स्टील च्या भांड्यात केली जाते, हायजेनिक पद्धतीने गुळ निर्मिती केली जात असल्यामुळे या गुळाचा चहा नासत नाही. गुळाचा दर्जा वर्षभर कायम टिकतो. या आणि याच कारणामुळे “गोविंद गुळ” ब्रँड ने आपली स्वतंत्र ओळख निर्माण करून बीड जिल्ह्याच्या शिरपेचात मानाचा तुरा खोवला आहे.

