Home Blog Page 14

अजित पवारांच्या मृत्यूभोवती संशयाचं वर्तुळ;रोहित पवारांचे गंभीर प्रश्न

0

मुंबई — राष्ट्रवादीचे दिवंगत नेते अजित पवार यांच्या विमान अपघात प्रकरणामुळे रोज नवनवीन खुलासे होत आहे. हा विमान अपघात नसून घातपात असल्याचा आतापर्यंत विरोधक आरोप करत होते. आता राष्ट्रवादीचे आमदार रोहित पवार यांनी या प्रकरणी पत्रकार परिषद घेऊन घातपात असल्याचा संशय व्यक्त केला असून सखोल चौकशीची मागणी केली आहे.

यावेळी विमान अपघाताच्या वेळीचा एक नवीन व्हिडीओ सुद्धा समोर आणला आहे.

राष्ट्रवादीचे आमदार रोहित पवार यांनी मुंबईत पत्रकार परिषद घेऊन अजित पवार यांच्या विमान अपघाताबद्दल एक सादरीकरण करून विमान कंपनीवर गंभीर आरोप केले आहे. यावेळी बारामती विमानतळाच्या धावपट्टीजवळ अजितदादांच्या विमानाला कशा प्रकारे अपघात झाला, याचा व्हिडीओ सुद्धा दाखवला आहे.

या व्हिडिओमध्ये स्पष्ट दिसत आहे की, विमानतळाच्या धावपट्टीवर मोठ्या प्रमाणात धुकं साचले आहे. विमान हे धावपट्टीच्या बाजूला कोसळलं होतं. त्यावेळी मोठ्या प्रमाणात आगीच्या ज्वाला दिसून येत आहे. विमानाचा स्फोट झाल्याचं या व्हिडीओमध्ये दिसून येत आहे. धावपट्टीच्या बाजूला एक लाईन दिसत आहे, त्यानंतर स्फोट झाला, ती लाईन काय आहे, आग आहे का, हे बघावे लागणार आहे. धावपट्टीवर ५ किमी पेक्षा कमी दृश्यमानता होती पण तरी सुद्धा विमानाचं लँडिंग का करण्यात आलं होतं, असा सवाल यावेळी रोहित पवार यांनी उपस्थितीत केला.

बारामतीच्या विमानतळावर खासगी विमानासाठी प्रशिक्षण दिलं जातं, यावेळी लावण्यात आलेल्या एका कॅमेऱ्यात ही संपूर्ण घटना कैद झाली आहे.

‘हा अपघात नाही घातपात’

“हा अपघात होता का घात होता तर आमची शंका आहे की हा घात होता. जी जी माहिती आमच्याकडे आले त्यावरून मी कुणावर शंका घेत आहे असे नाही. बराच राज्यात ती कंपनी काम करते तीने चुकीची माहिती दिली आहे. आमचा सरकार किंवा कुणावर आरोप नाही. पण सीआयडीला ही अथॉरीटी नाही. गुजरातला ब्लॅक बॉक्सचे बोलणे सांगितले नाही, पण आमचे म्हणजे आहे की कुटुंबातील कुणाला तरी ते संभाषण एकले जावे आम्हाला त्यांना सांगायचे आहे. राजकीय दृष्टीकोणातून नाही पण व्यवहारीक दृष्टीने काही गोष्टी दाबल्या जात आहे असे आम्हाला वाटते. संथ गतीने जर तुम्ही करत असाल तर तुम्हाला तपासात इट्रेन्स नाही, असे म्हणावे लागले. वीएसआर कंपनीच्या सर्व्हिस बंद कराव्यात” अशी मागणी रोहित पवार यांनी पत्रकार परिषदेत केली.

कांवत साहेब..! आज तर गोसावींनी डंकाच वाजवला; मुलीचा शोध लागेना म्हणून तक्रारदाराचा नातेवाईकच झोडपला

0

बीड — पोलीस अधीक्षक नवनीत कांवत यांच्या कारकिर्दीत अजब काय घडेल सांगणं अवघड झालं आहे. पोलीस ठाण्याला तक्रारी तर घेतल्या जात नाहीत पण घेतलीच तक्रार तर तपासात यश येत नाही. मग काय तक्रारदाराचे नातेवाईक झोडपायचे गुन्हे दाखल करायची धमकी द्यायची हा नवा फंडा एसपींच्या लाडक्या गोसावींनी सुरू केला आहे. धावज्याचीवाडी येथील अल्पवयीन मुलगी दोन महिन्यापासून गायब आहे. पालक पोलीस ठाण्याचे उंबरे झिजवत आहेत. नेहमीप्रमाणे आजही ते नेकनूर मध्ये आले. पोलिसांची त्यांची बाचाबाची झाली मग काय आपल्या कर्तुत्वाचा डंका वाजवण्यासाठी तक्रारदाराच्या नातेवाईकांना झोडपून काढलं. पोलीस ठाण्यात बसवून ठेवलं. वार्तांकन करायला गेलेल्या पत्रकाराला ही धमकावलं. यापेक्षा वेगळी कायद्याच्या राज्याची संकल्पना काय असू शकते? बीडची जनता मात्र अशा घटनांनी धन्य धन्य होऊ लागली आहे.

आरक्षणाच्या मुद्द्यावरून बीडमध्ये जाळपोळ झाली. त्यावेळी पोलीस अधीक्षक असलेले नंदकुमार ठाकूर यांच्यावर हे प्रकरण शेकले गेले त्यांची बदली झाली. जाळपोळ झाली असली तरी जनता सुरक्षित होती हे वास्तव मान्य करायची वेळ आली आहे. पोलीस अधीक्षक नंदकुमार ठाकूर यांची बदली झाल्यानंतर काही काळासाठी अविनाश बारगळ विराजमान झाले होते. मात्र त्यानंतर जिल्ह्यात घडलेल्या अप्रिय घटनेनंतर  मोठ्या वल्गनेसह गाजावाजा करत नवनीत कांवत अधीक्षक पदावर विराजमान झाले. त्यांच मोठेपण जितकं मिरवलं गेलं तितकाच त्यांच्या मोठेपणाचा फुगा फाडकनं फुटला आहे. कायदा सुव्यवस्थेची जिल्ह्यात पुरती वाट लागली आहे. पोलीस अधीक्षक फक्त एम पी डी ए, मकोका प्रकरण करण्यात धन्यता मानत आहेत. पण जिल्ह्यात सगळी घाणच घाण झाली आहे. सगळ्या अवैध धंद्यांना पोलिसांचं संरक्षण मिळत आहे. माध्यम याचा उहापोह करीत असली तरी ज्या बीडच्या पत्रकारांनी पोलीस अधीक्षकांना डोक्यावर घेतलं तेच पोलीस अधीक्षक पत्रकारांची पोलीस अधिकाऱ्यांच्या बैठकीत लायकी काढण्यापर्यंत मजल मारत असल्याचं सांगितलं जात आहे. ही कदाचित वदंता ही असू शकते. पण कायदा सुव्यवस्थेचे तीन तेरा वाजल्याचे चित्र पाहायला मिळत आहे.
धावज्याची वाडी येथील अल्पवयीन मुलगी एक डिसेंबर 2025 पासून गायब झाली. मुलीच्या वडिलांनी 4 डिसेंबर रोजी नेकनूर पोलीस ठाण्यात तक्रारही दाखल केली. संशयितांची नाव देखील सांगितली. घटनेला दोन महिन्याहून अधिकचा काळ उलटून गेला आहे. पालक मात्र नेकनूर पोलीस ठाण्याच्या चकरा मारून परेशान आहेत. मुलीचा शोध लागत नाही म्हणून मुलीच्या आईने काही दिवस अन्न पाणी ही वर्ज्य केले होते. तब्येत खालावत होती. नातेवाईकांच्या आग्रहास्तव मुलीच्या आईने खाण पान सुरू केले. 12 जानेवारी रोजी अल्पवयीन मुलीच्या नातेवाईकांनी मुलीचा शोध लागावा म्हणून नेकनूर पोलीस ठाण्यात ठिय्या आंदोलन देखील केले होते. प्रत्येक वेळी पोलिसांचं एकच उत्तर तपास सुरू आहे. नातेवाईकांच पोलीस ठाण्याचे उंबरे झिजवण्याचं चक्र गेल्या दोन महिन्यापासून सुरू आहे. आज देखील असेच नातेवाईक पुन्हा पोलीस ठाण्यात आले. पोलिसांना विचारणा करायला गेले. संतापलेल्या पोलिसांनी पीडित कुटुंबाच्या नातेवाईकांना झोडपून काढले. त्यातल्या एका नातेवाईकाला पोलीस ठाण्यात बसवून ठेवले. त्याच्यावर गुन्हा दाखल करण्याची दमदाटी केली गेली कदाचित गुन्हा दाखल देखील झाला असेल. शेवटी ते पोलीस आहेत त्यांच्यापाशी ओल ही जळतं वाळलं ही जळतं असं सांगितलं जातं.आता खरा एसपींना अपेक्षित न्याय झाला. असं म्हणायची वेळ आली.एक बिचारा पत्रकारही गोंधळाचा आवाज ऐकून न रहावल्यामुळे पोलीस ठाण्यात काय घडत आहे याचा वार्तांकन करायला गेला. त्यालाही पोलिसांनी दमदाटी करून दादागिरी ची भाषा वापरली. आता पोलीस अधीक्षकांच्या कायदा सुव्यवस्थेच्या जिल्ह्यात पत्रकारांना वार्तांकन करणे देखील अवघड होत असल्याचे चित्र पाहायला मिळत आहे. असे प्रकार मात्र नंदकुमार ठाकूर यांच्या काळात कधीच पाहायला मिळाले नाहीत. हे वास्तव देखील नाकारता येत नाही. पोलीस कर्मचारी देखील इतके लाडवून कधीच ठेवले नाहीत. इतिहासात पहिल्यांदाच असे प्रकार घडू लागल्याचं पहायला मिळू लागला आहे. पोलीस उपनिरीक्षक चंद्रकांत गोसावी पोलीस अधीक्षकांचा लाडका आहे. मग जनतेला न्याय मिळणार कसा? पीडित अल्पवयीन मुलीचं तिच्या नातेवाईकाचं काहीही झालं तरी देणं घेणं काय? आपला खास मर्जीतला माणूस मजेत राहिला म्हणजे झालं एवढ महत्त्वाचं. मग कायदा सुव्यवस्थेचे धिंडवडे निघाले पोलीस दलाची इभ्रत टांगली गेली तर काय हरकत आहे कदाचित असा विचार केला असावा. पोलीस अधीक्षकांनी कमीत कमी तक्रार दाखल करू नये दाखल केलीच तर तपास कुठपर्यंत आला आहे याची विचारणा करू नये, पत्रकारांनी वार्तांकन करू नये असे अलिखित फतवे तरी काढावेत म्हणजे वर्तमानपत्राचे रकाने काळे करण्याची वेळ तरी येणार नाही असं म्हणण्याची वेळ आली आहे. पीडित कुटुंबांला न्याय मिळणारच नाही असं तरी सध्याचे चित्र पाहायला मिळत आहे.

कायद्यातले भीष्माचार्य एड‌‌. पद्माकरराव हसेगावकर कालवश

0

बीड — वकीली क्षेत्रातील भीष्म पितामह दिवानी कायद्यातील चालते बोलते विद्यापीठ अॅड. पद्माकरराव भगवानराव हसेगावकर यांचे आज दिनांक १० फेब्रुवारी २०२६ रोजी सकाळी सात वाजता अल्पशा आजाराने वयाच्या ८९ व्या वर्षी निधन झाले.
बीड जिल्हा वकील संघाचे जेष्ठ विधीज्ञ एड. पद्माकर हसेगावकर यांचे आज वयाच्या ८९ या वर्षी निधन झाले त्यांनी सुरुवातीला 10 वर्ष महसूल खात्यामध्ये पेशकार म्हणून नोकरी केली नंतर राजीनामा देऊन वकिली व्यवसायाला सुरुवात केली त्यांनी जवळपास 57 वर्ष वकिली व्यवसाय केला शेवटच्या श्वासापर्यंत त्यांनी अनेक ज्युनिअर ला वकिली व्यवसायामध्ये मार्गदर्शन केले. त्यांच्या मार्गदर्शनामुळे अनेकांना वकिली व्यवसायात नवी उंची गाठण्यात मोठी मदत झाली. त्यांचे अनेक जूनियर हे सध्या न्यायाधीश पदावर आहे दिवाणी कायद्यातील कुळ कायदा महसूल कायदा व दिवाणी स्वरूपातील कायद्यावर त्यांचा गाढा अभ्यास होता. एॅड. हसेगावकर यांनी एखाद प्रकरण हाती घेतल्यानंतर त्यातील बारकावे अभ्यासून ते न्यायालयापुढे मांडत असत. त्यांच्या या खास शैलीमुळे त्यांच्या नावाचा धाक, दबदबा वाटायचा विरोधातील वकिलांना वाटायचा.
त्यांच्या पश्चात एक मुलगा सरकारी वकील एड. अमित हासेगावकर सून एड. अश्विनी अमित हसेगावकर मुलगी मेघा असा परिवार आहे. हासेगावकर कुटुंबीयांवर कोसळलेल्या दुःखात “सह्याद्री माझा” परिवार सहभागी आहे.

बीड शहरातील मुलींच्या छेडछाड प्रकरणी कडक कारवाई करा

0

भाजपचे युवा नेते डॉ.योगेश क्षीरसागर, नगरसेविका डॉ.सारिकाताई क्षीरसागर यांचे एसपींना निवेदन

शाळा-कॉलेज परिसरात दामिनी पथकाचे पेट्रोलिंग, बंद पोलीस चौक्या सुरू करण्याची मागणी

बीड — शहरातील शाळा, महाविद्यालये व कोचिंग क्लासेस परिसरात वाढत्या छेडछाड घटनांच्या पार्श्वभूमीवर भाजपचे युवा नेते डॉ.योगेश क्षीरसागर, नगरसेविका डॉ.सारिकाताई क्षीरसागर यांनी पोलीस अधीक्षक नवनीत कावत यांची मंगळवारी (दि. १०) भेट घेऊन विविध मागण्या मांडल्या. शहरातील सुरक्षा व्यवस्थेला अधिक बळकटी देण्यासाठी तातडीने उपाययोजना करण्याची मागणी यावेळी करण्यात आली.

शहरातील शाळा, महाविद्यालये व कोचिंग क्लासेसच्या बाहेर सध्या मुलींच्या छेडछाडीच्या घटना वाढत असल्याची बाब पोलीस प्रशासनाच्या निदर्शनास आणून देण्यात आली. काही ठिकाणी अशा प्रवृत्तीचे लोक एकत्र येऊन वातावरण बिघडविण्याचा प्रयत्न करत असल्याचेही सांगण्यात आले. या प्रकारांना आळा घालण्यासाठी संबंधितांवर कडक कारवाई करण्याची मागणी करण्यात आली.
तसेच शाळा, महाविद्यालये आणि कोचिंग क्लासेस परिसरात दामिनी (चिडीमार) पथकाच्या माध्यमातून सातत्याने पेट्रोलिंग करून संशयित हालचालींवर लक्ष ठेवण्याची आवश्यकता व्यक्त करण्यात आली. याशिवाय शहरातील अनेक पोलीस चौक्या सध्या बंद अवस्थेत असल्याने त्या तातडीने सुरू करून तेथे आवश्यक मनुष्यबळ उपलब्ध करून द्यावे, अशी मागणीही डॉ.क्षीरसागर यांनी केली. यासंदर्भात पोलीस अधीक्षकांशी सविस्तर चर्चा करण्यात आली. यावेळी युवा नेते राणा चव्हाण, भाजप विद्यार्थी आघाडीचे जिल्हाध्यक्ष संग्राम बांगर यांच्यासह भाजपचे पदाधिकारी, कार्यकर्ते उपस्थित होते.

भारत-अमेरिका कराराच्‍या निषेधार्थ शेतकरी संघटनांकडून भारत बंदची हाक

0

मुंबई — भारत-अमेरिका व्यापार कराराला शेतकरी संघटनांनी तीव्र विरोध दर्शवला आहे. अमेरिकन शेती उत्पादनांवरील कर कमी केल्याने किंवा पूर्णपणे हटवल्याने भारतीय शेतकऱ्यांवर नकारात्मक परिणाम होईल, अशी भीती संयुक्त किसान मोर्चाने व्यक्त केली आहे.

अमेरिकन शेतकऱ्यांना मिळणाऱ्या मोठ्या अनुदानामुळे भारतीय शेतकरी त्यांच्याशी स्पर्धा करू शकणार नाहीत, हा प्रमुख आक्षेप आहे. याविरोधात 12 फेब्रुवारी रोजी देशव्यापी आंदोलनाची घोषणा करण्यात आली आहे. अखिल भारतीय किसान सभेने जारी केलेल्या निवेदनात म्‍हटले की, भारत आणि अमेरिकेदरम्यान प्रस्तावित अंतरिम व्यापार करार हा भारतीय शेतीचे अमेरिकन बहुराष्ट्रीय कंपन्यांसमोर संपूर्ण शरणागती आहे.

हा व्यापार करार सुक्या धान्याच्या चुऱ्यासारख्या वस्तू, पशुखाद्यासाठी लाल ज्वारी आणि सोयाबीन तेलासाठी बाजारपेठ खुली करून कृषी क्षेत्रावर खोलवर परिणाम करेल आणि यामुळे दुग्धव्यवसाय क्षेत्रावरही परिणाम होईल, असा दावा त्यांनी केला. अमेरिका आणि युरोपियन युनियनसोबत (ईयू) हे करार त्यांच्या स्थिर अर्थव्यवस्थांना फायदा पोहोचवण्यासाठी केले जात आहेत आणि ते भारतासाठी फायदेशीर नाहीत.

या करारामुळे आधीच कमी उत्पन्न आणि कर्ज फेडण्यास असमर्थ असलेल्या शेतकऱ्यांवर आणखी परिणाम होईल. याच्‍या निषेधार्थ देशभरातील प्रत्‍येक गावांमध्ये १२ फेब्रुवारी रोजी निदर्शने केली जातील. या आंदोलनात सर्व राजकीय पक्ष, शेतकरी आणि शेतमजूर संघटना, कामगार संघटनांनी सहभागी सामील होण्याचे आवाहन केले.

धारूर आगाराच्या बसचालकाची मांजरा धरणाच्या रॅम्पला गळफास घेऊन आत्महत्या

0

केज — धारूर आगारात कार्यरत असलेल्या बसचालकाने केज तालुक्यातील धनेगाव येथील मांजरा धरणाच्या रॅम्पच्या लोखंडी अँगलला गळफास घेऊन जीवन संपवले.
या बाबतची माहिती अशी की,केज तालुक्यातील धनेगाव येथील रहिवाशी असलेले आत्मलिंग नामदेव गुजर यांनी दि.७ फेब्रुवारी रोजी सायंकाळी ६.४५ वाजण्याच्या सुमारास धनेगाव येथील मांजरा धरणाच्या डाव्या कालव्याच्या रॅम्प च्या लोखंडी अँगलला दोरीने गळफास घेऊन आत्महत्या केली आहे.या घटने मागील कारण अद्याप स्पष्ट झालेले नाही. मयत आत्मलिंग गुजर यांचे चुलत भाऊ विश्वनाथ रामलिंग गुजर यांच्या फिर्यादी वरून युसुफवडगाव पोलिस ठाण्यात अकास्मिक मृत्यूची नोंद दाखल करण्यात आले आहे. सहाय्यक पोलिस निरीक्षक मच्छिंद्रनाथ शेंडगे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस जमादार डोंगरे हे तपास करीत आहेत.

शिक्षकाच्या गळ्याला चाकू लावून तिघांनी लुटले; गुन्हा दाखल

0

बीड — आमच्या गाडीला तू कट का मारला? असे कारण पुढे करत एका शिक्षकाला रस्त्यात अडवून त्याच्या गळ्याला चाकू लावला; त्याच्या हातातील दोन अंगठ्या, एक मोबाईल, नगदी पाच हजार असा एकूण ६२ हजाराचा ऐवज काढून घेतल्याचा प्रकार खालापूरी-राजुरी या रस्त्यावर घडला. या प्रकरणी बीड ग्रामीण पोलिस ठाण्यात तीन जणांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

रविसिंग भगवान खांभेकर हे कमळेश्वर धानोरा केंद्र खालापुरी या ठिकाणी शिक्षक म्हणून कार्यरत आहेत. ७ तारखेला ते शाळेतून घरी मोटार सायकलवरून येत होते . यावेळी खालापुरी राजुरी रस्त्यावर त्यांना अभिजीत शरद पवार व अन्य दोन जणांनी रस्त्यावर अडवले. तू आमच्या गाडीला कट का मारला ? असं विचारत शिक्षकाला मारहाण केली. त्यांच्या गळ्याला चाकू लावून दोन अंगठ्या, एक मोबाईल, नगदी पाच-हजार, आधार कार्ड, एटीएम कार्ड असा ६२ हजाराचा ऐवज जबरदस्तीने काढून घेतला. या प्रकरणी शिक्षक खांबेकर यांच्या तक्रारीवरून अभिजीत पवार व अन्य दोघा जणांविरोधात बीड ग्रामीण पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास पोलीस करीत आहेत.

माझा फोन नंबर का ब्लॉक केला असं म्हणत गेवराईच्या तरुणाचा नर्तकीवर प्राणघातक हल्ला

0

जामखेड — तु मला फोनवर का बोलत नाही? माझा नंबर ब्लॉक का केला? असे म्हणत रागातून नर्तिकेवर कोयत्याने वार करत गंभीर जखमी केले. जखमी महिलेवर जामखेड येथील एका खासगी रुग्णालयात उपचार सुरू आहेत. घटनेनंतर हल्लेखोर आरोपी घटनास्थळावरून पसार झाला आहे.जख्मी महिला जामखेड येथील कलाकेंद्रात नृत्यांगना म्हणून काम करीत आहे. या घटनेने खळबळ उडाली आहे.या प्रकरणी पिडीत महीलेचा मित्राविरोधात दिलेल्या फिर्यादीवरुन आरोपी राहूल अशोक कचरे याच्या विरोधात जीवे मारण्याचा प्रयत्नाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

याबाबत सविस्तर असे की, जामखेड शहरातील तपनेश्वर भागात राहणाऱ्या आणि सांस्कृतिक कला केंद्रातील नृत्यांगनेचे या गुन्ह्यातील आरोपी राहूल अशोक कचरे याचे सोबत मागील पाच वर्षांपासून मैत्रीचे संबध होते. यापुर्वी देखील त्रास देत असल्याने महिलेने कचरे विरोधात गुन्हा दाखल केलेला आहे.
याच त्रासातून गुरुवार दि. ५ फेब्रुवारी रोजी रात्री १० वाजण्याच्या सुमारास फिर्यादी महीलेस आरोपी राहुल कचरे याने फोनवरून् तु माझ्याशी फोनवर बोल, माझे तुझ्यावर प्रेम आहे. तु जर बोलली नाही तर मी तुला मारून टाकीन अशी धमकी दिली होती. त्यावेळी फिर्यादी महीलेने त्याचा फोन कट केला. त्यानंतर दुसऱ्या दिवशी रात्री २ वाजण्याच्या सुमारास फिर्यादी महिला ही आपल्या रूमवर असताना तिची मैत्रिण बाल्कणीत गेली असता तेथे दबा धरून बसलेला आरोपी राहूल कचरे याने नर्तीकेच्या रूममध्ये येत तु माझ्याशी का बोलत नाही? माझा नंबर का ब्लॉक केला? असे म्हणून फिर्यादी महीलेच्या बोटांवर, हातावर व डोक्यावर कोयत्याने वार करून जखमी केले आहे. त्यावेळी तिच्या मैत्रिणीने त्यास मारू नको अशी विनंती केली होती. मात्र मी तुला संपवून टाकणार आहे अशी धमकी देत आरोपी निघून गेला. या प्रकरणी २६ वर्षीय नृत्यांगनेच्या फिर्यादीवरुन आरोपी राहुल अशोक कचरे, रा. खळेगाव ता. गेवराई जि. बीड याच्या विरोधात जामखेड पोलीस स्टेशनला गुन्हा दाखल करण्यात आला असून सध्या आरोपी हा फरार आहे. पुढील तपास पोलीस निरीक्षक दशरथ चौधरी यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलीस निरीक्षक वर्षा जाधव या करीत आहेत.

अंबाजोगाई: चोरी प्रकरणात दोघांना अटक

0

अंबाजोगाई — शहरातील रविवार पेठ तसेच बाराभाई गल्ली परिसरात झालेल्या घरफोडीचा पोलिसांनी कसून तपास केला.या प्रकरणातील दोन आरोपींना पोलिसांनी शनिवारी अटक केली.त्यांच्याकडून ६ लाख १० हजार रुपयांचा ऐवज हस्तगत करण्यात आला आहे.

याबाबत माहिती अशी की काझी मोहम्मद अलीमुद्दीन करीमुद्दीन रा. बाराभाई गल्ली अंबाजेगाई यांच्या बंद घरात २९ जानेवारी रोजी मध्यरात्री सव्वा एकच्या सुमारास दोन चोरट्यांनी प्रवेश केला. त्यानंतर त्यांनी चार लाखाची रोख रक्कम व सोन्या चांदीचे दागिने असा ११ लाख ७ हजार रुपयांचा ऐवज चोरून नेला होता. ही चोरीची घटना लक्षात आल्यानंतर काजी मोहम्मद यांनी अंबाजोगाई पोलिसांत धाव घेत गुन्हा दाखल केला. त्यानुसार पोलिसांनी तपासाची चक्रं फिरवित पठाण मोहम्मद रियाज खान वय २५ वर्ष, रा. बाराभाई गल्ली व सलमान मुस्तफा शेख वय ३१ वर्ष, रा. झारेगल्ली, अंबाजोगाई या दोघांना शिताफिने पकडले त्यांच्याकडून ६ लाख १० हजार रुपयांचा मुद्देमाल पोलिसांनी जप्त केला आहे

राज्यातील शासकीय रुग्‍णालयांतील मोफत उपचार बंद

0

मुंबई — शासकीय रुग्णालयांमधून केले जाणारे मोफत उपचार पूर्णपणे बंद करण्यात आले असून यापुढे रुग्णालयातून पुन्हा शुल्क आकारले जाणार आहे. राज्याच्या आरोग्य विभागाने हा निर्णय घेतला आहे. त्यामुळे इथून पुढे केस पेपर पासून प्रत्येक चाचणीसाठी पैसा मोजावा लागणार आहे.
प्राथमिक आरोग्य केंद्रांपासून जिल्हा व महिला रुग्णालयांपर्यंत नवे दर लागू होणार असून, बाह्यरुग्ण विभागातील केसपेपरसाठी ५ रुपयांपासून ते सांधा प्रत्यारोपण शस्त्रक्रियेसाठी ४० हजार रुपयांपर्यंत शुल्क आकारले जाणार आहे.तत्कालीन आरोग्‍यमंत्री तानाजी सावंत यांनी राज्‍यातील सर्वच आरोग्‍य विभागाच्‍या रुग्‍णालयात धाडसी निर्णय घेत, मोफत उपचार सुरू केले होते. त्‍याची अंमलबजावणी १५ ऑगस्‍ट २०२३ मध्‍ये सुरू झाली. तेव्‍हापासून आतापर्यंत सर्वच ठिकाणी मोफत उपचार केले जात आहेत. यामध्‍ये केसपेपर काढण्‍यापासून रक्‍ततपासणी, इतर सर्व तपासण्‍या आणि सर्व उपचार मोफत आहेत. परंतु, गेल्‍या काही दिवसांत ही संकल्‍पना व्‍यवहार्य ठरत नसल्‍याचा साक्षात्‍कार आरोग्‍य विभागाला झाला असून, अलीकडेच जारी केलेल्‍या शासन निर्णयानुसार, आता उपचारासाठी दर लागू केले आहेत. याबाबत आरोग्य हक्क कार्यकर्ते शरद शेट्टी म्‍हणाले, ”शासन निर्णयातील शुल्क कागदावर कमी वाटत असले, तरी शासकीय रुग्णालयांत येणारे बहुतांश रुग्ण समाजातील अत्यंत दुर्बल घटकांतील असतात. त्‍यासाठी मोफत उपचार असावेत. खासदार, आमदार आदींसाठी मोफत उपचारांचा उल्लेख आहे, जे प्रत्यक्षात शासकीय रुग्णालयांत उपचार घेतच नाहीत. सरकारने या निर्णयाचा पुनर्विचार करावा.”

नवीन दर खालील प्रमाणे आहेत

रुग्णालयात दाखल रुग्णांना दररोज १० रुपये प्रवेश शुल्क द्यावे लागेल. एमआरआय स्कॅनसाठी १ हजार ६०० रुपये मोजावे लागतील.हिमोग्लोबिन, टीएलसी, डीएलसी, रक्तगट व आरएच तपासणी, लघवीच्या रासायनिक चाचण्या,कल्चर-सेंसिटिव्हिटी अशा प्रत्येक रक्ततपासणीसाठी १५ रुपये आकारले जातील. मूत्रपिंड व मूत्राशय तपासणीसाठीची इंट्राव्हेनस पायलोग्राम एक्स-रे प्रतिस्कॅन १०० रुपये, डोक्याचा सीटी स्कॅन ३०० रुपये, तर मणका, मान व छातीचा सीटी स्कॅन ४०० रुपये असेल. भूल देऊन करण्यात येणाऱ्या लहान-मोठ्या शस्त्रक्रियांकरिता ६० ते १६० रुपये आकारले जातील.

पहिली प्रसूती मोफत

पहिली प्रसूती मोफत असून, दुसऱ्यासाठी ५० रुपये, तर तिसरी व पुढील प्रत्येक प्रसूतीसाठी २५० रुपये शुल्क आकारले जाईल. वातानुकूलित खोलीसाठी दररोज १५० रुपये आणि साधारण खोलीसाठी ७५ रुपये, आयसीयूसाठी १०० रुपये, तसेच प्रत्येक डायलिसिससाठी १५० रुपये आकारले जातील. मृतदेह एम्बाल्मिंगसाठी १५०० रुपये शुल्क राहील. रुग्णवाहिकेसाठी प्रति किमी ५ रुपये व ८ तासांनंतर प्रति तास ३० रुपये प्रतीक्षा शुल्क आकारले जाईल, तर सांधा प्रत्यारोपण शस्त्रक्रिया ४० हजार रुपयांत करण्यात येईल.

इतर योजनांचा लाभ कायम

सरकारने वेळोवेळी जारी केलेल्या आदेशांनुसार, काही घटकांना मोफत उपचारांचा लाभ कायम राहणार आहे. यात शासकीय कर्मचारी व त्यांचे कुटुंबीय, शासकीय रुग्णालयांतील वैद्यकीय अधिकारी, परिचारिका, ॲक्युपेशनल व फिजिओथेरपीचे विद्यार्थी, न्यायालयीन कोठडीत असलेले व्यक्ती, स्वातंत्र्यसैनिक व त्यांचे कुटुंबीय, वैद्यकीय-न्यायवैद्यकीय प्रकरणांतील रुग्ण, न्यायालयीन चौकशीतील कैदी, पोलिसांकडून पाठविलेली प्रकरणे, कुष्ठरोग मंडळामार्फत पाठवलेले रुग्ण, आश्रमशाळा व महिला सुधारगृहांमार्फत पाठवलेले रुग्ण, शहरी भागातील निराधार मुले, आमदार, खासदार, मंत्री, न्यायाधीश यांचा समावेश आहे.