भ्रष्टाचाराच्या डासांनी हिवताप विभागाला हुडहुडी; डॉ. शिंदे निलंबित तर इतर भ्रष्टाचार-यांवर पांघरूण

बीड — जिल्हा हिवताप विभागाला भ्रष्टाचाराच्या डासांनी 89 लाखांना अक्षरशः फोडून खाल्लं की वरिष्ठ अधिकाऱ्यांना अक्षरशः चांगलीच हुडहुडी भरली यामध्ये मात्र हिवताप अधिकारी डॉ.विजयसिंह शिंदे हा मोठा मच्छर निलंबित झाला. भ्रष्टाचाराच्या डासांचं मोहोळ इतकं जोरात उठलं की वरिष्ठ अधिकाऱ्यांनी लाज झाकण्यासाठी भ्रष्टाचारावर पांघरून घातलं. पण पांघरून घालण्याच्या नादात अख्ख्या व्यवस्थेची अवस्था हिजड्यासारखी झाल्याची परिस्थिती निर्माण झाली आहे.


जिल्हा हिवताप विभाग नेहमीच चर्चेच्या केंद्रस्थानी राहत आलेला आहे. जनतेला हिवताप भरू नये म्हणून सतर्क असलेल्या या विभागातील पैशाच्या गटारात भ्रष्टाचारी डास पैदा झाले. याच डासांनी जनतेसह प्रशासनाला ही फोडून खाण्यात मागे पुढे पाहिले नाही. हा सगळा भ्रष्टाचाराचा खेळ डाॅ. विजयसिंह शिंदे याने खेळातला मास्टरमाइंड असलेल्या सानप व इतर कर्मचाऱ्यांच्या संगणमातांने
बोगस वेतन देयकाच्या माध्यमातून 89लाख 53 हजार158 रक्कम हडपण्याचा डाव मांडला. हा खेळ मराठवाड्यातील बहुतांशी जिल्ह्यांमध्ये पाहायला मिळाला. हिवताप विभागातून वेतन फरक देयके दाखल करताना अधिकचे वेतन दिले गेले असल्याची बाब औरंगाबाद येथील लेखा आणि कोषागार कार्यालयाच्या सहसंचालकांच्या लक्षात आली.या झालेल्या भ्रष्टाचारात सामाजिक कार्यकर्ते इंजी.सादेक इनामदार यांनी तब्बल आठ महिने पाठपुरावा केला. या प्रकरणात तक्रारी झाल्यानंतर तपासणी करण्याचे आदेश देण्यात आले. बोगस प्रमाणपत्र वाटप असो अथवा एम पी डब्ल्यू ची बोगस भरती असो हा सगळा भ्रष्टाचाराचा खेळ राजरोस आज पर्यंत चालू राहिला. त्यामुळे निर्ढावलेल्या अधिकारी कर्मचाऱ्यांनी कर्मचाऱ्यांच्या नावावर 89 लाखाहून अधिकची रक्कम काढण्यासही हयगय केली नाही.आरोग्य कर्मचारी जीवन शाहूराव सानप याच्या नावावर 15 लाख 79 हजार 256 रुपये, हिवताप अधिकारी डॉ विजयसिंग शिंदे यांच्या नावावर 15 लाख 79 हजार 256 रुपये, आरोग्य निरीक्षक अशोक सुखदेव राख याच्या नावावर दोन वेळा वेगवेगळी बिले ज्याची रक्कम 14 लाख 86 हजार 472 आणि 14 लाख 10 हजार 851, आरोग्य कर्मचारी संजय धनोबा सानप याच्या नावावर 14 लाख 10 हजार 851 रुपये, आरोग्य निरीक्षक सुनील मोतीराम गायकवाड याच्या नावावर 14 लाख 86 हजार 472 रुपये अशी तब्बल 89 लाख 53 हजार 158 रुपये इतकी अधिकची रक्कम या कर्मचाऱ्यांना एरियर्स च्या नावाखाली वाटप करण्यात आली. ही बाब उघडकीस आल्यानंतर लातूर च्या उपसंचालकांनी डॉ विजयसिंह शिंदे यांना तात्काळ निलंबित केले. या भ्रष्टाचाराच्या प्रकरणात सहभागी असलेले जीवन सानप, अशोक राख, संजय सानप, सुनील गायकवाड यांच्यावर कोणतीच कारवाई केलेली नाही. या कर्मचाऱ्यांवर मात्र वरिष्ठ अधिकाऱ्यांनी पांघरून घातला असलं तरी या सगळ्या खेळात व्यवस्थेची अवस्था “एक साला मच्छर आदमी को हिजडा बना देता है” या चित्रपटातील डायलॉग सारखी अवस्था झाली आहे.

भ्रष्टाचार निर्मूलन समितीचे अध्यक्ष सादेक इनामदार यांची मागणी

कर्मचाऱ्यांच्या मासिक वेतन देयकात केवळ वेतनाची रक्कम असताना, जिल्हा हिवताप अधिकारी कार्यालय बीड येथील सुमारे 89 लाख 53 हजार रुपयांची संशयास्पद रक्कम देयकात समाविष्ट करण्याचा प्रयत्न झाला. या प्रकरणात जिल्हा हिवताप अधिकारी शिंदे यांच्यावर निलंबनाची कारवाई करण्यात आली; मात्र लेखा विभागातील संबंधित कर्मचारी थोरात व सांगळे यांच्यावर अद्याप कारवाई का झाली नाही? .
या प्रकरणातील सर्व दोषींवर तात्काळ निलंबनाची कारवाई करून गुन्हे दाखल करावेत, तसेच जीवन सानप याने आंधळे नामक अधिकाऱ्याच्या सहीने दिलेल्या बोगस प्रमाणपत्रांची तसेच जीवन सानपच्या बेकायदेशीर संपत्तीचीही सखोल चौकशी करावी, अशी मागणी देखील इनामदार यांनी केली आहे.

Related Articles

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Stay Connected

0FansLike
0FollowersFollow
0SubscribersSubscribe
- Advertisement -

Latest Articles