बीड — शहरातील रस्ते, चौक तसेच विद्युत खांबांवर बेकायदेशीरपणे बॅनर लावून अतिक्रमण करू नये, यासाठी जिल्हा वाहतूक शाखेचे प्रभारी पोलीस निरीक्षक वैभव पाटील यांनी शहरातील बॅनर लावणार्या युवकांची बैठक घेऊन त्यांना आवश्यक सूचना दिल्या.
या बैठकीत शहरातील चौक, रस्ते व इलेक्ट्रिक पोलवर कोणत्याही परिस्थितीत बॅनर, फ्लेक्स किंवा जाहिरातीचे फलक लावू नयेत, अशा स्पष्ट सूचना देण्यात आल्या. अशा प्रकारचे बॅनर वाहतुकीस अडथळा निर्माण करण्याबरोबरच अपघातास कारणीभूत ठरू शकतात, याकडे उपस्थितांचे लक्ष वेधण्यात आले.
तसेच, नगर परिषदेकडून आवश्यक परवानगी घेतल्याशिवाय कोणतेही बॅनर किंवा जाहिरात फलक उभारू नयेत, असे नियम समजावून सांगण्यात आले. सार्वजनिक ठिकाणी अनधिकृत बॅनर लावल्यास संबंधितांवर कायदेशीर कारवाई करण्यात येईल, असा इशाराही यावेळी देण्यात आला.
शहरातील वाहतूक सुरळीत राहावी, सार्वजनिक मालमत्तेचे नुकसान टळावे आणि शहराचे सौंदर्य अबाधित राहावे, यासाठी नागरिकांनी व युवकांनी प्रशासनाला सहकार्य करावे, असे आवाहन प्रभारी पोलीस निरीक्षक वैभव पाटील यांनी केले.