Home क्राईम बीडमध्ये वाहन चोरी प्रकरण उघड; दोन आरोपी अटक, चोरीचा टेम्पो जप्त

बीडमध्ये वाहन चोरी प्रकरण उघड; दोन आरोपी अटक, चोरीचा टेम्पो जप्त

0
9

बीड – पेठ बीड पोलीस ठाण्यात दाखल असलेल्या चारचाकी वाहन चोरी प्रकरणाचा स्थानिक गुन्हे शाखेने यशस्वी छडा लावत दोन आरोपींना अटक केली आहे. त्यांच्या ताब्यातून चोरीस गेलेला अशोक लेलँड कंपनीचा टेम्पो जप्त करण्यात आला आहे.
पेठ बीड येथील मोमीनपुरा परिसरातील रहिवासी अश्पाक अनिमोद्दीन जुलहा यांचा टेम्पो दि. १० एप्रिल २०२६ रोजी बार्शी रोड परिसरातून अज्ञात चोरट्यांनी चोरून नेला होता. याबाबत पेठ बीड पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता.

तपासादरम्यान स्थानिक गुन्हे शाखेला मिळालेल्या गुप्त माहितीच्या आधारे आरोपी लातूर येथील असल्याचे निष्पन्न झाले. त्यानुसार पोलीस निरीक्षक शिवाजी बंटेवाड यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक श्रीराम खटावकर व पथकाने लातूर येथे सापळा रचून तैबाज सलीम शेख (वय २५) आणि रेहान इलाही शेख (वय १९) या दोन आरोपींना ताब्यात घेतले.
पोलीस चौकशीत आरोपींकडून चोरीस गेलेला टेम्पो जप्त करण्यात आला असून त्यांनी विवेकानंद पोलीस ठाण्यातील गुन्हा रजिस्टर नं. 207/2026 अंतर्गत पिकअप चोरी केल्याची कबुली दिली आहे.
दोन्ही आरोपींना मुद्देमालासह पेठ बीड पोलीस ठाण्यात हजर करण्यात आले असून पुढील तपास स्थानिक गुन्हे शाखा व पोलीस करत आहेत.
ही कारवाई पोलीस अधीक्षक नवनीत काँवत, अप्पर पोलीस अधीक्षक सचिन पांडकर आणि पोलीस निरीक्षक शिवाजी बंटेवाड यांच्या मार्गदर्शनाखाली पार पडली. या मोहिमेत श्रीराम खटावकर, मारुती कांबळे, बाळु सानप, सोमनाथ गायकवाड, युनुस बागवान, अश्पाक सय्यद, मनोज परजणे, आश्विन सुरवसे व चालक अतुल हराळे यांनी सहभाग घेतला.

NO COMMENTS

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here