पदोन्नती करूनच अतिरिक्त शिक्षकांचे समायोजन करावे –आ.संदीप क्षीरसागर 

 शिक्षक संघटनांकडून आमरण उपोषणाचा इशारा

बीड — बीड जिल्हा परिषदेच्या शिक्षण विभागाकडून सन २०२३-२४ च्या संच मान्यतेच्या आधारे अतिरिक्त शिक्षक समायोजन करण्याचे आदेश काढण्यात आले आहेत. परंतु पदोन्नती न करताच शिक्षकांचे समायोजन करणे हे शिक्षक बंधू-भगिनींवर अन्यायकारक ठरणार आहे त्यामुळे अगोदर पदोन्नतीची प्रक्रिया राबवून नंतरच समायोजन करावे अशी विनंती आ.संदीप क्षीरसागर यांनी बीड जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकार्‍यांकडे केली आहे. दरम्यान पदोन्नती न करताच समायोजन केल्यास गुरूवार (दि.३०) रोजी पासून आमरण उपोषण करणार असल्याचा इशारा शिक्षक संघटनांकडून देण्यात आला आहे.
दि.२८ जानेवारी २०२५ रोजी बीड जिल्हा परिषदेकडून शिक्षकांच्या समायोजनाबाबत आदेश काढण्यात आला असून दि.३१ जानेवारी २०२५ रोजी शिक्षक समायोजन प्रक्रिया राबविण्यात येणार आहे. परंतु सदरील समायोजन प्रक्रिया ही पदोन्नती प्रक्रिया न करताच करण्यात येणार असल्याने जिल्ह्यातील शिक्षक-शिक्षिका बांधवांवर अन्यायकारक ठरणार आहे. सन २०२३-२४ च्या संचमान्यतेच्या आधारे बीड जिल्हा परिषद शिक्षण विभाग यावेळी अतिरिक्त शिक्षकांचे समायोजन करणार आहे. परंतु मुख्याध्यापक, केंद्रप्रमुख व पदवीधर शिक्षकांची पदोन्नती अगोदर केल्यास सहशिक्षकांची पदे रिक्त होतील जेणेकरून अतिरिक्त शिक्षकांना समायोजनासाठी जागा उपलब्ध होतील आण त्यांच्यावर समायोजनाबात कुठलाही अन्याय होणार नाही. परंतु शिक्षण विभागाकडून घाई घाईने पदोन्नती न करताच समायोजन करण्याचा घाट घातल्याने जिल्ह्यातील अनेक शिक्षक-शिक्षिका बांधवांवर अन्याय होईल. त्यामुळे दिनांक ३१ जानेवारी २०२५ रोजी होणारी समायोजन प्रक्रिया स्थगित करून अगोदर मुख्याध्यापक, केंद्रप्रमुख व पदवीधर शिक्षक यांची पदोन्नती करण्यात यावी अशी मागणी आमदार संदीप क्षीरसागर यांनी जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी यांच्याकडे केली आहे.

Related Articles

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Stay Connected

0FansLike
0FollowersFollow
0SubscribersSubscribe

Latest Articles