घरफोडी करणारा आरोपी जेरबंद; दोन गुन्हे उघड

बीड — शहरातील शिंदेनगर फेज-3 परिसरात शिक्षकाच्या घरात घुसून मोबाईल चोरी करणाऱ्या आरोपीला स्थानिक गुन्हे शाखेने ताब्यात घेतले. आरोपीकडून शिवाजीनगर आणि बीड शहर पोलीस ठाण्यात दाखल असलेले दोन घरफोडीचे गुन्हे उघडकीस आले असून, एकूण 24 हजार 500 रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.

शिंदेनगर फेज-3 येथे भाड्याच्या घरात राहणारे शिक्षक आशुतोष नाथ चौबे (वय 38) यांनी याबाबत शिवाजीनगर पोलीस ठाण्यात फिर्याद दिली होती. 4 ऑक्टोबर रोजी ते घरात झोपलेले असताना गॅलरीच्या दरवाजाचा कोंडा तोडून चोरट्याने घरात प्रवेश केला. त्यानंतर चौबे आणि त्यांच्या पत्नीचे मोबाईल असा सुमारे 22 हजार रुपयांचा मुद्देमाल चोरीला गेला.

या प्रकरणी शिवाजीनगर पोलीस ठाण्यात गुन्हा क्रमांक 318/2026, कलम 304 (2), 331 (4) बीएनएस अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला होता.
गुन्ह्याचा समांतर तपास स्थानिक गुन्हे शाखेकडून सुरू असताना गोपनीय माहिती आणि तांत्रिक पुराव्यांच्या आधारे अभिषेक शेषेराव काशीद (वय 24, रा. चक्रधरनगर, बीड) याचा या गुन्ह्यात सहभाग असल्याचे निष्पन्न झाले. त्यानंतर पोलिसांनी त्याला ताब्यात घेतले.
चौकशीत त्याच्याकडून शिवाजीनगर पोलीस ठाण्यातील घरफोडीचा गुन्हा तसेच बीड शहर पोलीस ठाण्यातील आणखी एका घरफोडीचा गुन्हा उघडकीस आला. या दोन्ही प्रकरणांतील एकूण 24 हजार 500 रुपये किमतीचा मुद्देमाल पोलिसांनी जप्त केला.
ही कारवाई पोलीस अधीक्षक नवनित काँवत, अपर पोलीस अधीक्षक समीर शेख आणि पोलीस निरीक्षक शिवाजी बंटेवाड यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक श्रीराम खटावकर, पोलीस हवालदार अर्जुन यादव, पोलीस अंमलदार अशपाक सयद, मनोज परजणे, विकी सुरवसे आणि चापोह नितीन वडमारे यांच्या पथकाने केली.

Related Articles

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Stay Connected

0FansLike
0FollowersFollow
0SubscribersSubscribe
- Advertisement -

Latest Articles