परळीत पोस्ट ऑफिसमध्ये ७० वर्षीय महिलेची ५० हजारांची रोकड लंपास

परळी  — पोस्ट ऑफिसमध्ये पैसे जमा करण्यासाठी आलेल्या ७० वर्षीय महिलेची पिशवी धक्का देऊन हिसकावून त्यातील तब्बल ५० हजार रुपयांची रोकड लंपास केल्याची घटना परळी वैजनाथ येथे घडली. या प्रकरणी संभाजीनगर पोलिस ठाण्यात अंदाजे ६५ वर्षीय अनोळखी महिलेविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला असून, संशयित महिलेचा शोध सुरू आहे.

बँक कॉलनी, परळी वैजनाथ येथील पद्मिनी संदीपान सूर्यवंशी (वय ७०) या १० ऑगस्ट रोजी दुपारी साडेबारा वाजण्याच्या सुमारास पोस्ट ऑफिसमध्ये पैसे जमा करण्यासाठी गेल्या होत्या. त्यांच्याकडे ५० हजार रुपयांची रोकड होती.

पैसे जमा करण्यासाठी त्या पोस्ट ऑफिसमध्ये असताना त्यांच्या मागून आलेल्या एका अनोळखी महिलेने त्यांना अचानक धक्का दिला. या प्रकारामुळे सूर्यवंशी यांचा काही क्षण गोंधळ उडाला. त्याच संधीचा फायदा घेत संशयित महिलेने त्यांच्या पिशवीतील ५० हजार रुपयांची रोकड चोरून पोबारा केल्याचे फिर्यादीत नमूद आहे.

घटनेनंतर पद्मिनी सूर्यवंशी यांनी संभाजीनगर पोलिस ठाण्यात तक्रार दाखल केली. त्यांच्या फिर्यादीवरून पोलिसांनी गु.र.नं. १८९/२०२६, कलम ३०३(२) बी.एन.एस. अन्वये गुन्हा दाखल केला आहे. पोस्ट ऑफिस परिसरातील हालचाली आणि उपलब्ध पुराव्यांच्या आधारे पोलिसांकडून संशयित महिलेचा शोध घेतला जात आहे.

Related Articles

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Stay Connected

0FansLike
0FollowersFollow
0SubscribersSubscribe
- Advertisement -

Latest Articles