शालार्थ आयडी घोटाळ्यात संजय गरुड पकडला; कनेक्शन”मुळे”बीडकडे संशयाची सुई; संस्थाचालकांची हळूच निघाली पूंई

बीड — राज्यात गाजत असलेल्या तब्बल 160 कोटी रुपयांच्या शालार्थ आयडी घोटाळ्यात आतापर्यंतची सर्वात मोठी कारवाई करत नाशिक आर्थिक गुन्हे शाखेने मुख्य संशयित शिक्षण संस्थाचालक संजय गरुड याला सोलापूर जिल्ह्यातील नातेपुते परिसरातून अटक केली आहे. मात्र या कारवाईपेक्षा अधिक चर्चेचा विषय ठरत आहे तो म्हणजे या घोटाळ्याचे बीड कनेक्शन. तपासात समोर आलेल्या धागेदोऱ्यांमुळे बीडमधील काही शिक्षण संस्थाचालक आणि जुन्या शालार्थ मंजुरींची चौकशी वेगाने सुरू होण्याची शक्यता निर्माण झाली आहे.
गुन्हा दाखल झाल्यापासून संजय गरुड फरार होता. त्याचा माग काढण्यासाठी नाशिक गुन्हे शाखेचे पथक दोन दिवस सोलापूर परिसरात तळ ठोकून होते. मोबाईल लोकेशन आणि तांत्रिक विश्लेषणाच्या आधारे नातेपुते येथील ठिकाणी छापा टाकून अखेर त्याला ताब्यात घेण्यात आले.

हिंगोणेकरांच्या चौकशीतून उघड झाला गरुडचा ठावठिकाणा

या प्रकरणात यापूर्वी अटक करण्यात आलेले जळगाव जिल्हा परिषदेचे तत्कालीन शिक्षणाधिकारी शशिकांत हिंगोणेकर यांनी चौकशीत महत्त्वाची माहिती दिल्याचे समोर आले आहे. त्याच्या माहितीच्या आधारेच तपास पथकाने संजय गरुडपर्यंत पोहोचण्यात यश मिळवले.
तपासानुसार, हिंगोणेकर यांने अधिकारांचा गैरवापर करून 259 शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांना नियमबाह्य वैयक्तिक मान्यता दिली होती. यातील बहुतांश कर्मचारी हे संजय गरुडच्या संस्थांशी संबंधित असल्याचे तपासात उघड झाले आहे.

बीड कनेक्शन ठरतेय तपासाचा केंद्रबिंदू

या घोटाळ्यातील सर्वात महत्त्वाचा मुद्दा म्हणजे शशिकांत हिंगोणेकर यांचा बीडमधील कार्यकाळ. त्यांनी 2015 ते 2017 या कालावधीत बीड जिल्हा परिषदेत प्राथमिक शिक्षणाधिकारी म्हणून काम केले होते. त्यामुळे त्या काळात मंजूर झालेल्या शालार्थ प्रकरणांच्या फाईली आता तपासाच्या रडारवर आल्या आहेत.
हिंगोणेकर यांच्या कबुलीजबाबातून मिळालेल्या माहितीमुळे बीडमधील शालार्थ आयडी घोटाळ्याची व्याप्ती वाढण्याची शक्यता वाढली आहे. तपास यंत्रणा आता बीडमधील काही संस्थाचालक, मंजुरी प्रक्रिया आणि आर्थिक गैर व्यवहारांची पडताळणी करणार असल्याची माहिती समोर येत आहे.

बीडमध्ये वाढली धास्ती

याआधी या घोटाळ्यात धुळे येथील संशयित प्रशांत तुळशीराम वाडिले याला अटक करण्यात आली होती. त्याच्या मोबाईलमधून मिळालेल्या माहितीच्या आधारे नाशिक पोलिसांच्या पथकाला बीड कनेक्शन ची माहिती यापूर्वीच मिळाली आहे . तसेच आरोपी हिंगोणेकर पोलिसांसमोर पोपटासारखा बोलत आहे. त्याच्याच माहितीच्या आधारे पोलीस संजय गरुड पर्यंत पोहोचली. वाडीले आणि हिंगोणेकर या दोघांकडूनही बीड कनेक्शन समोर आल्यामुळे पोलिसांचा रडावर वर बीडचे संस्थाचालक देखील आले आहेत. यामुळे जिल्ह्यातील अनेक शिक्षण संस्थाचालकांमध्ये अस्वस्थता निर्माण झाली असून, तपासाचा फास आणखी आवळण्याची चिन्हे आहेत.

481 पैकी 438 कर्मचारी जळगावचे

तपासात आतापर्यंत 481 संशयित कर्मचारी समोर आले असून त्यापैकी 438 कर्मचारी हे जळगाव जिल्ह्यातील असल्याची माहिती आहे. बनावट शालार्थ आदेशांच्या आधारे राज्य शासनाची 160 कोटी रुपयांची आर्थिक फसवणूक झाल्याचा आरोप असून, संजय गरुड हा या प्रकरणातील सहावा अटक आरोपी ठरला आहे.
संजय गरुडच्या शेंदुर्णी एज्युकेशन संस्थेअंतर्गत जामनेर, पाचोरा, भडगाव आणि चोपडा तालुक्यांतील 15 माध्यमिक शाळा तसेच कनिष्ठ व वरिष्ठ महाविद्यालयांच्या शालार्थ नोंदींचीही सखोल चौकशी सुरू आहे.

Related Articles

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Stay Connected

0FansLike
0FollowersFollow
0SubscribersSubscribe

Latest Articles