महाविद्यालयीन तरुणीवर गुंगीचे औषध देऊन अत्याचार; ब्लॅकमेल करत 3 लाख व साडेनऊ तोळे सोने उकळले

अंबाजोगाई — शहरात महाविद्यालयीन शिक्षण घेणाऱ्या 20 वर्षीय तरुणीवर गुंगीचे औषध देऊन अत्याचार केल्याचा आणि त्यानंतर अश्लील फोटो-व्हिडिओच्या माध्यमातून ब्लॅकमेल करून लाखो रुपये व सोन्याचे दागिने उकळल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. या प्रकरणी अंबाजोगाई शहर पोलिसांनी दोन आरोपींना अटक करून पुढील तपास सुरू केला आहे.


पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, केज तालुक्यातील मूळ रहिवासी असलेली 20 वर्षीय तरुणी अंबाजोगाई येथे उच्च शिक्षणासाठी राहत होती. याच दरम्यान तिची ओळख महेश करपे आणि पवन कराड या दोघांशी झाली. ओळखीनंतर आरोपींकडून तिचा सतत पाठलाग आणि त्रास दिला जात असल्याचा आरोप आहे.
तक्रारीनुसार, एका दिवशी आरोपी महेश करपे याने तरुणीला जबरदस्तीने मंचुरियन खाऊ घातले. त्यामध्ये गुंगी आणणारे पदार्थ मिसळले असल्याने तरुणी बेशुद्ध झाली त्या नंतर तिच्यावर अत्याचार करण्यात आला. नुसता अत्याचारच केला नाही तर अश्लील व्हिडिओ तयार करण्यात आला.
त्यानंतर दुसरा आरोपी पवन कराड यानेही पीडितेला गुंगीचे औषध देऊन पुण्यातील एका लॉजमध्ये नेले आणि तिच्यावर अत्याचार केला . या घटनांदरम्यान आरोपींनी तरुणीचे फोटो आणि व्हिडिओ चित्रित केल्याचेही समोर आले आहे.

फोटो-व्हिडिओ व्हायरल करण्याची धमकी

तक्रारीनुसार, आरोपींनी अश्लील फोटो आणि व्हिडिओ कुटुंबीयांना दाखवण्याची तसेच सोशल मीडियावर व्हायरल करण्याची धमकी देत पीडितेचा मानसिक छळ केला. या दबावामुळे तरुणीने आरोपींना वेळोवेळी सुमारे 3 लाख रुपये रोख रक्कम आणि घरातील साडेनऊ तोळे सोन्याचे दागिने दिल्याचे फिर्यादीत म्हटले आहे.
मात्र, सततच्या धमक्या आणि वाढत्या छळामुळे पीडितेने अखेर अंबाजोगाई शहर पोलीस ठाण्यात धाव घेत संपूर्ण हकिगत सांगितली.

दोन्ही आरोपी अटकेत

घटनेचे गांभीर्य लक्षात घेऊन पोलिसांनी तातडीने विविध कलमांखाली गुन्हा दाखल केला. त्यानंतर विशेष पथकाने कारवाई करत महेश करपे आणि पवन कराड या दोन्ही आरोपींना अटक केली. या प्रकरणातील आर्थिक व्यवहार, ब्लॅकमेलिंगचे स्वरूप आणि इतर संभाव्य बाबींचा सखोल तपास सुरू असल्याची माहिती पोलिसांनी दिली.

Related Articles

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Stay Connected

0FansLike
0FollowersFollow
0SubscribersSubscribe

Latest Articles