पराभूत उमेदवाराकडून भाजप नगरसेविकेच्या पती वर भ्याड हल्ला; पोलिसांच्या कारवाईवर प्रश्नचिन्ह

बीड – नुकत्याच झालेल्या नगरपालिका निवडणुकीतील पराभवाचा राग मनात धरून कबाड गल्ली परिसरात शिवसेनेच्या पराभूत उमेदवाराकडून भाजप नगरसेविकेच्या पतीवर हल्ला झाल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. या घटनेचा व्हिडिओ सीसीटीव्हीत कैद झाला असून, त्यानंतर पोलिसांच्या कारवाईवरही गंभीर प्रश्न उपस्थित होत आहेत.
प्रभाग क्रमांक ७ मधील भाजपच्या विजयी उमेदवार सौभाग्यश्री देशपांडे यांचे पती सागर देशपांडे यांच्यावर हा हल्ला झाला. तक्रारीनुसार, पराभूत उमेदवार बाळासाहेब जाधव हे निकालानंतर सातत्याने धमक्या, शिवीगाळ आणि त्रास देत होते.

📌 काय घडले नेमके?

शुक्रवारी सायंकाळी  ८ वाजण्याच्या सुमारास सागर देशपांडे आपल्या घरासमोर फोनवर बोलत उभे असताना, बाळासाहेब जाधव आपल्या मुलासह ५ ते ७ जणांना घेऊन घटनास्थळी आले. त्यांनी अचानक हल्ला करत लाथा-बुक्क्यांनी व काठीने मारहाण केली. या हल्ल्यात देशपांडे जखमी झाले. विशेष म्हणजे, संपूर्ण घटना सीसीटीव्हीत स्पष्टपणे दिसत असून, हल्लेखोरांनी समोरून येत थेट मारहाण केल्याचे दृश्य समोर आले आहे.

पोलिसांच्या भूमिकेवर प्रश्न

या घटनेदरम्यान सागर देशपांडे यांचे वडील अरुण देशपांडे हे घराच्या गॅलरीत उभे असल्याचे सीसीटीव्हीत दिसत आहे. तरीही बीड शहर पोलिसांनी त्यांच्याविरुद्धही गुन्हा दाखल केला आहे.यामुळे “घटनास्थळी प्रत्यक्ष सहभागी नसतानाही गुन्हा दाखल का?” असा सवाल उपस्थित होत आहे.पोलीस निरीक्षक शितलकुमार बल्लाळ यांच्या भूमिकेवर प्रश्नचिन्ह निर्माण केले जात आहेत. नागरिकांमध्ये चर्चा सुरू आहे. शितलकुमार बल्लाळ यांच्याशी अवैध धंद्यातून निर्माण झालेला दोस्ताना अरुण देशपांडे यांच्यावर गुन्हा दाखल करण्यास कारणीभूत ठरला असल्याचं सांगितलं जाऊ लागला आहे.

📄 दोन्ही बाजूंनी गुन्हे दाखल

सागर देशपांडे यांच्या फिर्यादीवरून बाळासाहेब जाधव यांचा मुलगा व इतर ५-६ जणांवर गुन्हा दाखल झाल.तर दुसरीकडे, जाधव यांच्या फिर्यादीवरून देशपांडे पिता-पुत्रावरही गुन्हा करण्यात आला आहे.
स्थानिक पातळीवर बाळासाहेब जाधव यांचा मटका व पत्त्याच्या क्लबशी संबंधित व्यवसाय असल्याची नोंद असून, त्यांच्यावर यापूर्वीही अनेक गुन्हे दाखल असल्याची माहिती समोर येत आहे.

Related Articles

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Stay Connected

0FansLike
0FollowersFollow
0SubscribersSubscribe

Latest Articles