गेवराईत दुष्काळग्रस्त शेतकऱ्यांशी सुनेत्रा पवार यांचा संवाद; ‘घाबरू नका, सरकार पाठिशी

आ.विजयसिंह पंडित यांनी दुष्काळग्रस्तांच्या व्यथा मांडून उपाययोजनांची केली मागणी

गेवराई — राज्यात निर्माण झालेल्या अभूतपुर्व दुष्काळ परिस्थितीच्या पार्श्वभुमीवर उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांनी आज गेवराई विधानसभा मतदार संघातील सिरसदेवी, धर्मेवाडी आदी ठिकाणी पिक पाहणी दौरा करून दुष्काळग्रस्त शेतकऱ्यांशी संवाद साधला. महायुती सरकार शेतकऱ्यांच्या पाठिशी खंबीरपणे उभा असून घाबरू नका, झालेल्या नुकसानीची भरपाई देणे संदर्भात सरकार कटिबध्द असल्याची भावना त्यांनी यावेळी व्यक्त केली. गेवराईचे आमदार विजयसिंह पंडित व माजी आमदार अमरसिंह पंडित यांनी दुष्काळग्रस्तांच्या व्यथा, अडचणी त्यांच्यासमोर मांडून कायमस्वरुपी उपाययोजना करण्याची मागणी केली. यावेळी महिला शेतकरी मोठ्या संख्येने उपस्थित होत्या.

अवेळी व अल्प प्रमाणात झालेल्या पावसामुळे राज्यात विशेषतः मराठवाड्यात अभूतपुर्व दुष्काळ परिस्थिती निर्माण झाली आहे. पिकांचे मोठे नुकसान झाले आहे. या पार्श्वभुमीवर राज्याच्या उपमुख्यमंत्री ना. सुनेत्रा अजित पवार यांनी आज बीड जिल्ह्यातील पिक पाहणीचा दौरा करून दुष्काळग्रस्त शेतकऱ्यांशी भावनिक संवाद साधला. या दौऱ्यात शेतकऱ्यांनी विशेषतः महिला भगिनींनी त्यांच्यासमोर आपल्या व्यथा मांडल्या. गेवराई विधानसभा मतदार संघातील सिरसदेवी व धर्मेवाडी येथे त्यांनी महिला शेतकऱ्यांशी संवाद साधून दुष्काळग्रस्त शेतकऱ्यांना धिर दिला. यावेळी त्यांच्यासमवेत सहकार मंत्री ना. बाबासाहेब पाटील, माजी आमदार अमरसिंह पंडित, आ. विजयसिंह पंडित, आ. प्रताप पाटील चिखलीकर, आ. राजेश विटेकर, आ. विक्रम काळे, राष्ट्रवादीचे जिल्हाध्यक्ष ॲड. राजेश्वर चव्हाण, रमेश आडसकर यांच्यासह बीड जिल्ह्यातील राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे पदाधिकारी उपस्थित होते. जिल्हाधिकारी विवेक जॉन्सन, पोलीस अधिक्षक नवनीत कॉवत, अपर पोलीस अधिक्षक समीर शेख यांच्यासह प्रशासनातील वरिष्ठ अधिकारी यावेळी उपस्थित होते.

धिर धरा, घाबरू नका, पावसाने दगा दिला असला तरी सरकार तुमच्या पाठिशी खंबीरपणे उभे आहे, येणाऱ्या काळात आपण पुन्हा उभे राहू असा विश्वास उपमुख्यमंत्री ना. सुनेत्रा अजित पवार यांनी दिला. यावेळी माध्यमाशी बोलताना त्यांनी राज्यशासनाने कोरडा दुष्काळ जाहिर केल्याचे सांगून या माध्यमातून मिळणाऱ्या सवलती लोकांना समजावून सांगितल्या. नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना मदतीसोबतच पिण्याचे पाणी, जनावरांचा चारा व पाणी, जलसंधारणाची कामे, मजुरांच्या हाताला काम, नरेगा अंतर्गत कामे आदी नव्याने सुरु करून दुष्काळग्रस्तांना दिलासा मिळेल अशी कामे शासन हाती घेणार असल्याचे यावेळी त्यांनी सांगितले. मौजे सिरसदेवी येथे त्यांनी रेशमाची रुई येथील महिला शेतकऱ्यांशी संवाद साधला. त्याचबरोबर सोयाबीन आणि कापूस उत्पादक महिला शेतकऱ्यांशीही त्यांनी अतिशय भावनिक संवाद साधत त्यांना धिर दिला. सिरसदेवी येथे महिला शेतकऱ्यांची संख्या मोठ्या प्रमाणावर होती. गेवराई तालुक्यातील राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे सर्व पदाधिकारी याठिकाणी उपस्थित होते.

Related Articles

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Stay Connected

0FansLike
0FollowersFollow
0SubscribersSubscribe
- Advertisement -

Latest Articles