बीड — गेल्या दोन दिवसांपासून बीड जिल्ह्यातील काही दैनिके व युट्यूब चॅनेलवर “सह्याद्री–देवराई येथे भीषण आग लागून मोठ्या प्रमाणावर वृक्षसंपदा नष्ट” झाल्याच्या बातम्या प्रसारित होत आहेत. मात्र या बातम्या पूर्णतः चुकीच्या व दिशाभूल करणाऱ्या असल्याचे स्पष्ट झाले आहे.

प्रत्यक्षात सह्याद्री–देवराईला कोणतीही आग लागलेली नसून, देवराईपासून सुमारे दीड किलोमीटर अंतरावरील पिंपळवाडी येथील वनविभागाच्या कार्यक्षेत्रात आग लागली होती. या आगीत सुमारे २० गुंठे वनक्षेत्र बाधित झाले असून फक्त हाळ जळाली आहे, झाडांचे नुकसान झालेले नाही, अशी अधिकृत माहिती आहे.
देवराई ट्रेकिंग ग्रुपचे सदस्य व वृक्षप्रेमी श्रीकृष्ण उबाळे यांनी सह्याद्री–देवराई येथे प्रत्यक्ष भेट देऊन परिस्थितीची पाहणी केली. यावेळी त्यांनी आग आटोक्यात आणणाऱ्या वनकर्मचाऱ्यांशी संवाद साधला. यामध्ये शेख अकबर, जयराम काळे, वनरक्षक अशोक केदार, विजय केदार, पद्माकर मस्के, अर्जुन साळुंखे, मधुकर नैराळे व विलास नवले यांचा समावेश होता.
बीडच्या रस्त्यावर शेतमालाला बाजार भाव मिळावा यासाठी शेतकरी मोर्चा काढून जिल्हाधिकारी कार्यालयावर धडकला.
बीड — तालुक्यातील पालवन परिसरातील ‘ सह्याद्री देवराई ’ प्रकल्पाला आज बुधवारी सायंकाळी भीषण आग लागली. या आगीने रौद्ररूप धारण केल्यामुळे डोंगरावरील हजारो झाडे, दुर्मिळ औषधी वनस्पती आणि असंख्य पशू-पक्षी होरपळून गेल्याची भीती व्यक्त करण्यात येत आहे. सयाजी शिंदे आणि त्यांच्या टीमने वर्षानुवर्षे घेतलेल्या मेहनतीवर या आगीमुळे अक्षरशः पाणी फेरलं गेलं आहे. आज सायंकाळच्या सुमारास पालवन डोंगर रांगेत अचानक धुराचे लोट दिसू लागले. वाऱ्याचा वेग जास्त असल्याने काही क्षणांतच या आगीने संपूर्ण सह्याद्री देवराई प्रकल्पाला वेढले. ही आग इतकी भीषण होती की, दुरूनच आगीच्या ज्वाळा आणि धूर दिसत होता. स्थानिक नागरिकांनी प्रसंगावधान राखून तातडीने वन विभागाला याची माहिती दिली.