Home Blog Page 122

संदीप क्षीरसागरांची उमेदवारी निश्चितच! विजयासाठी परिस्थिती अनुकूल बनू लागली

0

बीड — तरुण, विकासाची दृष्टी असणारा, सामान्यां मध्ये मिसळणार नेतृत्व बीड मतदार संघाला संदीप क्षीरसागरांच्या रूपाने मिळालं अन् नव विचाराला चालना मिळाली.गावागावात निर्माण होणारे तंटे बखेडे बंद झाले. यातून विकासाची वाट मोकळी झाली. त्यामुळे मतदार संघासाठी आशेचे (सं) दीप उजळले गेले असल्यामुळे या निवडणुकीत उमेदवारी तर मिळणारच पण विजयाची वाट सुकर होण्यासाठी उजवी गुढी निर्माण होऊ लागली आहे.

बीड क्षीरसागरांचं पूर्वीपासून प्राबल्य असणारा हक्काचा मतदारसंघ.यातच चौसाळा मतदार संघ सामील झाल्यानंतर ही ताकत आणखी दुणावली. पण मतदार संघाला मिळालेलं नेतृत्व मात्र गावागावात दोन गट तयार करायची. त्यांच्यात रस्सीखेच सुरू ठेवायची. यातून निर्माण होणाऱ्या वाद विवादातून गावातली इत्यंभूत माहिती मिळवायची. या माहितीच्या जोरावर जनतेला झूलवत विकासापासून दूर ठेवायचं. गाव खेड्यातला प्रत्येक माणूस तंट्या बखाड्यातून आपल्यापर्यंत आलाच पाहिजे ही नीती वापरली जायची. या सर्व गोष्टीचा उबग येऊन जनतेने कुचकामी माणसंही अनेक वेळा निवडून दिली.मात्र 2019 ला संदीप क्षीरसागर सारखं तरुण नवविचाराच्या नेतृत्वाला संधी दिली. संदीप क्षीरसागर ने देखील जनतेत मिसळण्याची त्यांच्या दुःखात सहभागी होण्याची संधी कधी सोडली नाही. प्रत्येक जण वाड्यावरच यावा हा अट्टाहास धरला नाही. गावातील दोन गट संपल्यामुळे जनतेला स्व विकासाकडे लक्ष देता आलं. वादविवाद जिथल्या तिथं गावपातळीवरच मिटल्या गेली. ही जमेची बाजू मतदार संघाच्या विकासाला चालना देणारी ठरली. त्यामुळे नव विचारांचा प्रवाह जनतेत आपोआप मिसळला गेला. पाच वर्षाच्या राजकारणात ज्यांचा स्वार्थ साधला गेला नाही.अशा स्वयंघोषित नेत्यांनी वेगळी वाट धरली. पण जाता जाता बदनामी करण्याचा डाव देखील आखला. पण तो फारसा यशस्वी ठरलाच नाही. मध्यंतरी जातीय समीकरणांची वावटळ सुटली गेली. पण लोकसभा निवडणुकीत मी जनतेसाठी जाती-धर्माच्या चौकटीत अडकणार नाही , सत्यालाच स्थान दिलं जाईल
असा संदेश देत विधानसभेला मतदार संघातून बजरंग सोनवणे ना सर्वाधिक मतांची गोळा बेरीज पदरात घातली. ही गोळाबेरीजच बजरंग सोनवणे यांच्या विजयाची नांदी ठरली. तर त्यातही अनेकांनी दूषणं देण्याचा प्रयत्न केला.पण या सर्व घटनांमधून जनतेच्या मनामध्ये वेगळी प्रतिमा निर्माण करण्यात संदीप क्षीरसागर यांना यश आले. मतदार संघात विरोधक सोडता संदीप क्षीरसागर यांच्या विरोधात बोलणारा सामान्य नागरीक शोधूनही सापडत नाही. आणखी जमेची बाजू काय असते?
वरचेवर राजकीय समीकरणे जुळली जाऊन संदीप क्षीरसागर यांच्या विक्रमी मताधिक्याने निवडून येण्यावर शिक्कामोर्तब होऊ लागले आहे. उजवी गुढी निर्माण होऊ लागली आहे. या निवडणुकीत उमेदवारी तर निश्चित आहेच. पण डॉ. ज्योती मेटे सारख्या उच्चविद्याविभूषित व उच्च पदस्थ अधिकाऱ्या राहिलेल्या तसेच मजबूत मराठा असलेल्या व्यक्तिमत्त्वाची साथ संदीप क्षीरसागर यांना मिळणार आहे. ज्योती मेटे यांना विधान परिषदेची येणाऱ्या काळात उमेदवारी मिळण्याची आशा प्रबळ झाली आहे.
एकूणच संदीप क्षीरसागरांच्या या निवडणुकीतील वाटचालीतील अनेक अडथळे दूर होत बाजू भक्कम होत असल्याचे चित्र पाहायला मिळत आहे.

राजेंद्र मस्केंचा भाजप जिल्हाध्यक्ष पदाचा राजीनामा

0

बीड — राज्यात विधानसभेच्या रणसंग्रामाला सुरुवात झाली आहे. आखाड्यात उतरवण्यासाठी उमेदवारांच्या याद्या जाहीर होऊ लागल्या आहेत.दरम्यान भाजप नेत्या पंकजा मुंडे यांना विधानसभे आधी मोठा धक्का बसला आहे.

पंकजा मुंडे यांचे निकटवर्तीय राजेंद्र मस्के यांनी आपल्या पदाचा राजीनामा देत पक्षाला सोडचिट्ठी दिली आहे. राजेंद्र मस्के हे भाजपचे बीड जिल्हाध्यक्ष आहेत. त्यांनी पोस्ट करून याची माहिती दिली.
राजेंद्र मस्के यांनी पोस्टमध्ये म्हटलं की, मी भारतीय जनता पक्षाच्या जिल्हाध्यक्ष पदाचा राजीनामा देत आहे. यासह भारतीय जनता पक्षाचा त्याग करत आहे. राजेंद्र मस्के यांनी अचानक घेतलेल्या निर्णयामुळे भाजपला मोठा धक्का बसला आहे. स्वत: पंकजा मुंडे यांनी राजेंद्र मस्के यांची बीड विधानसभेची भूमिका जाहीर केली होती.
खुद्द पंकजा मुंडे यांनीच राजेंद्र मस्के बीड विधानसभा लढणार असं आधीच जाहीर केलं होतं. पण आता ऐन विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर मस्के यांनी भाजपच्या जिल्हाध्यक्षपदाचा राजीनामा दिल्याने राजकीय चर्चाना उधाण आले आहे. त्यांनी अचानक हा निर्णय का घेतला हे अद्याप समजू शकलेले नाही.

भाजपाची उमेदवारांची पहिली यादी जाहीर; केज मधून नमिता मुंदडा

0

मुंबई — महाराष्ट्र विधानसभा निवडणूक जाहीर झाली असून, सगळ्याच पक्षांनी आता उमेदवार याद्या जाहीर करायला सुरूवात केली आहे. नुकतीच भाजपने आपली 99 उमेदवारांची पहिली यादी जाहीर केली आहे.

यामध्ये बड्या नेत्यांना पुन्हा संधी देण्यात आली आहे. 2019 किंवा यापूर्वी झालेल्या कोणत्याही विधानसभा निवडणुकीपेक्षा यंदाची निवडणूक ही भाजपसाठी काहीशी वेगळी असणार आहे. याचं कारण म्हणजे भाजप यंदा शिवसेना आणि राष्ट्रवादी या दोन पक्षांसोबत मैदानात उतरणार आहे. मोठ्या पक्षांना घेऊन विधानसभा निवडणुकीत नेमकी कुणाकुणाला संधी मिळाली आहे हे खालील यादीतून जाणून घेऊयात.

इथे वाचा भाजपच्या 99 उमेदवारांची नावं

1. नागपूर दक्षिण पश्चिम – देवेंद्र फडणवीस
2. कामठी – चंद्रशेखर बावनकुळे
3. शहादा – राजेश पाडवी
4. नंदुरबार – विजयकुमार कृष्णराव गावित
5. धुळे – अनुप अग्रवाल
6. सिंदखेडा – जयकुमार जितेंद्रसिंग रावल
7. शिरपूर – काशीराम वेचन पावरा
8. रावेर – अमोल जावले
9. भुसावळ – संजय वामन सावकारे
10. जळगाव – सुरेश दामू भोले
11. चाळीसगाव – मंगेश रमेश चव्हाण
12. जामनेर – गिरीश दत्तात्रेय महाजन
13. चिखली – श्वेता विद्याधर महाले
14. खामगाव – आकाश पांडुरंग फुंडकर
15. जळगाव (जामोद) – डॉ. संजय श्रीराम कुटे
16. अकोला पूर्व – रणधीर प्रल्हादराव सावरकर
17. धामगाव रेल्वे – प्रताप जनार्दन अडसद
18. अचलपूर – प्रविण तायडे
19. देवली – राजेश बकाने
20. हिंगणघाट – समीर त्र्यंबकराव कुणावर
21. वर्धा – पंकज राजेश भोयर
22. हिंगणा – समीर दत्तात्रेय मेघे
23. नागपूर दक्षिण – मोहन गोपालराव माते
24. नागपूर पूर्व – कृष्ण पंचम खोपडे
25. तिरोरा – विजय भरतलाल रहांगडाले
26. गोंदिया – विनोद अग्रवाल
27. अमगाव – संजय हनवंतराव पुरम
28. आमोरी – कृष्णा दामाजी गजबे
29. बल्लारपूर – सुधीर मुनगंटीवार
30. चिमूर – बंटी भांगडिया
31- वणी – संजीवरेड्डी बोडकुरवार

32-रालेगाव – अशोक उडके

33-यवतमाळ – मदन येरवर

34-किनवट – भीमराव केरम

35-भोकर – क्षीजया चव्हाण

36-नायगाव – राजेश पवार

37-मुखेड – तुषार राठोड

38-राहुरी – शिवाजीराव कार्डिले

39-शेवगाव – मोनिका राजले

40-शिर्डी – राधाकृष्ण विखे पाटील

41-पार्वती – माधुरी मिसाळ

42-कोथरुड – चंद्रकांत पाटील

43-शिवाजीनगर – सिद्धार्थ शिरोले

44-भोसरी – महेश लांडगे

45-चिंचवड – शंकर जगताप

46-दौंड – राहुल कुल

47-उरण – महेश बाल्दी

48-पनवेल – प्रशांत ठाकूर

49-कुलाबा – राहुल नार्वेकर

50-मलबार हिल – मंगलप्रभात लोढा

51-वडाळा – कालिदास कोळंबकर

52-सायन-कोळीवाडा – कॅप्टन आर. तमिल सेल्वन

53-वांद्रे पश्चिम – आशिष शेलार
54-घाटकोपर पश्चिम – राम कदम

55-विलेपार्ले – पराग अलवणी

56-अंधेरी पश्चिम – अमित साटम

57-गोरेगाव – विद्या ठाकूर

58-मलाड पश्चिम – विनोद शेलार

59-चारकोप – योगेश सागर

60-कांदिवली पूर्व – अतुल भातखळकर

61-मुलुंड – मिहिर कोटेचा

62-दहिसर – मनीषा चौधरी
63-बेलापूर – मंदा म्हात्रे
64-ऐरोली – गणेश नाईक
65-ठाणे – संजय मुकुंद केळकर
66-डोंबिवली – रवींद्र चव्हाण
67-कल्याण पूर्ण – सुलभा गायकवाड
68-मुरबाड – किसन कथोरे
69-भिवंडी पश्चिम – महेश चौघुले
70-नालासोपारा – राजन नाईक
71-नाशिक पश्चिम -सीामा हिरे
72-नाशिक पूर्व – राहुल ढिकाले
73-चंदवड – राहुल अहेर
74-बगलान – दिलीप बोरसे
75-गंगापूर – प्रशांत बंब
76-औरंगाबाद पूर्व – अतुल सावे
77-फुलंब्री – अनुराधा चव्हाण
78-भोकरदन – संतोष रावसाहेब दानवे
79-बदनापूर – नारायण कुटे
80-परतूर – बबनराव लोणीकर
81-जिंतूर – मेघना बोर्डिकर
82-हिंगोली – तानाजी मुटकुले
83-श्रीगोंदा – प्रतिभा पाचपुते
84-कर्ज जामखेड – राम शिंदे
85-केज – नमिता मुंदडा
86-निलंगा – संभाजीपाटील निलांगेकर
87-औसा – अभिमन्यू पवार
88-तुळजापूर – राणाजगजितसिंह पाटील
89-सोलापूर शहर उत्तर – विजयकुमार देशमुख
90-अक्कलकोट – सचिन कल्याणशेट्टी
91-सोलापूर दक्षिण – सुभाष देशमुख
92-मान – जयकुमार गोरे
93-कराड – अतुल भोसले
94-सातारा – छत्रपती शिवेंद्र राजे भोसले
95-कणकवली – नितेश राणे
96-कोल्हापूर दक्षिण – अमल महाडीक
97-इजलकरंजी – राहुल अवाडे
98-मीरज- सुरेश खाडे
99- सांगली – सुधीर गाडगीळ

मांजरसुंबा-पाटोदा महामार्गावरील मुळूकवाडी जवळ गोळीबार ;एक जखमी

0

बीड — पोलिसात निवेदन दिल्याच्या कारणावरून स्कॉर्पिओतून आलेल्या तिघांनी गोळीबार केल्याची घटना शनिवारी रात्री 10:45 च्या सुमारास घडली. या गोळीबारात एक जण जखमी झाला आहे.

मांजरसुंबा लिंबागणेश रोडवर असलेल्या मुळुकवाडी जवळ संदीप गोरख तांदळे वय 28 वर्ष रा. हिंगणी खुर्द ता. बीड
होते. यावेळी स्कॉर्पिओ गाडी क्र. एम एच 23 बी डब्ल्यू 76 89 मधून आणखी दोघांना सोबत घेऊन आलेल्या बाळा उर्फ विजयसिंह रामकिसन बांगर रा. पाटोदा याने संदीप तांदळे यास पोलीस ठाण्यात दिलेल्या निवेदनाच्या रागातून जीवे मारण्याच्या उद्देशाने स्वतः जवळ असलेली पिस्तूल रोखून चार राऊंड फायर केले. यामध्ये संदीप तांदळे याच्या मांडीला गोळी घासून गेली यात तो जखमी झाला आहे. त्याला उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले. याप्रकरणी बाळा बांगर सह अन्य दोन आरोपी विरोधात नेकनूर पोलीस ठाण्यात कलम 109 भारतीय दंड संहिता संहिता कलम 3,25,27 भारतीय हत्यार अधिनियमान्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास नेकनूर पोलीस करत आहेत.

चौसाळ्यात दहा वर्षीय बालिकेवर तीन नराधमांचा लैंगिक अत्याचार

0

बीड – शंभर रुपये व चिकन खायला देण्याचे अमिष दाखवीत दहा वर्षाच्या बालिकेवर तिघांनी लैंगिक अत्याचार केल्याची खळबळ जनक घटना घडली आहे.

याबाबत मिळालेल्या माहितीनुसार चौसाळा शहरातील आझाद नगर मध्ये राहणाऱ्या दहा वर्षीय पीडित बालिकेला 3 ऑगस्ट 2024 ला राजेंद्र रामलिंग चंदनशिवे, सागर राजेंद्र चंदनशिवे, दोघेही राहणार वंजारवाडी ह. मू. चौसाळा तसेच आशिफ कुमार चौधरी उर्फ कल्लू (नेपाळी) ह.मू. वाशी, जी धाराशिव या तिघांनी मिळून बालिकेला शंभर रुपये व चिकन खायला देण्याचे आमीष दाखवले. पीडित बालिकेच्या जुन्याचं घरात तिच्यावर राजेंद्र चंदनशिवे व आशिफ कुमार चौधरी नेपाळी यांनी बलात्कार केला. तर सागर चंदनशिवे यांने अश्लील कृत्य करत ही बाब कोणाला सांगितल्यास तुझ्या आई वडिलांना जीवे मारून टाकण्याची धमकी दिली. याप्रकरणी पीडित बालिकेच्या आईने दिलेल्या फिर्यादीवरून आरोपी विरुद्ध बालक लैंगिक अपराध संरक्षण कायदा अन्वये नेकनूर पोलीस ठाण्यात 19 ऑक्टोबर रोजी गुन्हा दाखल झाला आहे. घटनेची माहिती मिळताच सहाय्यक पोलीस अधीक्षक कमलेश मीना, सपोनी चंद्रकांत गोसावी,पो. उपनिरीक्षक रोकडे, पो.उप‌.नि. शेळके यांनी भेट दिली

मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेला ब्रेक!

0

मुंबई — मुख्यमंत्री लाडकी बहीण योजने अंतर्गत 2 कोटी 40 लाखांहून अधिक पात्र महिलांना पाच महिन्यांचे हप्ते प्राप्त झाले मात्र निवडणुकीमुळे लाडकी बहीण योजनेला स्थगिती देण्यात आली आहे.

केंद्रीय निवडणूक आयोगाने महाराष्ट्रात विधान सभा निवडणुकीचा कार्यक्रम जाहीर केला आहे. त्यानुसार, राज्यात २० नोव्हेंबरला एकाच टप्प्यात मतदान होणार आहे. त्यामुळे राज्यात आचारसंहिता लागू झाली आहे. आचारसंहितेच्या काळात मतदारांवर थेट प्रभाव टाकणाऱ्या आर्थिक योजना बंद कराव्यात अशा सूचना निवडणूक आयोगाने राज्य सरकारला दिल्या आहेत. त्यानुसार, महिला आणि बालकल्याण विभागाकडून या योजनेसाठी लागणारा निधी थांबवला आहे. परिणामी निवडणुका होईपर्यंत लाडकी बहीण योजनेचे पैसे पात्र महिलांना मिळणार नाहीत. दरम्यान, राज्य सरकारने या योजनेअंतर्गत ऑक्टोबर आणि नोव्हेंबर महिन्याचे एकत्र पैसे दिले होते. त्यामुळे आता डिसेंबर महिन्याच्या हप्त्याची प्रतिक्षा करावी लागणार आहे.

पैशाचा पाऊस पाडतो असं सांगत 45 लाखाला घातला गंडा

0

सहा जणांविरोधात गुन्हा दाखल

बीड — तंत्र विद्या अवगत असल्याचे सांगून पैशाचा पाऊस पाडून तुला मालामाल करतो असे आमिष दाखवत लॅब टेक्निशियन ची 45 लाखाहून अधिकच्या रकमेला गंडा घातल्याचा प्रकार बीड शहरात उघडकीस आला
या प्रकरणी सहा जणांविरोधात शिवाजीनगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
शेख अझहर शेख जाफर रा.भारतभूषण नगर, बालेपीर नगर रोड बीड याला पैशाचा पाऊस पाडून तुला मालामाल करतो, असे आमिष हमीद खान ऊर्फ बाबू करीम खान व इतरांनी दिले. या मांत्रिकांनी शेख अझहर याच्याकडून रोख 24 लाख व फोन पे द्वारे 21 लाख 23 हजार 315 रुपये उकळले. आपली याच्यामध्ये फसवणूक झाल्याचे शेख अझहर यांच्या निदर्शनास आल्यानंतर त्यांनी याबाबत शिवाजीनगर पोलीस ठाण्यात फिर्याद दाखल केली. या प्रकरणी हमीद खान ऊर्फ बाबू करीम खान रा.जे.के. कॉम्प्लेक्सच्या मागे बार्शी नाका बीड, जिलानी अब्दुल कादर सय्यद रा. मोमीन गल्ली ता.औसा जि. लातूर,सविता पवार रा. पुंडलिक नगर औरंगाबाद, शेख समीर शेख अहमद रा. जालना,उत्तम भागवत रा. घोलपवाडी ता. इंदापूर जि. पुणे, प्रकाश गोरे रा. झारकरवाडी ता. इंदापूर जि. पुणे या सहा जणांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

टिप्परने उडवल्याने महिलेचा जागीच मृत्यू

0

बीड — मोटार सायकल वर मांजरसुंबा कडे जाणाऱ्या दुचाकी स्वाराला टिप्परने धडक दिल्यामुळे महिलेचा जागीच मृत्यू झाला तर मोटर सायकल स्वार जखमी झाला आहे. ही घटना बार्शी नाका बायपास चौकात घडली.

मांजरसुंबाकडे मोटार सायकल क्र. एम एच 23 ए एच 8435 ने जात असणाऱ्या दोघांना जगदंबा स्टोन क्रेशर चे टिप्पर क्र. एम.एच.23-एयू-4670 ने जोराची धडक दिल्याची घटना दुपारी बायपास रोडवर घडली यामध्ये सदरील महिलेचा जागीच मृत्यू झाला अन्य एक जखमी झाला असून टिप्पर सोडून चालक फरार झाला. अपघात झाला त्यावेळी लोकांनी एकच गर्दी गेली होती.सदरील महिलेचा मृतदेह जिल्हा रूग्णालयात आणण्यात आला असून जखमीवर रूग्णालयात उपचार करण्यात येत आहेत.

कला क्रीडा केंद्रातील तिरटच्या जुगार अड्डयावर पोलिसांचा छापा

0

बीड — शिक्षण आणि सांस्कृतिक माहेरघर म्हणून ओळखल्या जाणाऱ्या अंबाजोगाई शहरातील एका कला क्रीडा केंद्रावर पोलिसांनी छाप्पा मारून तब्बल ५० लाखांचा मुद्देमाल जप्त केला आहे. पोलीस अधिक्षक अविनाश बारगळ यांनी या कारवाईसाठी सपोनि बाळराजे दराडे,पोलीस उपनिरीक्षक श्री. विघ्ने यांच्यासह काही कर्मचाऱ्यांची पथकासाठी नेमणूक केली होती.

अंबाजोगाईतील अंबासाखर कारखाना शेजारील उड्डाणपुलाजवळ राज कला क्रीडा केंद्र असून येथे तिरट नावाचा जुगार अड्डा सुरु झाला होता. याची माहिती पोलीस अधिक्षक अविनाश बारगळ यांना मिळाल्यानंतर त्यांनी ग्रामीण पोलीस ठाण्यातील सपोनि बाळाराजे दराडे, स्थानिक गुन्हे शाखेतील पोलीस उपनिरीक्षक श्री. विघ्ने यांच्यासह काही कर्मचाऱ्यांना सदर ठिकाणी छापा मारण्याचे आदेश दिले होते. त्यानुसार पोलिसांनी या ठिकाणी काल रात्री छापा मारला असता २३ जणांवर गुन्हे दाखल करण्यात आले. तर नगदी रोक्कड ५ लाख ७६ हजार ६०० रुपयांसह स्कर्पिओ गाडी, काही दुचाक्या, इतर साहित्य असा ५० लाख ३१ हजार १७६ रुपयांचा मुद्देमाल पोलिसांनी जप्त केला आहे. जुगार अड्डयावरील मागच्या अनेक दिवसातील ही मोठी कारवाई असून यामुळे अवैध धंद्यावल्याचे धाबे दणाणले आहेत.

मटका,जुगार अड्डे, अवैध फटाक्यांचे गोदाम गोदापात्रातील अवैध वाळू तस्करी, गुटखा तस्करी यासारख्या वाढलेल्या गुन्हेगारीवर वचक बसवण्यासाठी विशेष पथकाचे विलास हजारे, गणेश मुंडे यासारख्या अधिकाऱ्यांनी जीवाचे रान केले होते. त्यांनी आपला दरारा ही निर्माण केला होता. बाळराजे दराडे यांनी देखील त्यांच्याच पावलावर पाऊल टाकून कारवायांचा धडाका लावत पोलीस अधीक्षक अविनाश बारगळ यांचा विश्वास सार्थ ठरवला आहे. त्यामुळे दराडेंवर विशेष पथकाची जबाबदारी सोपवण्यात यावी अशी मागणी जनतेतून होऊ लागली आहे

बाबरी मुंडे च्या सर्व समावेशक राजकारणाच्या “शाबरी “मंत्राने माजलगावात नवी पहाट होणार !

0

बीड — माजलगाव मतदार संघात विशिष्ट घराण्याची मक्तेदारी व त्यातून निर्माण झालेली सरंजामशाही यामुळे विकासाला खीळ बसली गेली. यातून गोरगरीब जनता पिळवटून निघाली मात्र स्व. गोपीनाथ मुंडे साहेबांच्या घराण्याशी एकनिष्ठ व त्यांच्याच तालमीतले संस्कार घेऊन वाढलेला बाबरी मुंडे या तरुणाने निवडणुकीसाठी शड्डू ठोकल्याने मतदार संघात आता तरी परिवर्तन होऊन नवी पहाट निर्माण होईल अशी आशा जनतेत निर्माण झाली आहे.

एकाच घराण्याच्या पायाशी माजलगाव ची सत्ता लोळण घेत आली आहे. त्यामुळे जनतेच्या विकासापेक्षा स्व विकासाला महत्व दिले गेले. यातून निर्माण झालेल्या सरंजामशाहीमुळे जनता भरडली गेली. पण प्रत्येक निवडणुकीत तोला मोलाचा प्रतिस्पर्धी न मिळाल्यामुळे मतदार संघात परिवर्तन कधी झालेच नाही. त्यामुळे विकासाकडे मतदार संघाची वाटचाल हे दूरा स्वप्न होऊन बसले शेतकरी ,मजूर, गोरगरिबांचे प्रश्न जैसे थे च राहिले गेले. प्रत्येक निवडणुकीत परिवर्तनाची धरलेली आशा फोल ठरत गेली व पदरात निराशाच पडत गेली. हा मतदारसंघाचा इतिहास आहे.
या निवडणुकीत मात्र परिवर्तनाची नवी पहाट उगवेल अशी आशा जनतेच्या मनात निर्माण झाली आहे. स्वर्गीय गोपीनाथ मुंडे यांच्या घराशी एकनिष्ठ राहिलेले व त्यांच्याच संस्काराच्या तालमीत वाढलेला “बाबरी मुंडे”हा उमदा चेहरा या निवडणुकीत हाबुक ठोकून मैदानात उतरणार आहे. भाजपने उमेदवारी दिली तर दुधात साखर दुर्दैवाने नाहीच उमेदवारी मिळाली तर वेळप्रसंगी जनहितासाठी बंडखोरी देखील करायची पण परिवर्तनच घडवून आणायचं असा चंग या तरुणांने बांधला आहे. वडवणीची नगरपंचायत ताब्यात आल्यानंतर या तरुणाने विकासासाठी केलेले प्रयत्न शहराचाच नव्हे तर तालुक्याचा चेहरा मोहरा बदलणारे ठरले. गोरगरिबांनी आवाज दिला की तितक्याच तत्परतेने “ओ” देत आधारही द्यायचा. हा मुंडे साहेबांनी दिलेला मंत्र अमलात आणला. संकटाच्या काळात मदत करणारा हक्काचा चेहरा म्हणून बाबरी मुंडे कडे पाहणारा मोठा वर्ग मतदार संघात निर्माण झाला. लगतच्या धारूरसह माजलगाव तालुक्यातील प्रत्येकालाच निस्वार्थपणे घराचे दरवाजे कायम मदतीसाठी उघडे ठेवले. याबरोबरच सांस्कृतिक चळवळ देखील मोठ्या प्रमाणावर बाबरी मुंडे यांनी राबवली त्यातून तरुणाची नव्या विचाराची फळी निर्माण केली. या सगळ्या वाटचालीमुळे सगळ्यांच्या परिचयाचा असणारा चेहरा म्हणून बाबरी मुंडे कडे पाहिले जाते. बाबरी मुंडे यांना उमेदवारी मिळाली तर नक्कीच परिवर्तनाची नवी पहाट माजलगाव मतदार संघामध्ये उजाडणार आहे. आणखी राजकीय पक्षांचे उमेदवार जाहीर व्हायचे बाकी आहेत पण तत्पूर्वीच जनतेतून त्यांच्या नावाला पसंती मिळत आहे. कदाचित त्यांची उमेदवारी जनतेवर लादली गेलेली सरंजामशाही मोडीत काढणारी ठरेल असा आशावाद निर्माण करणारी ठरू लागली आहे.