Home Blog Page 121

मराठा आंदोलन : न्यायालयाची नाराजी;मुंबई मोकळी करण्याचे आदेश ,उद्या पुन्हा सुनावणी

मुंबई — सुरू असलेले मराठा आंदोलन Maratha protest हाताबाहेर गेलं आहे, आता कोणालाही मुंबईत Mumbai येऊ देऊ नका, असे शब्दात मुंबई उच्च न्यायालयाने High court नाराजी व्यक्त केली आहे.
तसेच उद्या दुपारपर्यंत मुंबईतील रस्ते मोकळे करा. सर्वात महत्त्वाचे म्हणजे 5 हजार लोकांना अटी शर्तींच्या आधारे राहून सरकार पुन्हा परवानगी द्यायची असल्यास देऊ शकते, अशीही सूचना न्यायालयाने सरकारला दिली. पण ही परवानगी दिल्यानंतर नियम आणि अटींचे पालन करावेच लागेल, असेही न्यायालयाने स्पष्ट केले आहे.

ॲड. गुणरत्न सदावर्ते यांनी आझाद मैदानात Azad maidanसुरू असलेल्या मराठा आरक्षण Maratha protest आंदोलनाविरुद्ध उच्च न्यायालयात High court याचिका दाखल केली आहे. मनोज जरांगे आणि वीरेंद्र पाटील यांनी आदेशाचे उल्लंघन केल्याचा दावा याचिकाकर्त्यांनी केला आहे. मुंबईतील मराठा आंदोलनाबाबत मी 29 तारखेला तक्रार दिली, आझाद मैदानाच्या वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांना फोन केला आणि त्यांना परिस्थिती जाणीव करून दिली. लेखी तक्रार दिली आणि गुन्हा दाखल करण्यासाठी अर्ज केला. पण, पोलिसांनी कारवाई केली नाही, असे गुणरत्न सदावर्ते यांनी न्यायालयात म्हटले. तसेच, आज राज्याचा मुख्यमंत्री मराठा नाही म्हणून हे सुरू आहे, असेही सदावर्तेंनी म्हटले.

दरम्यान आंदोलकांकडून देखील आज उच्च न्यायालयात बाजू मांडण्यात आली असून कैलास खांडबहाले यांच्याकडून हस्तक्षेप याचिका दाखल करण्यात आली आहे. त्यामुळे, जरांगे पाटील Manoj jarange Patil यांच्या आंदोलनाला यापुढे परवानगी मिळणार की नाही हे पाहावे लागेल. दरम्यान उद्या, मंगळवारी दुपारी तीन वाजता पुन्हा सुनावणी होणार आहे.

न्यायालयाने म्हटले आहे की, मुंबईसह संपूर्ण उच्च न्यायालय परिसराला घेराव घालण्यात आला आहे. उच्च न्यायालयाच्या न्यायमूर्तींच्या गाड्या अडवण्यात आल्या आहेत, त्यांना उच्च न्यायालयात येण्यापासून अडवण्यात आल्याचे न्यायमूर्तींकडून स्वतः सांगण्यात आले. तसेच, मुंबईत अजून आंदोलनकर्ते येत आहेत, त्यांना कसं अडवणार, अशी विचारणाही उच्च न्यायालयाने राज्य सरकारला केली आहे.

एमी फाऊंडेशनने दाखल केलेल्या याचिकेत मुंबई उच्च न्यायालयाने अंतरिम आदेश दिले होते. मात्र, त्या आदेशाचे उल्लंघन झाल्याचे याचिकाकर्त्यांकडून न्यायालयात सांगण्यात आले. तर, आंदोलकांनी मुंबई अडवून ठेवली असल्याचा दावा ॲड. गुणरत्न सदावर्ते यांनी यावेळी केला आहे. आझाद मैदान पोलीस ठाण्याचे पोलीस अधिकारी श्रीकांत अडाते हेही उच्च न्यायालयात उपस्थित होते.
मुंबई उच्च न्यायालयाने न्यायालयात मनोज जरांगे पाटील यांचा अर्ज वाचून दाखवला. या अर्जाच्या सुरुवातीलाच आमरण उपोषणाचा उल्लेख आहे. मात्र, नियमात आमरण उपोषणाला परवानगी नसल्याने उच्च न्यायालयाने राज्य सरकारला विचारणा केली आहे. अर्जाच्या खाली जरांगे पाटील यांची सही असल्याचं तुम्ही सांगू शकता का? मनोज जरांगे पाटील यांना नोटीस बजावण्यात आली आहे का? अशीही विचारणा मुंबई उच्च न्यायालयाने राज्य सरकारला केली आहे. गेल्या सुनावणीत नोटीस बजावण्याचे आदेश न्यायालयाने दिले होते.

दुसरीकडे आंदोलन करण्यास परवानगी नाही, परवानगी फक्त एका दिवसासाठी देण्यात आली होती, अशी बाजू राज्य सरकारने मांडली. आंदोलकांकडून लिहून देताना सगळ्या अटी पाळण्यात येतील असं मान्य केलं होतं, त्याआधारे परवानगी देण्यात आली होती अशी माहिती महाधिवक्ता बिरेंद्र सराफ यांनी न्यायालयात दिली. न्यायालयाने नियमात राहून आंदोलन करण्याची परवानगी दिली होती, त्यानुसार परवानगी देण्यात आली होती. आझाद मैदान हे आंदोलनासाठी आरक्षित आहे. मात्र, त्याव्यतिरिक्त कुठेही आंदोलन करण्यास परवानगी नाही, असेही सरकारने म्हटले आहे.

गणेशोत्सवात कायदा आणि सुव्यवस्था सांभाळणं पोलिसांसाठी देखील कठीण आहे. तरी आम्ही समतोल पाळण्याचा प्रयत्न करतोय जेणेकरून कायदा व सुव्यवस्था बिघडणार नाही. शनिवारी आणि रविवारी आंदोलनाला परवानगी देण्यात आलेली नाही, केवळ 5 हजार आंदोलकांना परवानगी देण्यात आली होती. राज्य सरकारने दिलेल्या परवानगीवर याचिकाकर्त्यांनी आक्षेप घेतला आहे. तसेच, ध्वनिक्षेपकांच्या वापरला विनापरवाना वापरण्यास परवानगी दिली नाही, आंदोलनाला केवळ सकाळी 9 ते सायंकाळी 6 वाजेपर्यंतच परवानगी देण्यात आली आहे. मनोज जरांगे पाटील यांनी अटी शर्ती पाळून परवानगी मागितली होती, म्हणून त्यांना परवानगी देण्यात आली होती. त्यातही, 5000 लोकांचा जमाव असेल आणि 1500 वाहन असतील, असे सांगण्यात आले होते. तुम्ही सगळ्या नियमांचे उल्लंघन केल्याचे राज्य सरकारने वेळोवेळी जरांगे पाटील यांना सांगितलं. बैलगाड्या चालवल्या जात आहेत, शहर एक खेळाचं मैदान झालं आहे, अशी माहिती राज्य सरकारने दिली. आंदोलक सगळीकडे आहेत, फ्लोरा फाऊंटनमध्ये आहेत, सीएसएमटी स्थानकात आंदोलक आहेत, असे म्हणत राज्य सरकारकडून उच्च न्यायालयात फोटोही दाखवण्यात आले. त्यामुळे, याचा काय तोडगा काढणार अशी विचारणा उच्च न्यायालयाने राज्य सरकारला केली होती.

पोलिसाचे कुटुंब शेतात गेले चोरट्यांनी घर फोडले

आष्टी — घराला कुलूप लावून पोलिसाचं कुटुंब शेतात गेलं. याचा फायदा घेत चोरट्यांनी घर फोडल्याची घटना अंभोरा पोलीस ठाणे हद्दीत शनिवारी घडली आहे.
आष्टी तालुक्यातील अंभोरा पोलिस ठाणे हद्दीतील केळ येथील मच्छिंद्र साधू दळवी हे शेतकरी असून मुलगा गणेश दळवी हे मुंबई येथे पोलिस दलात कार्यरत आहे. दळवी हे शनिवारी सकाळी कुटुंबासह शेतात काम करत असताना दुपारच्या दरम्यान चोरट्यांनी घरी कोणी नाही . या संधीचा फायदा घेत घरफोडी केली. कपाटातून अंदाजे दहा ते बारा तोळे सोन्याची चोरी केल्याचे उघडकीस आले. अंभोरा पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. घटनास्थळी श्वान पथक,ठसे तज्ज्ञ, फोरेन्सिक पथक,स्थानिक गुन्हे शाखा,अंभोरा पोलिसांनी भेट देऊन पाहणी केली आहे.

नागरिकांनी सतर्क राहण्याचे आवाहन
ठाणे हद्दीतील रोडलगत वस्ती असलेले व गाव परिसरातील लोकांनी शेती कामे करताना घराला कुलूप न लावता एक व्यक्ती घरी ठेवावी. सीसीटीव्ही लावावेत. जेणे करून अशा घटनांना आळा बसेल. तसेच नागरिकांनी घाबरून न जाता सतर्क राहण्याचे आवाहन अंभोरा पोलिस ठाण्याचे सहायक पोलीस निरीक्षक मंगेश साळवे यांनी केले आहे.

मूर्ख बनवतो तो नेता मोठा होतो — नितीन गडकरी

नागपूर — आज लोकांना सर्वाधिक मूर्ख बनवू शकतो तो सर्वाधिक चांगला नेता ठरतो. बोलणे सोपे, करणे कठीण आहे. मी त्याची वेळोवेळी अनुभूती घेतो. मी ज्या क्षेत्रात काम करतो, तेथे मनापासून खरे बोलण्याची मनाई आहे, अशा शब्दांत भाजपचे राष्ट्रीय नेते व केंद्रीय महामार्ग मंत्री नितीन गडकरी Nitin Gadkari यांनी सध्याच्या राजकारणावर politics भाष्य केले.
अखिल भारतीय महानुभाव परिषद नागपूर जिल्हातर्फे भगवान सर्वज्ञ चक्रधर स्वामी Chakradhar Swami यांच्या 805 व्या अवतरण दिनानिमित्त आयोजित कार्यक्रमात सुरेश भट सभागृहात ते बोलत होते.

गडकरी पुढे म्हणाले की, येथे हौसे, गवसे, नवसे सारेच आहेत. मात्र भगवान कृष्णाने लिहून ठेवले आहे की, शेवटी विजय हा सत्याचाच होतो. एखादी गोष्ट साध्य करण्यासाठी शॉर्टकट आहेत. शॉर्टकटने माणूस लवकर पुढे जातो. नियम तोडून रस्ता क्रॉस करायचा असेल तर सिग्नल मोडून पुढे जावे लागते. मात्र, शॉर्टकट तुमचे करिअर career शॉर्ट करतो, असा सबुरीचा सल्लाही त्यांनी एकप्रकारे विरोधकांना दिला. कथनी आणि करणीत अंतर नको, मी खोटे बोलणार नाही आश्वासन देणार नाही. मला कोणी मते दिली नाही तरी चालेल. मी खोटे आश्वासन देणार नाही. जे मनात असेल तेच तोंडात असेल. पटलं तर पटलं नाही पटलं तर नाही पटलं. चर्चा केल्याशिवाय मी आश्वासन देणार नाही असेही सांगितले.
भगवान चक्रधर स्वामी Chakradhar Swami यांच्या जीवन चरित्रावर life biographyगडकरी यांनी यावेळी भर दिला. महान व्यक्तींच्या विचारातून आपण प्रभावित होऊन आपल्या जीवनात काम करतो. आपले दोष कमी करणे ही निरंतर प्रक्रिया आहे. जीवनमूल्य काय आहे ते आकाशातून पडले नाही. धार्मिक ग्रंथ, प्रवचनातून आलेले आहेत. माणसात आणि दगडात फरक आहे. दगडात बदल होत नाही. दगडावर कितीही तबला पेटी वाजवली तरी काही उपयोग होत नाही. दगडाला कधीच आनंद होत नाही. व्रतस्थ जीवन जगणे सोपे नाही.

आमदार, खासदाराचा पोरगा खासदार, मंत्र्याच्या पोटातून मंत्री, काही कार्यकर्ते म्हणतात आम्ही काय करावे, मी म्हणतो घंटा निवडणूक चिन्ह घ्या आणि वाजवा, सर्व पक्षात हेच सुरू आहे. कोणाचा मुलगा असावे हे चुकीचे नाही. मात्र जनतेने निवड केली पाहिजे. सामाजिक व्यवस्थेत बदल करावेत. शिक्षणाचा प्रसार केला पाहिजे. भूतकाळातील इतिहास, वर्तमानातील अनुभव आणि भविष्याचा वेध घेत तंत्रज्ञानातून एकत्रितपणे पुढे जाण्याची गरज व्यक्त केली.
सरकार कुठल्याही पार्टीचे असो, मंत्र्यांच्या गळ्यात हार घालत जा आणि काम करून घेत जा, मात्र आपल्या पंथ,संप्रदायात त्यांना दिसू देऊ नका, धर्मकारण, राजकारण, समाजकारण दूर ठेवले पाहिजे.आम्ही जिथे घुसलो तिथे आग लावल्याशिवाय राहत नाही. गादीसाठी झगडे, मग कमिशन नेमतो आणि नंतर स्टे देतो. शेवटी राजा नाही धर्म श्रेष्ठ या वास्तवाकडे लक्ष वेधले. डिजिटल स्वरूपात लीळाचरित्र परदेशी पोहोचले पाहिजे असे आवाहन केले. आधुनिकीकरण आणि पाश्चातीकरण या दोन गोष्टीत फरक आहे. तंत्रज्ञानाचा गैरवापर होऊ नये असेही सांगितले.

वोट चोरीच्या अणुबॉम्ब नंतर आता हायड्रोजन बॉम्ब दाखवणार — राहुल गांधी

पाटणा — काँग्रेस खासदार राहुल गांधी Rahul Gandhi यांनी सोमवारी बिहारमधील त्यांच्या मतदार अधिकार यात्रेच्या मोठ्या सभेचा समारोप करताना भारतीय जनता पार्टी BJP आणि निवडणूक आयोगावर election commissionजोरदार हल्ला चढवला.विरोधकांनी आतापर्यंत अणुबॉम्ब पुरावे सादर केले होते. आता त्याहूनही मोठा हायड्रोजन बॉम्ब उघड करणार असल्याचा इशारा त्यांनी दिला. भाजप आणि निवडणूक आयोग मिळून बिहार निवडणुकीत Bihar election मोठ्या प्रमाणात मतदार यादीतून नावे वगळत आहेत या विरोधकांच्या आरोपाचा राहुल यांच्या या विधानाला सदर्भ होता.

विरोधकांचा दावा आहे की निवडणूक आयोगाच्या विशेष पुनरावृत्ती प्रक्रियेद्वारे ६५ लाखांहून अधिक मतदारांना वगळण्याची तयारी सुरू आहे. या प्रकरणाची सर्वोच्च न्यायालयातही supreme court सुनावणी सुरू आहे. पाटणा येथील मतदार हक्क रॅली दरम्यान राहुल गांधी म्हणाले, आम्ही भाजपला संविधानाची हत्या करू देणार नाही. म्हणूनच आम्ही ही यात्रा काढली आहे आणि जनतेने आम्हाला प्रचंड पाठिंबा दिला आहे.

ते म्हणाले की बिहारच्या लोकांनी महाआघाडीला पाठिंबा दिला आणि मत चोर, गादी सोड हा नारा दिला असून हा नारा आता चीनपर्यंत घुमत आहे. पंतप्रधान मोदी सध्या एससीओ शिखर परिषदेत सहभागी होण्यासाठी चीनला गेले असल्याच्या पार्श्वभूमीवर राहुल यांनी हा दावा केला. दरम्यान, भाजपने राहुल यांच्या आरोपांवर पलटवार केला आहे आणि त्यांचे विधान बेजबाबदारपणाचे असल्याचे म्हटले आहे.

माजी कायदा मंत्री रविशंकर प्रसाद म्हणाले, राहुल गांधींचे शब्द समजून घेण्यासाठी वेळ लागतो. निवडणुकीत अणुबॉम्ब आणि हायड्रोजन बॉम्बचा अर्थ काय? राहुल यांच्या पाटणा येथील रॅलीत गर्दी दाखवण्यासाठी २० हजार लोकांना उत्तर प्रदेशातील देवरिया येथून आणण्यात आल्याचा आरोपही भाजप नेत्यांनी केला.

Maratha reservation हैदराबाद गॅझेटला तत्वत: मंजुरी; काही प्रमाणात जरांगे समाधानी?

मुंबई — मराठा समाजाच्या आरक्षणाच्या मागणीसाठी आझाद मैदानावर Azad maidan सुरू असलेल्या बेमुदत उपोषणाने राज्य सरकारला हादरवले असताना, मराठा आरक्षण Maratha reservation उपसमितीची आज झालेली बैठक मोठ्या निर्णयाची ठरली.
उपसमितीच्या बैठकीनंतर निवृत्त न्यायमूर्ती संदीप शिंदे यांच्या अध्यक्षतेखालील समितीचे सदस्य आणि सनदी अधिकाऱ्यांचे शिष्टमंडळ मुंबईतील आझाद मैदानावर मनोज जरांगे यांची भेट घेऊन चर्चा केली.

या चर्चेनंतर मराठा समाजाला मोठा दिलासा मिळाला असून, राज्य सरकारने हैदराबाद संस्थानच्या गॅझेटीअरला Hyderabad gadget तत्वत: मंजुरी दिल्याची माहिती समोर आली आहे. या निर्णयामुळे मराठा-कुणबी नोंदींबाबतचा वाद मिटण्याची शक्यता निर्माण झाली असून, आंदोलनाला नवे वळण मिळाले आहे.

मराठा आरक्षण उपसमितीची बैठक यशस्वी झाल्यानंतर शिंदे समितीने Shinde committee जरांगे पाटलांना Manoj jarange Patil भेट देण्याचा निर्णय घेतला. या भेटीत मराठा समाजाच्या मागण्यांवर सविस्तर चर्चा होणार असून, शिंदे समितीचे सदस्य जरांगे यांच्या सूचना घेऊन मंत्रिमंडळ उपसमितीसमोर मांडणार आहेत.

माजी न्यायमूर्ती संदीप शिंदे यांनी या भेटीनंतर प्रसारमाध्यमांशी बोलताना सांगितले की, “काही प्रमाणात जरांगे यांचे समाधान झाले आहे. त्यांनी दिलेल्या सूचना मंत्रिमंडळ उपसमितीपुढे आम्ही मांडणार आहोत. काही गोष्टींना सरकारने तत्वत: मान्यता दिली आहे. त्यावरील जरांगे यांचे मत सकारात्मक आहे. त्यानंतर मंत्रिमंडळ पुढील निर्णय घेईल. सध्या सरकारने हैदराबाद गॅझेटला तत्वत: मान्यता दिली आहे.” या निर्णयाने मराठा समाजात उत्साह निर्माण झाला असून, उपोषण कसे पुढे जाईल याकडे लक्ष लागले आहे.

मराठा समाजाने ओबीसी OBC कोट्यातून आरक्षण मिळावे यासाठी ‘मराठा कुणबी एकच आहे’ हे जाहीर करणारी अधिसूचना notification काढावी, अशी मनोज जरांगे पाटलांची Manoj jarange Patil मुख्य मागणी आहे. या प्रश्नावर शिंदे यांनी स्पष्ट केले की, “सध्या हैदराबाद संस्थानच्या गॅझेटबाबत निर्णय घेण्यात आला आहे. यावर मी आणखी काही सांगू शकत नाही. मंत्रिमंडळ त्यावर अंतिम निर्णय घेईल.

मनोज जरांगे पाटलांनीही हैदराबाद आणि सातारा संस्थानच्या गॅझेटीअरनुसार मराठवाड्यातील marathvada मराठ्यांना कुणबी प्रमाणपत्रे देण्याची मागणी ठेवली असून, त्यावर तात्काळ अंमलबजावणीची अपेक्षा व्यक्त केली आहे. या तत्वत: मंजुरीमुळे कुणबी प्रमाणपत्र वितरण प्रक्रिया वेग घेईल अशी शक्यता आहे.

हैदराबाद गॅझेट म्हणजे काय?

हैदराबाद संस्थानातील निजाम सरकारने 1918 मध्ये मराठा समाजाच्या शिक्षण व नोकरीतील उपेक्षेला पूरक म्हणून ‘हिंदू मराठा’ Hindu Maratha नावाने आरक्षणाचा आदेश जारी केला होता. निजामाच्या राज्यात Nizam state मराठा समाज बहुसंख्य असल्याने त्यांना विशेष जागा राखीव ठेवण्यात आल्या. मराठवाडा हा निजामशाहीचा भाग असल्याने या गॅझेटचा मराठा आरक्षण आंदोलनात नेहमी हवाला दिला जातो. मराठा नेते आणि आंदोलकांनी या ऐतिहासिक दस्तऐवजावर आधारित कुणबी नोंदी शोधण्याची मागणी केली असून, शिंदे समितीने या दिशेने काम सुरू केले आहे. या गॅझेटनुसार मराठा-कुणबी एकच असल्याचे स्पष्ट होत असल्याने आरक्षण प्रक्रियेला बळ मिळेल.

वाल्मिक कराडची सुटका नाहीच;हत्याप्रकरणी जामीन अर्ज फेटाळला

बीड — सरपंच संतोष देशमुख Santosh Deshmukh यांच्या हत्या प्रकरणातील मुख्य आरोपी वाल्मिक कराडला Valmik Karad मोठा धक्का बसला आहे. विशेष मकोका न्यायालयाने courtवाल्मिक कराडचा जामीन अर्ज फेटाळला आहे.
वाल्मिकच्या अडचणीत आणखी वाढ झाली असून तुरुंगातून त्याची सुट्टीच नाही, हे स्पष्ट झालं आहे. दरम्यान, सरपंच संतोष देशमुख यांची निर्घृणपणे हत्या करण्यात आल्यानंतर राज्यभरातून संतापाची लाट पाहायला मिळाली. विधिमंडळातही हे प्रकरण चांगलंच गाजलं होतं. त्यानंतर, धनंजय मुंडेंना Dhananjay Munde आपल्या मंत्रिपदाचा राजीनामा देखील द्यावा लागला. केज तालुक्यातील मस्साजोग येथील सरपंच संतोष देशमुख Santosh Deshmukh murder case यांचं अपहरण करून त्यांची हत्या करण्यात आली होती. त्यानंतर वाल्मिक कराडसह सर्व आरोपींवर मकोका अंतर्गत कारवाई करण्यात आली होती. या हत्या प्रकरणी क्रमांक एकचा आरोपी वाल्मिक कराड आणि इतर आरोपी कारागृहात असून, वाल्मिक कराडने या हत्या प्रकरणातून मला दोष मुक्त करावं, अशी न्यायालयाकडे मागणी केली होती. यावर गेल्या दोन महिन्यापासून बीड न्यायालयात सुनावणी सुरू होती.मात्र, आज अखेर न्यायालयानं त्याचा जामीन अर्ज फेटाळून लावल्यानं चर्चेला उधाण आलं आहे. तसेच विष्णू चाटेच्या अर्जाबाबत आद्याप काहीच निर्णय समोर आलेला नाहीय. मात्र, वाल्मिक कराड याचा जामीन अर्ज अखेर न्यायालयानं आज फेटाळून लावला आहे. यामुळे वाल्मिक कराड याचे वकील यांनी उच्च न्यायालयात जामीनासाठी अर्ज दाखल करणार असल्याचं सांगण्यात येत आहे.
दिवंगत सरपंच संतोष देशमुख यांचे भाऊ धनजंय देशमुख माध्यमांशी बोलताना म्हणाले की, ‘आरोपी कृष्णा आंधळे अद्यापही फरार आहे. त्याच्या शोधात पोलीस यंत्रणा लागली आहे. मात्र तो कुठे लपून बसला आहे, हे अद्याप समजलं नसल्यानं’ धनंजय देशमुख यांनी तपास यंत्रणेवर नाराजी व्यक्त केली आहे. ‘आरोपी कृष्णा आंधळे तपास यंत्रणेच्या लक्षात राहिला नसल्याचा’ आरोप धनंजय देशमुख यांनी केला आहे. ते पुढे बोलताना म्हणाले की, ‘या प्रकरणाबाबत मी वेळोवेळी तपास यंत्रणेला संपर्क करून या आरोपीच्या संदर्भात पाठपुरावा करतोय. परंतु त्याचा कुठेच थांगपत्ता लागत नसल्याचं उत्तर या यंत्रणेकडून येत आहे, असं धनंजय देशमुख यांनी म्हटलं आहे.

बीडमध्ये भीषण अपघात ! भरधाव कंटेनरच्या धडकेत 6 तरुणांचा मृत्यू

बीड — धुळे-सोलापूर राष्ट्रीय  महामार्गावरील Dhule Solapur National Highway बीड तालुक्यातील नामलगाव namalgaon फाटा येथे आज सकाळी साडेसातच्या सुमारास झालेल्या भीषण अपघातात 6 जणांचा मृत्यू झाला. भरधाव कंटेनरने पायी चालणाऱ्या सहा व्यक्तींना चिरडल्याने हा अपघात road accident घडला.

यात चार जणांचा जागीच मृत्यू झाला, तर दोघांचा बीड जिल्हा रुग्णालयात  उपचारादरम्यान मृत्यू झाला. या घटनेने संपूर्ण जिल्ह्यात शोककळा पसरली आहे.

अपघातात मृत्यूमुखी पडलेले सर्वजण बीड तालुक्यातील रहिवासी होते. मृतांमध्ये दिनेश दिलीप पवार (माऊली नगर, बीड), पवन शिवाजी जगताप (अंबिका चौक, बीड), अनिकेत रोहिदास शिंदे (शिदोड, ता. बीड), किशोर गुलाब तोर (बाभूळतारा, ता. गेवराई), आकाश अर्जुन कोळसे (रिलायन्स पंप परिसर, बीड) आणि विशाल श्रीकिसन काकडे (वय २२, शेकटा, ता. शेगाव) यांचा समावेश आहे. हे सर्वजण पेंडगाव येथे मारुतीरायाच्या दर्शनासाठी पायी जात होते.

बीड ते पेंडगाव असा पायी प्रवास करताना नामलगाव फाटा येथील उड्डाणपूल ओलांडून एसआर जीनिंगजवळ S.r. giningचालत असताना मागून भरधाव आलेल्या कंटेनरने त्यांना धडक दिली. या अपघातात सहाही जण गंभीर जखमी झाले, त्यापैकी चौघांचा जागीच मृत्यू झाला, तर दोघांनी उपचारादरम्यान प्राण सोडले. बीड ग्रामीण पोलिसांनी police कंटेनरच्या दोन चालकांना ताब्यात घेतले असून, मृतदेह जिल्हा रुग्णालयात ठेवण्यात आले आहेत.

या महामार्गावर सर्व्हिस रोडच्या service road अभावामुळे असे अपघात वारंवार घडत असल्याचे स्थानिकांनी नमूद केले आहे. या दुर्घटनेने बीड जिल्ह्यात हळहळ व्यक्त होत असून, रस्ता सुरक्षेसाठी तातडीने उपाययोजना करण्याची मागणी जोर धरू लागली आहे.

अतिवृष्टीमुळे झालेल्या नुकसानीचे तात्काळ पंचनामे करा – आ.संदीप क्षीरसागर

मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्र्यांसह जिल्हाधिकाऱ्यांना दिले पत्र

बीड  — बीड विधानसभा क्षेत्रात  Beed Assembly Constituency मागील दोन दिवसात झालेल्या अतिवृष्टीमुळे heavy rain  मोठ्याप्रमाणात नुकसान झाले आहे. या नुकसानीचे प्रशासनाने तात्काळ पंचनामे पूर्ण करुन सरसकट नुकसान भरपाई crop  compensation for damages  देण्याची मागणी आ. संदीप क्षीरसागर यांनी केली आहे.

बीड विधानसभा क्षेत्रातील बीड व शिरूर (का) तालुक्यातील सर्वच महसूल मंडळामध्ये झालेल्या अतिवृष्टीच्या पावसाने क्षेत्रातील पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. या क्षेत्रातील उभा असलेला कापूस, सोयाबीन, बाजरी आदीं पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. तसेच पशुहानीसह शेतकरी व ग्रामस्थांच्या घरांचे नुकसान झाले आहे. त्यामुळे नुकसान झालेल्या घरांचे, पिकांचे व पशुहानीचे तातडीने पंचमाने करण्यासाठी बाबतचे आदेश विभागाला द्यावेत, जेणेकरून शेतकरी बांधवाला सरसकट आर्थिक मदत मिळेल. अशी मागणी आ.संदीप क्षीरसागर  Sandeep Kshirsagar मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री यांच्यासह बीडच्या जिल्हाधिकाऱ्यांना दिलेल्या पत्रातून केली आहे.

विवेक” हरवलेल्या प्रशासनाने आत्मदहनाला भाग पाडलं; प्रयत्न करताच तुटेपर्यंत पळालं

बीड — जनतेच्या दुःखावर “जॉन्सन” मलम लागेल वेदना कमी होतील अशी अपेक्षा होती मात्र “विवेक “शून्य प्रशासनाने न्याय मागणाऱ्या कुटुंबाकडे दुर्लक्ष करून अंत पाहिला. इशारा देऊनही शेवटचा मार्ग म्हणून आत्मदहनाचा मार्ग अवलंबला त्यावेळी मात्र व्यवस्था तुटेपर्यंत पळाल्याचं विदारक करूण चित्र बीडमध्ये जिल्हाधिकारी कार्यालयात पाहायला मिळाल.
केज तालुक्यातील कासारी येथील रामहरी महादेव वायबसे व त्यांचे कुटूंब 15 ऑगस्टपासून आपल्या विविध मागण्यांसाठी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर उपोषणाला बसलेले आहेत. रामहरी वायबसे यांचे सख्खे भाऊ डॉ. संभाजी वायभसे यांच्याकडून व गुंडांमार्फत अनेकदा मारहाण झाल्याचा आरोप रामहरी वायबसे यांनी केलेला आहे. त्यांच्याविरूध्द कारवाई करावी यासाठी ते सपत्नीक उपोषणाला
बसलेले आहेत. मात्र प्रशासन उपोषणाची कसलीच दखल घेत नसल्याने रामहरी वायबसे यांनी आज सकाळी जिल्हाधिकारी कार्यालयातच अंगावर डिझेल ओतून घेत आत्मदहनाचा प्रयत्न केल्याची धक्कादायक घटना घडली. जिल्हाधिकारी कार्यालयाच्या समोर कुटूंबासह उपोषणाला बसूनही प्रशासन कसलीच दखल घेत नसल्याने संतप्त झालेल्या रामहरी वायबसे हे आज सकाळी हातात डिझेलचे कॅन्ड घेऊन उपोषण स्थळापासून थेट जिल्हाधिकारी यांच्या कार्यालयापर्यंत धावत सुटले. मला न्याय द्या, जगुन काही उपयोग नाही असे म्हणत ते थेट जिल्हाधिकारी कार्यालयात घुसले आणि मुख्य प्रवेश द्वारावरच त्यांनी कॅन्ड मधील डिझेल अंगावर ओतून घेत आत्मदहनाचा प्रयत्न केला.त्याचवेळी त्याठिकाणी उपस्थित पोलीसांनी त्यांना रोखल्याने पुढील अनर्थ टळला. पतीने डिझेल ओतून घेतल्याचे पाहुन पत्नीने एकच हंबरडा फोडला. यावेळी महिला पोलीसांनी त्यांनाही धीर दिला. दरम्यान या घटनेने जिल्हाधिकारी कार्यालयात खळबळ उडाली आहे. विशेष म्हणजे उपोषण स्थळापासून ते जिल्हाधिकारी कार्यालयाच्या मेन गेटपर्यंत वायबसे डिझेलचे कॅन्ड हातात घेऊन धावत सुटले होते. मात्र एवढे होईपर्यंत तेथील पोलीस कर्मचारी आणि महसुलचे कर्मचारी झोपा काढत होते का ? असा प्रश्न उपस्थित होऊ लागला आहे. 24 तासात केंव्हाही आत्मदहन करणार असा इशारा त्यांनी दिला होता. मग त्यांना रोखले का नाही ? त्यांचे काही बरेवाईट झाले असते तर त्याला जबाबदार कोण होते ? असे प्रश्न उपस्थित होऊ लागले आहेत.

धनगरांना फसवलं, शेतकरी आत्महत्या करतायत; फडणवीसांचं फसवणुकी शिवाय कर्तुत्व काय?

मुंबई — मराठा आरक्षणासाठी Maratha reservation मनोज जरांगे पाटील यांच्या नेतृत्त्वात मराठा मोर्च मुंबईच्या आझाद मैदानात Azad maidan पोहोचला. मोर्चा मुंबईत पोहचण्याआधीच भाजपाकडून “इतिहास शिव्यांना नाही तर कर्तुत्वाला लक्षात ठेवतो” अशी बॅनरबाजी करण्यात आली होती. यावर आता मनोज जरांगे यांनी देवेंद्र फडणवीस यांचं कर्तृत्व काय? असा प्रश्न उपस्थित करत प्रत्युत्तर दिले आहे.
देवेंद्र फडणवीस Devendra fadnavis  आम्हाला महाराष्ट्राचे संस्कार शिकवतात, पण त्यांचे कर्तृत्व काय हे त्यांनी सांगावं? असा प्रश्न उपस्थित करत मनोज जरांगे पाटील यांनी भाजपाच्या बॅनरबाजीवर टीका केली. त्यांनी असेही म्हटले की, फडणवीसांनी धनगरांना फसवलं आणि त्यांना अजून आरक्षण दिलेलं नाही. कैकाडी समाज हा पश्चिम महाराष्ट्रात अनुसूचित जातीत आहे, तर मराठवाड्यात ओबीसी आहे. तर इतर ठिकाणी वेगळ्याच प्रवर्गात आहे. कैकाडी समाज एकाच राज्यात तीन प्रवर्गात आहे, हे फडणवीसांचे कर्तृत्व? मराठ्याची एक मुलगी ओबीसी आणि दुसरी जनरल प्रवर्गात, हे फडणवीसांचं कर्तृत्व? शेतकरी आत्महत्या करतायत हे फडणवीसांचं कर्तृत्व? असे प्रश्न उपस्थित त्यांनी जोरदार टीका केली.

मनोज जरांगे Manoj jarange Patil म्हणाले की, देवेंद्र फडणवीसांनी अंतरवालीत antarvali आंदोलनाला बसलेल्या आया-बहिणींना जर मारलं नसतं तर आम्ही त्यांच्यावर बोललो नसतो. त्या आया-बहिणींवर गुन्हेही त्यांनी दाखल केले, अशी माहिती देतानाच मनोज जरांगे पाटील यांनी चित्रा वाघ यांच्यावर निशाणा साधला. राज्यपालांच्या कोट्यातून आमदारकी मिळवण्यासाठी काही लोक मराठ्यांवर बोलतात. त्यामागे त्यांचे काहीही कर्तृत्व नाही असं म्हणत मनोज जरांगे यांनी भाजपच्या आमदार चित्रा वाघ Chitra vagh यांनाही टोला लगावला.
दरम्यान, मनोज जरांगे पाटील यांचा मोर्चा पूर्व द्रुतगती महामार्गावरून मुंबईत येण्याची शक्यता होती. त्यामुळे याच महामार्गावरील पुलांवर भाजपाने बॅनर लावले होते. या बॅनरवर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा मोठा फोटो लावण्यात आला होता. तसेच या बॅनरवर लिहिण्यात आले होते की, “इतिहास शिव्यांना लक्षात ठेवत नाही, इतिहास हा कर्तृत्वाला लक्षात ठेवतो… मराठा समाजाला पहिल्यांदा आरक्षण देणारे आणि उच्च न्यायालयात High court ते आरक्षण टिकवणारे नेतृत्व म्हणजे देवेंद्र फडणवीस.” असे या बॅनरवर लिहिण्यात आले होते. तसेच, या बॅनरच्या खाली प्रवीण दरेकर, प्रसाद लाड, निरंजन डावखरे आणि नरेंद्र पाटील या भाजपाच्या नेत्यांची नावे लिहिण्यात आली होती