Home Blog Page 122

सरकार इंग्रजांपेक्षा बेक्कार..! प्यायला पाणी नाही, शौचालयाला कुलपं, हॉटेल्स बंद असले डाव खेळू नका– जरांगे पाटील

मुंबई —  आरक्षणाच्या मागणीसाठी  आझाद मैदानात उतरलेल्या मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटील Manoj jarange Patil यांच्या आंदोलनास पोलिसांनी दिलेली परवानगी संपली असून आता उद्यासाठी त्यांना परवानगी देण्यात आली आहे.मात्र, मराठा आंदोलकांकडून आज दिवसभर झालेला घटनाक्रम पाहता आणखी काही कडक नियम व अटी पोलिसांकडून लावण्यात आले आहेत. त्यातच, जरांगे यांच्या आंदोलनाच्या परवानगीबाबत मुंबई पोलीस Mumbai policeदलातील वरिष्ठ पातळीवरील अधिकाऱ्यांनी चर्चा करुन 1 दिवसाच्या मुदतवाढीचा निर्णय घेतला.

मनोज जरांगे पाटील 7 वाजता पत्रकार परिषद press conference घेतली असून, आझाद मैदानात Azad maidan सुरू असलेल्या आंदोलनाची दिशा स्पष्ट करणार आहेत. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केलेल्या आव्हानाला ही मनोज जरांगे पाटील उत्तर दिलं आहे.

यावेळी बोलताना मनोज जरांगे म्हणाले की, सरकारने आता असले डाव खेळू नये आरक्षण द्यावे. आम्ही गोरगरीब मराठ्यांना आरक्षण Maratha reservation मिळाले तर आम्ही तुम्हाला विसरणार नाही. तुम्ही एक एक दिवस मुदत वाढ दिली तरी उपोषण मागण्या पूर्ण होईपर्यंत सुरू राहील.

सिद्ध झालं परवानगी सरकार देऊ शकते. मला गोळी मारण्याचे, लोक अडवायचे सगळे सरकारच्या हातात आहे. आमच्या टॉयलेट्सला लॉक लावले आहे बाहेरचे चहाचे हॉटेल्स ही बंद आहेत. प्यायला पाणी नाही, जेवायला नाही, तुम्ही तर इंग्रजा पेक्षा बेकार झालेत. असं ते म्हणाले.

मला सरकारने काय केलं हे माहिती नाही. त्यांनी काल मला आंदोनलाची परवानगी दिली होती. आज पुन्हा एकदा परवानगी दिली आहे. माझं एक मत आहे की असले भंगार खेळ खेळण्यापेक्षा खरा डाव खेळावा. त्यांनी मराठा समाजाला आरक्षण देऊन टाकावे. त्यांनी मराठा समाजाचे मन जिंकणे गरजेचे आहे.

मराठा समाजाचे मन जिंकण्याची हीच योग्य वेळ आहे. गोरगरिबांच्या लेकरांना आरक्षण दिले तर मरेपर्यंत मराठा समाज या सरकारला विसरणार नाही. एक-एक दिवस मदुतवाढ देण्यापेक्षा थेट आरक्षण देऊन टाकावे, असे मत जरांगे यांनी व्यक्त केले.

नाटक का खेळले जात आहे. आंदोलनास परवानगी देणे सरकारच्या हातात आहे. मला गोळ्या घालून मारणेही सरकारच्याच हातात आहे. पोरांना अडवायचं का सोडायचं हेही सरकारच्याच हातात आहे. मराठा समाजाच्या मुलांना त्रास न दिल्यास तेही काहीच करणार नाहीत.

मराठा समाजाच्या मुलांना लघवी करण्याचीही सोय नाही. वडापाव किंवा इतर खाद्यपदार्थांची दुकाने बंद करण्यात आली आहेत. पाणी प्यायचीही सोय नाही. मराठ्यांनी कंटाळून मुंबई सोडून जावे असा यामागे डाव आहे. तुम्ही इंग्रजांपेक्षाही क्रूर झाले आहेत, अशी टीका मनोज जरांगे यांनी केली आहे.

बीड:सार्वजनिक गणेश मंडळांच्या उत्कृष्ट देखाव्याला मिळणार लाखांचे बक्षीस

देखावा साकारणाऱ्या गणेश मंडळांनी नाव नोंदणी करावी-डॉ.योगेश, डॉ.सारिका क्षीरसागर

बीड — बीडमध्ये सामाजिक कार्यात अग्रेसर असलेल्या ‘कल्पतरू प्रतिष्ठान’च्या पुढाकारातून उत्कृष्ट सार्वजनिक गणेशोत्सव Ganesh festival मंडळ स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे. या स्पर्धेत सहभागी होऊ इच्छिणाऱ्या सार्वजनिक गणेश मंडळांनी नाव नोंदणी करण्याचे आवाहन राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे बीड विधानसभा अध्यक्ष डॉ.योगेश क्षीरसागर, ‘कल्पतरू’च्या सचिव डॉ.सारिका क्षीरसागर यांनी केले आहे.

गणेश चतुर्थीनिमित्त सार्वजनिक गणेश मंडळ लाडक्या बाप्पाच्या स्वागतासाठी उत्सुक होते. यंदा गणरायाचे आगमन सर्वत्र अतिशय उत्साहात झाले आहे. यावर्षीही ‘कल्पतरू’च्या kalpataru पुढाकारातून आकर्षक देखावे साकारणाऱ्या सार्वजनिक गणेश मंडळांना प्रोत्साहन देण्यासाठी स्पर्धेचे आयोजन केले आहे. देखाव्यांमध्ये सांस्कृतिक परंपरा ,Cultural traditions ऐतिहासिक, historical धार्मिक religious, आध्यात्मिक ,Spiritual शैक्षणिक, academic वैज्ञानिक आणि स्थानिक ग्रामीण व शहरी जीवनाशी संबंधित सामाजिक संदेश देणारे देखावे साकारणे अपेक्षित आहे. अशा देखाव्यांपैकी उत्कृष्ट मंडळास सन्मानित करण्यात येईल.

अशी असतील बक्षिसे; उत्तेजनार्थ मंडळांनाही रोख बक्षिस दिले जाणार

पहिल्या क्रमांकाच्या उत्कृष्ट गणेशोत्सव मंडळास १ लाख,

द्वितीय क्रमांकास ७५ हजार,

तृतीय क्रमांकास ५१ हजार व सन्मानचिन्ह, तसेच उत्तेजनार्थ मंडळांनाही रोख रक्कम बक्षिस स्वरूपात दिली जाणार आहे. दरम्यान, हा बक्षीस वितरण सोहळा गणेशोत्सव कालावधीत आयोजित केला जाईल, अशी माहिती संयोजकांनी दिली आहे.

अशी आहे निवड समिती

उत्कृष्ट सार्वजनिक गणेश मंडळांच्या देखाव्यांची निवड करण्यासाठी निरीक्षण समिती गठीत करण्यात आली आहे. या समितीमध्ये प्रा.लक्ष्मीकांत बाहेगव्हाणकर, प्रा.संजय पाटील देवळाणकर, प्रा.सारंग वाघमारे, फामजी पारीख, विद्याभूषण बेदरकर यांचा समावेश आहे. या स्पर्धेत सहभागी होऊ इच्छिणाऱ्या मंडळांनी नोंदणीसाठी श्रीमंत तोंडे ८३२९२५९२९५ व नागेश शेटे ७०५७०२६८७७ यांच्याशी संपर्क साधावा असे आवाहन करण्यात आले आहे.

मराठा आंदोलनकर्त्यांचा आझाद मैदानात ठिय्या, आझाद मैदानात पोलीस छावणी, हजारो पोलिसांचा बंदोबस्त

मुंबईमराठा आरक्षण आंदोलनाचे नेते मनोज जरांगे पाटील यांच्या नेतृत्वाखाली आंंदोलक शुक्रवारी आझाद मैदानावर धडकणार आहेत. या आंदोलनासाठी पोलिसांनी जय्यत तयारी केली असून आझाद मैदान परिसरात दिड हजार पोलिसांचा बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे.
त्यामुळे आझाद मैदानाला पोलीस छावणीचे स्वरूप आले आहे. त्यातच गृहमंत्री अमित शहा देखील शुक्रवारी मुंबईत येणार असल्याने मुंबई पोलिसांची कसोटी पाहणारा ठरणार आहे.
मराठा आरक्षण आंदोलनाचे नेते जरांगे पाटील यांनी ऐन गणेशोत्सवात मुंबईत आंदोलनाची घोषणा केली आहे. त्यांच्या समर्थकांसह ते मुंबईच्या दिशेने रवाना झाले आहेत. मराठा आरक्षणासाठी मुंबईतील आझाद मैदानात आमरण उपोषण करणार आहेत. गुरुवारी रात्री मराठा मुंबईत दाखल होणार आहेत. नवी मुंबईतून गुरूवारी रात्री अटल सेतूवर हा जत्था दाखल होईल तेथून मुक्तमार्गाने (फ्री वे) आझाद मैदानात रवाना होणार आहे. ‘न भूतो न भविष्यती’ असे हे आंदोलन होणार असल्याचा दावा करण्यात आल्याने पोलिसांनी कायदा व सुव्यवस्था बिघडू नये यासाठी कंबर कसली आहे.

पोलिसांचा प्रचंड बंदोबस्त

गणेशोत्सव काळात मुंबई पोलिसांनी २० हजार पोलिसांचा बंदोबस्त ठेवण्यात आला आहे. आता मनोज जरांगे पाटील मुंबईच्या आझाद मैदानात येणार असल्याने तेथे पोलीस छावणीचे स्वरूप आले आहे. आंदोलन स्थळ आझाद मैदान येथे दीड हजार पोलिसांचा बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे. त्यात 2 अतिरिक्त पोलीस आयुक्त, 6 पोलीस उपायुक्त दर्जाचे अधिकारी, 200 सहाय्यक पोलीस आयुक्त आणि पोलीस निरीक्षक दर्जाचे अधिकारी आणि 1300 पोलीस कर्मचारी आदींचा समावेश आहे. याशिवाय राज्य राखीव दल, शीघ्र कृती दल, दंगल नियंत्रण पथक, केंद्रीय राखीव दल, बॉम्ब स्क्वॉड पथक तैनात करण्यात आले आहे. लाखोंच्या संख्येने आंदोलन एकत्र येणार असल्याने कुठलेही गालबोट लागू नये यासाठी आम्ही सर्वतोपरी खबरदारी घेत असल्याचे एका वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्याने सांगितले.
शुक्रवारचा दिवस पोलिसांची कसोटी पाहणारा ठरणार आहे. गणेशोत्सवातच मनोज जरांगे पाटील यांचे आंदोलन असल्याने पोलिसांवरील ताण वाढला आहे. त्यातच केंद्रीय गृहमंत्री अमित शहा शुक्रवारीच मुंबईतील गणेशोत्सव दर्शनासाठी येणार आहेत.

शहा हे मुंबईतील काही गणेशोत्सव मंडळ आणि मुंबईतील भाजप नेत्याच्या घरी गणेशाचे दर्शन घेण्यासाठी जाणार आहे. शहा यांच्या सुरक्षेसाठी मुंबईत कडेकोट पोलिस बंदोबस्त ठेवण्यात आलेला आहे. त्यामुळे पोलिसांची सत्वपरिक्षा ठरणार आहे. मनोज जरांगे पाटील हे देखील आंदोलनापूर्वी लालबाग राजाच्या दर्शनाला जाणार आहे.
पालघर, वसई, मधून हजारोंच्या संख्येने आंदोलक

शुक्रवारी होणाऱ्या आंदोलनासाठी मुंबईलगतच्या मिरा भाईंदर, वसई विरार आणि पालघर मधूनही हजारोंच्या संख्येने आंदोलक जाणार आहेत. त्याची जय्यत तयारी सुरू आहे. कार्यकर्त्यांमध्ये उत्साह दिसून येत आहे. गैरसोय होऊ नये यासाठी आम्ही आमच्या लोकांना ट्रेनने जाण्याच्या सूचना केल्या आहेत, असे आंदोलक शंकर बने यांनी सांगितले. कितीही अडचणी आल्या तरी आम्ही मागे हटणार नाही असेही बने यांनी सांगितले. दरम्यान, गुरूवार दुपारपासून मुंबईत आंदोलनकर्ते दिसू लागले. आझाद मैदान, नरिमन पॉईंट, फोर्ट परिसरात आंदोलनकर्त्याचे जत्थे फिरताना दिसत होते.

अपघाताने एलसीबी ला 21 लाखाचा गांजा पकडण्यात यश

बीड — गस्तीवर असलेल्या एलसीबीचे वाहन पाहून कार चालकाने भरधाव वेगाने गाडी पळविल्याने नवगन राजुरी-खालापुरी रस्त्यावर अपघात घडला अन् कारची तपासणी केली असता त्यामध्ये पाच पोते 105 किलो 750 ग्रॅम किंमत 21 लाख 15 हजार रुपयांचा गांजा मिळून आला. याप्रकरणी दोन आरोपींवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. हा गांजा नगर जिल्ह्यातून विक्रीसाठी बीड जिल्ह्यात आणण्यात आला आहे.
स्थानिक गुन्हे शाखेचे पथक नवगन राजुरी परिसरात तपास करीत होते.यावेळी मारुती सुझुकी कंपनीची सियाझ कार चालकाने पोलिसांचे वाहन पाहून भरधाव वेगाने पळविली, काही अंतरावर गेल्यानंतर राजुरी रस्त्यावर हनुमान वस्तीजवळ सदरील कारचा अपघात घडला, याची माहिती मिळताच एलसीबीचे पोलीस उपनिरीक्षक श्रीराम खटावकर यांनी पथकासह जाऊन पाहणी केली असता त्यामध्ये 5 काळ्या रंगाचे पोते आढळून आले.त्यामधून गांजा सारखा वास येऊ लागल्याने याची माहिती वरीष्ठांना दिली. माहिती मिळताच अप्पर पोलीस अधीक्षक सचिन पांडकर, एलसीबीचे पोलीस निरीक्षक शिवाजी बंटेवाड, ग्रामीण पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक मारुती खेडकर यांनी घटनास्थळी धाव घेतली पाहणी केली असता त्या पाच पोत्यांमध्ये 105 किलो 750 ग्राम गांजा मिळून आला. ज्याची किंमत 21 लाख 15 हजार रुपये आहे. तो जप्त करण्यात आला असून, याप्रकरणी आरोपी बाबासाहेब विश्वनाथ दहातोंडे रा. चांदा ता. नेवासा व दत्तु मुरलीधर सकट रा. टाकळी खंडेश्वरी ता. कर्जत जि. नगर यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला. हा गांजा नगर जिल्ह्यातून चांदा येथून बीड जिल्ह्यात विक्रीसाठी आणल्याचे सांगितले आहे. यामुळे नगर मधून बीडमध्ये गांजाची तस्करी होत असल्याचं उघड झाला आहे.

मराठा आरक्षण आंदोलनासाठी जाणाऱ्या वरपगावच्या आंदोलकाचा हृदयविकाराने मृत्यू

केज — मराठा आरक्षण Maratha reservation मागणीसाठी मुंबईला Mumbai निघालेल्या वरपगाव येथील सतीश ज्ञानोबा देशमुख यांचा हृदयविकाराच्या धक्क्याने heart attack मृत्यू झाल्याची दुर्दैवी घटना जुन्नर जवळ घडली.
मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी मनोज जरांगे पाटील Manoj jarange Patil यांच्या मुंबईमधील आंदोलनात सहभागी होण्यासाठी वरपगाव येथील 20 कार्यकर्ते मुंबईकडे गेले आहेत.
जुन्नर junnar परिसरात त्यांनी बुधवारी रात्री मुक्काम करुन गुरुवारी सकाळी 9 वाजण्याच्या सुमारास चहा, नाष्टा करुन ते मुंबईकडे जात असताना वाहनातच सतीश ज्ञानोबा देशमुख वय 45 वर्ष यांचा हृदयविकाराच्या धक्क्याने मृत्यू झाला.नारायणगाव पोलीस ठाण्याच्या हद्दीत ही घटना घडल्याची माहिती पोलिसांना मिळताच पोलिसांनी घटनास्थळी जाऊन पंचनामा केला. मृतदेह उत्तरीय तपासणीसाठी नारायणगाव येथील ग्रामीण रुग्णालयात पाठविण्यात आला. तेथे उत्तरीय तपासणी केल्यानंतर दुपारी दोन वाजण्याच्या नंतर मृतदेह नातेवाईकांच्या स्वाधीन करण्यात आला. या प्रकरणी नारायणगाव पोलीस ठाण्यात आकस्मित मृत्यूची नोंद करण्यात आली.सतीश देशमुख यांच्या पश्चात आई, भाऊ, पत्नी व मुलगा असा परिवार आहे.
दुसऱ्या एका घटनेत केज तालुक्यातील भाटुंबा येथील प्रा. गणेश धपाटे हे देखील आपल्या मित्रांसह आंदोलनात सहभागी होण्यासाठी गेले होते. मंचर जवळ चहा पिण्यासाठी उतरले असता रस्ता ओलांडताना दुचाकीस्वाराने त्यांना धडक accident दिली. यामध्ये ते गंभीर रित्या जखमी झाले आहेत.

पुलावरून पाणी वाहू लागले; चार चाकीसह आडत व्यापारी आणि ऑटो रिक्षा चालक वाहून गेले

धारूर — धारूर तालुक्यात बुधवारी झालेल्या मुसळधार पावसाने heavy rain पूरसदृश्य परिस्थिती निर्माण झाली. वाण नदीला पूर आल्याने रुई धारूर,अंजनडोह या दोन गावा मधील पुलावरून पाण्याचा अंदाज न आल्याने अंजनडोह येथील आडत व्यापारी नितीन शिवाजीराव कांबळे यांचा वाहून गेल्याने मृत्यू झाला तर याच नदीवर आवरगाव जवळ ऑटो रिक्षा सह एक जण वाहून गेला. ऑटो चालकाचा शोध सध्या सुरू आहे.


धारूर dharur  तालुक्यात बुधवारपासून पावसाने जोरदार heavy rain हजेरी  लावली असून झालेल्या पावसामुळे नद्या नाल्यांना पूर आले आहेत तर तालुक्यातील सर्वच तळी ओसंडून वाहत आहे.झालेल्या पावसाने वाण नदीला पूर आल्याने तालुक्यातील पूर्वे कडील गावांचा सम्पर्क तुटला आहे.वाण नदीवरील रुईधारूर व अंजनडोह या गावाच्या मधील पुलावर पाणी आल्याने चार चाकी गाडी वाहून गेल्याची घटना घडली.यात अंजनडोह येथील आडत व्यापारी नितीन कांबळे वय 42 वर्ष यांचा मृत्यू झाल्याची घटना घडली आहे. याच वाण नदीवरील आवरगाव वरील पुलावर मध्यरात्री ऑटो चालक अनिल लोखंडे वय तीस वर्ष व ऑटो वाहून गेल्याची घटना घडली या घटनेत ऑटो सापडला आहे मात्र ऑटो चालक अनिल लोखंडे गेल्या 12 तासांपासून बेपत्ता असून प्रशासनाच्या वतीने शोध कार्य सुरू आहे. सर्वच नद्यांना,तळ्याना पूरजन्य परिस्थिती Flood situation निर्माण झाली असून प्रशासनाने नागरिकांना सावधगिरी बाळगण्याचे आवाहन केले आहे.
दरम्यान तालुक्यातील नदीकाठच्या गावातील नागरिकांनी व शेतकऱ्यांनी नदी नाला ओढा ओलांडताना पाण्याची पातळी धोक्याची नाही याची खात्री करूनच पार करावा असे आवाहन किल्ले धारूर चे तहसीलदार श्रीकांत निळे नायब तहसीलदार सुरेश पाळवदे पोलीस निरीक्षक देवीदास वाघमोडे सह पोलीस – महसूल प्रशासनाने केले आहे.

अंबाजोगाई: हॉटेलमध्ये मित्रानेच केली तरुणाची हत्या

अंबाजोगाई — अंबासाखर कारखाना रोड वरील न्यू दरबार हॉटेल येथे मंगळवारी (दि.२६) रात्री साडेआठच्या सुमारास अविनाश शंकर देवकर , सलमान मुस्तस्फा आणि स्वराज पोळ हे तिघे जेवण्यासाठी आले होते.त्यावेळी आर्थिक देवाणघेवाणीच्या कारणातून स्वराज पोळ याने अविनाशच्या डोक्यात तसेच मानेवर तीक्ष्ण हत्याराने सपासप वार केले आणि पसार झाला. गंभीररीत्या जखमी झालेल्या अविनाशचा जागीच मृत्यू झाला. घटनेची माहिती मिळताच पोलीस घटनास्थळी दाखल होऊन मृतावस्थेत रक्ताच्या थारोळ्यात पडलेल्या अविनाशचा मृतदेह ताब्यात घेऊन उत्तरीय तपासणीसाठी रूग्णालयात पाठविण्यात आला.

दरम्यान, घटनेचे गांभीर्य व गणेशोत्सवाचे दिवस असल्याने अंबाजोगाई शहर पोलिसांनी आपल्या तपासाची चक्रे वेगाने फिरवत अवघ्या सहा तासातच पळून जात असलेल्या खुनी स्वराज पोळ यास सापळा रचून अत्यंत शिताफीने सोलापूर तुळजापुर महामार्गावर जेरबंद करण्यास यश मिळवले. मयत अविनाशची आई अंजना यांनी अंबाजोगाई शहर पोलीस ठाण्यात फिर्याद दाखल केली आहे.

बुधवारी (दि. २७) रोजी अविनाश देवकर याच्या मृतदेहाचे अंबाजोगाई येथील रूग्णालयात शवविच्छेदन करुन मृतदेह नातेवाईकांच्या ताब्यात देण्यात आला. या गुन्ह्याचा अधिक तपास एपीआय राजेंद्र घुगे हे करत आहेत. पोलीस निरीक्षक शरद जोगदंड यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलीस निरीक्षक ज्ञानेश्वर कांबळे ,सहाय्यक पोलीस निरीक्षक राजेंद्र घुगे , पीएसआय पवार, पीएसआय शिंदे, पोलीस हवालदार भागवत नागरगोजे, पोहेका गायकवाड, गुट्टे व इतर पोलिसांनी आरोपीचा माग काढत पर जिल्ह्यामध्ये पळून गेलेल्या स्वराज पौळ यास नाट्यमयरीत्या सहा तासातच अटक केली.

Maratha reservation: भगवं वादळ मुंबईकडे रवाना; जरांगेंच्या आंदोलनाला एक दिवसाची परवानगी

जालना — मराठा आरक्षण आंदोलक मनोज जरांगे पाटील यांना मुंबई हायकोर्टाने काल आझाद मैदान इथं आंदोलन करण्यास परवानगी नाकारल्यानंतर आज पोलिसांनी काही अटी-शर्तींसह जरांगे पाटील यांना उपोषण करण्यास परवानगी दिली आहे.
मराठा आरक्षणाच्या Maratha reservation प्रलंबित मागण्यांसाठी काढण्यात आलेल्या महामोर्चाला mahamorcha अभूतपूर्व प्रतिसाद मिळत आहे. अंतरवली सराटीतून बुधवारी (दि.२७) सकाळी साडेदहा वाजता मराठा समाजबांधवांचा भव्य मोर्चा मुंबईच्या दिशेने निघाला.मंगळवारपासूनच हजारोंच्या संख्येने समाजबांधव अंतरवलीत दाखल झाले होते.


ढोल-ताशांच्या गजरात निघालेल्या मोर्चाचा ताफा वडीगोद्री फाटा येथे पोहोचला असता, गाड्यांचा आणि पायी चालणाऱ्या समाजबांधवांचा प्रचंड लोंढा पाहायला मिळाला. सोलापूर-धुळे महामार्गाच्या डाव्या बाजूला दोन ते तीन किलोमीटरवर गाड्यांची अखंड रांग होती. अवघे दहा किलोमीटर अंतर पार करायला तब्बल तीन तास लागले. याबरोबरच मराठवाड्यातील ग्रामीण भागासह राज्य महामार्ग व राष्ट्रीय महामार्ग मोर्चेकऱ्यांच्या गाड्यांनी फुलून गेलेला दिसला. घोषणा ढोल बाजा यांच्या मदतीने उत्साह दुगुनीत होत असल्याचं पाहायला मिळालं. यावरून महामोर्चाची भव्यता लक्षात घेण्यासारखी आहे. हे झालं आरक्षणाची मागणी करणाऱ्या मराठा समाजाची पण यामध्ये राजकीय नेत्यांची देखील मोर्चात रीघ लागल्याचे चित्र पाहायला मिळालं. बीड जिल्ह्यातून आ. संदीप क्षीरसागर Sandeep kshirsagar यांनी आंदोलनात मोठ्या संख्येने सहभागी होण्याचा आवाहन काल केलं होतं त्यांनी देखील या मोर्चाला पाठिंबा देत सहभाग घेतला आहे. गेवराईचे आमदार विजय राजे पंडित Vijay Raje pandit यांनी देखील आरक्षण लढाईला नेहमीच पाठबळ दिला आहे. चलो मुंबईचा नारा पंडित यांनी दिला. माजलगाव चे आमदार प्रकाश सोळंके Prakash Solanki यांनी देखील आंदोलनात सहभागी होणार असल्याची भूमिका घेतली. याबरोबरच खासदार बजरंग सोनवणे यांनी देखील चलो मुंबईचा नारा देत आझाद मैदानावर Azad maidan होणाऱ्या आंदोलनात सहभागी होणारा असल्याची घोषणा केली आहे. धाराशिव कळंब मतदारसंघाचे शिवसेना ठाकरे गटाचे आमदार कैलास पाटील यांनी देखील समाज माध्यमातून आंदोलनात सहभागी होण्याचं आवाहन केलं. धाराशिव चे खा. ओमराजे निंबाळकर यांनी देखील सरकारने तात्काळ तोडगा काढावा असं आवाहन करताना जनतेला सहभागी होण्याची हाक दिली. जिल्हा परिषद पंचायत समिती सदस्य देखील मोठ्या संख्येने या महामोर्चात सहभागी झाले आहेत.


दरम्यान मराठा आरक्षण आंदोलनाला आझाद मैदान एक दिवसासाठी आंदोलनासाठी खुले करण्यात आले आहे .
शासकीय सुट्टीच्या दिवशी व शनिवारी आणि रविवारी आंदोलनाला परवानगी देण्यात येणार नसल्याचं या आदेशात म्हटलं आहे. तसेच आंदोनासाठी कमाल पाच हजार आंदोलकांची अट घालण्यात आली आहे. दरम्यान यावर आता मनोज जरांगे पाटील Manoj jarange Patil यांची पहिली प्रतिक्रिया आता समोर आली आहे. आपण सर्व अटी आणि नियमांचं पालन करणार मात्र आंदोलन बेमुदत होणार असं त्यांनी म्हटलं आहे.

नेमकं काय म्हणाले जरांगे पाटील? Jarange Patil

लोकशाहीचं कायद्याचं सर्व नियामांचं आम्ही पालन करणार, माझा समाज देखील पालन करणार. आम्ही हट्टी नाहीयेत. तुम्ही जे सांगितलं आहे, त्या निर्णयाचं मराठ्यांकडून तंतोतंत पालन होणार, पण आम्ही एक दिवसाचं आंदोलन करणार नाही आम्ही बेमुदत आंदोलन करणार. बाकीच्या त्यांच्या सर्व नियमांचं आम्ही पालन करणार, त्यावर मी आता प्रतिक्रिया देत नाही. मी आधी ऑर्डर बघतो आणि नंतर त्यावर प्रतिक्रिया देतो, परवानगी दिल्याबद्दल सरकारचे आणि न्यायालयाचे आभार मानतो. पण आंदोलन एक दिवसाचं नाही तर बेमुदत होणार, एक दिवसाची परवानगी दिली तर करा मग एक दिवसात आरक्षण मंजूर, तुम्ही जोपर्यंत आरक्षण देत नाही तोपर्यंत मी आंदोलन करणार, असं जरांगे पाटील यांनी म्हटलं आहे.

शेतातील जुगार अड्ड्यावर पोलिसांचा छापा 9 लाखाचा मुद्देमाल जप्त

आष्टी — तालुक्यातील धामणगाव शिवारातील शेतामध्ये सुरू असलेल्या जुगार अड्ड्यावर पोलिसांनी police raid छापा मारून बारा जुगारी ताब्यात घेतले तर तब्बल नऊ लाख रुपयांचा मुद्देमाल अंभोरा पोलीसांनी जप्त केला आहे.
याबाबत अधिक माहिती अशी की अंभोरा पोलीस ठाण्याच्या हद्दीमध्ये असलेल्या धामणगाव येथील शेतामध्ये जुगार अड्डा सुरू असल्याची माहिती पोलिसांना सोमवारी मिळाली. माहिती मिळताच पोलिसांनी जुगार अड्ड्यावर छापा police raid मारला. यावेळी पोलिसांनी 12 जणांना ताब्यात घेतले. यावेळी जुगाऱ्या कडून रोख रक्कम, दुचाकी,मोबाईल व जुगारीचे साहित्य असा एकूण 8 लाख 80 हजारांचा मुद्देमाल जप्त केला. आरोपींविरुद्ध महाराष्ट्र जुगार प्रतिबंधक कायद्यान्वये gambling prevention act अंभोरा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.ही कारवाई पोलिस अधीक्षक नवनीत कांवत, अप्पर पोलिस अधीक्षक सचिन पांडकर, उपविभागीय पोलिस अधिकारी बाळकृष्ण हनपुडे, यांच्या मार्गदर्शनाखाली अंभोरा पोलिसांनी केली. या प्रकरणाचा पुढील तपास एपीआय सोपान येवले करीत आहे.

गेवराईतील राडा : लक्ष्मण हाकेसह 14 जणांविरोधात गुन्हा दाखल

गेवराई — ओबीसी OBC नेते लक्ष्मण हाके व आ. विजयसिंह पंडीत समर्थकांमध्ये झालेल्या गोंधळामुळे कायदा सुव्यवस्थेचा law and order प्रश्न निर्माण झाला. हाके यांनी शहरात येऊ नये यासाठी पोलिसांनी नोटीस बजावून देखील जाणीवपूर्वक राडा घालण्याचा प्रयत्न केला गेला. दरम्यान या प्रकरणी लक्ष्मण हाके सह 14 जनाविरोधात पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे.
आ.विजयसिंह पंडित व आ.प्रकाश सोळंके यांच्याविरोधात मराठा आरक्षणाच्या (Maratha reservation) प्रश्नावरून केलेल्या कथित वादग्रस्त वक्तव्यामुळे शहरात तणाव निर्माण झाला. या वक्तव्यानंतर संतप्त कार्यकर्त्यांनी प्रा. हाके यांच्या प्रतिकात्मक पुतळ्याला जाळून संताप व्यक्त केला.या संदर्भात मी गेवराईला gevrai येणारच अस आव्हान लक्ष्मण हाके यांनी दिलं. पोलिसांनी तात्काळ गेवराई शहरात हाके यांनी येऊ नये यासाठी प्रतिबंधक नोटीस Prohibited notice बजावली. मात्र लक्ष्मण हाके यांनी पोलिसांच्या police आदेशाला न जुमानता आपल्या कार्यकर्त्यासह शहरात आले छत्रपती शिवाजी महाराज चौकात थांबून माध्यमांचे संवाद साधला. यावेळी त्याच्या विरोधात घोषणा करण्यात आल्या. चप्पल फेक दगडफेक यासारखे अनुचित प्रकार घडले गेले. हा प्रकार घडत असताना पोलिसांनी हाके यांना पुढील प्रवासासाठी निघून जाण्याची सूचना केली मात्र त्याकडेही त्यांनी दुर्लक्ष केले. दरम्यान या घटनेनंतर पोलिसांनी स्वतः फिर्यादी होऊन 14 जणांविरुद्ध भारतीय न्याय दंड संहिता बीएनएस 2023 कलम 189(2), 190, 191(2), 191(3), 285, 223 आणि 352 अंतर्गत गुन्हा दाखल केला. यामध्ये लक्ष्मण हाके सुनील ढाकणे, बजरंग सानप बळीराम खटके पवन कारवार सिद्धू पघळ, मुक्ताराम आव्हाड शिवाजी गवारे दत्ता दाभाडे अशोक बोरकर वसीम फारुकी शाहरुख पठाण संतोष सुतार आणि मोईन ख्वाजा शेख यांचा समावेश आहे. जिल्ह्यातील कायदा सुव्यवस्थेत बाधा आणणाऱ्या लोकांची गळ केली जाणार नाही. कायदा हातात घेणारा वर कठोर कारवाई करण्यात येईल असा इशारा पोलीस अधीक्षक नवनीत कावत SP Navneet Kanvat यांनी दिला आहे.