Home Blog Page 137

बीड जिल्हाधिकारी कार्यालयावर जिल्हाभरातील ठेवीदारांचा आक्रोश मोर्चा

0

सचिन उबाळेंच्या नेतृत्वाखाली ठेवीदारांचा मोर्चा

बीड — ज्ञानराधासह दिवाळखोरीत निघालेल्या मल्टीस्टेट पतसंस्थांच्या ठेवीदारांनी जिल्हाधिकारी कार्यालयावर भर उन्हात मोर्चा काढून शासन आणि प्रशासनाला जाब विचारला.
अर्चना कुटेंसह फरार असलेल्या इतर मल्टीस्टेटच्या अध्यक्ष व इतर संचालकांना
तात्काळ अटक करावी, मल्टीस्टेट आणि पतसंस्थांच्या तपासाची माहिती ठेवीदारांना द्यावी अशी मागणी यावेळी ठेवीदारांच्या वतीने जिल्हाधिकाऱ्यांच्या वतीने करण्यात आली. ठेवीदारांचा जीव घेणाऱ्या व्यवस्थेचा यावेळी ठेवीदारांनी धिक्कार केला.
बीड येथे ठेवीदार संघर्ष कृती
समितीचे राज्य मुख्यप्रवर्तक तथा स्वाभीमान संघटनेचे जिल्हाध्यक्ष प्रा. सचिन उबाळे यांच्या नेतृत्वाखाली जिल्हाधिकारी कार्यालयावर जिल्हाभरातील ठेवीदारांनी मोर्चा काढला. येथील डॉ. बाबासाहेब आंबेडकर पुतळ्यापासून सुरू झालेला मोर्चा माळीवेस, सुभाष रोड, साहित्यरत्न आण्णाभाऊ साठे
चौक, छत्रपती शिवाजी चौक-नगर रोड मार्गे जिल्हाधिकारी कार्यालयावर धडकला. ज्ञानराधा, साईराम, राजस्थानी मल्टीस्टेटसह जिजाऊ मल्टीस्टेट, शुभकल्याण, लक्ष्मीमाता, मातोश्री अर्बन, मराठवाडा अर्बन (माजलगाव) या आर्थिक दिवाळखोरीत निघालेल्या मल्टीस्टेट आणि पतसंस्थांमुळे ठेवीदार आर्थिक अडचणीत सापडले आहेत. या ठेवीदारांच्या ठेवी तात्काळ मिळाव्यात, फरार असलेल्या अर्चना कुटेला तात्काळ अटक करावी यासह अन्य मल्टीस्टेटच्या अध्यक्ष, संचालकांना बेड्या ठोकाव्यात आणि मल्टीस्टेट, पतसंस्थांच्या तपासाची माहिती ठेवीदारांना द्यावी अशी मागणी या मोर्चातून करण्यात आली. प्रचंड उन्हात जिल्हाभरातील ठेवीदार मोठ्या संख्येने या मोर्चामध्ये सहभागी झाले होते.

नॅनो खतांसह सर्व कृषी साहित्याची खरेदी ही नियमानुसार व मुख्यमंत्री आणि वित्तमंत्र्यांच्या मान्यतेनेच – धनंजय मुंडे

0

अंजली दमानिया यांचे आरोप धादांत खोटे; धनंजय मुंडे यांच्याकडून दमनियांचा प्रथमच समाचार

त्यांनी आजवर अनेकांवर आरोप केले, शेवटी काय निघाले शोधून दाखवा – मुंडेंचे माध्यमांना आव्हान; अंजली बदनामीया म्हणत खोचक टोला

५९ दिवसांपासून आमची मीडिया ट्रायल सुरू, खोटे आरोप करून सनसनाटी निर्माण करणे व बदनामी करण्याचा एककलमी कार्यक्रम, त्यांना माझ्या शुभेच्छा

अंजली दमानिया यांचे कोट्यावधी रुपयांचा घोटाळा केल्याचे आरोप खोडून काढत मुंडेंनी केला खुलासा, त्या खरेदीच्या दरांमध्ये कुठेही तफावत नाही

ऑफिस ऑफ प्रॉफिट सारखे अनेक खोटे व चुकीचे आरोप करून केवळ आमची, आमच्या जिल्ह्याची आणि बहुजन समाजाची बदनाम केली – धनंजय मुंडे

मुंबई  — अंजली दमानिया यांनी मुंबईत पत्रकार परिषद घेऊन नॅनो युरिया, डीएपी, प्रेयर पंप, कापूस बॅगा खरेदीत घोटाळा झाल्याचा आरोप केल्यानंतर धनंजय मुंडे यांनी हे आरोप पत्रकार परिषद घेऊन फेटाळून लावली आहेत

मार्च २०२४ दरम्यान कृषी विभागाने खरेदी केलेल्या नॅनो खते, इलेक्ट्रिक फवारणी पंप, कापूस साठवणुकीच्या बॅग इत्यादी जी खरेदी करण्यात आली ती संपूर्णपणे शासनाचे संकेत अनुसरूनच करण्यात आले. डी बी टी वरील वितरणात सदर वस्तू वगळून त्या शासन मार्फत खरेदी करण्यासाठी राज्याचे मुख्यमंत्री तसेच राज्याचे उपमुख्यमंत्री तथा वित्तमंत्री यांच्या पूर्वपरवानगीनेच केलेली आहे. त्यावरून सामाजिक कार्यकर्त्या अंजली दमानिया यांनी केलेले संपूर्ण आरोप हे धादांत खोटे असून केवळ सनसनाटी निर्माण करण्यासाठी केले आहेत असे मंत्री धनंजय मुंडे यांनी स्पष्ट केले आहे.

मागील 59 दिवसांपासून आमची मीडिया ट्रायल केली जात असून वेगवेगळे चुकीचे व खोटे आरोप करून केवळ आणि केवळ आमची बदनामी केली जात आहे असे म्हणतानाच धनंजय मुंडे यांनी अंजली दमानिया यांनी केलेल्या आरोपांवरती सविस्तर स्पष्टीकरण देत सर्व आरोप खोडून काढले.

मुळात देशाचे पंतप्रधान स्वतः नरेंद्र मोदी साहेब यांनी नॅनो खतांच्या वापरावर भर देण्याबाबत सूचना केलेले आहेत त्याचे पालन करणारे महाराष्ट्र हे पहिले राज्य असून नॅनो खतांच्या वापरामुळे शेतकऱ्यांचा वेळ वाचतो त्याचबरोबर उत्पादन खर्च कमी होतो आणि उत्पन्नात भर पडते म्हणून जास्तीत जास्त शेतकऱ्यांनी नॅनो खते वापरावीत असा माझा भर होता.

नॅनो युरिया व नॅनो डीएपी ही दोन्ही शासनाने खरेदी केलेली खते इफको या कंपनीने बनवलेले असून त्या कंपनीचे दर कश्मीर पासून कन्याकुमारी पर्यंत संपूर्ण भारतात सर्वत्र सारखेच आहेत त्यामुळे या दरांमध्ये तफावत होती आणि त्यातून अमुक कोटींचा घोटाळा झाला असे बोलणे म्हणजे अज्ञानाचे लक्षण आहे असे धनंजय मुंडे म्हणाले.

त्याचप्रमाणे बॅटरी ऑपरेटेड फवारणी पंप खरेदी करताना काही कंपन्या काही राज्यांमध्ये जे फवारणी पंप पुरवतात त्यांना सहा महिन्यांची वॉरंटी व त्या आतील दुरुस्ती देतात मात्र महाराष्ट्र शासनाने फवारणी पंप खरेदी करताना किमान एक वर्ष वॉरंटी दिली जावी व त्यातील दुरुस्तीचा खर्च संबंधित कंपनीने करावा अशा प्रकारचे फवारणी पंप संपूर्ण निविदा प्रक्रिया स्पर्धात्मक रीतीने राबवूनच खरेदी केले असून संबंधित चारही प्रकारच्या निविदा प्रक्रियेत जास्तीत जास्त कंपन्यांनी सहभागी व्हावे यासाठी संबंधित निविदाना दोन वेळा मुदत वाढ सुद्धा देण्यात आली होती असेही मुंडेंनी स्पष्ट केले.

ज्या काळात हे सर्व घडले त्या काळामध्ये कापसाचे भाव पडलेले होते त्यामुळे सहसा शेतकरी कापूस विकायला तयार होत नव्हते मात्र घरामध्ये पडून राहिल्याने कापसाबरोबरच शेतकरी कुटुंबांना सुद्धा विविध संसर्गजन्य आजाराची लागण होऊ लागल्याने कापूस भरून ठेवण्यासाठी बॅगा देण्याची मागणी समोर आली तेव्हा भारत सरकारच्या कंपनीकडून प्रमाणित असलेल्या दरानेच केंद्र सरकारच्या कंपनीकडूनच संबंधित खरेदी करण्यात आल्याचे मुंडेंनी स्पष्ट केले आहे.

मान्सून च्या सुरू होण्याच्या अगोदर पेरणी आणि पेरणी उत्तर कामाची तयारी शेतकऱ्यांना करून ठेवावी लागते. मधल्या काळात लोकसभेची आचारसंहिता लागणार होती त्यामुळे सदर प्रक्रिया ही मार्च महिन्यातच राबवण्यात आली. संपूर्ण कल्पना महाराष्ट्राचे मुख्यमंत्री तसेच तत्कालीन उपमुख्यमंत्री तथा अर्थमंत्री यांना होती व संपूर्ण प्रक्रिया ही त्यांच्या पूर्वपरवानगीनेच पार पडलेली आहे. मात्र शेतीच्या मशागतीतील आणि शेतकऱ्यांची संबंधित कोणत्या गोष्टी कधी केल्या जाव्यात तसेच काय केले पाहिजे याचे कदाचित अंजली दमानिया यांना माहिती नसावी असेही धनंजय मुंडे म्हणाले.

अंजली दमानिया यांनी आजवर वेगवेगळ्या नेत्यांवर अनेक आरोप केले, परंतु त्यात पुढे काय झाले, याचा शोध माध्यमांनी घ्यावा, असे आवाहनही धनंजय मुंडे यांनी केले.

प्रत्येक प्रकरणांमध्ये अंजली दमानिया ह्या केवळ न्यूज व्हॅल्यू मिळवण्यासाठी आणि विशिष्ट हेतू साध्य करून घेण्यासाठी काहीही खोटे आरोप करून सनसनाटी निर्माण करतात आणि कॅमेऱ्यासमोर येतात. बीडच्या प्रकरणात सुद्धा जेव्हा त्यांनी एन्ट्री घेतली तेव्हा त्यांनी तीन आरोपींची नाव घेत या आरोपींची हत्या झाली आहे अशी बतावणी करत सणसणाटी निर्माण केली होती. त्यांनी अशा पद्धतीच्या खोट्या आणि तपासाची दिशाभूल करणाऱ्या गोष्टी का पसरवल्या याबाबत आजही कोणी त्यांना एक शब्द विचारायला तयार नाही, याबाबत धनंजय मुंडे यांनी नाराजी व्यक्त केली.

दरांच्या बाबतीत एक याचिका उच्च न्यायालय स्तरावर

अंजली दमानिया यांनी केलेल्या खोट्या आरोपांच्या नुसारच एका पुरवठादार ठेकेदाराने आपल्याला हवे असलेल्या वस्तूंच्या हवे असलेल्या दरांच्या अनुषंगाने मुंबई उच्च न्यायालयात एक याचिका दाखल केली होती. मात्र सदर प्रकरण न्यायालयासमोर सुनावणीला आल्यानंतर सदरील दरांमधील वस्तुस्थिती समजल्यानंतर त्या ठेकेदाराने संबंधित वस्तूंच्या दरांच्या अनुषंगाने केलेल्या सर्व मागण्या संबंधित याचिकेतून मागे घेतल्या आहेत.

ऑफिस ऑफ प्रॉफिट बाबतही खुलासा

अंजली दमानिया यांनी ऑफिस ऑफ प्रॉफिट च्या नावाखाली केलेले आरोप देखील पूर्णपणे चुकीचे आणि खोटे असून माझ्याशी संबंधित असलेली व्यंकटेश्वरा ही कंपनी थर्मल पावर स्टेशन अर्थात महाजनको कडून एक रुपये ही कमवत नाही हे रेकॉर्डवर आहे कंपनीच्या बॅलन्स शीट व बँक अकाउंट स्टेटमेंट वरती सुद्धा आहे. हे अंजली दमानीयांना सुद्धा माहित आहे. थर्मल मध्ये कोळशामुळे तयार झालेली राख ही तळ भरून साठवू न देता ती घेऊन जावी व इतर उद्योगांना वापरावी अशी सर्वोच्च न्यायालयाची मार्गदर्शक तत्वे आहेत. थर्मल पावर स्टेशनच्या राखेमुळे आमच्या भागात सिमेंट कंपनी आली, रोजगार मिळाले. सिमेंट कंपनीला कोणी राख पुरवली आणि होणारे प्रदूषण कमी केले तर त्यात ऑफिस ऑफ प्रॉफिट कसले आले? माझ्या किंवा माझ्या पत्नीच्या कंपनीने महाजनको कडून एकही रुपया कमावला नाही. मात्र तरीही मागील 59 दिवसांपासून सातत्याने खोटे आरोप करून आमची मीडिया ट्रायल केली जात आहे. त्याद्वारे माझ्यासह बीड जिल्ह्याची आणि बहुजन समाजाची सुद्धा बदनामी केली जात आहे असे म्हणत धनंजय मुंडे यांनी अंजली दमानिया यांचा अंजली बदनामी या असा उल्लेख करत खोचक टोला लगावला.

रोज एका नवीन प्रकरणाचा आधार घेऊन खोटे आणि धादांत चुकीचे आरोप करून मीडिया ट्रायल करून आमची बदनामी करण्याचे काम कोणीतरी अंजली बदनामिया यांना दिले असून हे काम करण्यासाठी त्यांना तसेच ज्यांनी काम दिले आहे त्यांना सुद्धा माझ्या शुभेच्छा आहेत, असे म्हणायलाही धनंजय मुंडे विसरले नाहीत.

अब्रू नुकसानीचा दावा दाखल करणार

अंजली दमानिया यांनी आज दिवसभरात दुसऱ्यांदा पत्रकार परिषद घेत पुन्हा एकदा खोटे व बेछूट आरोप केले आहेत. या विषयासह विविध विषयांवर मोघम आरोप करणाऱ्या अंजली दमानिया ताई यांच्या विरोधात आपण आता फौजदारी अब्रू नुकसानीचा खटला मुंबई उच्च न्यायालयात दाखल करणार असल्याचे धनंजय मुंडे यांनी आता ट्विट केले आहे.

आ.संदीप क्षीरसागरांनी घेतला विविध विभागांचा आढावा

0

महसूल, बांधकाम, कृषी, जिल्हा परिषदेची आढावा बैठक

बीड — बीड मतदारसंघातील विविध विषयांच्या अनुषंगाने आ.संदीप क्षीरसागर यांनी महसूल विभागांतर्गत बीड व शिरूर कासार तहसिल कार्यालय, सार्वजनिक बांधकाम तसेच जिल्हा परिषदेतील बांधकाम, ग्रामीण पाणीपुरवठा विभागांची बैठक घेऊन आढावा घेतला. यावेळी या विभागांशी निगडित नागरिकांच्या तक्रारींचा निपटारा करण्याचे निर्देश आ.संदीप क्षीरसागर यांनी अधिकार्‍यांना दिले.
मतदारसंघातील सामान्य लोकांची सरकारी कार्यालयात अडकलेली कामे तसेच जनसामान्यांच्या तक्रारींच्या अनुषंगाने तसेच विभागांतर्गत होत असलेले कामकाज यांचा आढावा घेण्यासाठी आ.संदीप क्षीरसागर यांनी मंगळवारी (दि.४) रोजी बीड येथील शासकीय विश्रामगृहात बैठक घेतली. महसूल विभागांतर्गत बीड व शिरूर कासार तहसिल कार्यालय, कृषी विभाग, सार्वजनिक बांधकाम विभाग तसेच जिल्हा परिषद अंतर्गत बांधकाम विभाग, ग्रामीण पाणीपुरवठा विभाग, मुख्यमंत्री ग्रामसडक योजना आदी विभागांचा आ.क्षीरसागर यांनी आढावा घेतला. यावेळी या विभागांशी संबंधित नागरिकांच्या असलेल्या तक्रारी यांचा निपटारा करण्याबात आ.संदीप क्षीरसागर यांनी संबंधित अधिकाऱ्यांना निर्देश दिले. तसेच‌‌ आ.क्षीरसागर यांनी या विभागांतर्गत झालेल्या आणि होत असलेल्या कामकाजाचा आढावा घेतला. या बैठकीस माजी आ.सय्यद सलीम, राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे जिल्हाध्यक्ष राजेंद्र मस्के‌ यांच्यासह विविध विभागांचे वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते.

राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेश सचिव श्रीहरी काळे अज्ञात वाहनाच्या धडकेत ठार

0

माजलगाव — राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाचे प्रदेश सचिव प्रा.श्रीहरी शिवाजीराव काळे यांना अज्ञात वाहनाच्या धडकेत मृत्यू झाला.ही घटना सोमवारी रात्री सातच्या सुमारास माजलगाव पाथरी महामार्गावरील खरात आडगाव फाटा येथे घडली

प्रा.श्रीहरी काळे वय 47 वर्ष आपल्या नातेवाईकांच्या लग्न समारंभास सकाळी मोटारसायकलवरून परभणीला गेले होते. यावेळी त्यांच्या सोबत जिल्हा परिषदेचे माजी जि. प. सदस्य डॉ.भगवान सरवदे होते. लग्न समारंभ उरकून परभणीहून माजलगाव कडे कल्याण-विशाखापट्टणम राष्ट्रीय महामार्गावरून येत होते. दरम्यान खरात आडगाव फाट्यावर चहा घेण्यासाठी मोटार सायकल थांबवली.यावेळी त्यांच्या सोबत असणारे डॉ.सरवदे हे दुचाकीच्या एका बाजूने उतरले. तर दुसऱ्या बाजूने श्रीहरी काळे उतरत होते. याच दरम्यान भरधाव वेगात असणाऱ्या अज्ञात चार चाकी वाहनाने काळे यांना जोराची धडक दिली. तर दुसऱ्या बाजूने दुचाकीवरून उतरणारे डॉ.सरवदे हे सुखरूप बचावले. अपघातानंतर स्थानिकांनी काळे यांना तात्काळ माजलगाव येथील ग्रामीण रुग्णालयात दाखल केले. मात्र डॉक्टरांनी त्यांना मयत घोषित केले.

ज्यादा व्याजदराचे आमिष दाखवून निवृत्त नायब तहसीलदाराला जाळ्यात ओढले; मुक्ताई अर्बन सोसायटीवर गुन्हा दाखल

0

माजलगाव — पतसंस्था सोसायटी या माध्यमातून खातेदारांच्या आर्थिक फसवणुकीचे प्रकार उघड होत आहेत. माजलगाव मधील मुक्ताई अर्बन को. ऑप. क्रे. सोसायटी जुना मोंढा शाखेतील खातेदार असलेल्या निवृत्त नायब तहसीलदारांची 23 लाख रूपयांची फसवणूक झाल्याचा प्रकार समोर आला आहे. या प्रकरणी दामोदर घाटूळ यांच्या फिर्यादीवरून मल्टीस्टेटचे अध्यक्ष विश्वंभर शिंदेसह 20 जणांवर माजलगाव शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

सेवानिवृत्त नायब तहसीलदार दामोदर गणपतराव घाटूळ हे सेवानिवृत्त झाल्यानंतर त्यांच्याकडे मोठी रक्कम आली होती. त्यांच्या घराशेजारी किरायाने राहणारे शिवप्रसाद सक्राते, विठ्ठल सक्राते व रमेश यादव यांनी घाटूळ यांच्या घरी जाऊन मुक्ताई अर्बन को-ऑपरेटिव्ह क्रेडिट सोसायटी मध्ये जादा व्याजदर देण्याचे आमिष दाखवून पैसे गुंतवण्यास भाग पाडले. त्यांनी पतसंस्थेत तब्बल 27 लाख रुपये गुंतवले. मात्र पतपेढी बंद करण्याचा प्रयत्न होत असल्याचे लक्षात आल्यावरून गुंतवणुकीची काही रक्कम काढून घेतली. परंतु दामोदर घाटूळ यांना पैशाची गरज पडल्यामुळे त्यांनी पतसंस्थेकडे आपल्या ठेवी परत कराव्यात अशी मागणी केली. विविध कारण देऊन पैसे देण्यास टाळाटाळ केली जाऊ लागली. दरम्यान 23 लाख रूपयांची रक्कम व्याजासह परत न करता फसवणूक केल्याचा प्रकार घाटूळ यांच्या लक्षात आल्यानंतर त्यांनी पोलिसात धाव घेतली.
या प्रकरणी दामोदर घाटुळ यांच्या फिर्यादीवरून मल्टीस्टेटचे अध्यक्ष विश्वंभर पांडुरंग शिंदे, अशोक विठ्ठल जोगडे, विलास निवृत्ती सौंदर, भागवत संभाजी गंगाञे, विशाल श्याम गोरे, केशव साहेबराव जोगडे, स्वाती विठ्ठल सक्राते, जनाबाई अनंतराव कदम, अशोक रतन चिगुरे, मोतीराम केशव शिरसाट, परमेश्वर लक्ष्मण कोरडे, शिवप्रसाद सर्जेराव सकारात्मक, विठ्ठल संक्राते, उद्धव केशव जोगडे, महेश फपाळ, किसन कुंडकर, बालाजी कुंडकर, दीपक कटके, रमेश दगडूबा यादव, रुस्तुम काळे या वीस जणांवर फसवणुकीसह विविध कलमान्वये माजलगाव शहर पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. मुक्ताई अर्बन को-ऑपरेटिव्ह सोसायटी चे मुख्य कार्यकारी अधिकारी शिवप्रसाद सर्जेराव सक्राते यांच्यावर यापूर्वी तीन अपहाराचे गुन्हे दाखल असल्याचं सांगितलं जात आहे. या प्रकरणाचा पुढील तपास पीएसआय केरबा माकने हे करत आहेत.

पेट्रोल- डिझेल काहीसं स्वस्त; सर्वसामान्यांना दिलासा

0

नवी दिल्ली — आजच्या दिवशी तेल कंपन्यांनी पेट्रोल आणि डिझेलच्या नवे दर जाहीर केले असून, महाराष्ट्रातील अनेक शहरांमध्ये पेट्रोल आणि डिझेलच्या किमतीत घट झाल्याचे दिसून आले आहे.

इंधनाच्या किंमतीमध्ये होणाऱ्या चढ-उतारामुळे सामान्य नागरिकांच्या बजेटवर मोठा परिणाम होतो, आणि आज पेट्रोल व डिझेलच्या दरांमध्ये घट झाल्यामुळे अनके ग्राहकांना खुशखबर मिळाली आहे. तर चला जाणून घेऊयात , आजचे पेट्रोल आणि डिझेलचे दर .

शहरानुसार पेट्रोल आणि डिझेलचे दर

सातारा – पेट्रोल 104.76 आणि डिझेल 91.25
सांगली – पेट्रोल 104.48 आणि डिझेल 90.79
कोल्हापूर – पेट्रोल 104.14 आणि डिझेल 90.66
अहमदनगर – पेट्रोल 104.59 आणि डिझेल 91.40
अकोला – पेट्रोल 104.22 आणि डिझेल 90.68
अमरावती – पेट्रोल 104 . 80 आणि डिझेल 91. 37
औरंगाबाद – पेट्रोल 105 . 50 आणि डिझेल 92.03
भंडारा – पेट्रोल 105.08 आणि डिझेल 91. 61
बीड- पेट्रोल 104.49 आणि डिझेल 91.33
बुलढाणा – पेट्रोल 104.88 आणि डिझेल 91. 90
चंद्रपूर – पेट्रोल 104.10 आणि डिझेल 90.67
धुळे – पेट्रोल 104.62 आणि डिझेल 91.10
गडचिरोली – पेट्रोल 105 आणि डिझेल 91.57
गोंदिया- पेट्रोल 105.50 आणि डिझेल 91.95
हिंगोली- पेट्रोल 105.16 आणि डिझेल 92.3
जळगाव – पेट्रोल 105.20 आणि डिझेल 91.23
जालना – पेट्रोल 105.30 आणि डिझेल 92.3
लातूर – पेट्रोल 105.42 आणि डिझेल 91.83
मुंबई शहर- पेट्रोल 103.50 आणि डिझेल 90.3
नागपूर – पेट्रोल 104.5 आणि डिझेल 90.65
नांदेड – पेट्रोल 105 . 49 आणि डिझेल 92 .3
नंदुरबार- पेट्रोल 104.81 आणि डिझेल 91.48
नाशिक – पेट्रोल 104.40 आणि डिझेल 91.7
उस्मानाबाद – पेट्रोल 104.78 आणि डिझेल 91.85
पालघर -पेट्रोल 103.75 आणि डिझेल 90 . 73
परभणी पेट्रोल 105.50 आणि डिझेल 92.3
पुणे- पेट्रोल 104.14 आणि डिझेल 90.88
रायगड- पेट्रोल 103.96 आणि डिझेल 90.62
रत्नागिरी – पेट्रोल 103.96 आणि डिझेल 91.96
सिंधुदुर्ग – पेट्रोल 105.50 आणि डिझेल 92.3
सोलापूर – पेट्रोल 105.10 आणि डिझेल 91 .23
ठाणे – पेट्रोल 103.68 आणि डिझेल 90.20
वर्धा- पेट्रोल 104.80 आणि डिझेल 91.44
वाशिम – पेट्रोल 105.05 आणि डिझेल 91.43
यवतमाळ – पेट्रोल 105.50 आणि डिझेल 92.3

सामान्य नागरिकांना दिलासा –

आंतरराष्ट्रीय बाजारात कच्च्या तेलाच्या किमतीत होणाऱ्या चढ-उतारानुसार पेट्रोल आणि डिझेलचे दर  बदलत असतात. यावर अतिरिक्त घटक म्हणजे स्थानिक कर, व्हॅट आणि मालवाहतूक शुल्क यांचा देखील प्रभाव पडतो. त्यामुळे, प्रत्येक राज्यात पेट्रोल-डिझेलच्या किमती वेगवेगळ्या असू शकतात. आजच्या दिवशी महाराष्ट्रातील बहुतांश शहरांमध्ये पेट्रोल आणि डिझेलच्या किमतीत घट झाल्यामुळे सामान्य नागरिकांना काही प्रमाणात दिलासा मिळाला आहे.

अंजली दमानिया फोडणार नवा बॉम्ब; धनंजय मुंडे यांच्यावर निशाणा !

0

मुंबई — संतोष देशमुख यांच्या हत्येनंतर विरोधकांसह सामाजिक कार्यकर्त्यांनी देखील रान उठवले आहे. राज्याचे मंत्री धनंजय मुंडे यांचे निकटवर्तीय वाल्मिक कराडदेखील या प्रकरणात आरोपी आहे.या मु्द्यावरून धनंजय मुंडे यांच्या राजीनाम्याची मागणी होत आहे. अशातच आता सामाजिक कार्यकर्त्या अंजली दमानिया यांनी केलेले ट्वीट चर्चेत आले आहे.

https://x.com/anjali_damania/status/1886119078643060795

राज्यातील विरोधी पक्ष धनंजय मुंडे यांच्या राजीनाम्यासाठी आग्रही आहेत. तर, दुसरीकडे भाजपचे आमदार सुरेश धस यांनी देखील धनंजय मुंडे यांच्यावर याआधी टीका केली आहे. धनंजय मुंडे यांच्या राजीनाम्याची मागणी सातत्याने केली जात आहे. तर, मुंडे यांनी आपला राजीनामा मागण्याचा अधिकार हा मुख्यमंत्री फडणवीस आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांचाच असल्याचे स्पष्ट केले आहे.

सामाजिक कार्यकर्त्या अंजली दमानिया यांनी देखील सातत्याने धनंजय मुंडे यांच्या राजीनाम्याची मागणी केली आहे. कराड आणि मु्ंडे यांचे व्यावसायिक संबंधाची कागदपत्रे दमानिया यांनी सादर केली. मात्र, त्यानंतरही मुंडे यांचा राजीनामा मान्य झाला नााही. या पार्श्वभूमी अंजली दमानिया यांनी एक सूचक ट्विट केले आहे.अंजली दमानिया यांनी म्हटले की, ‘हे सगळे पुरावे अतिशय धक्कादायक आहेत, ते उद्या जनतेपुढे येतील, त्यानंतर नक्कीच मोठा निर्णय घ्यायला जनता सरकारला भाग पाडेल. मंगळवारी सकाळी 11 वाजता माझ्या घरून पत्रकार परिषद घेणार आहे. हे भ्रष्टाचाराचे पुरावे पाहून मंत्रिपदाचा राजीनामा मिळेल अशी अपेक्षा. या पुराव्यांवर आपण मागील 4 दिवस काम केले असल्याचेही त्यांनी सांगितले.’

धनंजय मुंडे जोपर्यंत मंत्रिपदावर आहे, तोपर्यंत इथे न्याय होणार नाही- अंजली दमानिया

नामदेव शास्त्री महाराज जर खरंच देशमुख कुटुंबीयांचा पाठीमागे असतील, तर त्यांनी त्या देशमुख कुटुंबीयांना न्याय मिळण्यासाठी जी विघ्न आहेत ती दूर करावी अशी विनंती आहे. त्यातला सर्वात मोठा विघ्न म्हणजे धनंजय मुंडे…धनंजय मुंडे जोपर्यंत मंत्रिपदावर आहे, तोपर्यंत इथे न्याय होणार नाही. म्हणून धनंजय मुंडे यांच्या राजीनाम्याचं काम आता भगवानगडानेच करायला हवं. त्यानंतरच देशमुख कुटुंबीयांना न्याय मिळेल, असं अंजली दमानिया यांनी सांगितले.

घरात घुसून शेतकऱ्याच्या गळ्याला चाकू लावला; दीड लाखाची लूट

0

आष्टी — पहाटेच्या सुमारास चोरट्यांनी घरात प्रवेश करून शेतकऱ्याच्या गळ्याला चाकू लावला. शेळी म्हैस विक्रीतून आलेल्या दीड लाख रुपयांची लूट केली. ही घटना तालुक्यातील शेकडे वस्तीवर रविवारी पहाटे घडली.

आष्टी तालुक्यातील महिंदा येथील शेकडे वस्तीवर शेतकरी मोहन शेकडे कुटुंबासह राहतात. शनिवारी रात्री जेवण करून शेकडे कुटुंब घरात झोपले होते. रविवारी पहाटे 2 वाजेच्या दरम्यान घराची कडी उघडून चार चोरट्यांनी घरात प्रवेश केला. यावेळी शेकडे यांना जाग आली असता चोरट्यांनी त्यांच्या गळ्याला गळ्याला चाकू लावला. तसेच आरडाओरड करू नये म्हणून तोंड दाबून धरले. इतर चोरट्यांनी घरात शोधाशोध करत पत्र्याची पेटी ताब्यात घेतली. याचवेळी एका चोराने वयोवृद्ध महिलेच्या गळ्यातील सोने तोडले, मात्र, शेकडे कुटुंबीयांनी आरडाओरड केला असता सोने तिथेच सोडून घरातील पेटी घेऊन चोरटे पळाले. आवाज ऐकून आलेल्या शेजाऱ्यांनी चोरांचा पाठलाग केला. परंतु, अंधाराचा फायदा घेत चोरटे पसार झाले. पेटी अर्धा किलोमीटर अंतरावर आढळून आणि. त्यातील दीड लाख रूपयांची रोकड चोरट्यांनी लंपास केली आहे. ही रक्कम शेती विक्री आणि शेळी, म्हैस विक्रीतून मिळाली होती.
माहिती मिळताच घटनास्थळी आष्टीचे उपअधीक्षक बाळकृष्ण हानपुडे, अंमळनेर पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक भार्गव सपकाळ, पोलीस उपनिरीक्षक कृष्णा चव्हाण, सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक परशूराम मंजुळे यांनी भेट देऊन पाहणी केली. श्वान पथक,ठसे तज्ज्ञांनी तपास केला. या प्रकरणी मोहन शंकर शेकडे याच्या फिर्यादीवरून रविवारी अंमळनेर पोलीस ठाण्यात चार चोरट्याविरूध्द कलम 309(4), 3(5) नुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक कृष्णा चव्हाण करीत आहेत.

बीडकरांची स्वप्नपूर्ती: विघनवाडी बीड रेल्वे मार्गाची होणार चाचणी

0

बीड — अहमदनगर बीड परळी रेल्वे मार्गाचे काम सध्या सुरू असून बीड करांची स्वप्नपूर्ती होणार आहे. विघनवाडी ते राजुरी आणि राजुरी ते बीड या दरम्यान नवीन लोहमार्गाची जलदगती चाचणी 4/5 फेब्रुवारी रोजी होणार आहे. त्यामुळे या भागातील ग्रामस्थांनी रेल्वे मार्गापासून दूर राहण्याचे आवाहन रेल्वे प्रशासनाने केले आहे. तसेच याबाबत रेल्वे प्रशासनाने जिल्हा पोलिस अधीक्षकांनाही याची माहिती दिलेली आहे.

बीडकरांच्या दोन-तीन पिढ्यांनी बघितलेले रेल्वेचे स्वप्न आता पूर्णत्वाकडे जात असल्याचे दिसत आहे. मध्यंतरी रेल्वेच्या‌ रखडलेल्या कामाने गती घेतली आहे. 5 जानेवारी 2024 रोजी आष्टी ते अंमळनेर या ३० किलोमीटरच्या मार्गावर 110 किलोमीटर प्रति तास या वेगाने हायस्पीड चाचणी घेण्यात आली. त्यानंतर विघनवाडी ते राजुरी या नवीन लोहमार्गाची जलदगती चाचणी 30 ते 31 डिसेंबरदरम्यान घेण्यात आली. दरम्यान आता पुढील चाचणीचा टप्पा पार पडत आहे. त्यासाठीचे नियोजन करण्यात आले आहे. आता मंगळवारी पुढील टप्पा पार पडत आहे. 4 फेब्रुवारी रोजी विघनवाडी ते राजुरी आणि 5 फेब्रुवारी रोजी राजुरी ते बीड या मार्गावरील रेल्वे लोहमार्गाची जलदगती चाचणी पार पडून बीड करांची स्वप्नपूर्ती बुधवारी होणार आहे.त्यामुळे चाचणीलगत येणाऱ्या गावकऱ्यांनी रेल्वे मार्गापासून दूर राहावे. तसेच गुरे, पाळीव प्राणी इत्यादी चाचणी दरम्यान रुळावर येणार नाहीत याची काळजी घ्यावी. लोहमार्गालगत चाचणी दरम्यान कोणीही वावरू नये, अशा सूचना देण्यात आल्या आहेत. या संबंधीचे पत्र उपजिल्हाधिकारी समन्वय यांनी पाटोदा, बीडच्या उपविभागीय अधिकाऱ्यांना दिले आहे.

बीड : जिल्ह्यात 183 शस्त्र परवाने रद्द, शस्त्र परवाना असणाऱ्यांच्या घरी पोलिसांच्या चकरा

0

बीड — मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्येनंतर दहशत, सत्ता, पैसा आणि बीडच्या वाळू माफिया आणि राखेचं भयानक वास्तव समोर आलं. हे वास्तव समोर आल्यानंतर खळबळ उडाली आहे.पवनचक्की प्रकरणाप्रमाणेच बीडमध्ये बंदुकीचा धाक दाखवणाऱ्यांच्या संख्येत कमी नाही. गेल्या काही दिवसांपूर्वी हवेत गोळीबार करणाऱ्यांच्या वायरल व्हिडीओने मोठी खळबळ माजली होती. संतोष देशमुख हत्या प्रकरणानंतर प्रशासन सतर्क झाला आहे. बीड जिल्ह्यात 183 शस्त्र परवानगी रद्द करण्यात आली आहे.

127 शस्त्र आणखी रद्द होणार आहेत. यामध्ये 8 जणांनी स्वतः सरेंडर होत आपली शस्त्रे जमा केली आहेत. सत्ता श्रीमंती आणि वर्चस्व दाखवण्याची हाऊस जपणाऱ्या बीडच्या शस्त्र परवानाधारकांवर मोठी कारवाई करण्यात आली आहे.संतोष देशमुख हत्या प्रकरणाला दोन महिने उलटून गेल्यानंतर पोलीस प्रशासन सतर्क झाले आहे .घाऊकपणे दिल्या जाणाऱ्या शस्त्र परवानांच्या तपासणीसाठी आता पावलं उचलली जात आहे. बीड जिल्ह्यात नोंदणीकृत 1281 शस्त्र परवाने आहेत. यात 310 प्रस्ताव रद्द करण्यासाठी पाठवण्यात आले असून यावर कारवाई करत आत्तापर्यंत 183 शस्त्र रद्द करण्यात आले आहेत. 127 शस्त्र रद्द होणार असल्याचा सांगण्यात आलंय. यात मृत असताना हे शस्त्र परवाना नावावर असणाऱ्यांची संख्या 118 एवढी आहे. ही आत्तापर्यंतची सर्वात मोठी कारवाई असल्याचं सांगितलं जात आहे.

विशेष म्हणजे जिल्ह्यात ज्यांच्याकडे शस्त्र परवाना आहे, त्यांचे सर्वेक्षण सुरू करण्यात आले असून पोलीस कर्मचारी घरी जाऊन परवानाधारक शस्त्र हाताळण्यास सक्षम आहे का ? जिवंत आहे का ? याची खात्री करत आहेत. यात अनेक जण मृत असल्याचे समोर आले आहे. मृत असतानाही शस्त्र परवाना नावावर असणाऱ्यांचा आकडा 118 असल्याचे समजते .त्यामुळे आता हे सर्व शस्त्र परवाने रद्द केले जाणार आहेत .
शस्त्र परवाना असणाऱ्यांच्या घरी पोलिस
विशेष म्हणजे जिल्ह्यात ज्यांच्याकडे शस्त्र परवाना आहे, त्यांचे सर्वेक्षण सुरू करण्यात आले असून पोलीस कर्मचारी घरी जाऊन परवानाधारक शस्त्र हाताळण्यास सक्षम आहे का ? जिवंत आहे का ? याची खात्री करत आहेत. यात अनेक जण मृत असल्याचे समोर आले आहे. मृत असतानाही शस्त्र परवाना नावावर असणाऱ्यांचा आकडा 118 असल्याचे समजते .त्यामुळे आता हे सर्व शस्त्र परवाने रद्द केले जाणार आहेत .