Home Blog Page 136

बस्ता बांधण्यासाठी निघालेल्या जीपचा अपघात; वधुपित्यासह महिला ठार

0

केज — आपल्या मुलीचा विवाह जवळ आल्यामुळे लग्नासाठी कपड्याचा बस्ता बांधण्यासाठी जीपने वधू पिता नातेवाईकांसह अहिल्यानगर कडे जात होते. दरम्यान सांगवी सारणी पुलावरील वळणावर समोरून येणाऱ्या टेम्पोची जीपसोबत धडक झाली.या अपघातात वधू पित्यासह लग्न जुळविण्यात मध्यस्थी असलेल्या महिलेचा मृत्यू झाला. हा अपघात आज, शुक्रवारी सकाळी 8 वाजण्याच्या दरम्यान अहमदनगर – अहमदपूर राष्ट्रीय महामार्गांवर सारणी शिवारात झाला.

केज तालुक्यातील कासारी येथील रामेश्वर शाहूराव डोईफोडे यांच्या मुलीचा विवाह बोरदेवी ता. बीड येथील इंजिनियर मुलासोबत 23 फेब्रुवारी आहे. दोन्ही बाजूच्या नातेवाईकांना सोयीचे म्हणून अहिल्यानगर येथे बस्ता बांधण्याचा निर्णय घेण्यात आला होता. त्यानुसार आज, शुक्रवारी सकाळी साडेसात वाजता एका जीप क्र.एम एच 16 ए टी 0016 ने मुलीचे वडील, नवरी मुलगी व इतर नातेवाईक अहिल्यानगरकडे निघाले. सकाळी 8 वाजेच्या सुमारास अहमदपूर -अहमदनर राष्ट्रीय महामार्गवरील सारणी – सांगवी पुलावरील वळणावर समोरून येणाऱ्या टेम्पो क्र. एम एच 01 / यु सी 5502 आणि जीपची जोरदार धडक झाली. यात वधू पिता रामेश्वर शाहूराव डोईफोडे वय 50 वर्षे, रा कासारी आणि उर्मिला उर्फ उमा श्रीराम घुले वय 45 वर्षे, रा कोरेगाव ह मू शिक्षक कॉलनी केज या दोघांचा मृत्यू झाला. गाडीतील अन्य 6 जण जखमी झाल आहेत. या घटनेची माहिती मिळताच पोलीस निरीक्षक वैभव पाटील, जमादार दत्तात्रय बिक्कड, शिवाजी कागदे, प्रकाश मुंडे, चालक दराडे यांनी अपघातस्थळी भेट दिली. मृत व जखमींना केज येथील उपजिल्हा रुग्णालयात रवाना केले.

बिबट्याच्या हल्ल्यात वयोवृद्ध महिलेचा मृत्यू 

0

पाटोदा —  तालुक्यातील मेंगडेवाडी गावातील उखारा शिवारात  दि.६ गुरूवार रोजी दुपारी बिबट्याच्या हल्ल्यात श्रीमती सोजरबाई धोंडीराम बोबडे वय ६५ वर्षे या वयोवृद्ध महिलेचा मृत्यू झाला असुन या परीसरात बिबट्याची दहशत पसरली आहे. वनविभाग आणि पोलिस प्रशासनाला याची फोनवरून भगवान शिंदे यांना कळविण्यात आले आहे.

याबाबत अधिक माहिती अशी की,

भगवान शिंदे यांच्या म्हणण्यानुसार श्रीमती सोजरबाई धोंडीराम बोबडे या दुपारी १२ वाजता शेतातील जनावराच्या गोठ्यात नेहमीप्रमाणे जात असतात. आज दुपारी ३ वाजता बिभिषण दासु शिंदे यांनी शेतातील जनावरे आणण्यासाठी जात असताना त्यांच्या गोठ्याशेजारी शेतात सोजरबाई यांचे प्रेत पाहीले.त्यांच्या अंगावरील जखमावरून बिबट्याने नरडीचा घोट घेतल्याचे दिसून आले. शेतात बिबट्याचे ठसे दिसुन आले.त्यांनी सोजरबाई यांच्या नातु जगन्नाथ बबन बोबडे यांना फोनवरून कल्पना दिली.त्यानंतर घटनास्थळी ग्रामस्थांनी धाव घेतली. भगवान शिंदे यांनी पाटोदा वनविभागाचे अधिकारी आरएफओ श्रीकांत काळे  व पोलीस प्रशासन पोलिस निरीक्षक जाधव यांना फोन वरून कल्पना दिली. सायंकाळी पाटोदा पोलीस प्रशासनाचे अधिकारी पोलिस उपनिरीक्षक आदिनाथ भडके व बीट अंमलदार बाळासाहेब वाघ पाटोदा यांनी घटनास्थळी भेट देऊन स्थळ पंचनामा केला. वनविभागाचे आरएफओ श्रीकांत काळे घटनास्थळी दाखल झाले आहेत. प्रेत शवविच्छेदनासाठी पाटोदा ग्रामीण रुग्णालयात पाठविण्यात आले आहे.

कराड-मुंडे विरोधातील बातम्या का पाहतोस म्हणून मारहाण करणारे दोन्ही आरोपी कर्नाटकात पकडले

0

संतोष देशमुख हत्या प्रकरणातील फरार आरोपी कृष्णा आंधळेचा ठाव ठिकाणा मिळण्याची शक्यता?

किल्लेधारूर – वाल्मीक कराड, धनंजय मुंडे यांच्या विरोधातील बातम्या का पाहतोस असं म्हणत लोखंडी राॅड सह कोयत्याने बेदम मारहाण करणाऱ्या वैजनाथ बांगर व अभिषेक सानप या दोघांना जेरबंद करण्यात पोलिसांना यश आले आहे.
केज तालुक्यातील धारूर पोलीस स्टेशन हद्दीमधील तरनळी या गावांमध्ये, वाल्मीक कराडच विरोधातील बातम्या का बघतोस? असं म्हणत अशोक मोहिते यास वैजनाथ बांगर आणि अभिषेक सानप या दोघांनी
लोखंडी रॉडने जबर मारहाण केली होती. या मारहाणीत अशोक मोहिते गंभीर जखमी झाले होते. त्यांना रुग्णालयात उपचारासाठी दाखल केले असता गुरुवारी संध्याकाळी पर्यंत तो शुद्धीत आला नाही. जखमी असलेला अशोक मोहिते हा होमगार्ड म्हणून देखील काम करत होता.
याप्रकरणी मावसभाऊ बालासाहेब भोसले यांच्या फिर्यादीवरून धारूर पोलीस स्टेशन मध्ये वैजनाथ बांगर, अभिषेक सानप या दोघांवर गुन्हा दाखल करण्यात आला होता. दरम्यान हा गुन्हा दाखल झाल्यापासून दोन्ही आरोपी फरार होते. मात्र येथील सहाय्यक पोलीस निरीक्षकांनी या गुन्ह्याचा तपास हाती घेतला.या दोन्ही फरार आरोपींचा पाठलाग करत कर्नाटक येथून दोघांच्या मुसक्या आवळण्यात पोलिसांना यश आले आहे. या दोघांकडून संतोष देशमुख हत्या प्रकरणातील फरार आरोपी कृष्णा आंधळे चा ठाव ठिकाणाला लागण्याची शक्यता पोलिसांकडून वर्तविली जात आहे. कृष्णा आंधळे याच्या वाढदिवसाच्या दिवशी पकडलेल्या दोन्ही आरोपींनी कृष्णा आंधळेला दिलेल्या शुभेच्छाचे स्टेटस ठेवले होते असं सांगितलं जात आहे

विद्युत पुरवठा सुरळीत करा;महावितरण विरोधात शेतकरी आक्रमक

0

बीड — खांडे पारगाव परिसरातील शेतकऱ्यांना विद्युत पुरवठा सुरळीत होत नसल्याने वैतागलेल्या शेतकरी, नागरिक महिला, विद्यार्थी यांच्या वतीने महा वितरण विरोधात शेतकरी आक्रोश मोर्चा, व जाहीर निदर्शने आंदोलन शिवसंग्राम शेतकरी जिल्हाध्यक्ष राजेंद्र आमटे यांच्या पुढाकाराने अधीक्षक अभियंता विभागीय महावितरण कार्यालय जालना रोड बीड येथे करण्यात आले

महावितरण कंपनीच्या भोंगळ कारभारामुळे शेतकऱ्याच्या पिकाची राख रांगोळी होत आहे. विहिरीत पाणी असतानाही महावितरण कंपनी मुळे डोळ्या देखत पीक करपून चालली आहेत, इ 10 वी 12 वी बोर्डाच्या परीक्षा जवळ या महिन्यात आहेत विद्यार्थांना अभ्यास करता येते नाही, माणसाच्या पिण्याच्या पाण्याचा प्रश्न, जनावरांना टँकर ने पाणी विकत घ्यावे लागत आहे हा सर्व दुर्दैवी प्रकार महावितरण कंपनीच्या भोंगळ कारभारामुळे होत आहे
या मुळे खांडे पारगाव परिसरातील खांडे पारगाव, अंथरवान प्रिंपी, नागपूर खुर्द, उमरद खालसा, नागपूर बुद्रुक, उमरी, अंथरवान प्रिंपि तांडा येथील सात गावातील शेतकऱ्यांच्या वतीने मोर्चा काढून जाहीर निदर्शने आंदोलन करून अधीक्षक अभियंता विभागीय कार्यालय जालना रोड बीड येथे निवेदन देऊन शेतकऱ्यांचा तत्काळ विद्युत पुरवठा सुरळीत करा, शासन नियमनुसार शेतकऱ्यांना दिवसाची लाईट द्या , सात गावांसाठी मजूर 5 M.v.p. ट्रान्सफॉर्मर तत्काळ बसावा, नवीन सबस्टेशन मंजूर करा, इंजि. भागा नगरे यांची तत्काळ बदली करा, विद्युत पुरवठा सुरळीत होई पर्यंत पूर्वी प्रमाणे एम.आय. डी. सी. मधून विद्युत पुरवठा करा, या वरील मागण्यासाठी सात गावातील शेतकऱ्यांच्या वतीने मोर्चा काढून जाहीर निदर्शनं आंदोलन करून अधीक्षक अभियंता विभागीय कार्यालय जालना रोड बीड येथे निवेदन देण्यात आले या वेळी शेतकऱ्याने आक्रमक भूमिका घेत तत्काळ मागण्या करण्यात यावी असे शिवसंग्राम शेतकरी जिल्हाध्यक्ष राजेंद्र आमटे, जालिंदर सोळुंके, खाजाभाई पठाण,……. आदी सह शेकडो शेतकरी उपस्थित होते

लाडक्या बहि‍णींचा तिजोरीवर ताण; आनंदाचा शिधा, शिव भोजन थाळी होणार बंद?

0

मुंबई — वाढत्या कर्जाच्या बोजामुळे महाराष्ट्र सरकार काही योजना बंद करण्याच्या तयारी असल्याची माहिती आहे. लाडकी बहिण योजनेमुळे सरकारच्या तिजोरीवर ताण पडत आहे. या योजनेमुळे सरकार इतर योजना बंद करण्याची तयारी करत असल्याची माहिती काही माध्यमांनी दिली आहे.

याशिवाय आमदारांसाठी खरेदी करण्यात येणाऱ्या बजेट बॅगचा आदेशही रद्द करण्यात येणार असल्याचे सांगितले जात आहे.

शिवभोजन थाळीचा घेणार आढावा

महाविकास आघाडी सरकारच्या काळात शिवभोजन थाळी ही लोकप्रिय ठरली होती. या योजनेत केवळ १० रुपयांत प्रत्येकाला जेवण देण्यात येत होते. मात्र आता ही योजना बंद करण्याचा विचार सरकारच्या पातळीवरुन सुरु असल्याचे समजते. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मंत्रीमंडळाच्या बैठकीत या योजनेचा आढावा घेण्याच्या सुचना दिल्याची माहिती मिळत आहे.

थाळीवर २६७ कोटींचा खर्च

शिवभोजनाच्या दोन लाख थाळींसाठी वार्षिक २६७ कोटींचा खर्च येतो. त्यामुळे तिजोरीवरील भार वाढत आहे. त्यामुळे चालू आर्थिक वर्ष संपल्यानंतर ही योजना गुंडाळली जाण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. दुसरीकडे आमदारांसाठी बजेट बॅग खरेदी करण्यात येणार होत्या. ८८६ हार्ड टाँप, चार चाकी बॅग खरेदीचा निर्णय घेण्यात आला होता. त्यासाठी ८२ लाखांचा अंदाजित खर्च ठेवला होता. मात्र आता तो निर्णयही रद्द करण्यात येणार असल्याचे समजते.

आनंदाचा शिधाही बंद?

सणासुदीच्या काळात स्वस्त धान्य दुकानांतून राज्य सरकार आनंदाचा शिधा वाटप करत होते. दिवाळी, गुढीपाडवा, डाँ. बाबासाहेब आंबेडकर जयंती यासारख्या सणाच्या दिवशी लाभार्थ्यांना सहा वस्तूंचे वाटप होत होते. त्यात एक किलो साखर, एक लिटर तेल, अर्धा किलो रवा, अर्धा किलो हरबरा डाळ, अर्धा किलो मैदा, अर्धा किलो पोहे यासारख्या सहा वस्तू दिल्या जात होत्या. ही किट फक्त १०० रुपयांमध्ये
दिली जात होती. त्यासाठी वार्षिक १६१ कोटींचा बोजा सरकारवर पडत होता. या वस्तूंमध्ये कमी करण्याचा किंवा ही योजनाच बंद करण्याचा सरकारचा विचार असल्याचे, काही माध्यमांनी वृत्त दिलं आहे

आर्थिक स्थितीमुळे करुणा मुंडेंना 2 लाखाची पोटगी; कौटुंबिक हिंसाचार झाला नाही — धनंजय मुंडे च्या वकिलाचे स्पष्टीकरण

0

मुंबई — मुंबई न्यायालयाने कौटुंबिक हिंसाचार प्रकरणी करुणा शर्मा यांनी केलेल्या अर्जावर दिनांक ०४ फेब्रुवारी रोजी झालेल्या सुनावणी दरम्यान धनंजय मुंडे यांच्या बाबत कोणताही अंतिम निष्कर्ष काढलेला नाही. अर्जदार करुणा शर्मा व त्यांची मुलगी शिवानी यांच्या सध्याची आर्थिक परिस्थिती व अन्य निकषांच्या आधारे त्यांना अंतरिम देखभालीसाठी मिळून २ लाख रुपये  पोटगी म्हणून देण्याचा अंतरिम निर्णय दिला आहे.धनंजय मुंडे यांच्या वरील आरोपांच्या अनुषंगाने किंवा कौटुंबिक हिंसाचाराच्या अनुषंगाने कोणत्याही आरोपांवर काहीही निर्णय अद्याप दिलेला नसून, याबाबत काही माध्यमांवर दाखविण्यात येत असलेले वार्तांकन निराधार आहे. असे मत प्रसिद्धीपत्रकाद्वारे धनंजय मुंडे यांच्या वकील ऍड. सायली सावंत यांनी प्रसिध्दी पत्रकाद्वारे स्पष्ट केले आहे.

धनंजय मुंडे यांनी स्वतःच आपल्या व्यक्तिगत आयुष्याबाबत याआधी जाहीर खुलासा करत ते करुणा शर्मा व मुले यांच्याबरोबर लिव्ह इन मध्ये राहिल्या बाबत त्यांनी यापूर्वीच कबुली दिलेली असून, आजच्या अंतरिम आदेशाला त्याचाच आधार असल्याचे वकील सायली सावंत यांनी स्पष्ट केले आहे.

ऍड.सायली सावंत यांनी याबाबत माध्यमांना सुध्दा विनंती केली असून, सर्व माध्यमांनी जबाबदार व अचूक वार्तांकन करावे तसेच न्यायालयाच्या अंतरिम आदेशावर आधारित कोणतीही दिशाभूल करणाऱ्या किंवा खोट्या वार्तांकन पासून दूर रहावे, कुणाचीही नाहक बदनामी होईल, असे चुकीचे वार्तांकन करू नये. कुठल्याही माध्यम कर्मी याबाबत अधिक माहिती किंवा स्पष्टीकरण हवे असल्यास ते वकिलांना मागावे, असे आवाहन ऍड.सायली सावंत यांनी केले आहे.

पोलीस ठाणेच आपल्या दारात;QR Code स्कॅन करा पोलिसात दाद मागा

0

एस पी कांवत यांचा आज पासून संवाद प्रकल्प

बीड — जिल्ह्यात नागरीक हे मोठ्या प्रमाणात ग्रामीण भागात राहतात. त्यामुळे बहुतांश वेळा त्यांना पोलीस स्टेशनशी संबंधीत काम असेल तर त्यांना पोलीस स्टेशनला पोहचायला बराच वेळ लागतो. त्याच बरोबर पोलीस स्टेशनला पोहचण्यासाठी बस भाडे/स्वतःचे वाहन असल्यास इंधन खर्च या स्वरुपात पैसाही खर्च होतो. पोलीस स्टेशनला गेल्यानंतर बऱ्याच वेळा काम होत नाही. किंवा नागरीकांचे समाधान होत नाही. त्यामुळे नागरीकांना वरीष्ठांकडे दाद मागण्यासाठी दुरचा प्रवास करावा लागतो. त्यामुळे नागरीकांचे आर्थीक नुकसान तर होतेच परंतु त्याच बरोबर त्यांना शारिरीक व मानसीक हालही होतात.
याच बाबींचा विचार करुन व नागरीकांना चांगली सेवा देण्याच्या भावनेतुन पोलीस अधीक्षक नवनीत काँवत (भा.पो.से.) यांचे संकल्पनेतुन संवाद प्रकल्प’ हा उपक्रम बीड जिल्हा पोलीस दलात राबवला जात आहे.
यासाठी पोलीस अधीक्षक नवनीत काँवत (भा.पो.से.) यांनी QR Code तयार केला आहे. सदरचा QR Code हा पोलीस स्टेशनचे प्रभारी अधिकारी यांचे कक्षात व पोलीस ठाणे अंमलदार यांचे कक्षात लावण्यात आला आहे. नागरिकांनी आपल्याकडे असलेल्या मोबाईल द्वारे सदरचा QR Code स्कॅन केल्यानंतर त्यांच्या मोबाईलचे स्क्रिन वर एक लिंक येईल. ती लिंक उघडल्यानंतर एक माहीतीचा फॉर्म येईल. त्यामध्ये नागरीकांना स्वतःचे नाव, मोबाईल क्रमांक, ज्या पोलीस ठाण्याच्या संबंधी काम आहे त्या पोलीस ठाण्याचे नाव निवडणे,पोलीस ठाणे येथे भेट देण्याचे कारण किंवा माहिती, पोलीस ठाणे येथे भेट दिल्यानंतर किंवा पोलीस ठाण्याच्या कामकाजावर आपण समाधानी आहात काय?, समाधानी/असमाधानी असल्याचे कारण, तुम्ही दिलेली भेट यावरुन पोलीस ठाण्यास किती गुण द्यायचे? (गुण 1-5), सुधारणेसाठी सुचना.

सदरची माहीती भरुन ती सबमीट करणे आवश्यक राहील. एखादी व्यक्ती पोलीस स्टेशनच्या कामकाजाबाबत असमाधानी असल्यास त्यांची पोलीस अधीक्षक कार्यालयाकडुन 24 तासांच्या आत समस्या जाणुन घेवुन समाधान करण्याचा प्रयत्न केला जाईल. सदरचा QR Code हा सोशल मिडीयाच्या माध्यमातुन सुद्धा नागरीकांपर्यंत पोहचवला जाणार आहे. त्यामुळे एखाद्या नागरीकास अवैध धंदे किंवा इतर महत्वाची गोपनीय माहीती द्यायची असेल तर ते सदरचा QR Code स्कॅन करुन माहीती देवु शकतात. अशा व्यक्तींचे नांव व मोबाईल क्रमांक गोपनीय ठेवले जाईल. तसेच याद्वारे नागरीकांना त्यांच्या काही तक्रारी असल्यास त्या QR Code द्वारे देवु शकतात. नागरीकांनी केलेल्या तक्रारी, दिलेल्या प्रतिक्रीया, सुचना ह्या पोलीस अधीक्षक हे स्वतः पाहु शकणार आहेत. तसेच नागरीकांनी केलेल्या प्रत्येक तक्रारीची दखल पोलीसांकडुन घेतली जाणार आहे.
या उपक्रमांद्वारे पोलीस आणि नागरीक यांच्यात समन्वय साधला जाणार आहे. यापुढे नागरीकांना विनाकारण पोलीस स्टेशन, उपविभागीय पोलीस अधिकारी कार्यालय, अपर पोलीस अधीक्षक कार्यालय, पोलीस अधीक्षक कार्यालयात चकरा मारण्याची आवश्यकता नाही. यामुळे नागरीकांचा वेळ व पैशांचा होणारा अपव्यय टाळता येणार आहे. सदरचा उपक्रम हा नागरीकांच्या सेवेसाठी राबविण्यात येत आहे.

‘ संवाद प्रकल्प’ हा उपक्रम आज दि. 6 फेब्रुवारी 2025 पासुन बीड जिल्ह्यात राबवीला जात आहे. सदर उपक्रमाचा नागरीकांनी योग्य उपयोग करुन पोलीस व नागरीकांमध्ये निर्माण झालेली दरी दुर करावी. तसेच नागरीकांनी सुचवीलेल्या सुधारणांचे स्वागत केले जाईल असे मत पोलीस अधीक्षक नवनीत काँवत (भा.पो.से.) यांनी व्यक्त केले आहे.

कराड मुंडे विरोधातील बातम्या पाहणाऱ्या तरुणास लोखंडी रॉड ने बेदम मारहाण

0

केज — धनंजय मुंडे व वाल्मीक कराड यांच्या विरोधातील बातम्या मोबाईलवर बघितल्या तर तुझा संतोष देशमुख करू अशी धमकी देत दोन युवकांनी एकास लोखंडी रॉडसह कोयत्याने बेदम मारहाण केल्याची घटना तरनळी येथे घडली आहे.

मारहाणीत जखमी झालेल्या अशोक शंकर मोहिते असं तरुणाचं नाव आहे. त्याला अंबाजोगाई येथील रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे उपचार सुरू आहेत. ही घटना केज तालुक्यातील तरनळी येथे बुधवारी (दि.५) दुपारी घडली. याप्रकरणी जखमीचा मावस भाऊ बाळासाहेब भोसले यांनी दिलेल्या फिर्यादीवरून वैजनाथ भारत बांगर व अभिषेक सिद्धेश्वर सानप या दोघांवर धारूर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याबाबत अधिक माहिती अशी, अशोक मोहिते हे तरनळी येथील रमाई चौक येथे बुधवारी दुपारी अडीचच्या सुमारास मोबाईलवर वाल्मीक कराड व धनंजय मुंडे यांच्या संदर्भातील बातम्या पाहत होते. ही बाब मोटरसायकलवरून आलेल्या वैजनाथ भारत बांगर , अभिषेक सिद्धेश्वर सानप या दोघांच्या निदर्शनास आली. त्यानंतर त्यांनी मोहिते यांच्यावर लोखंडी रॉड व कोयत्याने हल्ला करत त्यांना लाथा- बुक्क्यांनी मारहाण केली. यापुढे वाल्मिक कराड व मुंडे यांच्या विरोधातील बातम्या पाहिल्यास तर तुझा संतोष देशमुख करू, अशी धमकी दिली. जखमी अशोक मोहिते यांच्यावर अंबाजोगाई येथील स्वामी रामानंद तीर्थ रुग्णालयात उपचार सुरू आहेत. याप्रकरणी तपास पोलीस निरीक्षक देविदास वाघमोडे यांच्या मार्गदर्शनाखाली सुरू आहे.

Exit Polls : 27 वर्षानंतर दिल्लीत कमळ फुलणार की भाजपच्या स्वप्नावर आप झाडू फिरवणार?

0

नवी दिल्ली — विधान सभेचे मतदान आज 5 फेब्रुवारी रोजी पार पडलं. या निवडणुकांचा निकाल 8 फेब्रुवारी रोजी जाहीर होणार आहे. मतदान पार पडल्यानंतर विविध संस्था आता एक्झिट पोल जाहीर करताना दिसत आहेत.

त्यामुळे आता कोणता पक्ष बाजी मारणार? याबद्दल अनेक अंदाज व्यक्त केले जात आहेत. त्याचप्रमाणे कोणत्या पक्षाला किती जागा मिळणार याबद्दलही अंदाज बांधले जात आहेत. समोर आलेल्या एक्झिट पोलमध्ये काय अंदाज व्यक्त केले आहेत त्याबद्दल आता माहिती जाणून घेऊया.

दिल्लीमध्ये सध्या आम आदमी पार्टीची सत्ता असलेली बघायला मिळत आहे. ‘आप’ पक्षाने आजवर 2013, 2015 व 2020 या वर्षांमध्ये दिल्लीत वर्चस्व मिळवले आहे. मात्र यावेळी भाजपदेखील सत्तेत येणार असल्याची शक्यता आता वर्तवली जात आहे. मॅट्रीजने समोर आणलेल्या सर्वेक्षणामध्ये भाजपला 35 ते 40 जागा मिळण्याचा अंदाज आहे. तसेच आपला 32 ते 37 जागा आणि काँग्रेस पक्षाला 1 जागा मिळण्याचा अंदाज वर्तवला आहे.
त्यामुळे आता पर्यंत अनेकांनी भाजपा पक्ष सत्तेत येण्याच्या शक्यता वर्तवल्या आहेत. तसेच ‘पीपल्स पल्स’नुसार, भाजप 51 ते 60 जागांवर आघाडी मिळवू शकते तर, ‘आप’ला 10 ते 18 जागा मिळू शकतील असा अंदाज वर्तवला आहे. त्याचप्रमानणे पोल ‘डायरी’च्या एक्झिट पोलनुसार भाजपला 42 ते 50 , ‘आप’ पक्षाला 18 ते 25 जागा तसेच काँग्रेसला 2 जागा मिळण्याची शक्यता वर्तवली आहे

2013 साली ‘आप’पक्षाने दिल्लीत यश मिळवले होते. तसेच 2020 साली ‘आप’ने 70 पैकी 67 जागा जिंकत सर्वांनाच आश्चर्याचा धक्का दिला होता. केंद्रात सत्ता असूनही दोन वेळा दिल्लीत पराभव सहन करावा लागल्यानंतर यावेळी भाजपाने सत्ता मिळविण्यासाठी कसोशीने प्रयत्न केले आहेत. त्यामुळे आता दिल्लीमध्ये भाजपचं कमळ खुलणार का? असे प्रश्नदेखील जनतेच्या मनात उभे राहिले आहेत. त्यामुळे दिल्लीमध्ये कोणत्या पक्षाचा झेंडा फडकणार? याकडे सगळ्यांचे लक्ष लागले आहे.

मादळमोहीच्या शिक्षकाचा असाही धंदा; शिक्षण विभागाचा कारभारच नंगा

0

बीड — मादळमोहीच्या एका शिक्षकाने छत्रपती संभाजी नगरची संस्था विकत घेतली. एवढ्यावरच कारभार थांबला नाही तर तिथले विद्यार्थीही बीडच्या शाळेत आणल्याचा प्रकार घडल्याने शिक्षण विभागाचा कारभार किती नंगा आहे हे समोर आल्याने खळबळ माजली आहे.

शिक्षकी देशातले काही शिक्षक ‘अजीम’ ओ शान शहेनशहा समजून नसते धंदे करत काळीमा फासण्याचा काम करायला देखील मागे पुढे पाहत नाहीत. असाच काहीसा प्रकार बीडमध्ये देखील घडला आहे. मादळमोही येथे शिक्षक असलेल्या महाभागाने छत्रपती संभाजीनगर येथील एक शिक्षण संस्था खरेदी केली. ती नुसती खरेदीच केली नाही तर मुलांच्या भवितव्याशी खेळ मांडला. छ.संभाजीनगरच्या संस्थेत ज्या विद्यार्थ्यांचा प्रवेश होता तेच विद्यार्थी बीडमध्ये संस्था आणल्यानंतर देखील शाळेच्या हजेरी पटावर आले गेले. वास्तविक पाहता संस्था विकत घेतल्यानंतर व तिचे स्थलांतर करताना त्या शाळेत शिकत असलेल्या विद्यार्थ्यांच्या पालकांना याची कल्पना देणे आवश्यक होतं. छ.संभाजीनगर येथील एखाद्या शाळेत या विद्यार्थ्यांना प्रवेश मिळणं गरजेचं होतं. मात्र सध्या विद्यार्थी राहायला छत्रपती संभाजी नगर मध्ये आहेत. त्यांचे प्रवेश बीडच्या संस्थेत असल्याने विद्यार्थ्यांच्या भवितव्याशी खेळ या शिक्षकाने मांडला आहे. एवढ्यावरच हे कृत्य थांबलं नाही तर बीडचे काही शिक्षक मोठी रक्कम घेऊन संस्थेत भरती केले. त्यांना दोन-तीन महिने अल्प प्रमाणात का होईना वेतनही देण्यात आले. मात्र भरमसाठ पैसा घेऊन देखील आता या संस्थेत काम करणाऱ्या शिक्षकांच्या हातावर छदाम देखील‌ या संस्थाचालक शिक्षकाने दिला नाही. परिणामी शिक्षकांच भवितव्य ही टांगणीला लागला आहे. उपासमार होत असली तरी बोलावं तर “बाबाही गेल्या अन् दशम्याही गेल्या” अशी वेळ येण्याची भीती निर्माण झाली आहे. थोडक्यात सांगायचं तर नोकरी ही जाईल तसेच संस्थाचालकाला दिलेला पैसाही पुढील अशा कात्रीत या स्थलांतरित संस्थेतील शिक्षकांची स्थिती झाली आहे. एवढा प्रताप मादळमोहीच्या शिक्षकाने करून देखील याची दखल शिक्षण विभागाने अजून घेतलीच नाही. घेणार की असाच या शिक्षकाचा नंगा नाच चालू राहणार? विद्यार्थ्यांच्या भवितव्याचं मातेर होणार? संस्थेत भरती झालेल्या शिक्षकांची स्वप्नदेखील धुळीला मिळणार? असे एक ना अनेक प्रश्न निर्माण झाले आहेत. शिक्षण विभागाने कमीत कमी छ.संभाजीनगरच्या विद्यार्थ्यांच्या भविष्याचा तरी विचार करून कारवाई करावी. त्या संस्थाचालक शिक्षकाला देखील आळा मोळा घालावा अशी मागणी होऊ लागली आहे.