Home Blog Page 120

पोलिसांनी 138 कोटीचं सोनं असलेला कंटेनर पकडला

0

पुणे — विधानसभा निवडणुकीचे वारे सध्या राज्यात वाहत असल्याने पोलिस यंत्रणा देखील गाड्यांची झाडाझडती घेत आहे. त्यातच खेड-शिवापूर येथे 5 कोटींची रोकड तपास यंत्रणांच्या हाती लागली होती.कोल्हापूर च्या दिशेने जात असलेल्या इनोव्हा गाडीतून ही मोठी रोख रक्कम पकडण्यात आली. पुणे ग्रामीण पोलिसांकडून चेक पोस्टवर ही कारवाई करण्यात आली. त्यानंतर शुक्रवारी पुण्यात तब्बल 138 कोटींचे सोने पोलिसांनी नाकाबंदीदरम्यान पकडल्यामुळे खळबळ उडाली आहे.

पुण्यातील सहकार नगर येथे पोलिसांनी एमएच 02 ईआर 8112 या कंटेनरला तपासणीसाठी थांबवले. तपासणीदरम्यान या पांढर्‍या रंगाच्या कंटेनरमध्ये मोठ्या प्रमाणात सोने असल्याचे पोलिसांच्या लक्षात आले. या कंटेनरमधील सोन्याची एकूण किंमत 138 कोटी रुपये इतकी असल्याची माहिती समोर आली आहे. नियमित नाकाबंदीदरम्यान सदर सोन्याचा कंटेनर थांबवून तपासणी करण्यात आली. सहकार नगर परिसरातून ताब्यात घेतलेला हा टेम्पो एका खासगी लॉजिस्टिक कंपनीचा असून यामधील सोनं पुण्यातील कुठल्या व्यापार्‍याकडे जात होतं, याचा तपास सध्या सुरू आहे. पोलिसांनी या संदर्भात सगळी माहिती आयकर विभाग तसेच निवडणूक आयोगाला कळवलेली आहे.

शेतात गांजाची लागवड;120 झाड जप्त

0

बीड — एका शेतात गांजाची लागवड केल्याची माहिती मिळाल्यावरून चकलांबा पोलिसांनी केलेल्या कारवाईत गांजाची 120 झाडे जप्त करण्यात आली.

याबाबत अधिक माहिती अशी की, चकलांबा पोलीस ठाणे हद्दीतील पौळ्याची वाडी येथील कैलास शेषराव शेंडगे यांची गट नंबर 472 मध्ये शेती आहे. या शेतात गांजाची लागवड केल्याची माहिती ठाण्याचे प्रभारी सपोनी संदीप पाटील यांना मिळाली.
यावरून त्यांनी शेतात छापा मारला असता. त्यांना गांजाची 100 किलो वजनाची 120 झाडे आढळून आली. या कारवाईत जवळपास दहा लाखाचा गांजा जप्त करण्यात आल्याची माहिती मिळत आहे. या कारवाईने खळबळ माजली आहे.

रमेश आडसकरांच्या हाती तुतारी; मानली जात आहे फिक्स उमेदवारी

0

माजलगाव — राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाचे उमेदवार जाहीर झाला असला तरी शरद पवार गटाच्या उमेदवाराच्या नावाची प्रतीक्षा आहे. त्यातच पंकजा मुंडे यांचे समर्थक रमेश आडसकर यांनी तुतारी हाती घेतली आहे. त्यामुळे त्यांच्या नावावर शिक्का मुहूर्त होईल अशी शक्यता वर्तवली जात आहे.

गेल्या एक वर्षात मराठा आंदोलनामुळे माजलगाव मतदार संघ ढवळून निघाला होता.आ. प्रकाश सोळंके यांनी मराठा आरक्षण आंदोलना बाबत एका कार्यकर्त्याशी फोनवर बोलताना अपशब्दांचा वापर केला होता. ही ऑडिओ क्लिप व्हायरल झाल्यानंतर त्याचे पडसाद मोठ्या प्रमाणावर उमटले होते. लोकसभा निवडणुकीत देखील जरांगे फॅक्टरचा प्रभाव माजलगाव मतदार संघात दिसून आला. माजलगाव मतदार संघात शरद पवार गटाकडून उमेदवारी मिळावी यासाठी अनेक जण प्रयत्नशील असल्याचे पाहायला मिळाले.दोन दिवसांपूर्वी अजित पवार गटाच्या राष्ट्रवादी काँग्रेसकडून आ. प्रकाश सोळंके यांची उमेदवारी जाहीर करण्यात आली. परंतु शरद पवार गटाकडे अनेक जण इच्छुक असल्यामुळे पहिले यादीत माजलगाव मतदार संघातील उमेदवाराचे नाव जाहीर झाले नव्हते. यातच शुक्रवारी रमेश आडसकर यांचा शरद पवार गटात प्रवेश झाल्याने त्यांची उमेदवारी निश्चित मानली जात आहे.
रमेश आडसकर हे गोपीनाथराव मुंडे व पंकजा मुंडे यांचे समर्थक मानले जातात. मागील विधानसभा निवडणुकीत मतदारसंघा बाहेरील असताना देखील केज व परळी मतदारसंघातील भाजपच्या उमेदवाराला फायदा व्हावा म्हणून रमेश आडसकर यांना माजलगावची उमेदवारी जाहीर झाली होती. नवखे असताना रमेश आडसकर यांनी चांगली फाईट दिली. त्यांचा अल्पमताने पराभव झाला होता. महायुतीमध्ये माजलगाव मतदार संघ हा राष्ट्रवादी काँग्रेसला सुटल्यामुळे रमेश आडसकर यांना पक्ष बदलल्याशिवाय पर्याय नव्हता. त्यामुळे त्यांनी शरद पवार यांची जवळीक करत आज शरद पवार गटात प्रवेश केला. मतदारसंघातील राजकीय गणिते पाहता त्यांची उमेदवारी फिक्स मानली जात आहे. मात्र, आडसकर यांनी ‘तुतारी’ हाती घेत राष्ट्रवादी शरद पवार गटात प्रवेश केल्यामुळे पंकजा मुंडे यांना हा मोठा धक्का मानला जात आहे.

अनिश्चिततेच्या राजकीय हिंदोळ्यावर क्षीरसागर घराण्याचे झोके

0

बीड — जिल्ह्याच्या राजकारणात गेल्या चार दशकाहून अधिक काळापर्यंत क्षीरसागर घराण्याचा “शब्द”परवलीचा मानला गेला. कार्यकर्त्यांचा राबता हा बंगल्यावर कायम असायचा निवडणुका आल्या की त्याला अक्षरशः भरती यायची मात्र घरात बेकीच राजकारण निर्माण झाल्यामुळे बीडच्या सारीपाटावर या निवडणुकीत मात्र क्षीरसागरांना आतापर्यंत डावललं गेल्याचा चित्र पाहायला मिळतं. भूमिका स्पष्ट नसल्यामुळे जयदत्त क्षीरसागर संधी कोणाकडे मिळते यावर लक्ष ठेवून आहेत. तर संदीप क्षीरसागर एकनिष्ठतेचं फळ मिळेल या आशेवर विसंबून आहेत.योगेश क्षीरसागर देखील अनिश्चिततेच्या हिंदोळ्यावर झोके घेत असल्याचे सध्यातरी पाहायला मिळत आहे. कधी नव्हे ते बंगला अलग थलग पडल्याचं तर दिसतच आहे पण अनेक वावड्या नुसत्याच घोंगावत आहेत.

केशरबाई क्षीरसागर यांच्या काळापासून जिल्ह्याच्या राजकारणात बंगल्याच महत्व जयदत्त क्षीरसागर यांच्या पर्यंत कायम राहिल्या गेलं. जिल्ह्यातील प्रत्येक विधानसभा मतदारसंघात क्षीरसागरांची ताकद कायम राहिली गेली. त्यामुळे त्यांना वजा करून मतदार संघाच गणित मांडणं मी मी म्हणणाऱ्या धुरंधर राजकारण्याला देखील कधीच जमलं नाही. ही बीडची परिस्थिती माहिती असल्यामुळे ते ज्या पक्षात राहिले त्या पक्षाने देखील कधीच क्षीरसागर यांचा उपमर्द होईल अशी कृती होऊ दिली नाही. उलट त्यांना विचारात घेऊनच मतदार संघाची त्यातील उमेदवारांची आखणी केली जायची. प्रशासनावर असलेली मजबूत पकड जनतेशी जोडली गेलेली नाळ यामुळे पराभव स्वीकारावा लागला असला तरी क्षीरसागरांच वलय त्या काळातही तितकच महत्त्वाचं राहिला गेलं. त्यामुळे अडकलेलं प्रत्येक काम हे बंगल्यावर गेलं तर होणारच ही आशा कायम जनतेच्या मनात असायची परिणामी निवडणुका असो अथवा नसो कार्यकर्त्यांसह समर्थकांची गर्दी बंगल्यात पाहायला मिळायची. एवढच की निवडणुकीत त्याला उधाण आलेलं असायचं‌. हा जवळपास 40 – 45 वर्षाचा इतिहास आहे. मात्र कालाय तस्मै नमः घरातील प्रत्येकाचीच राजकीय महत्त्वकांक्षा जागी झाली अन घराला घरघर लागली. 2019 च्या निवडणुकीत त्याचा परिणाम जाणवला गेला जयदत्त क्षीरसागर यांना पुतण्याकडूनच निसटता पराभव स्वीकारावा लागला. तसं काका पुतण्याच्या राजकारणाची समाजकारणाची पद्धती बदलली गेली. यातून बंगल्याचे महत्व कमी होऊ लागलं. जसजसं निवडणूक जवळ येऊ लागली तसं तसं बीडच्या नगरपालिकेवर अधिराज्य गाजवणाऱ्या भारत भूषण क्षीरसागर यांच्या मुलाची राजकीय महत्त्वकांच्या देखील वाढली गेली. त्याने देखील नवे राजकीय डावपेच निवडणूक आखाड्यात उतरण्यासाठी आखायला सुरुवात केली. त्यामुळे एकाच घरातून विधानसभा उमेदवारीसाठी वेगवेगळ्या पक्षातून का होईना तिघांची दावेदारी केली जाऊ लागली. जयदत्त क्षीरसागर यांनी राज्याच्या राजकारणाची बदलती समीकरणे पाहून वेट अँड वॉच असं म्हणत भूमिका स्पष्ट केली नाही.कुठल्याही राजकीय पक्षाशी त्यांनी बांधील की जपली नाही. कदाचित ते पूर्वीच्या आपलं जनतेवर असलेलं वर्चस्व आपल्याला तारुन नेईल. राजकीय पक्ष आपल्याला पायघड्या घालतील अशी अपेक्षा कदाचित त्यांना असावी. ती आता फोल ठरू लागल्याचं दिसू लागला आहे. काहीशी अशीच अवस्था संदीप क्षीरसागर यांची देखील आहे. पक्ष फुटीच ग्रहण लागल्यानंतर शरद पवारांची त्यांनी साथ सोडली नाही. लोकसभा निवडणुकीत मातब्बर समजल्या जाणाऱ्या पंकजा मुंडे यांचा भावाची साथ मिळवून देखील पराभव करून विजयाची माळ पवारांच्या गळ्यात घालता आली. याच एकनिष्ठतेचा फळ आपल्याला मिळेल असा आशावाद “गृहीत” धरला गेला. राजकारणात “गृहीत”या शब्दाला फारसा अर्थ नसतो. हे मात्र संदीप क्षीरसागर यांना कळालं नाही. राज्याच्या राजकारणात शरद पवारांसारखं व्यक्तिमत्व कधी काय डावपेच अखेल त्यात कोण चित पट होईल हे कुणालाच सांगता आलं नाही. हा इतिहास संदीप क्षीरसागरांना लक्षात राहिला नाही. त्याहूनही वेगळी स्थिती डॉ.योगेश क्षीरसागर यांची आहे. त्यांची मदार सर्वस्वी दुसऱ्यावर अवलंबून आहे. दुसऱ्यावर विसंबला त्याचा कार्यभाग बुडाला ही जुनी म्हण अजूनही बदलली नाही. धनंजय मुंडे, पंकजा मुंडे यांच्यावर ते विसंबून आहेत. वास्तविक पाहता बीडची जागा शिवसेनेच्या शिंदे गटालाच मिळाली पाहिजे यासाठी राष्ट्रवादी अजित पवार गटासोबत रस्सीखेच सुरू आहे. त्यामुळे शिंदे गटाला जागा सुटली तर योगेश क्षीरसागरांचे भवितव्य अंधारात जाणार आहे. तसंही उमेदवारी मिळाली तरी त्यांचा जनसंपर्क मतदारसंघात कमीच आहे.
एकंदरच क्षीरसागर घराण्याचे तीन मल्ल निवडणूक आखाड्यात उतरण्यासाठी तेल लावून सज्ज असले तरी वरिष्ठांच्या खेळीने मैदानात उतरण्याआधीच चितपट होतात की काय? याकडे जिल्ह्याचे लक्ष लागले आहे. यातील संदीप क्षीरसागर याची  उमेदवारी निश्चित मानली जात आहे. जयदत्त क्षीरसागर यांच्या राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटात प्रवेश करण्याच्या वावड्या उडत आहेत. तर बीडची जागा आपल्याच पक्षाला मिळावी यासाठी पक्षश्रेष्ठींच्या खेळीत योगेश क्षीरसागरांची कोंडी झाली आहे.तरी बीडच्या राजकारणात महत्त्वाचं राजकीय घराणं समजल्या जाणार क्षीरसागर घराण्यातील प्रत्येक नेता अनिश्चिततेच्या हिंदोळ्यावर झुलत असल्याचं पाहायला मिळत आहे.

काँग्रेसची 48 उमेदवारांची यादी जाहीर

0

मुंबई — विधानसभा निवडणुकीसाठी काँग्रेसने आपल्या 48 उमेदवारांची पहिली यादी जाहीर केली आहे. पाथरीतून सुरेश वरपूडकर, विलासराव देशमुख यांच्या दोन्ही मुलांना लातूर – ग्रामीण मध्ये धिरज देशमुख तर शहर मधून अमित देशमुख उमेदवारी देण्यात आली आहे.

अशी आहे उमेदवारांची यादी
अक्कलकुवा – ॲड. के.सी. पडवी (ST)
2.शहादा – राजेंद्रकुमार कृष्णराव गावित (ST)
3. नंदुरबार – किरण दामोदर तडवी (ST)
4.नवापूर – श्रीकृष्णकुमार सुरुपसिंग नाईक (ST)
5.साक्री – एसटी प्रवीणबापू चौरे
6.धुळे ग्रामीण – कुणाल रोहिदास पाटील
7.रावेर – ॲड. धनंजय शिरीष चौधरी
8.मलकापूर – राजेश पंडितराव एकाडे
9.चिखली – राहुल सिद्धिविनायक बोंद्रे
10.रिसोड – अमित सुभाषराव झनक
11.धामणगाव रेल्वे -प्रा.वीरेंद्र वाल्मीकराव जगताप
12.अमरावती – डॉ. सुनील देशमुख
13.तेओसा – ॲड. यशोमती चंद्रकांत ठाकूर
14.अचलपूर – अनिरुद्ध उर्फ बबलूभाऊ सुभानराव देशमुख
15.देवळी – रणजित प्रताप कांबळे
16.नागपूर दक्षिण पश्चिम – प्रफुल्ल विनोदराव गुडधे
17.नागपूर मध्यवर्ती – बंटी बाबा शेळके
18.नागपूर पश्चिम – विकास पी. ठाकरे
19.नागपूर उत्तर – SC डॉ. नितीन काशिनाथ राऊत
20 साकोली – नानाभाऊ फाल्गुनराव पटोले
21.गोंदिया- गोपालदास शंकरलाल अग्रवाल
22.राजुरा- सुभाष रामचंद्रराव धोटे
23.ब्रह्मपुरी – विजय नामदेवराव वडेट्टीवार
24.चिमूर – सतीश मनोहरराव वारजूकर
25.हदगाव – माधवराव निवृत्तीराव पवार पाटील
26 भोकर- तिरुपती बाबुराव कदम कोंडेकर
27 नायगाव – मीनल निरंजन पाटील (खतगावकर)
28 पाथरी – सुरेश अंबादास वरपुडकर
29 फुलंब्री – विलास केशवराव औताडे
30 मीरा भाईंदर – सय्यद मुजफ्फर हुसेन
31 मालाड पश्चिम – अस्लम आर. शेख
32 चांदिवली – मोहम्मद आरिफ नसीम खान
33 धारावी – डॉ.ज्योती एकनाथ गायकवाड (ST)
34 मुंबादेवी – अमीन अमीराली पटेल
35 पुरंदर – संजय चंद्रकांत जगताप
36 भोर – संग्राम अनंतराव थोपटे
37 कसबा पेठ – रवींद्र हेमराज धंगेकर
38 संगमनेर – विजय बाळासाहेब थोरात
39 शिर्डी – प्रभावती जे.घोगरे
40 लातूर – ग्रामीण धिरज विलासराव देशमुख
41 लातूर शहर – अमित विलासराव देशमुख
42 अक्कलकोट – सिद्धाराम सातलिंगप्पा म्हेत्रे
43 कराड दक्षिण – पृथ्वीराज चव्हाण
44 कोल्हापूर दक्षिण – रुतुराज संजय पाटील
45 करवीर – राहुल पांडुरंग पाटील
46 हातकणंगले – राजू जयंतराव आवळे (SC)
47 पलूस-कडेगाव – डॉ.विश्वजीत पतंगराव कदम
48 जाट – विक्रमसिंह बाळासाहेब सावंत

धनंजय मुंडेंनी लाडक्या बहिणींसोबत भरला उमेदवारी अर्ज

0

बीड – राष्ट्रवादी काँग्रेसचे (अजित पवार) उमेदवार धनंजय मुंडे यांनी गुरुवारी परळी विधानसभा मतदारसंघातून आपला विधानसभा निवडणुकीसाठी उमेदवारी अर्ज दाखल केला. यावेळी धनंजय मुंडे यांनी कुठलेही शक्तीप्रदर्शन केले नाही.

धनंजय मुंडे यांनी गुरुपुष्यामृत मुहूर्तावर विधानसभेचा उमेदवारी अर्ज भरणे पसंत केले. धनंजय मुंडे यांनी बीडच्या परळी तहसील कार्यालयामध्ये भाजपच्या नेत्या विधान परिषदेच्या आ.पंकजा मुंडे आणि माजी खासदार प्रीतम मुंडे यांच्या उपस्थितीत विधानसभेसाठी उमेदवारी अर्ज दाखल केला.
परळीतून उमेदवारी अर्ज भरल्यानंतर धनंजय मुंडे यांनी पहिली प्रतिक्रिया दिली. धनंजय मुंडे माध्यमांशी बोलताना म्हणाले, ‘यंदा पंकजा मुंडे यांच्यासोबत मी स्वतः माझा उमेदवारी अर्ज दाखल केला. पंकजा मुंडे या उमेदवार असताना मी त्यांचा सूचक होतो, त्यावेळी मी त्यांना घरी घ्यायला गेलो होतो आणि आज तोच क्षण पुन्हा आला. आज माझी बहीण माझ्यासाठी माझा उमेदवारी अर्ज दाखल करण्यासाठी आली. हा वेगळाच आनंद आहे.’ असे धनंजय मुंडे यांनी म्हटले.
उमेदवारी अर्ज दाखल केल्यानंतर धनंजय मुंडे म्हणाले की, ‘कोणतीही निवडणूक असली तरी मी ती सहज घेत नाही. लढाई ही लढाई असते. या लढाईमध्ये आपण संपूर्णपणे झोकून देऊन विजय प्राप्त करायचा प्रयत्न करत असतो. त्यामुळे मी ही निवडणूक पूर्ण ताकदीने लढणार आहे. लोकसभेमध्ये आम्ही बहीण-भाऊ एकत्र होतो. पंकजा मुंडे यांना परळी मतदारसंघातून 75 हजारांचे मताधिक्य मिळाले होते म्हणून मी ही निवडणूक सहजपणे घेणार नाही.’
धनंजय मुंडे यांचा अर्ज दाखल करताना त्यांच्या लाडक्या बहिणी त्यांच्यासोबत होत्या. माजी खासदार प्रीतम मुंडे आणि आमदार पंकजा मुंडे यांच्यासोबतच राष्ट्रवादी काँग्रेसच्या कार्यकर्त्या महिलाही त्यांचा अर्ज दाखल करताना सोबत उपस्थित होत्या.

शेतातील विद्युत पोलच्या ताण तारेला स्पर्श झाल्याने बाप लेकाचा मृत्यू

0

आष्टी — शेतात काम करत असलेल्या बाप लेकाला शेतात असलेल्या विद्युत खांबाच्या ताणतारेत करंट उतरला होता. त्याला स्पर्श झाल्याने विजेचा धक्का लागून दोघांचाही मृत्यू झाला. ही घटना मंगळवारी दुपारी टाकळसिंग येथे घडली. रात्री उशिरा दोघांवरही एकाच चितेवर अंत्यसंस्कार करण्यात आले.

दादासाहेब विनायक कुमकर वय 55 वर्ष, बिभीषण दादासाहेब कुमकर वय 32 वर्ष अशी मयत पिता-पुत्रांची नावे आहेत.

टाकळसिंग येथील शेतकरी दादासाहेब कुमकर व बिभीषण कुमकर हे आपल्या शेतात नव्याने डाळिंब बागाची लागवड करण्यासाठी काम करत होते. यावेळी शेतातील विद्युत खांबाला असलेल्या ताणतारेला करंट उतरला होता. या तान तारेला स्पर्श झाल्याने दोघांना विजेचा धक्का बसला. यात त्यांचा मृत्यू झाल्याचे सांगितले जात आहे. घटनेची माहिती कळताच नातेवाईक, शेजारील नागरिकांनी शिवारात धाव घेतली. बिभीषण यास उपचारासाठी जामखेड येथे घेऊन जाताना वाटेतच प्राणज्योत मालवली. तर त्याचे वडील दादासाहेब यांना आष्टी येथील रुग्णालयात दाखल केले, परंतु त्यांचाही मृत्यू झाला.घटनेची माहिती कळताच पोलिस निरीक्षक शरद भुतेकर, पोह. अशोक शिंदे, पोना. प्रवीण क्षीरसागर, पोशि. मजर सय्यद, पोशि. राजाभाऊ सदगुणे यांनी धाव घेतली. घटनास्थळाचा पंचनामा करून मृतदेह शव विच्छेदनासाठी आष्टी येथील ग्रामीण रुग्णालयात पाठविला. शवविच्छेदनानंतर मंगळवारी रात्री टाकळसिंग येथे एकाच चितेवर बाप लेकाच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार करण्यात आले. दादासाहेब कुमकर यांना पत्नी, मुलगा, मुलगी तर बिभीषण कुमकर यांना पत्नी, मुलगा, मुलगी असा परिवार आहे.

शरद पवार गटाची पहिली यादी जाहीर; आष्टीत नवा भिडू तर केजात साठे

0

मुंबई –राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी पत्रकार परिषद घेतली. यावेळी त्यांनी विधानसभा निवडणुकीसाठीच्या उमेदवारांची पहिली यादी जाहीर केली. जयंत पाटील यांनी पहिल्या यादीत शरद पवार गटाच्या एकूण 45 उमेदवारांची नावे जाहीर केली.

यामध्ये बारामती मतदार संघाचा देखील समावेश आहे. बारामतीमधून शरद पवार गटाकडून युगेंद्र पवार यांना उमेदवारी जाहीर करण्यात आली आहे. त्यामुळे बारामतीत उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या विरुद्ध पुतणे युगेंद्र पवार यांच्यात आता थेट लढत बघायला मिळणार आहे.त्यामुळे अजित पवार यांच्यासाठी ही लढाई कठीण असणार आहे. बीडचा सस्पेन्स कायम ठेवला असून आष्टीतून मेहबूब शेख तर केज मधून पृथ्वीराज साठे यांना उमेदवारी देण्यात आली आहे.

शरद पवार गटाकडून जाहीर करण्यात आलेल्या यादीत मेहबूब शेख, राणी लंके, भाग्यश्री आत्राम, रोहित पाटील अशा नावांचा समावेश आहे. शरद पवार गटाकडून हर्षवर्धन पाटील, सररजित घाटगे, उदगीरचे सुधाकर भालेकर यांना देखील उमेदवारी जाहीर करण्यात आली आहे. हे तीनही नेते भाजपमधून शरद पवार गटात आले आहेत. तसेच खासदार निलेश लंके यांच्या पत्नी राणी लंके यांना उमेदवारी जाहीर करण्यात आली आहे. मुक्ताईनगरमधून आमदार एकनाथ खडसे यांच्या कन्या रोहिणी खडसे यांना उमेदवारी जाहीर करण्यात आली आहे.

वाचा उमेदवारांची यादी

इस्लामपूर – जयंत पाटील
काटोल – अनिल देशमुख
घनसावंगी – राजेश टोपे
कराड उत्तर – बाळासाहेब पाटील
मुंब्रा-कळवा – जितेंद्र आव्हाड
कोरेगाव – शशिकांत शिंदे
बसमत – जयप्रकाश दांडेगावकर
जळगाव ग्रामीण – गुलाबराव देवकर
इंदापूर – हर्षवर्धन पाटील
राहुरी – प्राजक्त तनपुरे
शिरुर – अशोक पवार
शिराळा – मासिंगराव नाईक
विक्रमगड – सुनील भुसारा
कर्जत – जामखेड – रोहित पवार
अहमदपूर – विनायकराव पाटील
सिंदखेडराजा – राजेंद्र शिंगणे
उदगीर – सुधाकर भालेराव
भोकरदन – चंद्रकांत दानवे
तुमसर – चरण वाघमारे
किनवट – प्रदीप नाईक
जिंतूर – विजय भामरे

केज – पृथ्वीराज साठे
बेलापूर – संदीप नाईक
वडगाव शेरी – बापूसाहेब पठारे
जामनेर – दिलीप खोडपे
मुक्ताईनगर – रोहिणी खडसे
मूर्तिजापूर – सम्राट डोंगरदिवे
नागपूर पूर्व – दिनेश्वर पेठे
किरोडा – रविकांत गोपचे
अहिरी – भाग्यश्री आत्राम
बदनापूर – बबलू चौधरी
मुरबाड – सुभाष पवार
घाटकोपर पूर्व – राखी जाधव
आंबेगाव – देवदत्त निकम
बारामती – युगेंद्र पवार
कोपरगाव – संदीप वरपे
शेवगाव – प्रताप ढाकणे
पारनेर – राणी लंके
आष्टी – मेहबूब शेख
करमाळा – नारायण पाटील
सोलापूर शहर उत्तर – महेश कोठेे
चिपळूण – प्रशांत यादव
कागल – समरजीत घाटगे
तासगाव-कवठे महंकाळ – रोहीतपाटील
हडपसर – प्रशांत जगताप

अजित पवारांचे उमेदवार ठरले; धनंजय मुंडे, प्रकाश सोळंके पुन्हा मैदानात

0

मुंबई — राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाने आज 37 उमेदवारांची पहिली यादी जाहीर केली आहे. माजलगाव मधून प्रकाश सोळंके यांच्याच नावावर पुन्हा एकदा शिक्कामोर्तब झाली आहे तर परळी मधून धनंजय मुंडे हे उमेदवार असणार आहेत.
राष्ट्रवादी काँग्रेसची उमेदवार यादी पुढीलप्रमाणे :
बारामती – अजित पवार

येवला – छगन भुजबळ

आंबेगाव – दिलीप वळसे-पाटील

कागल – हसन मुश्रीफ

परळी – धनंजय मुंडे

दिंडोरी – नरहरी झिरवाळ

अहेरी – धर्मरावबाबा आत्राम

श्रीवर्धन – आदिती तटकरे

अमळनेर – अनिल पाटील

उदगीर – संजय बनसोडे

अर्जुनी मोरगाव – राजकुमार बडोले

माजलगाव – प्रकाशदादा सोळंके

वाई – मकरंद पाटील

खेड आळंदी – दिलीप मोहिते

अहमदनगर शहर – संग्राम जगताप

इंदापूर – दत्तात्रय भरणे

अहमदपूर – बाबासाहेब पाटील

शहापूर – दौलत दरोडा

पिंपरी – अण्णा बनसोडे

कळवण – नितीन पवार

कोपरगाव – आशुतोष काळे

अकोले – डॉ. किरण लहामटे

बसमत – चंद्रकांत नवघरे

चिपळूण – शेखर निकम

मावळ – सुनील शेळके

जुन्नर – अतुल बेनके

मोहोळ – यशवंत माने

हडपसर – चेतन तुपे

देवळाली – सरोज आहिरे

चंदगड – राजेश पाटील

इगतपुरी – हिरामण खोसकर

तुमसर – राजू कारेमोरे

पुसद – इंद्रनील नाईक

अमरावती – सुलभा खोडके

नवापूर – भरत गावित

पाथरी – निर्मला विटेकर

मुंब्रा-कळवा – नजीब मुल्ला

दराडेंचा धडाका; गुटखा माफिया नंतर कोट्यावधीचा गुटखा कंटेनर पकडला

0

बीड — बीडचा फरार गुटखा माफिया जेरबंद केल्यानंतर सपोनी बाळराजे दराडे यांनी बीडच्या जुन्या आरटीओ ऑफिस जवळ गुटख्याने भरलेला कंटेनर लातूरकडे जात असताना पकडला. या कंटेनरवर केलेल्या कारवाईत एक कोटीहून अधिक किमतीचा राज निवास गुटखा पकडला गेला आहे

ग्रामीण पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक बाळराजे दराडे यांनी अवैध धंद्यावर कारवाया करून जिल्ह्याचे लक्ष आपल्याकडे केंद्रित केले आहे. 16 ऑक्टोबर रोजी गेल्या अनेक महिन्यांपासून फरार असलेला गुटखा माफिया महारुद्र मुळे यास पकडण्यात यश मिळवले. त्यानंतरही त्यांचा कारवायाचा धडाका सुरूच आहे.
बुधवारी रात्री 8 च्या सुमारास त्यांनी जुन्या आरटीओ कार्यालया जवळ सापळा रचून गुटख्याने भरलेल्या पूर्ण कंटेनर ताब्यात घेतला आहे. यात राजनिवास हा गुटखा असून तो छत्रपती संभाजी नगरहून लातूरकडे जात असल्याची प्राथमिक माहिती आहे. सपोनि बाळराजे दराडे यांनी केलेल्या या कारवाईमुळे गुटखा माफियांचे मात्र धाबे दणाणले आहेत. दराडे यांनी केलेले या कारवाईत एक कोटीहून अधिक च्या किमतीचा गुटखा असल्याची माहिती दिली जात आहे. सध्या हा कंटेनर पोलीस मुख्यालयात घेऊन जाण्यात आला आहे.