जिल्ह्यातील 63 गावे डोंगरी विभागात सामील करा — माजीमंत्री जयदत्त क्षीरसागर

बीड — बीड जिल्ह्यातील 63 गावांचा डोंगरी विभागात समावेश होणे आवश्यक आहे,जेणे करून या गावांना योजनेचा लाभ घेता येईल,तसेच विद्यार्थ्यांना शैक्षणिक सवलती देखील मिळतील त्याकरीता निकषात बसणार्या गावांचा डोंगरी विभागात समावेश करण्यात यावा व याबाबतचा प्रस्ताव शासनाकडे मंजुरीसाठी सादर करण्यात यावा असे निवेदन माजी मंत्री जयदत्त क्षीरसागर यांनी मा.जिल्हाधिकारी यांना दिले आहे.
बीड जिल्ह्यातील मौजे भवानवाडी, शिवणी, मौजवाडी, ढेकणमोहा तांडा, कारळवाडी, निर्मळवाडी, बाभुळखुंटा, मैंदा, पोखरी, पोखरी (लिंबा), बेलखंडी, कुटेवाडी, भाळवणी, सुर्याचीवाडी, देवर्याचीवाडी, कदमवाडी, पिंपळवाडी, पिंपरनई, करचुंडी, मंझरी, कारेगव्हाण, धनगरवाडी, कोळवाडी, समनापूर, काठोडा, कपीलधारवाडी (पाली) हे बीड तालुक्यातील तर शिरूर तालुक्यातील ढोकरवाडी, रूपेवाडी, बरगवाडी, घुगेवाडी, खरगवाडी, धनगरवाडी, भानकवाडी (व.), भानकवाडी (खा.), हटकरवाडी, आव्हळवाडी, सांगळवाडी, डोळ्याचीवाडी, ढिसलेवाडी, वंजारवाडी, येवलवाडी तर केज तालुक्यातील लिंबाचीवाडी, कोल्हेरवाडी, काशिदवाडी, येवता, बेंगळवाडी, धारूर तालुक्यातील पिंपळटक्का, पिंपरवाडा, सोनी मोहा, चारदरि, अंबेवडगाव, धुनकवड (नं.1), धुनकवड (नं.2), घागरवाडा, रेपेवाडी, पहाडी पारगाव, गोपाळपूर (तांडा), चोंडी, गावंदर, अरणवाडी, सोन्ना खोटा, कोढारबन, थेटे गव्हाण आदि गावांचा डोंगरी विभागात समावेश करण्यात यावा जेणे करून या गावच्या विकासासाठी शासनाच्या डोंगरी योजनेतून भरीव निधी मिळेल तसेच विद्यार्थ्यांना शैक्षणिक सवलतीचा लाभ मिळेल असे निवेदन माजी मंत्री जयदत्त क्षीरसागर यांनी मा.जिल्हाधिकारी यांना दिले आहे