Physical Address
304 North Cardinal St.
Dorchester Center, MA 02124
Physical Address
304 North Cardinal St.
Dorchester Center, MA 02124

केज ऊसतोड मजूर मृत्यू प्रकरणाने बीड जिल्ह्याला हादरवले आहे. उचलीच्या वादातून झालेल्या मारहाणीनंतर उपचारादरम्यान मृत्यू झाला.
केज — ऊसतोडणीसाठी घेतलेली उचल परत करण्याच्या कारणावरून झालेल्या मारहाणीत ५५ वर्षीय ऊसतोड कामगाराचा मृत्यू झाल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. बाबासाहेब तोगे असे मृत कामगाराचे नाव असून, या प्रकरणी ऊसतोड मुकादमासह तिघांविरुद्ध केज पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. मृतदेह केज पोलिस ठाण्यात आणल्यानंतर नातेवाईकांनी केलेल्या आक्रमक पाठपुराव्यामुळे अखेर गुन्हा नोंदवण्यात आला.
मिळालेल्या माहितीनुसार, केज तालुक्यातील मुंडेवाडी येथील रहिवासी बाबासाहेब तोगे (वय ५५) यांनी ऊसतोडणीच्या कामासाठी उचल घेतली होती. मात्र, घेतलेली रक्कम परत करावी किंवा ऊसतोडणीसाठी कामावर यावे, असा तगादा त्यांच्यामागे लावण्यात आला होता. याच कारणावरून सांगवी (ता. केज) येथील अशोक काशीनाथ केदार, नानाभाऊ काशीनाथ केदार आणि राधाबाई अशोक केदार या तिघांनी सुमारे पंधरा दिवसांपूर्वी तोगे यांना मारहाण केली. त्यानंतर त्यांना सांगली येथील साखर कारखान्यावर नेण्यात आले होते.
मारहाणीनंतर बाबासाहेब तोगे यांची प्रकृती खालावली. त्यामुळे त्यांना सांगली येथील वसंतदादा पाटील शासकीय रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले. मात्र, उपचार सुरू असतानाच १३ नोव्हेंबर रोजी त्यांची प्राणज्योत मालवली. या घटनेनंतर सांगलीतील विश्रामबाग पोलिस ठाण्यात आकस्मिक मृत्यूची नोंद करण्यात आली. वैद्यकीय अधिकारी डॉ. निखिता धोमाणे यांनी मृतदेहाचे शवविच्छेदन केले असून, पुढील तपासणीसाठी व्हिसेरा प्रयोगशाळेत पाठवण्यात आला आहे.
दरम्यान, बाबासाहेब तोगे यांच्या मृत्यूला जबाबदार असलेल्या व्यक्तींवर गुन्हा दाखल करावा, अशी मागणी त्यांच्या कुटुंबीयांनी केली. १४ नोव्हेंबर रोजी मुलगा सचिन तोगे आणि नातेवाईकांनी मृतदेह रुग्णवाहिकेतून थेट केज पोलिस ठाण्यात आणला. रात्री साडेसातच्या सुमारास रुग्णवाहिका पोलिस ठाण्यात दाखल झाली. यावेळी अशोक केदार, नानाभाऊ केदार आणि राधाबाई केदार यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्याची मागणी नातेवाईकांनी लावून धरली.

अखेर शनिवारी रात्री साडेदहा वाजण्याच्या सुमारास केज पोलिसांनी तिन्ही संशयितांविरुद्ध गुन्हा दाखल केला. ऊसतोडणीच्या उचलीच्या वादातून एका मजुराला जीव गमवावा लागल्याने या घटनेने ऊसतोड कामगारांच्या सुरक्षिततेचा प्रश्न पुन्हा ऐरणीवर आला आहे.
केज ऊसतोड मजूर मृत्यू प्रकरणात नातेवाईकांनी आक्रमक भूमिका घेतल्यामुळेच गुन्हा दाखल झाला आहे. 14 नोव्हेंबर रोजी मृतदेह थेट केज पोलिस ठाण्यात आणल्यानंतर पोलिसांनी कारवाई केली. या केज ऊसतोड मजूर मृत्यू प्रकरणामुळे ऊसतोड कामगारांच्या सुरक्षेचा प्रश्न पुन्हा एकदा ऐरणीवर आला आहे.
ऊसतोड कामगारांना उचल देऊन त्यांच्याकडून जबरदस्तीने काम करून घेण्याचे प्रकार बीड जिल्ह्यात वाढले आहेत. केज ऊसतोड मजूर मृत्यू या घटनेनंतर मुकादमांच्या दहशतीवर अंकुश लावण्याची मागणी कामगार संघटनांनी केली आहे. या प्रकरणाचा पुढील तपास केज पोलीस करत आहेत.
बीड जिल्ह्यातील इतर बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा. अधिकृत माहितीसाठी महाराष्ट्र पोलिसांच्या अधिकृत संकेतस्थळाला भेट द्या.