पवनचक्की कंपन्यांच्या मनमानीविरोधात शेतकरी रस्त्यावर; चौसाळ्यात रास्ता रोको

Spread the love

beed pavanchakki shetkari andolan मुळे बीड जिल्हा हादरला आहे. पवनचक्की कंपन्यांच्या मनमानीविरोधात शेतकरी रस्त्यावर उतरले आहेत.

दीपावलीच्या हार्दिक शुभेच्छा युवा सेना बीड जिल्हा

- जाहिरात -

बीड — पवनचक्की प्रकल्पांच्या कामातून शेतकऱ्यांच्या जमिनीवर अतिक्रमण, अपुरा मोबदला आणि विरोध करणाऱ्यांना गुन्ह्यांच्या धमक्या दिल्या जात असल्याचा आरोप करत शेतकरी हक्क मोर्चाने बुधवारी (दि. १८) चौसाळा येथे रास्ता रोको आंदोलन केले. पवनचक्की कंपन्यांच्या मनमानीला महसूल आणि पोलीस प्रशासनाकडून अभय मिळत असल्याचा आरोपही आंदोलकांनी केला. पवनऊर्जा प्रकल्पांसाठी स्थापन केलेल्या संनियंत्रण समित्या केवळ कागदावरच असल्याचा मुद्दा उपस्थित करत प्रशासनाच्या कार्यपद्धतीवर संताप व्यक्त करण्यात आला.

बीड तालुक्यातील बालाघाट परिसरातील चौसाळा, कानडीघाट, गोलंग्री, माळेवाडी, बोरखेड, घारगाव, रुईगव्हाण, वडवाडी आणि बाभळगाव या भागांत पवनचक्की कंपन्यांचे प्रकल्प सुरू आहेत. या प्रकल्पांच्या कामांदरम्यान शेतकऱ्यांच्या संमतीशिवाय जमिनीत विद्युत खांब उभारणे, शेतातून वीजवाहिन्या टाकणे आणि योग्य मोबदला न देणे असे प्रकार घडत असल्याचा आरोप शेतकरी हक्क मोर्चाने केला आहे.

चौसाळा बसस्थानकासमोर झालेल्या आंदोलनात शेतकऱ्यांनी कंपन्यांच्या मनमानीविरोधात जोरदार घोषणाबाजी केली. शेतकऱ्यांची आर्थिक लूट थांबवा, पवनचक्की कंपन्यांची दादागिरी बंद करा आणि शेतकऱ्यांच्या तक्रारींची दखल घ्या, अशा मागण्या यावेळी करण्यात आल्या.

संनियंत्रण समित्या असूनही शेतकऱ्यांना न्याय का नाही?

पवनऊर्जा प्रकल्पांशी संबंधित तक्रारींचे निराकरण करण्यासाठी महाराष्ट्र शासनाच्या उद्योग, ऊर्जा व कामगार विभागाने २१ ऑक्टोबर २०१३ रोजी शासन आदेश काढून जिल्हा, तालुका आणि उपविभागीय स्तरावर संनियंत्रण समित्या स्थापन करण्याची तरतूद केली आहे.

beed pavanchakki shetkari andolan
बीड : चौसाळा बसस्थानकासमोर पवनचक्की कंपन्यांच्या मनमानीविरोधात शेतकरी हक्क मोर्चाचे रास्ता रोको आंदोलन

जिल्हास्तरीय समितीचे अध्यक्ष जिल्हाधिकारी असून पोलीस अधीक्षक आणि जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी सदस्य आहेत. उपविभागीय समितीचे अध्यक्ष उपविभागीय अधिकारी, तर तहसीलदार सचिव आहेत.

जमीन व्यवहारांची कायदेशीर तपासणी, शेतकऱ्यांना योग्य मोबदला मिळतो की नाही याची खातरजमा, तक्रारींची चौकशी आणि शेतकरी व प्रकल्प विकासक यांच्यात समन्वय साधणे ही समित्यांची प्रमुख कामे आहेत. मात्र, बीड जिल्ह्यात या समित्यांचे कामकाज प्रभावीपणे होत नसल्याचा आरोप डॉ. गणेश ढवळे यांनी केला. तक्रारी करूनही कारवाई होत नसल्याने कंपन्यांची मनमानी वाढत असल्याचे त्यांनी म्हटले.

beed pavanchakki shetkari andolan – शेतकऱ्यांच्या 5 प्रमुख तक्रारी काय?

आंदोलनकर्त्यांनी पवनचक्की कंपन्यांच्या कामकाजाबाबत पाच प्रमुख आक्षेप नोंदवले आहेत.

– शेतकऱ्यांची लेखी परवानगी न घेता जमिनीत विद्युत खांब उभारणे.

– शेतातून बळजबरीने विद्युत वाहिन्या टाकणे आणि पोल उभारणे.

– योग्य मोबदला न देता किंवा वटणार नसलेले धनादेश देऊन आर्थिक नुकसान करणे.

– कामाला विरोध करणाऱ्या शेतकऱ्यांना दमदाटी करून खंडणीचे गुन्हे दाखल करण्याची धमकी देणे.

– महसूल आणि पोलीस यंत्रणेतील काही अधिकाऱ्यांच्या संगनमताने बेकायदेशीर जमीन अधिग्रहण सुरू असल्याचा संशय.

या तक्रारींची निष्पक्ष चौकशी करून संबंधित कंपन्या आणि दोषी अधिकाऱ्यांवर कारवाई करण्याची मागणी आंदोलनकर्त्यांनी केली.

जिल्हाधिकाऱ्यांमार्फत मुख्यमंत्र्यांना निवेदन

आंदोलनानंतर जिल्हाधिकाऱ्यांमार्फत मुख्यमंत्री तथा ऊर्जामंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि पालकमंत्री सुनेत्रा पवार यांना निवेदन पाठविण्यात आले. तहसीलदार चंद्रकांत शेळके आणि नेकनूर पोलीस ठाण्याचे सहायक पोलीस निरीक्षक मंगेश साळवे यांनी निवेदन स्वीकारले. यावेळी नेकनूर पोलीस ठाण्याचे पोलीस उपनिरीक्षक आणि कर्मचारी उपस्थित होते.

आंदोलनात डॉ. गणेश ढवळे लिंबागणेशकर, अशोक लोढा, डॉ. बाबुराव जोगदंड, डॉ. दिलीप मोटे, सुधाकर गुंजाळ, अशोक जोगदंड, संभाजी कदम, बाळासाहेब मोरे पाटील, सचिन आंधळे, काकासाहेब शिंदे, काकासाहेब जोगदंड, कल्याण महाराज जगताप, श्रीकांत कवडे, विजय झोडगे, माऊली शिंदे, प्रवीण आनेराव, राजेंद्र आमटे, माजी सैनिक अशोक येडे, सय्यद सादेक, रामधन जमाले, भीमराव कुटे आणि रेवण मोरे यांच्यासह परिसरातील शेतकरी सहभागी झाले होते.

संनियंत्रण समित्यांच्या कामकाजाचा तातडीने आढावा घेऊन शेतकऱ्यांच्या तक्रारींची चौकशी करावी, बेकायदेशीर कामांना आळा घालावा आणि दोषींवर कारवाई करावी, अशी मागणी करण्यात आली. अन्यथा आंदोलन अधिक तीव्र करण्याचा इशाराही शेतकरी हक्क मोर्चाने दिला.

beed pavanchakki shetkari andolan हा केवळ चौसाळ्यापुरता मर्यादित नाही. बालाघाट परिसरातील कानडीघाट, गोलंग्री, माळेवाडी, बोरखेड, घारगाव, रुईगव्हाण, वडवाडी आणि बाभळगाव या गावातील शेतकऱ्यांना देखील हाच त्रास होत आहे. शेतकऱ्यांच्या जमिनीत परवानगीशिवाय खांब उभारले जात आहेत. योग्य मोबदला मिळत नाही. beed pavanchakki shetkari andolan मुळे आता प्रशासनाला जाग आली आहे. संनियंत्रण समित्यांनी काम केले पाहिजे, अशी मागणी शेतकरी करत आहेत. जर कारवाई झाली नाही तर आंदोलन अधिक तीव्र करण्याचा इशारा शेतकरी हक्क मोर्चाने दिला आहे. शेतकऱ्यांना न्याय मिळेपर्यंत हे आंदोलन सुरूच राहणार आहे.

beed pavanchakki shetkari andolan मुळे शेतकऱ्यांना न्याय मिळेल अशी अपेक्षा आहे.

अधिक माहितीसाठी महाराष्ट्र शासनाच्या संकेतस्थळाला भेट द्या. हे देखील वाचा: बीड चंपावती शाळा शिक्षणाधिकारी प्रकरण

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *