Home क्राईम नाशिक दिंडोरी अपघात : उघड्या विहिरीत कार कोसळून ९ जणांचा मृत्यू, इंदोरे...

नाशिक दिंडोरी अपघात : उघड्या विहिरीत कार कोसळून ९ जणांचा मृत्यू, इंदोरे गावात शोककळा

0
9

Dindori well accident news  नाशिक —  दिंडोरी तालुक्यात घडलेल्या भीषण अपघाताने संपूर्ण परिसर हादरला आहे. दिंडोरी तालुक्यातील इंदोरे गावाजवळ शुक्रवारी रात्री उघड्या विहिरीत कार कोसळून ९ जणांचा दुर्दैवी मृत्यू झाला. या घटनेमुळे इंदोरे गावासह संपूर्ण तालुक्यात शोककळा पसरली आहे.

शुक्रवारी रात्री दिंडोरी शहरात एका खाजगी क्लासचे वार्षिक स्नेहसंमेलन व गुणगौरव समारंभ पार पडला होता. कार्यक्रमानंतर इंदोरे गावातील दरगुडे कुटुंबीय आणि काही विद्यार्थी कारने (MH15-JS-1053) घरी परतत होते. रात्री सुमारे १० वाजण्याच्या सुमारास शिवाजी नगर परिसरात पाण्याने भरलेल्या उघड्या विहिरीत ही कार अचानक कोसळली.
घटनेची माहिती मिळताच स्थानिक नागरिकांनी तातडीने मदतकार्य सुरू केले. त्यानंतर पोलीस, अग्निशमन दल आणि आपत्ती व्यवस्थापन पथक घटनास्थळी दाखल झाले. विहिरीत पाणी मोठ्या प्रमाणात असल्याने आणि अंधारामुळे बचावकार्य अडचणीचे ठरले. अखेर तीन हायड्रा क्रेनच्या सहाय्याने मध्यरात्री कार बाहेर काढण्यात यश आले.
कार बाहेर काढल्यानंतर आत असलेल्या सर्व ९ जणांचा बुडून आणि गुदमरून मृत्यू झाल्याचे स्पष्ट झाले. या अपघातात ७ विद्यार्थी आणि २ पालकांचा समावेश असल्याची प्राथमिक माहिती समोर आली आहे. आनंदाच्या कार्यक्रमातून परतणाऱ्या कुटुंबावर काळाने झडप घातल्याने गावात हळहळ व्यक्त होत आहे.
मृतांची नावे:
१) रेश्मा सुनील दरगुडे (२७)
२) आशा अनिल दरगुडे (३२)
३) खुशी अनिल दरगुडे (१४)
४) श्रेयस अनिल दरगुडे (११)
५) राखी सुनील दरगुडे (११)
६) श्रावणी अनिल दरगुडे (११)
७) समृद्धी राजेंद्र दरगुडे (७)
८) माधुरी अनिल दरगुडे (१३)
९) सुनील दत्तू दरगुडे (३२)
या प्रकरणी पोलिसांकडून पुढील तपास सुरू असून, उघड्या विहिरीमुळे झालेल्या या दुर्घटनेबाबत निष्काळजीपणाचा मुद्दाही समोर येत आहे.

NO COMMENTS

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here