एसीबीला पाहताच हवालदाराची कारमधून धूम! पाच हजारांची लाच घेऊन पैशांसह पसार

Spread the love

गेवराई हवालदार लाच

गेवराई हवालदार लाच प्रकरणामुळे बीड जिल्ह्यात खळबळ उडाली आहे.

बीड — लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने (एसीबी) बीड जिल्ह्यात लाचखोरांवर कारवाईचा बडगा उगारला असतानाच गेवराई पोलीस ठाण्यात एक धक्कादायक प्रकार घडला आहे. पाच हजार रुपयांची लाच स्वीकारल्यानंतर एसीबीच्या पथकाला पाहताच एका हवालदाराने फिर्यादी आणि पंचांना कारमधून खाली उतरवले आणि लाचेच्या रकमेसह कार घेऊन पलायन केले. पांडुरंग उत्तम दराडे असे या हवालदाराचे नाव आहे. या प्रकारामुळे पोलीस दलात खळबळ उडाली आहे.

गेवराई हवालदार लाच प्रकरणात नेमकं काय घडलं?

एसीबीचे उपअधीक्षक सोपान चित्तमपल्ले यांनी दिलेल्या माहितीनुसार, चोरीला गेलेल्या कारचा ताबा फिर्यादीला देण्यासाठी हवालदार पांडुरंग दराडे याने पाच हजार रुपयांची मागणी केली होती. न्यायालयीन प्रक्रिया आणि कागदपत्रांची पूर्तता टाळून कार परत मिळवून देतो, त्यासाठी पाच हजार रुपये द्यावे लागतील, असे त्याने फिर्यादीला सांगितले होते.

बीडमधील चंपावती शिक्षण संस्थेतील दुहेरी वेतन घोटाळा वाचा

या मागणीबाबत फिर्यादीने लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे तक्रार केली. तक्रारीची पडताळणी केल्यानंतर एसीबीच्या पथकाने गेवराई पोलीस ठाण्यात सापळा रचला. ठरल्याप्रमाणे हवालदार दराडे याने स्वतःच्या खासगी कारमध्ये बसून फिर्यादीकडून पाच हजार रुपये स्वीकारले. यावेळी पंचही घटनास्थळी उपस्थित होते.

लाचेची रक्कम स्वीकारताच एसीबीच्या पथकाने कारवाईसाठी पुढे हालचाल केली. मात्र, पथकाचा इशारा मिळताच दराडे याला कारवाईची चाहूल लागली. त्याने क्षणाचाही विलंब न करता कारमधील फिर्यादी आणि पंचांना खाली उतरवले आणि लाचेची रक्कम सोबत घेऊन कारसह घटनास्थळावरून पळ काढला. त्यामुळे एसीबीच्या पथकासमोरच हा प्रकार घडल्याने प्रकरणाला वेगळे वळण मिळाले.

या घटनेनंतर बीड लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडून पुढील तपास सुरू आहे. पोलीस ठाण्याच्या परिसरातच लाच स्वीकारणे आणि त्यानंतर एसीबीच्या पथकाला पाहून पलायन करणे, या प्रकारामुळे गेवराई पोलीस ठाणे पुन्हा चर्चेत आले आहे.

गेवराई हवालदार लाच प्रकरणापूर्वी  गेवराई पोलीस ठाण्याचे तत्कालीन पोलीस निरीक्षक किशोर पवार यांना नियंत्रण कक्षात संलग्न करण्यात आले होते. त्यानंतर सुकाळे यांच्या कार्यकाळात पुन्हा लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या कारवाईचा प्रकार समोर आल्याने गेवराई पोलीस ठाण्याच्या कारभाराबाबत चर्चा सुरू झाली आहे.

🚨 लाच मागितली तर गप्प बसू नका!

कोणताही सरकारी अधिकारी / कर्मचारी तुमच्याकडे कामासाठी लाच मागत असेल, तर त्याची माहिती ताबडतोब लाचलुचपत प्रतिबंधक विभागाला (ACB) द्या. तुमचे नाव गोपनीय ठेवले जाते.

📞 टोल फ्री नंबर: 1064

📱 WhatsApp: +91 9930997700

👉 ACB कडे ऑनलाईन तक्रार करा

📲

ताज्या बातम्या सर्वात आधी मिळवायच्या आहेत का?

बीड सह राज्यातील ताज्या बातम्या, थेट तुमच्या WhatsApp वर - अगदी फ्री

WhatsApp चॅनल Follow करा →

✓ 100% फ्री   •   ✓ रोज अपडेट   •   ✓ कधीही Unfollow करू शकता

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *