नापास करण्याची धमकी देत ११ महिने लैंगिक छळ! बीडमध्ये प्राध्यापकाचे संतापजनक कृत्य उघड

Spread the love

बीड प्राध्यापक लैंगिक छळ प्रकरणबीड प्राध्यापक लैंगिक छळ प्रकरण समोर आल्याने बीड शहरात मोठी खळबळ उडाली आहे.

बीड — वैद्यकीय शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थिनीचा महाविद्यालयातील प्राध्यापकानेच लैंगिक छळ केल्याची धक्कादायक घटना बीड शहरात उघडकीस आली आहे. परीक्षेत कमी गुण देऊन नापास करेन, तसेच पाच वर्षे एकाच वर्गात बसवून ठेवेन, अशी धमकी देत आरोपी प्राध्यापकाने विद्यार्थिनीवर दबाव टाकल्याची तक्रार आहे. तब्बल ११ महिने हा प्रकार सुरू होता. अखेर त्रासाला कंटाळून विद्यार्थिनीने पोलिसांत तक्रार दिल्यानंतर शिवाजीनगर पोलिसांनी आरोपी प्राध्यापकाला अटक केली आहे.

डॉ. अनिस अहमद असे अटक करण्यात आलेल्या प्राध्यापकाचे नाव आहे. बीडमधील होमिओपॅथिक वैद्यकीय महाविद्यालयात द्वितीय वर्षात शिक्षण घेणाऱ्या २२ वर्षीय विद्यार्थिनीने त्याच्याविरोधात तक्रार दाखल केली आहे.

बीड प्राध्यापक लैंगिक छळ प्रकरण नेमकं घडलं कसं?

पोलिसांत दाखल तक्रारीनुसार, संबंधित विद्यार्थिनीला पीसीओडीचा (PCOD) त्रास असल्याने ती नियमित तपासणीसाठी महाविद्यालयाच्या रुग्णालयात जात होती. जानेवारी २०२६ मध्ये तपासणीच्या निमित्ताने प्राध्यापक डॉ. अनिस अहमद याने तिच्याशी जवळीक साधण्याचा प्रयत्न केला. याच वेळी त्याने चुकीच्या पद्धतीने स्पर्श करून तिचा लैंगिक छळ केल्याचे तक्रारीत नमूद आहे.

बीडमधील चंपावती शिक्षण संस्थेतील दुहेरी वेतन घोटाळा वाचा

यानंतर उपचार आणि तपासणीच्या कारणावरून विद्यार्थिनीला वारंवार बोलावण्यात आले. गेल्या ११ महिन्यांत तीन ते चार वेळा अशाच प्रकारे गैरवर्तन केल्याचा आरोप प्राध्यापकावर करण्यात आला आहे.

  बीड प्राध्यापक लैंगिक छळ प्रकरण  नापास करण्याची धमकी देऊन दबाव

विद्यार्थिनीने प्राध्यापकाच्या वर्तनाला विरोध केला असता, त्याने तिला परीक्षेत कमी गुण देण्याची आणि नापास करण्याची धमकी दिल्याचे तक्रारीत म्हटले आहे. एवढेच नव्हे, तर हा प्रकार कोणाला सांगितल्यास पाच वर्षे एकाच वर्गात बसवून ठेवेन, अशी धमकीही त्याने दिली. शैक्षणिक नुकसान होण्याच्या भीतीपोटी विद्यार्थिनीने बराच काळ हा प्रकार सहन केला.

बीड प्राध्यापक लैंगिक छळ प्रकरण: अखेर पोलिसांत तक्रार; प्राध्यापकाला अटक

सततचा त्रास आणि धमक्यांमुळे मानसिक दबावाखाली आलेल्या विद्यार्थिनीने अखेर शिवाजीनगर पोलीस ठाणे गाठले. तिने पोलिसांना संपूर्ण प्रकार सांगत प्राध्यापकाविरोधात तक्रार दाखल केली. या तक्रारीच्या आधारे पोलिसांनी डॉ. अनिस अहमद याच्याविरोधात विनयभंग आणि लैंगिक छळासंबंधी विविध कलमांनुसार गुन्हा दाखल करून त्याला अटक केली आहे.

या घटनेमुळे बीडमधील शैक्षणिक आणि वैद्यकीय क्षेत्रात खळबळ उडाली आहे. विद्यार्थ्यांच्या सुरक्षिततेचा आणि शिक्षकांकडून मिळणाऱ्या संरक्षणाचा प्रश्न या घटनेमुळे पुन्हा ऐरणीवर आला आहे. या प्रकरणाचा पुढील तपास शिवाजीनगर पोलीस करत आहेत.

हे देखील वाचा: बीड पोलीस आपल्या बांधवावर – सविस्तर बातमी वाचा

बीड पोलीस अधिकृत संकेतस्थळ

📲

ताज्या बातम्या सर्वात आधी मिळवायच्या आहेत का?

बीड सह राज्यातील ताज्या बातम्या, थेट तुमच्या WhatsApp वर - अगदी फ्री

WhatsApp चॅनल Follow करा →

✓ 100% फ्री   •   ✓ रोज अपडेट   •   ✓ कधीही Unfollow करू शकता

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *