सावत्र पित्याकडून १३ वर्षीय मुलीवर अत्याचार; गुन्हा दाखल

केज — तालुक्यात नातेसंबंधांना काळिमा फासणारी एक अत्यंत धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. १३ वर्षीय अल्पवयीन मुलीवर तिच्याच सावत्र पित्याने लैंगिक अत्याचार केल्याचा आरोप असून, आरोपीविरुद्ध POCSO Act अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

 घटना नेमकी काय घडली?

मिळालेल्या माहितीनुसार, पीडित मुलीच्या आईने सुमारे ९ वर्षांपूर्वी पहिल्या पतीपासून घटस्फोट घेतल्यानंतर आरोपीसोबत दुसरे लग्न केले होते. या कुटुंबात एक लहान मुलगाही आहे.
९ एप्रिल रोजी, मुलीची आई माहेरी गेली असताना आरोपी घरी आला. घरात मुलगी एकटी असल्याचे पाहून त्याने गैरफायदा घेतल्याचे समोर आले आहे. त्याने आपल्या लहान मुलाला मोबाईलमध्ये गुंतवून ठेवले आणि मुलीशी अयोग्य वर्तन करत जबरदस्ती केली.

 मुलीने दिली आईला माहिती

घटनेनंतर आई घरी परतल्यावर मुलगी घाबरलेली आणि रडत असल्याचे दिसले. सुरुवातीला ती काही बोलली नाही, मात्र आईने विश्वासात घेतल्यावर तिने संपूर्ण प्रकार सांगितला.
पोलिसांत गुन्हा दाखल
यानंतर पीडितेच्या आईने तात्काळ केज पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली. पोलिसांनी आरोपीविरुद्ध:भारतीय न्याय संहिता कलम 64(3)(F), 65(1)
POCSO Act पाॅक्सो ॲक्ट कलम 4 आणि 6
अंतर्गत गुन्हा नोंदवला आहे.या प्रकरणाचा तपास पिंक पथकाचे फौजदार प्रकाश शेळके करत आहेत.

Related Articles

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Stay Connected

0FansLike
0FollowersFollow
0SubscribersSubscribe

Latest Articles