रोहित पवारांचे अन्नत्याग आंदोलन स्थगित; मंत्री गिरीश महाजनांच्या मध्यस्थीनंतर तोडगा

पंढरपूर —  राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे आमदार रोहित पवार यांनी पंढरपूर येथे सुरू केलेले अन्नत्याग आंदोलन अखेर स्थगित केले आहे. मंत्री गिरीश महाजन यांच्या मध्यस्थीनंतर सकारात्मक चर्चा झाल्याने रोहित पवार यांनी आंदोलन मागे घेण्याची घोषणा केली.

रोहित पवार यांच्या आंदोलनाचा आज तिसरा दिवस होता. तीन दिवस उपोषण केल्यामुळे त्यांची प्रकृती खालावली होती. शरीरातील बीपी आणि शुगर कमी झाल्याची माहिती डॉक्टरांनी दिली होती. डॉक्टरांनी सलाईन घेण्याचा सल्ला दिला होता; मात्र मंत्री गिरीश महाजन आल्यानंतरच पुढील निर्णय घेणार असल्याची भूमिका रोहित पवार यांनी घेतली होती.

दरम्यान, रात्री सव्वा दहा वाजण्याच्या सुमारास मंत्री गिरीश महाजन आंदोलनस्थळी दाखल झाले. त्यांनी रोहित पवार यांच्याशी चर्चा केली. यावेळी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याशीही त्यांनी संपर्क साधला. मुख्यमंत्र्यांनी मागण्यांवर सकारात्मक भूमिका घेत लवकरच बैठक घेण्याचे आश्वासन दिल्याची माहिती देण्यात आली.

मंत्री महाजन यांनी सांगितले की, आंदोलन करण्याआधी मुख्यमंत्र्यांशी चर्चा केली असती तर चर्चेतून मार्ग काढता आला असता. आगामी पावसाळी अधिवेशनापूर्वी रोहित पवार आणि शेतकरी नेत्यांच्या शिष्टमंडळाची मुख्यमंत्र्यांसोबत बैठक घेण्यात येईल. या बैठकीत मागण्यांवर योग्य तो निर्णय घेतला जाईल, असे आश्वासन त्यांनी दिले.

यानंतर रोहित पवार यांनी अन्नत्याग आंदोलन स्थगित करत असल्याचे जाहीर केले. पंढरपूरमधील नामदेव पायरी येथे नतमस्तक होऊन त्यांनी उपोषण सोडले.

Related Articles

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Stay Connected

0FansLike
0FollowersFollow
0SubscribersSubscribe

Latest Articles