आष्टी — अहिल्यानगर पोलीस दलात सेवा बजावणाऱ्या आष्टी तालुक्यातील चिंचाळ्यातील पोलीस अंमलदार सुदाम राजकुमार पोकळे वय 29 वर्ष यांचा रस्ता अपघातात मृत्यू झाला. कर्जत तालुक्यातील राशीन येथे गुरुवारी रात्री गस्तीवर असताना ही दुर्दैवी घटना घडली.सुदाम पोकळे हे कर्जत पोलीस ठाण्यांतर्गत राशीन पोलीस चौकी येथे कार्यरत होते. गुरुवारी रात्री ते नेहमीप्रमाणे आपल्या सहकाऱ्यांसह गस्तीवर (पेट्रोलिंग) असताना, एका भरधाव अज्ञात वाहनाने त्यांना जोराची धडक दिली. धडक इतकी भीषण होती की, सुदाम पोकळे यांचा जागीच मृत्यू झाला. कर्तव्य बजावत असतानाच काळाने त्यांच्यावर घाला घातल्याने पोलीस दलासह सर्वत्र हळहळ व्यक्त होत आहे.सुदाम पोकळे यांच्या निधनाचे वृत्त समजताच त्यांच्या मूळ गावी चिंचाळा ता.आष्टी येथे शोककळा पसरली आहे. त्यांच्या पश्चात आई, वडील, भाऊ, पत्नी आणि मुलगा असा मोठा परिवार आहे.
भरधाव वाहनाच्या धडकेत तरुण पोलिस अंमलदाराचा अंत
0
333
Related Articles
- Advertisement -

