ब्रम्हगाव हनुमान मूर्ती विटंबना प्रकरणातील आरोपी जेरबंद

बीडचकलांबा पोलीस ठाण्याच्या हद्दीतील ब्रम्हगाव येथे हनुमान मूर्तीची विटंबना केल्याप्रकरणी पोलिसांनी एका आरोपीला अटक केली आहे. स्थानिक गुन्हे शाखा आणि चकलांबा पोलिसांनी संयुक्त कारवाई करत गुरुवारी रात्री आरोपीला ब्रम्हगावमधूनच ताब्यात घेतले.

गेल्या 28 मे रोजी रात्री अज्ञात व्यक्तीने गावातील हनुमान मंदिरातील मूर्तीला मांसाचा तुकडा चिकटविल्याचा प्रकार घडला होता. दुसऱ्या दिवशी सकाळी ही घटना उघडकीस आल्यानंतर गावात खळबळ उडाली होती. घटनेची माहिती मिळताच चकलांबा पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत पंचनामा करून संबंधित वस्तू जप्त केली.

प्रकरणाचे गांभीर्य लक्षात घेऊन अप्पर पोलीस अधीक्षक समीर शेख, उपविभागीय पोलीस अधिकारी अनिल कटके, स्थानिक गुन्हे शाखेचे प्रमुख शिवाजी बंटेवाड तसेच चकलांबा पोलीस ठाण्याचे प्रभारी अधिकारी सचिन इंगळे यांनी घटनास्थळी भेट दिली होती. यावेळी गावकऱ्यांना शांतता आणि कायदा-सुव्यवस्था राखण्याचे आवाहन करण्यात आले होते.

घटनेनंतर गावात हनुमान मूर्तीचा अभिषेक आणि महाआरती करण्यात आली होती. दरम्यान, पोलिसांनी तांत्रिक तपास व गुप्त माहितीच्या आधारे संशयिताचा शोध घेत अखेर आरोपीला अटक करण्यात यश मिळवले. पुढील तपास सुरू आहे.

Related Articles

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Stay Connected

0FansLike
0FollowersFollow
0SubscribersSubscribe

Latest Articles