Home क्राईम बीडमध्ये मोटार वायर चोरी प्रकरण उघड: मध्यप्रदेशातील टोळीचा पर्दाफाश, 3 आरोपी अटकेत

बीडमध्ये मोटार वायर चोरी प्रकरण उघड: मध्यप्रदेशातील टोळीचा पर्दाफाश, 3 आरोपी अटकेत

0
6

बीड — जिल्ह्यातील शेतकऱ्यांच्या तलाव व नदीमध्ये बसवलेल्या मोटारींच्या वायर चोरीच्या घटना मागील काही दिवसांपासून सातत्याने घडत होत्या. बीड, परभणी आणि जालना जिल्ह्यातील या चोरीमुळे शेतकरी त्रस्त झाले होते. या प्रकरणाची गांभीर्याने दखल घेत पोलीस अधीक्षक नवनीत काँवत यांनी स्थानिक गुन्हे शाखेला तपासाचे आदेश दिले.

स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक शिवाजी बंटेवाड यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक महेश विघ्ने यांच्या पथकाने सर्व घटनास्थळांची पाहणी करून तपास सुरू केला.
तपासादरम्यान पोलिसांना गोपनीय माहिती मिळाली की, मध्यप्रदेशातील काही इसम रुद्राक्ष विक्रीच्या बहाण्याने गावोगाव फिरून रेकी करत होते. त्यानंतर रात्रीच्या वेळी शेतकऱ्यांच्या मोटारींच्या वायर चोरी करत होते.
ही माहिती मिळताच पोलिसांनी तत्काळ कारवाई करत नाशिक जिल्ह्यातील नांदगाव येथे धाड टाकली. येथे संशयितांचा शोध घेऊन तीन आरोपींना ताब्यात घेण्यात आले. यामध्ये
धर्मेंद्र सुक्कल पारधी वय 25, वर्ष जि. कटनी, मध्यप्रदेश ,शेख शफीक शेख बाबू वय 25 वर्ष, माजलगाव, बीड,एक विधीसंघर्षग्रस्त बालक यांचा समावेश आहे. चौकशीदरम्यान आरोपींनी माजलगाव आणि केज परिसरातील विविध ठिकाणी एकूण 6 गुन्हे केल्याची कबुली दिली. त्यांनी आणखी 8 साथीदारांच्या मदतीने ही चोरी केली असल्याचे समोर आले आहे.

आरोपीकडून गुन्ह्याच्या वेळी वापरण्यात आलेल्या 2 मोटारसायकल किंमत सुमारे ₹1.5 लाख रुपये असा मुद्देमल जप्त करण्यात आलास.दर तिन्ही आरोपींना पुढील कारवाईसाठी केज पोलिसांच्या ताब्यात देण्यात आले असून, उर्वरित 8 फरार आरोपींचा शोध सुरू आहे.

पोलीस पथकाची कामगिरी

ही कारवाई पोलीस अधीक्षक नवनीत काँवत, अपर पोलीस अधीक्षक चेतना तिडके, स्थानिक गुन्हे शाखेचे पोनि. शिवाजी बंटेवाड यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आली.
पथकात पोउपनि महेश विघ्ने, पोहवा महेश जोगदंड, जफर पठाण, दिलीप गित्ते, बप्पासाहेब घोडके आणि गणेश मराडे यांचा समावेश होता.

NO COMMENTS

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here